यात्रा महोत्सवासाठी कोंडोलीत चोख पोलीस बंदोबस्त मानोरा : प्रतिनिधी तालुक्यातील पवित्र तीर्थक्षेत्र कोंडोली येथे सुरू असलेल्या श्री पिताबर महाराज यांच्या १२३ व्या यात्रा महोत्सवा निमित्त तसेच गुरु श्री गजानन महाराज यांच्या गुरु,शिष्य भेट सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत आहे. यात्रेनिमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. मानोरा पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक नैना पोहेकर, पोलीस उपनिरीक्षक अभिजित बारे, रायटर राहुल जयसिंगकार, व बीट जमादार दीपक राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण यात्रा परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. यात्रास्थळी गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. यासाठी पुरुष व महिला पोलीस कर्मचारी, महिला पोलीस, तसेच होमगार्ड व महिला होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रमुख प्रवेशद्वार, मंदिर परिसर, दिंडी मार्ग व यात्रा मैदान परिसरात सतत गस्त घालण्यात येत असून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. चोख व शिस्तबद्ध बंदोबस्तामुळे भाविकांना कोणतीही अडचण न येता दर्शन व गुरु,शिष्य भेट सोहळा पार पडत आहे. पोलिस प्रशासनाच्या तत्परतेबद्दल नागरिक व भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यात्रा शांततेत व उत्साहात पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज असून भाविकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन ठाणेदार नैना पोहेकर यांनी केले आहे.

- दारव्हा शहरातील कावेरी नगर परिसरात सोमवार दि. १६ फेब्रुवारीला उशिरा रात्री झालेल्या मारहाणीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शाम श्रावण टारपे (वय ५७, रा. कावेरी नगर, दारव्हा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. सै. आवेज सै. जमिल (वय २०, रा. रेल्वे स्टेशन परिसर, दारव्हा) व इनायत अली इरफान अली (वय २५, रा. अशोक नगर पाटीपुरा, यवतमाळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. घटना १६ फेब्रुवारी रोजी रात्री ११.१० ते ११.२० दरम्यान घडली. तक्रारदार यांचा पुतण्या गौरव प्रकाश टारपे (वय २६, रा. कावेरी नगर) हा घराजवळ असताना आरोपींनी त्याच्याशी वाद घालत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर जीवे मारण्याच्या उद्देशाने लाकडी राफ्टरने त्याच्या डोक्यावर व शरीरावर प्रहार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गौरव गंभीर जखमी झाला. प्राथमिक उपचारानंतर त्याला अधिक उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, ही संपूर्ण घटना घराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून मारहाणीचा व्हिडिओ दिवसभर समाजमाध्यमांवर व्हायरल होत होता. पोलिसांनी दोन्ही आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास दारव्हा पोलीस करीत आहेत. सदर घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत असून दारव्हा ठाणेदार यांना शहरातील काही सामाजिक संघटनाणी रात्री ७. ३० वाजता निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी केली.2
- Post by Sharad Dayedar1
- ज्ञानेशप्रसाद, ब्युरो चिफ न्यूज मराठी वाशिम* संवाद:- 9923230821 रिसोड: न. प. चे कर्मचारी विनोद बांगर यांच्यामुळे, गावात पुन्: पक्षांचा चिव चिवाट ऐकायला मिळतोय!1
- *“धानोरा विकासकामांचा भांडाफोड; जलसंधारण घोटाळ्यावर जि.प. प्रशासन कोंडीत!”* - जि.प. यवतमाळसमोर आमरण उपोषणाला सुरवात! उमरखेड : धानोरा (सा), ता. उमरखेड येथील कथित विकासकामांतील गैरव्यवहार आणि जलसंधारण विभागातील अनियमिततेच्या गंभीर आरोपांमुळे जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात संतापाचा ज्वालामुखी उसळला आहे. सोमवारी (दि. १६ फेब्रुवारी २०२६) पासून जिल्हा परिषद यवतमाळ कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात झाली असून प्रशासनावर थेट कारवाईचा दबाव वाढला आहे. पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा या आमरण उपोषणात रामदास अंबादास कांबळे (अध्यक्ष, संयुक्त पत्रकार संघ), शेख इरफान शेख इसा (कार्याध्यक्ष) आणि सुरेंद्रनाथ पंजाबराव दळवी (उपाध्यक्ष) सहभागी झाले आहेत त्यांनी जि.प. कार्यालयासमोर “दोषींवर कारवाई झाल्याशिवाय माघार नाही” असा स्पष्ट इशारा दिला. *धानोरा प्रकरणातील आरोप गंभीर* उपोषणकर्त्यांनी केलेले आरोप थेट जनहिताशी निगडित असून त्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल गैरव्यवहार, स्मशानभूमीकडे जाणाऱ्या सीसी रस्त्याचे काम न करता बिले काढल्याचा आरोप, सार्वजनिक शौचालयाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबत तक्रारींकडे दुर्लक्ष यांचा समावेश आहे. संबंधित प्रकरणांत चौकशी व कार्यवाही न झाल्याने आमरण उपोषण करत असल्याचे त्यांनी सांगितले. *जलसंधारण विभागावर लाखोंच्या भ्रष्टाचाराचा ठपका* जि.प. उपविभाग पुसद येथे कार्यरत उपविभागीय जलसंधारण अधिकारी सीमा तायडे यांच्या कार्यकाळात पुसद, दिग्रस, उमरखेड व महागाव तालुक्यांतील विकासकामांत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. धरण–तलाव गाळ उपसा योजनेत अनियमितता,वीटभट्टी धारकांना नियमबाह्य माती परवाने, संबंधित अधिकाऱ्यांच्या संपत्तीची सखोल चौकशी अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ निलंबन आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. *तक्रारींनंतरही कारवाई नाही* १७ डिसेंबर २०२५ रोजी लेखी निवेदन, ९ जानेवारी २०२६ रोजी स्मरणपत्र आणि ३० जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व ग्रामविकास मंत्र्यांना ई-मेलद्वारे तसेच प्रत्यक्ष तक्रार करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. “दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. उपोषणादरम्यान काही अनुचित घडल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा देत उपोषणकर्त्यांनी उपोषण तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान जि.प. कार्यालया समोर सुरू असलेल्या आमरण उपोषणातील गंभीर आरोपांवर प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.1
- अमरावतीच्या मेळघाटात बैलांचा नाही तर चक्क "बोकडपट"..1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- 🕉️📖 महाशिवरात्री विशेषांकाचे दिमाखदार विमोचन! 📖🕉️ महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त हिमायतनगरमध्ये सुरू असलेल्या भक्तिमय वातावरणात “श्रमिक लोकराज्य” दैनिकाच्या महाशिवरात्री उत्सव 2026 विशेषांकाचे उत्साहात विमोचन संपन्न झाले. या विशेषांकाचे प्रकाशन माजी आमदार मा. माधवराव पाटील जवळगांवकर यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यास मंदिर कमिटी पदाधिकारी, नगरपरिषद प्रतिनिधी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. धर्म, संस्कृती आणि समाजमनाचे दर्शन घडवणारा हा विशेषांक वाचकांसाठी पर्वणी ठरत आहे. 🙏 #श्रमिकलोकराज्य #महाशिवरात्रीविशेषांक #Mahashivratri2026 #हिमायतनगर #दैनिकविमोचन धार्मिकउत्सव ShivBhakti MediaNews NNLDigitalMedia1
- छत्रपती शिवरायांचे विचार युवा पिढीने अंगिकारावे - कुलसचिव डॉ. अविनाश असनारे1