तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन. गुलालविरहित, सनई चौघड्याच्या निनादात भावपूर्ण निरोप अनेक वर्षाची परंपरा कायम, विसर्जन मिरवणूने वेधले लक्ष. तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन... गुलालविरहित, सनई चौघड्याच्या निनादात भावपूर्ण निरोप दिला.. मराठी पत्रकार संघाच्या अनेक वर्षाची परंपरा कायम, विसर्जन मिरवणूने वेधले लक्ष.... तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. दीड दिवसाचा गणरायाची ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी स्थापना करण्यात आली. मंगळवारी तळोदा स्मारक चौकापासून सनईच्या सुरात, चौघड्याच्या निनादात, बाप्पाची पालखीतून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत गुलाल विरहित फूल पाकळ्यांची उधळण करण्यात येत होती. मिरवणुकीत नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, माजी मंत्री ॲड पद्माकर वळवी, राष्ट्रवादीचे योगेश चौधरी, शिवसेना विपुल कुलकर्णी, माजी नगरसेवक सुभाष चौधरी, बापू कलाल, भाजपाचे गौरव वाणी, नगरसेवक शिरीष माळी, सुरज माळी,नगरसेवक कपिल कर्णकार, योगेश पाडवी, अनिल पवार, शैलेश अहिरे भूषण सोनार, श्याम सोनागडवाला, सामाजिक राजकीय मान्यवरांसह पोलिस उपनिरीक्षक गुलाबसिंग पावरा, वाहतूक शाखेचे संदीप महाले, महेश महाले, होमगार्ड यशवंत कुकावलकर मिरवणुकीत सहभाग घेतला. विसर्जन मिरवणुकीत पत्रकार दत्तात्रय सूर्यवंशी, भरत भामरे, सुनील सूर्यवंशी, वसंत मराठे, किरण पाटील, महेंद्र लोहार, कैलास पाडवी, नरेश चौधरी, सम्राट महाजन, हेमंत मराठे, वैभव कर्णकार, सुशील सूर्यवंशी, बापू गुरव, मानसिंग राजपूत आदींनी परिश्रम घेतले.
तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन. गुलालविरहित, सनई चौघड्याच्या निनादात भावपूर्ण निरोप अनेक वर्षाची परंपरा कायम, विसर्जन मिरवणूने वेधले लक्ष. तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन... गुलालविरहित, सनई चौघड्याच्या निनादात भावपूर्ण निरोप दिला.. मराठी पत्रकार संघाच्या अनेक वर्षाची परंपरा कायम, विसर्जन मिरवणूने वेधले लक्ष.... तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. दीड दिवसाचा गणरायाची ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी स्थापना करण्यात आली. मंगळवारी तळोदा स्मारक चौकापासून सनईच्या सुरात, चौघड्याच्या निनादात, बाप्पाची पालखीतून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत गुलाल विरहित फूल पाकळ्यांची उधळण करण्यात येत होती. मिरवणुकीत नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, माजी मंत्री ॲड पद्माकर वळवी, राष्ट्रवादीचे योगेश चौधरी, शिवसेना विपुल कुलकर्णी, माजी नगरसेवक सुभाष चौधरी, बापू कलाल, भाजपाचे गौरव वाणी, नगरसेवक शिरीष माळी, सुरज माळी,नगरसेवक कपिल कर्णकार, योगेश पाडवी, अनिल पवार, शैलेश अहिरे भूषण सोनार, श्याम सोनागडवाला, सामाजिक राजकीय मान्यवरांसह पोलिस उपनिरीक्षक गुलाबसिंग पावरा, वाहतूक शाखेचे संदीप महाले, महेश महाले, होमगार्ड यशवंत कुकावलकर मिरवणुकीत सहभाग घेतला. विसर्जन मिरवणुकीत पत्रकार दत्तात्रय सूर्यवंशी, भरत भामरे, सुनील सूर्यवंशी, वसंत मराठे, किरण पाटील, महेंद्र लोहार, कैलास पाडवी, नरेश चौधरी, सम्राट महाजन, हेमंत मराठे, वैभव कर्णकार, सुशील सूर्यवंशी, बापू गुरव, मानसिंग राजपूत आदींनी परिश्रम घेतले.
- "नवापूर स्थानकावर टॉयलेटला ठोकले 'कुलूप'; हक्काच्या सुविधेसाठी महिला प्रवाशांची ससेहोलपट!" "नवापूर स्थानकावर टॉयलेटला ठोकले 'कुलूप'; हक्काच्या सुविधेसाठी महिला प्रवाशांची ससेहोलपट!" नवापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुविधांसाठी प्रशासनाने टॉयलेट (शौचालय) बांधले खरे, परंतु ते वापरण्यायोग्य नसल्याने अथवा त्याला नेहमी कुलूप ठोकलेले असल्याने प्रवाशांना विशेषतः महिलांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि ३ वरील या सुविधेकडे रेल्वे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले असून, ऐन प्रवासाच्या वेळी महिला आणि वृद्ध प्रवाशांची तुफान ससेहोलपट होत आहे. कुलूपबंद सुविधा, प्रवाशांची अडचण: नवापूर स्थानकातून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. परंतु प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि ३ वर बनवण्यात आलेले स्वच्छतागृह नेहमी कुलूपबंद स्थितीत पहायला मिळते. 'टॉयलेट असूनही वापरता येत नाही' अशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे. महिला व वृद्धांना मोठा मनस्ताप: लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान ट्रेनची वाट पाहणाऱ्या महिला प्रवाशांना, लहान मुलांना आणि वयोवृद्धांना प्रातर्विधी व स्वच्छतेसाठी कुठे जावे, असा गंभीर प्रश्न पडला आहे. प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे महिलांना प्रचंड संकोच आणि त्रासाला सामोरे जावे लागत आहे. स्वच्छतेचा फज्जा आणि दुर्गंधी: एका बाजूला टॉयलेटला कुलूप असल्याने परिसर अस्वच्छ राहतो, तर दुसऱ्या बाजूला उघड्यावर जाण्याशिवाय प्रवाशांकडे पर्याय उरत नाही, ज्यामुळे स्टेशन परिसरात अस्वच्छता पसरत आहे. प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष: प्रवाशांनी यासंदर्भात अनेकदा तोंडी तक्रारी करूनही रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही. "अशा सुविधा जर बंदच ठेवायच्या असतील तर त्या बांधल्या कशासाठी?" असा संतप्त सवाल स्थानिकांकडून आणि प्रवाशांकडून विचारला जात आहे. प्रवाशांची मागणी: नवापूर स्थानकावरील प्लॅटफॉर्म १ आणि ३ वरील कुलूपबंद टॉयलेट्स तात्काळ उघडून ते स्वच्छ व वापरायोग्य करण्यात यावेत. प्रशासनाने याप्रकरणी लवकरात लवकर योग्य ती पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक प्रवाशांनी दिला आहे.3
- नंदुरबार येथील श्रीमती डी आर हायस्कूल येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा नंदुरबार येथील श्रीमती डीआर हायस्कूल येथे 14 सप्टेंबर हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.1
- धुळ्यातील अलहेरा उर्दू शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; वाढत्या आजारांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी विशेष पुढाकार धुळ्यातील अलहेरा उर्दू शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; वाढत्या आजारांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी विशेष पुढाकार धुळ्यातील गरीब नवाज नगर परिसरातील अलहेरा उर्दू प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून परिसरात साचलेल्या पाण्यामुळे मलेरिया, टायफॉइड आणि सर्दी-तापासारख्या साथीच्या आजारांचा फैलाव वाढला होता, ज्यामुळे अनेक शालेय विद्यार्थी आजारी पडत होते. या गंभीर समस्येची दखल घेत, शाळेतील पालक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री जुनेद पठाण साहेब यांनी सुल्तानिया संस्थेच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे शाळेतच शिबीर घेण्याची मागणी केली होती. प्रशासनाने या निवेदनाची त्वरित दखल घेतल्याने हे शिबीर यशस्वीपणे पार पडले. यात शेकडो विद्यार्थ्यांची कसून आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आले, तसेच आवश्यक असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शनही करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे चेअरमन श्री इमरान आजमी साहेब आणि अलहेरा उर्दू प्राथमिक शाळेचे प्र. मुख्याध्यापक श्री नदीम खान गुलशेर खान यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिबिरात डॉक्टर निशा धवन, डॉक्टर बदर सूर्यवंशी आणि आशा वर्कर नफिसा दीदी यांनी अत्यंत काळजीपूर्वक विद्यार्थ्यांची तपासणी करत उत्कृष्ट आरोग्यसेवा पुरवली. या संपूर्ण प्रक्रियेत आणि शिबिराच्या नियोजनात श्री जुनेद पठाण साहेब यांच्यासह श्री हुसेन पिंजारी साहेब, श्री अयाज अहमद अयाज आणि अमजद पठाण साहेब यांनी विशेष परिश्रम घेतले. वाढत्या साथीच्या आजारांच्या काळात शालेय विद्यार्थ्यांसाठी जागेवरच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे धुळे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.1
- धरणगांव येथील चारा बाजार परिसरातील पाण्याची पाईपलाईन फुटल्याने पिण्याचे पाणी रस्त्यावर वाया जात आहे. नगरपालिकेने याच्यावर दखल घेऊन संबंधित पाईपलाईन दुरुस्ती करावी अशी चारा बाजार येथील परिसरातील नागरिकांची मागणी होत आहे1
- सुरगाणा तालुक्यातील दुमी वरंबा रस्त्याची दुरवस्था झाली आहे1
- चांदवडला आगमन मिरवणूकांनी गणरायाची वाजतगाजत प्रतिष्ठापना; ‘वरचे गावचा राजा’ची लक्षवेधी मिरवणूकीने स्थापना; ‘महाकाल अघोरी तांडव’चा सजीव देखावा पाहण्यासाठी नागरीकांची गर्दी चांदवड शहरातील विविध गणेश मंडळांनी आगमन मिरवणूका काढून आपल्या गणरायाची उत्साहात, वाजतगाजत प्रतिष्ठापना केली. गणेश मंडळांच्या सुमारे १५ फुटी भव्य गणेशमूर्तींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील वरचे गाव येथील छत्रपती संभाजी महाराज फेंड सर्कलच्या ‘वरचे गावचा राजा’चा मुखदर्शन व आगमन सोहळा लक्षवेधी ठरला. या मंडळाच्या मिरवणूकीचे विशेष आकर्षण असलेला महाकाल अघोरी तांडव नृत्य प्रयोग हा सजीव देखावा पाहण्यासाठी अबालवृद्ध, बाळगोपाळांसह महिलांनी मोठी गर्दी केली होती. शनिवारी (दि. १२) पहाटे तीन वाजता नंदुरबार येथून निघालेल्या ‘वरचे गावचा राजा’च्या सुमारे १५ फूर्टी भव्य गणेशमूर्तीचे सुमारे १५ तासानंतर शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास चांदवड शहरात आगमन झाले. रविवारी (दि. १३) सायंकाळी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीपासून ‘वरचे गावच्या राजा’च्या आगमन मिरवणूकीस प्रारंभ झाला. मिरवणूकीत डीजे पथक, महाबली हनुमान देखावा, बालाजी देखावा, भगवान शिवशंकराचे रुप, ढोल-ताशांच्या तालावर अघोरी नृत्य करणारे साधू, महाकाली देखावा यासह नाशिक येथील सुमारे १०० सदस्यांचे ढोलताशा पथक सहभागी झाले होते. मिरवणूकीचे विशेष आकर्षण असलेल्या हरियाणा येथील महाकाल अघोरी पथकाचा शिवतांडव, अग्नीतांडव नृत्य प्रयोग हा सजीव देखावा पाहण्यासाठी अबालवृद्ध, बालगोपाळांसह महिला व नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. महाकाल यांचा तिसरा डोळा उघडल्यानंतरचे आक्रमक रुप, कांतारा, कालिकादेवी, महाकाली, शिवपार्वती व अघोरींचे नृत्य चांदवडकरांनी अनुभवले. पथकाने सादर केलेली अग्नी व भस्माच्या चित्तथरारक कसरती पाहण्यासाठी शहरातील रस्ते नागरीकांच्या गर्दीने भरले होते. या मिरवणूकीत तलवारबाजी, लाठीकाठी, दांडपट्टा आदी मर्दानी खेळांच्या प्रदर्शनानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी फटायांची प्रचंड आतषबाजी करण्यात आली. आठवडे बाजार तळ, सोमवार पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्रीराम रोड, शिवनेरी चौक, शिंपी गल्ली मार्गे सुमारे पाच तासानंतर मिरवणूकीची वरचे गाव येथे सांगता झाली. यावेळी गणेशाच्या मुखदर्शनप्रसंगी फटायांची प्रचंड आतषबाजी करण्यात आली. मिरवणूक यशस्वीतेसाठी छत्रपती संभाजी महाराज फेंड सर्कलच्या पदाधिकारी, सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ---- गणेश मंडळांकडून भव्य गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना- संभाजी महाराज फ्रेंड सर्कलच्या मंडळासह शहरातील त्रिलोक गणेश मित्र मंडळ, संत गाडगेबाबा चौक गणेश मित्र मंडळ, हिंदुराजा गणेश मित्र मंडळ, राजमुद्रा फ्रेंड सर्कल आदी विविध मंडळांचाही गणेश आगमन सोहळा वाजतगाजत, डीजे च्या निनादात पार पडला. या मंडळांनीही भव्य गणेशमूतींची वाजतगाजत प्रतिष्ठापना केली. शहरातील शासकीय विश्रामगृहाजवळून निघालेल्या गणेश आगमन मिरवणूकांची मंडळांच्या गणेश प्रतिष्ठापनास्थळी सांगता झाली.4
- वाहेगाव साळ येथे नव्याने हनुमान चौक मित्र मंडाळाची स्थापना सामाजिक व धामी॔क उपक्रमांची सुरुवा तरुण मुले एकत्र येवुन हनुमान चौक मंत्र मंडाळाची स्थापना करुन वष॔ पहीले गणपती बाप्पाची मुती॔ बसुन मित्र मंडळ व पोलीस पाटिल उपस्थतीत गणपती बाप्पाची पहीली आरती घेण्यात आली दरवषी॔ मोठ्या उत्साहात करणार2
- तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन. गुलालविरहित, सनई चौघड्याच्या निनादात भावपूर्ण निरोप अनेक वर्षाची परंपरा कायम, विसर्जन मिरवणूने वेधले लक्ष. तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन... गुलालविरहित, सनई चौघड्याच्या निनादात भावपूर्ण निरोप दिला.. मराठी पत्रकार संघाच्या अनेक वर्षाची परंपरा कायम, विसर्जन मिरवणूने वेधले लक्ष.... तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. दीड दिवसाचा गणरायाची ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी स्थापना करण्यात आली. मंगळवारी तळोदा स्मारक चौकापासून सनईच्या सुरात, चौघड्याच्या निनादात, बाप्पाची पालखीतून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत गुलाल विरहित फूल पाकळ्यांची उधळण करण्यात येत होती. मिरवणुकीत नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, माजी मंत्री ॲड पद्माकर वळवी, राष्ट्रवादीचे योगेश चौधरी, शिवसेना विपुल कुलकर्णी, माजी नगरसेवक सुभाष चौधरी, बापू कलाल, भाजपाचे गौरव वाणी, नगरसेवक शिरीष माळी, सुरज माळी,नगरसेवक कपिल कर्णकार, योगेश पाडवी, अनिल पवार, शैलेश अहिरे भूषण सोनार, श्याम सोनागडवाला, सामाजिक राजकीय मान्यवरांसह पोलिस उपनिरीक्षक गुलाबसिंग पावरा, वाहतूक शाखेचे संदीप महाले, महेश महाले, होमगार्ड यशवंत कुकावलकर मिरवणुकीत सहभाग घेतला. विसर्जन मिरवणुकीत पत्रकार दत्तात्रय सूर्यवंशी, भरत भामरे, सुनील सूर्यवंशी, वसंत मराठे, किरण पाटील, महेंद्र लोहार, कैलास पाडवी, नरेश चौधरी, सम्राट महाजन, हेमंत मराठे, वैभव कर्णकार, सुशील सूर्यवंशी, बापू गुरव, मानसिंग राजपूत आदींनी परिश्रम घेतले.1