औंढा नागनाथ मंदिरावरील शिल्पकला नैसर्गिक रंगसंगतीत साकारावी -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* *औंढा नागनाथ मंदिरावरील शिल्पकला नैसर्गिक रंगसंगतीत साकारावी -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* • औंढा नागनाथसह नागपूरच्या कल्याणेश्वर मंदिर विकास आराखड्याला शिखर समितीची मंजूरी • आंबेगाव येथील शिवसृष्टीसाठी ५० कोटी मंजूर हिंगोली :- औंढा नागनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. या मंदिरावरील पुरातन शिल्पकलेचे जतन करत नैसर्गिक रंगांचा वापर करुन त्याचे संवर्धन करण्यात यावे. तलाव आणि मंदिर परिसरात वापरले जाणारे दगड आणि इतर साहित्य त्याचप्रमाणे एकूणच सर्व कामे दर्जेदार असावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत श्री क्षेत्र औंढा नागनाथ तसेच नागपूर येथील कल्याणेश्वर मंदिराच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली. तसेच पुण्याजवळ आंबेगाव येथील शिवसृष्टी थीम पार्कच्या चौथ्या टप्प्याच्या कामासाठी ५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार संतोष बांगर, प्रवीण दटके, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत औंढा नागनाथ मंदिराच्या १९३ कोटी ५५ लाख २० हजार ४७४ कोटींच्या तर, कल्याणेश्वर मंदिराच्या ७२.४९ कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली. आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित शिवसृष्टी ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्पाच्या प्रगतीचा यावेळी आढावा घेण्यात आला. यातील चौथ्या टप्प्यासाठीच्या कामासाठी ५० कोटींच्या निधीलाही मंजूरी देण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औंढा नागनाथ मंदिर परिसराचा विकास करताना मंदिराचे वैभव जपण्याचे निर्देश दिले. तर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी जतन आणि संवर्धनाबरोबरच भाविकांसाठी चांगल्या सोयी-सुविधा निर्माण करण्याची सूचना केली. *औढा नागनाथ मंदिर परिसराचा विकास आराखडा* औंढा नागनाथ मंदिराच्या संवर्धन आणि जीर्णोद्धाराचे काम पुरातत्व आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जाणार असून यामध्ये मंदिराच्या आवारातील नंदी मंडप, ओवरी आणि दर्शन बारी या मंदिराच्या आवारातील वास्तूंचे संवर्धन केले जाणार आहे. यासह हरीहर तलाव आणि परिसरातील मंदिरांचे संवर्धन आणि जीर्णोद्धार केला जाणार आहे. मंदिर परिसरासाठी बाह्य विद्युतीकरण, सीसीटीव्ही, रोषणाई आणि उद्यान विकास देखील केला जाणार आहे. भक्त निवासाची नव्याने उभारणी केली जाणार असून २५०० क्षमतेचा प्रतीक्षा कक्ष असणार आहे. भाविकांना कमी वेळेत दर्शन मिळावे, यादृष्टीने याचे नियोजन केले जाणार असून दर्शन रांगेत भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. याचबरोबर मंदिराचे वैभव कायम राखून मोठी झाडे लावणे, परिसराला दगडी बांधकामासारखा साज देणे, परिसरात सापडलेल्या जुन्या मूर्त्या भाविकांना पाहता याव्यात यासाठी म्युझियम तयार करणे, भाविकांना माहिती देण्यासाठी माहिती केंद्र उभारणे आदी कामे केली जाणार असल्याची माहिती हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सादरीकरणाद्वारे दिली. *कल्याणेश्वर मंदिर परिसरात पार्किंगची व्यवस्था वाढवावी* नागपूर येथील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या कल्याणेश्वर मंदिर महाल परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याचा आढावा घेताना आवश्यकता विचारात घेऊन पार्किंगची व्यवस्था वाढविण्यात यावी, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. तथापि, अशा परिसरात यांत्रिक पार्किंगचा वापर व्यवहार्य ठरत नसल्याने साध्या पार्किंगची व्यवस्था असावी, असे ते म्हणाले. नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यावेळी यापूर्वी शिखर समितीच्या बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांनुसार मंदिर विकास आराखड्यात करण्यात आलेल्या बदलांची माहिती दिली. त्यानुसार बेसमेंटमधील यांत्रिक वाहनतळ वगळून त्याठिकाणी दोन तळघरांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच निवासी व्यवस्था वगळण्यात आली असून मंदिराच्या शिखराचे बांधकाम प्रस्तावात समाविष्ट करण्यात आले आहे. या सुधारणांनंतर प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च ७२.४९ कोटी रुपये इतका निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या खर्चास शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. कल्याणेश्वर मंदिर हे नागपूरमधील ऐतिहासिक आणि धार्मिक श्रद्धास्थान असून प्रस्तावित विकास आराखड्यात मंदिर परिसराचे हेमाडपंथी स्थापत्यशैलीनुसार सुशोभीकरण, भव्य सभामंडप, बहुउद्देशीयसभागृह, महाप्रसादासाठी स्वतंत्र सुविधा, प्रशासकीय कार्यालये, वेदशाळा, योगशाळा, प्रसाधनगृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भाविकांसाठी विविध सुविधा तसेच दोन स्तरांवरील तळघरांचा समावेश करण्यात आला आहे. या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्य, पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेचा प्रेरणादायी इतिहास आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुणे येथील आंबेगाव बुद्रुक परिसरात विकसित करण्यात येत असलेल्या ‘शिवसृष्टी’ ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. यावेळी शिवसृष्टी प्रकल्पाचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी विविध टप्प्यांतील कामांची सविस्तर माहिती सादर केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित हा प्रकल्प देशातील तसेच आशियातील वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक थीम पार्क म्हणून विकसित करण्यात येत असून, नव्या पिढीपर्यंत शिवचरित्र प्रेरणादायी आणि प्रभावी पद्धतीने पोहोचविण्याचा त्यामागील उद्देश असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
औंढा नागनाथ मंदिरावरील शिल्पकला नैसर्गिक रंगसंगतीत साकारावी -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* *औंढा नागनाथ मंदिरावरील शिल्पकला नैसर्गिक रंगसंगतीत साकारावी -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* • औंढा नागनाथसह नागपूरच्या कल्याणेश्वर मंदिर विकास आराखड्याला शिखर समितीची मंजूरी • आंबेगाव येथील शिवसृष्टीसाठी ५० कोटी मंजूर हिंगोली :- औंढा नागनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. या मंदिरावरील पुरातन शिल्पकलेचे जतन करत नैसर्गिक रंगांचा वापर करुन त्याचे संवर्धन करण्यात यावे. तलाव आणि मंदिर परिसरात वापरले जाणारे दगड आणि इतर साहित्य त्याचप्रमाणे एकूणच सर्व कामे दर्जेदार असावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत श्री क्षेत्र औंढा नागनाथ तसेच नागपूर येथील कल्याणेश्वर मंदिराच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली. तसेच पुण्याजवळ आंबेगाव येथील शिवसृष्टी थीम पार्कच्या चौथ्या टप्प्याच्या कामासाठी ५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार संतोष बांगर, प्रवीण दटके, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत औंढा नागनाथ मंदिराच्या १९३ कोटी ५५ लाख २० हजार ४७४ कोटींच्या तर, कल्याणेश्वर मंदिराच्या ७२.४९ कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली. आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित शिवसृष्टी ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्पाच्या प्रगतीचा यावेळी आढावा घेण्यात आला. यातील चौथ्या टप्प्यासाठीच्या कामासाठी ५० कोटींच्या निधीलाही मंजूरी देण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औंढा नागनाथ मंदिर परिसराचा विकास करताना मंदिराचे वैभव जपण्याचे निर्देश दिले. तर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी जतन आणि संवर्धनाबरोबरच भाविकांसाठी चांगल्या सोयी-सुविधा निर्माण करण्याची सूचना केली. *औढा नागनाथ मंदिर परिसराचा विकास आराखडा* औंढा नागनाथ मंदिराच्या संवर्धन आणि जीर्णोद्धाराचे काम पुरातत्व आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जाणार असून यामध्ये मंदिराच्या आवारातील नंदी मंडप, ओवरी आणि दर्शन बारी या मंदिराच्या आवारातील वास्तूंचे संवर्धन केले जाणार आहे. यासह हरीहर तलाव आणि परिसरातील मंदिरांचे संवर्धन आणि जीर्णोद्धार केला जाणार आहे. मंदिर परिसरासाठी बाह्य विद्युतीकरण, सीसीटीव्ही, रोषणाई आणि उद्यान विकास देखील केला जाणार आहे. भक्त निवासाची नव्याने उभारणी केली जाणार असून २५०० क्षमतेचा
प्रतीक्षा कक्ष असणार आहे. भाविकांना कमी वेळेत दर्शन मिळावे, यादृष्टीने याचे नियोजन केले जाणार असून दर्शन रांगेत भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. याचबरोबर मंदिराचे वैभव कायम राखून मोठी झाडे लावणे, परिसराला दगडी बांधकामासारखा साज देणे, परिसरात सापडलेल्या जुन्या मूर्त्या भाविकांना पाहता याव्यात यासाठी म्युझियम तयार करणे, भाविकांना माहिती देण्यासाठी माहिती केंद्र उभारणे आदी कामे केली जाणार असल्याची माहिती हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सादरीकरणाद्वारे दिली. *कल्याणेश्वर मंदिर परिसरात पार्किंगची व्यवस्था वाढवावी* नागपूर येथील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या कल्याणेश्वर मंदिर महाल परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याचा आढावा घेताना आवश्यकता विचारात घेऊन पार्किंगची व्यवस्था वाढविण्यात यावी, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. तथापि, अशा परिसरात यांत्रिक पार्किंगचा वापर व्यवहार्य ठरत नसल्याने साध्या पार्किंगची व्यवस्था असावी, असे ते म्हणाले. नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यावेळी यापूर्वी शिखर समितीच्या बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांनुसार मंदिर विकास आराखड्यात करण्यात आलेल्या बदलांची माहिती दिली. त्यानुसार बेसमेंटमधील यांत्रिक वाहनतळ वगळून त्याठिकाणी दोन तळघरांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच निवासी व्यवस्था वगळण्यात आली असून मंदिराच्या शिखराचे बांधकाम प्रस्तावात समाविष्ट करण्यात आले आहे. या सुधारणांनंतर प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च ७२.४९ कोटी रुपये इतका निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या खर्चास शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. कल्याणेश्वर मंदिर हे नागपूरमधील ऐतिहासिक आणि धार्मिक श्रद्धास्थान असून प्रस्तावित विकास आराखड्यात मंदिर परिसराचे हेमाडपंथी स्थापत्यशैलीनुसार सुशोभीकरण, भव्य सभामंडप, बहुउद्देशीयसभागृह, महाप्रसादासाठी स्वतंत्र सुविधा, प्रशासकीय कार्यालये, वेदशाळा, योगशाळा, प्रसाधनगृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भाविकांसाठी विविध सुविधा तसेच दोन स्तरांवरील तळघरांचा समावेश करण्यात आला आहे. या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्य, पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेचा प्रेरणादायी इतिहास आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुणे येथील आंबेगाव बुद्रुक परिसरात विकसित करण्यात येत असलेल्या ‘शिवसृष्टी’ ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. यावेळी शिवसृष्टी प्रकल्पाचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी विविध टप्प्यांतील कामांची सविस्तर माहिती सादर केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित हा प्रकल्प देशातील तसेच आशियातील वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक थीम पार्क म्हणून विकसित करण्यात येत असून, नव्या पिढीपर्यंत शिवचरित्र प्रेरणादायी आणि प्रभावी पद्धतीने पोहोचविण्याचा त्यामागील उद्देश असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
- अजमेरच्या प्रवासाला काळाचा घाला! उमरखेडच्या स्विफ्ट डिझायरला भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, चार जखमी पातूर-अकोला मार्गावरील भीषण दुर्घटना; दोघांची प्रकृती चिंताजनक, नांदेड येथे उपचार सुरू उमरखेड/ढाणकी, दि. २७ ऑगस्ट २०२६ : अजमेरच्या दिशेने निघालेल्या उमरखेड परिसरातील प्रवाशांच्या स्विफ्ट डिझायर कारला पातूर-अकोला मार्गावर भीषण अपघात झाला. २६ ऑगस्ट रोजी रात्री उमरखेडहून अजमेरसाठी दोन कार रवाना झाल्या होत्या. त्यापैकी एका स्विफ्ट डिझायर कारचा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, चालकाला झोपेची डुलकी आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट डिव्हायडरवर आदळली. या भीषण अपघातात ढाणकी येथील अदनान खान रफिक खान यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघाताची तीव्रता एवढी होती की, कारचे इंजिन तुटून वाहनापासून बाहेर पडले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघातात सय्यद बाबू सय्यद हमीद (३०), सय्यद अक्रम सय्यद इब्राहिम (३२), सय्यद तोहिद सय्यद समशेर (२०) तसेच चालक फरान शेख जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. यातील काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला अपघातानंतर एका जखमीने प्रसंगावधान राखत पुढे जात असलेल्या दुसऱ्या कारमधील सहकाऱ्यांना फोन करून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर पुढील कारमधील सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तसेच उमरखेडमधील नातेवाईकांनाही घटनेची माहिती देण्यात आली. नगरसेवक पप्पू चिकन यांची तातडीची धाव अपघाताची माहिती मिळताच उमरखेडचे नगरसेवक पप्पू चिकन यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने अकोला गाठले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्याची व्यवस्था करण्यात आली. सध्या सय्यद बाबू, सय्यद अक्रम आणि सय्यद तोहिद यांच्यावर नांदेड येथील ऋतुराज जाधव यांच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. रात्रीचा प्रवास ठरतोय जीवघेणा? या दुर्घटनेने रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासातील सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः चालकाला झोप येत असताना वाहन चालवणे किती धोकादायक ठरू शकते, याचे हे अपघात अत्यंत भीषण उदाहरण आहे. काही क्षणांची झोपेची डुलकी संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. दरम्यान, या अपघाताची अधिकृत कारणे आणि वाहनचालकाची स्थिती याबाबत संबंधित पोलिसांकडून तपासानंतरच स्पष्ट माहिती समोर येणार आहे. मात्र, या दुर्घटनेत एका तरुणाचा गेलेला जीव आणि गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांमुळे उमरखेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. — प्रतिनिधी, उमरखेड4
- *आईसोबत भांडण.. अन् थेट टॉवरवर! तासभराच्या थरारानंतर तरुणाची सुखरूप सुटका* *हरसूल-सावंगी परिसरात खळबळ; पोलिस व अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे मोठी दुर्घटना टळली* *छत्रपती संभाजीनगर :* आईसोबत झालेल्या वादानंतर रागाच्या भरात एका तरुणाने थेट उंच टॉवर गाठल्याने हरसूल-सावंगी परिसरात सोमवारी मोठी खळबळ उडाली. तरुण टॉवरवर चढल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. दरम्यान, पोलिस आणि अग्निशमन दलाने तब्बल एक तास शर्थीचे प्रयत्न करून या तरुणाला सुखरूप खाली आणण्यात यश मिळविले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. करण शिवाजी माळी असे टॉवरवर चढलेल्या तरुणाचे नाव असल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, करण माळी याचे आईसोबत घरगुती कारणावरून भांडण झाले होते. या वादानंतर तो संतप्त झाला आणि रागाच्या भरात थेट परिसरातील टॉवरवर चढला. तो नशेच्या अवस्थेत असल्याचीही माहिती समोर आली आहे. टॉवरवर तरुण चढल्याचे लक्षात येताच नागरिकांनी पोलिस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. काही वेळातच दोन्ही विभागांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. उंच टॉवरवर असलेल्या तरुणाला सुरक्षितपणे खाली आणणे हे पथकांसमोर मोठे आव्हान होते. कोणतीही घाई न करता जवानांनी आणि पोलिसांनी त्याच्याशी संवाद साधत त्याची समजूत काढण्यास सुरुवात केली. सुमारे एक तास सुरू असलेल्या या प्रयत्नांनंतर अखेर करण माळी याला टॉवरवरून खाली उतरविण्यात यश आले. त्यानंतर उपस्थित नागरिकांसह पोलिस आणि अग्निशमन दलाने सुटकेचा निःश्वास सोडला. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी खवड्या डोंगर परिसरात घडलेल्या अशाच प्रकारच्या घटनेनंतर आता पुन्हा हरसूल-सावंगी येथे तरुणाच्या टॉवरवर चढण्याच्या घटनेने शहरात चिंता व्यक्त होत आहे. मात्र, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे यावेळीही संभाव्य मोठी दुर्घटना टळली.1
- शिवसेनेच्या संवाद मेळाव्यास मोठ्या संख्येने या; शिवसेना परभणी तालुका प्रमुख विनोद लोहगावकर शिवसेनेच्या संवाद मेळाव्यास मोठ्या संख्येने या; शिवसेना परभणी तालुका प्रमुख विनोद लोहगावकर1
- मुखेडमध्ये ईद-ए-मिलादुन्नबीचा सामाजिक संदेश; राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेच्या शिबिरात ६४ जणांचे रक्तदान1
- 🚨 Nanded Crime | किनवटमध्ये गुटखा निर्मितीचे साहित्य जप्त; ₹१.०३ लाखांचा मुद्देमाल ताब्यात 📍किनवट | २७ ऑगस्ट २०२६ महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या कथित निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात किनवट पोलिसांना यश आले आहे. फुलेनगर, गोकुंदा येथील एका घरावर छापा टाकून पोलिसांनी ₹१,०३,८०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांच्या माहितीनुसार, जप्त मुद्देमालात गुटखा निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या ३ लोखंडी मशीन, चुना, तंबाखूजन्य पदार्थ, सुपारी, प्लास्टिक पिशव्या, मिश्रित तंबाखूजन्य पदार्थ आणि ॲल्युमिनियमची पात्रे यांचा समावेश आहे. या प्रकरणी व्यंकट गंगाराम नागनुरवार (रा. फुलेनगर, गोकुंदा, किनवट) याच्याविरुद्ध किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २६ ऑगस्ट रोजी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत करण्यात आली. 💰 एकूण जप्त मुद्देमाल : ₹१,०३,८०० या कारवाईबद्दल तुमचं मत कमेंट करा आणि नांदेडमधील बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा! #NandedCrime #Kinwat #NandedNews #Gutkha #NandedPolice #PoliceAction #NandedUpdates #NandigramTimes1
- पत्रकारांनी निर्भीडपणे काम करा; तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन! दिलीप माने यांची ग्वाही; महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या गंगाखेड शाखा कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन सत्याच्या बाजूने निर्भीड पत्रकारिता करा, कोणत्याही आमिषाला, दबावाला किंवा भीतीला बळी पडू नका, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दिलीप माने यांनी केले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा गंगाखेडच्या कार्यालयाचे उद्घाटन दि. २३ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडले. यावेळी पत्रकारांनी संघटितपणे काम करण्याचे आवाहनही माने यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार गोविंद यादव होते. उद्घाटक म्हणून जिल्हाध्यक्ष दिलीप माने, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार जावेद इनामदार, तुकाराम अय्या आणि प्रा. डॉ. बालाजी शिंदे उपस्थित होते.1
- इलेक्ट्रिक मोटर पंप चोरी करणाऱ्या टोळीचा रिसोड पोलिसांनी केला पर्दाफाश रिसोड : शेतकऱ्यांच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटरपंप चोरी करणाऱ्या टोळीचा रिसोड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून दोन चोरीचे इलेक्ट्रिक मोटरपंप आणि काळ्या-पिवळ्या रंगाचा प्रवासी ऑटो असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लोणार येथून चोरी केलेले मोटरपंप विक्रीसाठी रिसोड येथे आणले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वाशिम नाका परिसरात सापळा रचून चार आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तेजराव दीपक तोडे, ओम राजू बोरकर, विजय भारत घाटोळे हे तिघे लोणार येथील रहिवासी असून, अमोल उर्फ पवन शंकर आव्हाडे हा सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील रहिवासी आहे. आरोपींकडून दोन इलेक्ट्रिक मोटरपंप आणि प्रवासी ऑटो जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे २ लाख रुपये असल्याची माहिती आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. लोणार येथील मोटरपंप चोरीचा पुढील तपास लोणार पोलीस करीत आहेत.1
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संवाद मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहा; कृषी बाजार सभापती पंढरीनाथ घुले1