logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या प्रशासकीय कामकाजाची विशेष पथकाकडून चौकसी रिसोड : रिसोडच्या तहसीलदार श्रीमती प्रतीक्षा तेजनकर यांच्या प्रशासकीय कामकाजाबाबत शासनाच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर महसूल विभागाने याप्रकरणी चौकशीचे निर्देश दिले आहेत. तहसीलदार कार्यालयातील संपूर्ण प्रशासकीय कामकाजाची विशेष पथकामार्फत तपासणी करून अहवाल सादर करण्याबाबत शासनस्तरावरून विभागीय आयुक्त, अमरावती विभाग यांना पत्र देण्यात आले आहे. शासनाच्या पत्रानुसार, तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी तहसील कार्यालयामध्ये स्वप्रसिद्धीसाठी व वैयक्तिक प्रसिद्धीसाठी सिनेमॅटिक रिल्स स्वरूपातील व्हिडिओकरण करून ते स्वतःच्या इन्स्टाग्राम खात्यावर प्रसारित केल्याचे तसेच त्याबाबतच्या बातम्या विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. यासंदर्भातील प्रस्ताव महसूल विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या अवलोकनार्थ सादर करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर, तहसीलदार म्हणून कार्यरत असताना करण्यात आलेल्या संपूर्ण प्रशासकीय कामकाजाची विशेष पथकामार्फत तपासणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार विभागीय आयुक्त, अमरावती विभाग यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष पथकाने तहसीलदारांच्या संपूर्ण प्रशासकीय कामकाजाची तपासणी करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल आपल्या अभिप्रायासह एक महिन्याच्या आत शासनास सादर करावा, अशी विनंती संबंधित पत्राद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, या चौकशीमुळे रिसोड तहसील कार्यालयातील प्रशासकीय कामकाजाकडे आता शासनस्तरावरून विशेष लक्ष केंद्रित झाले असून, विशेष पथकाच्या तपासणीत नेमके कोणते निष्कर्ष समोर येतात आणि शासनाकडे कोणता अहवाल सादर केला जातो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

22 hrs ago
user_सारनाथ अवचार
सारनाथ अवचार
पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
22 hrs ago
02a87029-79f4-4f42-9c95-cfec321440d2

तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या प्रशासकीय कामकाजाची विशेष पथकाकडून चौकसी रिसोड : रिसोडच्या तहसीलदार श्रीमती प्रतीक्षा तेजनकर यांच्या प्रशासकीय कामकाजाबाबत शासनाच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर महसूल विभागाने याप्रकरणी चौकशीचे निर्देश दिले आहेत. तहसीलदार कार्यालयातील संपूर्ण प्रशासकीय कामकाजाची विशेष पथकामार्फत तपासणी करून अहवाल सादर करण्याबाबत शासनस्तरावरून विभागीय आयुक्त, अमरावती विभाग यांना पत्र देण्यात आले आहे. शासनाच्या पत्रानुसार, तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी तहसील कार्यालयामध्ये स्वप्रसिद्धीसाठी व वैयक्तिक प्रसिद्धीसाठी सिनेमॅटिक रिल्स स्वरूपातील व्हिडिओकरण करून ते स्वतःच्या इन्स्टाग्राम खात्यावर प्रसारित केल्याचे तसेच त्याबाबतच्या बातम्या विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. यासंदर्भातील प्रस्ताव महसूल विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या अवलोकनार्थ सादर करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर, तहसीलदार म्हणून कार्यरत असताना करण्यात आलेल्या संपूर्ण प्रशासकीय कामकाजाची विशेष पथकामार्फत तपासणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार विभागीय आयुक्त, अमरावती विभाग यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष पथकाने तहसीलदारांच्या संपूर्ण प्रशासकीय कामकाजाची तपासणी करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल आपल्या अभिप्रायासह एक महिन्याच्या आत शासनास सादर करावा, अशी विनंती संबंधित पत्राद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, या चौकशीमुळे रिसोड तहसील कार्यालयातील प्रशासकीय कामकाजाकडे आता शासनस्तरावरून विशेष लक्ष केंद्रित झाले असून, विशेष पथकाच्या तपासणीत नेमके कोणते निष्कर्ष समोर येतात आणि शासनाकडे कोणता अहवाल सादर केला जातो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • माना फाट्यावर प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग! | एसी केबिनमध्ये शॉर्टसर्किट मूर्तिजापूर तालुक्यातील माना फाटा येथे प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. गुजरातमधील दहेज येथून प्लास्टिकचे दाणे घेऊन कलकत्त्याच्या दिशेने जाणाऱ्या NL 01 AJ 4266 क्रमांकाच्या ट्रकच्या एसी केबिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. माना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेत ट्रकच्या एसी केबिनचे मोठे नुकसान झाले असून प्लास्टिकच्या दाण्यांचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने चालकासह कोणालाही दुखापत झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला. 📍 घटनास्थळ: माना फाटा, मूर्तिजापूर तालुका, अकोला 🚛 ट्रक: NL 01 AJ 4266 🔥 प्राथमिक कारण: एसी केबिनमधील शॉर्टसर्किट इंडिया न्यूज आर सेवन | भारताची आवाज उपसंपादक मोहम्मद रिज़वान सिद्दिकी, मूर्तिजापूर बातमी आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा.
    1
    माना फाट्यावर प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग! | एसी केबिनमध्ये शॉर्टसर्किट
मूर्तिजापूर तालुक्यातील माना फाटा येथे प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी सकाळी घडली.
गुजरातमधील दहेज येथून प्लास्टिकचे दाणे घेऊन कलकत्त्याच्या दिशेने जाणाऱ्या NL 01 AJ 4266 क्रमांकाच्या ट्रकच्या एसी केबिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले.
माना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेत ट्रकच्या एसी केबिनचे मोठे नुकसान झाले असून प्लास्टिकच्या दाण्यांचेही नुकसान झाले आहे.
सुदैवाने चालकासह कोणालाही दुखापत झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला.
📍 घटनास्थळ: माना फाटा, मूर्तिजापूर तालुका, अकोला
🚛 ट्रक: NL 01 AJ 4266
🔥 प्राथमिक कारण: एसी केबिनमधील शॉर्टसर्किट
इंडिया न्यूज आर सेवन | भारताची आवाज
उपसंपादक मोहम्मद रिज़वान सिद्दिकी, मूर्तिजापूर
बातमी आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा.
    user_MOHAMMED RIZWAN RAHEMAN
    MOHAMMED RIZWAN RAHEMAN
    Construction Contractor मूर्तिजापूर, अकोला, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • आमच्या गावाची स्वच्छता आमच्या dalambi गावामध्ये खूप प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. ओला कचरा सुखा कचरा आणि घरातील wastage कचरा यामुळे गावात बिमारी च प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.
    3
    आमच्या गावाची स्वच्छता 
आमच्या dalambi गावामध्ये खूप प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. ओला कचरा सुखा कचरा आणि घरातील wastage कचरा यामुळे गावात बिमारी च प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.
    user_विकास इंगळे
    विकास इंगळे
    अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • जुना धामणगांव दलित वस्ती कडे जाणाऱ्या मार्गावरील नालीची समस्या; नागरिकांचे आरोग्य धोक्यात पावसाचे पाणी व गाळ थेट मुख्य रस्त्यावर; विद्यार्थी, वृद्धांसह नागरिकांचे हाल जुना धामणगांव दलित वस्ती कडे जाणाऱ्या मार्गावरील नालीची समस्या; नागरिकांचे आरोग्य धोक्यात पावसाचे पाणी व गाळ थेट मुख्य रस्त्यावर; विद्यार्थी, वृद्धांसह नागरिकांचे हाल प्रतिनिधी : संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे : जुना धामणगांव येथील दलित वस्तीच्या मुख्य मार्गावरील नालीची दुरवस्था झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नालीमध्ये पावसाचे पाणी अथवा मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानंतर नालीतील घाण पाणी, गाळ व कचरा थेट मुख्य रस्त्यावर येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते. तसेच शाळकरी विद्यार्थी, महिला, वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांनाही याच मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र, नालीचे घाण पाणी व गाळ रस्त्यावर साचत असल्याने नागरिकांना त्यातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला असून, दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. नालीतील साचलेले घाण पाणी आणि गाळ यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय नाली व परिसरात पाणी व कचरा साचत असल्याने साप तसेच इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होत असून, नालीची योग्य साफसफाई, दुरुस्ती व पाण्याचा सुरळीत निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. संबंधित विभागाने केवळ तात्पुरती साफसफाई न करता नालीची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी तसेच पावसाचे पाणी रस्त्यावर येणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन नालीची स्वच्छता, गाळ काढणे, दुरुस्ती आणि पाण्याच्या योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे
    1
    जुना धामणगांव दलित वस्ती कडे जाणाऱ्या मार्गावरील नालीची समस्या; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पावसाचे पाणी व गाळ थेट मुख्य रस्त्यावर; विद्यार्थी, वृद्धांसह नागरिकांचे हाल
जुना धामणगांव दलित वस्ती कडे जाणाऱ्या मार्गावरील नालीची समस्या; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
पावसाचे पाणी व गाळ थेट मुख्य रस्त्यावर; विद्यार्थी, वृद्धांसह नागरिकांचे हाल
प्रतिनिधी : संतोष वाघमारे
धामणगांव रेल्वे :
जुना धामणगांव येथील दलित वस्तीच्या मुख्य मार्गावरील नालीची दुरवस्था झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नालीमध्ये पावसाचे पाणी अथवा मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानंतर नालीतील घाण पाणी, गाळ व कचरा थेट मुख्य रस्त्यावर येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते. तसेच शाळकरी विद्यार्थी, महिला, वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांनाही याच मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र, नालीचे घाण पाणी व गाळ रस्त्यावर साचत असल्याने नागरिकांना त्यातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला असून, दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
नालीतील साचलेले घाण पाणी आणि गाळ यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय नाली व परिसरात पाणी व कचरा साचत असल्याने साप तसेच इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरवर्षी पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होत असून, नालीची योग्य साफसफाई, दुरुस्ती व पाण्याचा सुरळीत निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. संबंधित विभागाने केवळ तात्पुरती साफसफाई न करता नालीची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी तसेच पावसाचे पाणी रस्त्यावर येणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नागरिकांच्या आरोग्याचा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन नालीची स्वच्छता, गाळ काढणे, दुरुस्ती आणि पाण्याच्या योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    12 hrs ago
  • अकोली जहागीर शेतशिवारात बिबट्याची दहशत; शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण कुत्र्याची शिकार; दोन-तीन दिवसांपूर्वी रुईखेड शितशिवारात गायीचीही शिकार केल्याची घटना! अकोली जहागीर शेतशिवारात बिबट्याची दहशत; शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण कुत्र्याची शिकार; दोन-तीन दिवसांपूर्वी रुईखेड शितशिवारात गायीचीही शिकार केल्याची घटना! अकोट तालुका प्रतिनिधी... अकोट तालुक्यातील अकोली जहागीर परिसरातील शेतशिवारात बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी व शेतमजूर वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्याने आकोली जहांगीर शेतशिवारात एका कुत्र्याची शिकार केली असून, दोन-तीन दिवसांपूर्वी रुईखेड शेतशिविरात एका गायीचीही शिकार सुद्धा केल्याची घटना घडल्याचे येथील नागरीकांन कडुन सांगण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांमध्ये चिंतेचे व भिंतीचे वातावरण आहे. बिबट्याचा वावर वाढल्याने भविष्यात मनुष्य किंवा पाळीव प्राण्यांवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वन विभागाने तातडीने या परिसराची पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून जोर धरत आहे.
    2
    अकोली जहागीर शेतशिवारात बिबट्याची दहशत; शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण
कुत्र्याची शिकार; दोन-तीन दिवसांपूर्वी रुईखेड शितशिवारात गायीचीही शिकार केल्याची घटना!
अकोली जहागीर शेतशिवारात बिबट्याची दहशत; शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण
कुत्र्याची शिकार; दोन-तीन दिवसांपूर्वी रुईखेड शितशिवारात गायीचीही शिकार केल्याची घटना!
अकोट तालुका प्रतिनिधी...
अकोट तालुक्यातील अकोली जहागीर परिसरातील शेतशिवारात बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी व शेतमजूर वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्याने आकोली जहांगीर शेतशिवारात एका कुत्र्याची शिकार केली असून, दोन-तीन दिवसांपूर्वी रुईखेड शेतशिविरात एका गायीचीही शिकार सुद्धा केल्याची घटना घडल्याचे  येथील नागरीकांन कडुन सांगण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांमध्ये चिंतेचे व भिंतीचे वातावरण आहे.
बिबट्याचा वावर वाढल्याने भविष्यात मनुष्य किंवा पाळीव प्राण्यांवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वन विभागाने तातडीने या परिसराची पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून जोर धरत आहे.
    user_राजकुमार वानखडे राज
    राजकुमार वानखडे राज
    News Anchor अकोट, अकोला, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • मुलींच्या शिक्षणाचे ध्येय बाळगत मॅरेथॉन स्पर्धा जिंकणाऱ्या 47 वर्षीय महिलेचा तहसिलदारांच्या हस्ते सत्कार मुलींच्या शिक्षणाचे ध्येय उराशी बाळगून  साडी परिधान करून, अनवानी पायी चालत जाऊन आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी संघर्ष करत कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथील रमाबाई अशोक रणवीर या 47 वर्षीय महिलेने अंबाजोगाई येथेअमृत दौड़ मॅरेथॉन स्पर्धा जिंकून भल्या भल्या प्रशिक्षित मुलीना लाजवेल अशी मोलाची कामगिरी केली आहे.या पार्श्वभूमीवर कळमनुरीचे तहसीलदार यांनी सोमवारी रमाबाई च्या घरी भेट देऊन सत्कार करून अभिनंदन केले . रमाबाई रणवीर हया अत्यंत गरिब कुटुंबातील महिला आहे .मोलमजुरी करून ती आपली उपजीविका धकवत असते, तिला दोन मुलीच आहेत .याच मजुरीच्या पैशातून ती आपल्या दोन मुलींचे शिक्षण पूर्ण करीत आहे .2012 मध्येच नवऱ्याने साथ सोडली,तेव्हा पासून त्या एकट्या पडल्या आहेत . हालाखीची कठीण परिस्थिती असताना ही तिने आपल्या एका मुलीला नांदेडला शिक्षणाला, तर दुसऱ्या मुलीला अंबाजोगाई येथे एका अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेण्याकरता ठेवले आहे .त्याच अकॅडमी मध्ये त्या स्वयंपाक करण्याचे काम करित होत्या .त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याकरता भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर शैक्षणिक संस्थेच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन मोठ्या कौशल्याने स्पर्धा जिंकली .या पार्श्वभूमीवर कळमनुरी तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी पोत्रा या ठिकाणी येऊन रमाबाई रणवीरचा सत्कार करून अभिनंदन केले आहे .त्यावेळी रमाबाईला घरकुल, शौचालय,या सह सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन तहसीलदार कांबळे यांनी दिले आहे.याप्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी शिवशंकर गुट्टे, पोलीस पाटील अनुराधा मारकोळे, रवी कांबळे,रघूनाथ पाटील, जिजाराम मुलगीर, श्रीकांत मुलगीर,वैभव मुलगीर, रघूनाथ गुहाडे, शामराव रायपुरे, गजानन राणगिरे, विक्रम रणवीर, सोपान रणवीर, डॉ. कैलास रणवीर ,शिवाजी मुलगीर, डॉ. मिलींद रणवीर यांच्या सह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती .
    1
    मुलींच्या शिक्षणाचे ध्येय  बाळगत मॅरेथॉन स्पर्धा जिंकणाऱ्या 47 वर्षीय महिलेचा तहसिलदारांच्या हस्ते सत्कार
मुलींच्या शिक्षणाचे ध्येय उराशी बाळगून  साडी परिधान करून, अनवानी पायी चालत जाऊन आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी संघर्ष करत कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथील रमाबाई अशोक रणवीर या 47 वर्षीय महिलेने अंबाजोगाई येथेअमृत दौड़ मॅरेथॉन स्पर्धा जिंकून भल्या भल्या प्रशिक्षित मुलीना लाजवेल अशी मोलाची कामगिरी केली आहे.या पार्श्वभूमीवर कळमनुरीचे तहसीलदार यांनी सोमवारी रमाबाई च्या घरी भेट देऊन सत्कार करून अभिनंदन केले .
रमाबाई रणवीर हया अत्यंत गरिब कुटुंबातील महिला आहे .मोलमजुरी करून ती आपली उपजीविका धकवत असते, तिला दोन मुलीच आहेत .याच मजुरीच्या पैशातून ती आपल्या दोन मुलींचे शिक्षण पूर्ण करीत आहे .2012 मध्येच नवऱ्याने साथ सोडली,तेव्हा पासून त्या एकट्या पडल्या आहेत . हालाखीची कठीण परिस्थिती असताना ही तिने आपल्या एका मुलीला नांदेडला शिक्षणाला, तर दुसऱ्या मुलीला अंबाजोगाई येथे एका अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेण्याकरता ठेवले आहे .त्याच अकॅडमी मध्ये त्या स्वयंपाक करण्याचे काम करित होत्या .त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याकरता भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर शैक्षणिक संस्थेच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन मोठ्या कौशल्याने स्पर्धा जिंकली .या पार्श्वभूमीवर कळमनुरी तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी पोत्रा या ठिकाणी येऊन रमाबाई रणवीरचा सत्कार करून अभिनंदन केले आहे .त्यावेळी रमाबाईला घरकुल, शौचालय,या सह सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन तहसीलदार कांबळे यांनी दिले आहे.याप्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी शिवशंकर गुट्टे, पोलीस पाटील अनुराधा मारकोळे, रवी कांबळे,रघूनाथ पाटील, जिजाराम मुलगीर, श्रीकांत मुलगीर,वैभव मुलगीर, रघूनाथ गुहाडे, शामराव रायपुरे, गजानन राणगिरे, विक्रम रणवीर, सोपान रणवीर, डॉ. कैलास रणवीर ,शिवाजी मुलगीर, डॉ. मिलींद रणवीर यांच्या सह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती .
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • ऋषिपंचमी निमित्त संत नगरी शेगाव भक्तिमय; श्रींच्या पालखीची भव्य प्रभातफेरी जागो जागी रांगोळी काढून स्वागत. ऋषिपंचमी निमित्त संत नगरी शेगाव भक्तिमय; श्रींच्या पालखीची भव्य प्रभातफेरी शेगाव : ऋषिपंचमीच्या पावन पर्वावर संत नगरी शेगाव आज श्री संत गजानन महाराजांच्या भक्तिरसात न्हाऊन निघाली. श्री संत गजानन महाराजांनी दि. ८ सप्टेंबर १९१० रोजी संजीवनी समाधी घेतली. त्यांच्या समाधीला ११६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर श्रींच्या पालखीची अश्वांसह व पताकाधारी वारकरी, पालखीचे भोई, सेवेकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत भव्य प्रभातफेरी संत नगरीतून काढण्यात आली. प्रभातफेरीदरम्यान सर्वत्र “गण गण गणात बोते” आणि “श्री संत गजानन महाराज की जय” या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले. टाळ-मृदंगाचा निनाद, भगव्या पताका, अश्व आणि पालखीचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. श्रींच्या नामस्मरणाने संपूर्ण शेगाव नगरीत आध्यात्मिक आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले. श्री संत गजानन महाराजांच्या चरणी कोटी कोटी नमन करून, श्री महाराज सर्व भक्तांवर सदैव कृपादृष्टी ठेवोत, सर्वांना सुख, शांती, आरोग्य व समृद्धी लाभो, अशी भक्तिभावाने प्रार्थना करण्यात आली.
    4
    ऋषिपंचमी निमित्त संत नगरी शेगाव भक्तिमय; श्रींच्या पालखीची भव्य प्रभातफेरी जागो जागी रांगोळी काढून स्वागत.
ऋषिपंचमी निमित्त संत नगरी शेगाव भक्तिमय; श्रींच्या पालखीची भव्य प्रभातफेरी
शेगाव : ऋषिपंचमीच्या पावन पर्वावर संत नगरी शेगाव आज श्री संत गजानन महाराजांच्या भक्तिरसात न्हाऊन निघाली. श्री संत गजानन महाराजांनी दि. ८ सप्टेंबर १९१० रोजी संजीवनी समाधी घेतली. त्यांच्या समाधीला ११६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
याच पार्श्वभूमीवर श्रींच्या पालखीची अश्वांसह व पताकाधारी वारकरी, पालखीचे भोई, सेवेकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत भव्य प्रभातफेरी संत नगरीतून काढण्यात आली. प्रभातफेरीदरम्यान सर्वत्र “गण गण गणात बोते” आणि “श्री संत गजानन महाराज की जय” या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले.
टाळ-मृदंगाचा निनाद, भगव्या पताका, अश्व आणि पालखीचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. श्रींच्या नामस्मरणाने संपूर्ण शेगाव नगरीत आध्यात्मिक आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले.
श्री संत गजानन महाराजांच्या चरणी कोटी कोटी नमन करून, श्री महाराज सर्व भक्तांवर सदैव कृपादृष्टी ठेवोत, सर्वांना सुख, शांती, आरोग्य व समृद्धी लाभो, अशी भक्तिभावाने प्रार्थना करण्यात आली.
    user_उमेश राजगुरे
    उमेश राजगुरे
    Fruit & Vegetable Wholesaler शेगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • गोडावूनमधून इलेक्ट्रिक साहित्य चोरी करणारे चार जण ताब्यात; ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त
    1
    गोडावूनमधून इलेक्ट्रिक साहित्य चोरी करणारे चार जण ताब्यात; ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन; गणेश मंडळाच्या बॅन्जोवर पोलिसांची कारवाई
    1
    ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन; गणेश मंडळाच्या बॅन्जोवर पोलिसांची कारवाई
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.