परभणीत अवकाळी पावसाच्या हलक्या सरी; शेतकऱ्यांची चिंता वाढली परभणी/प्रतिनिधी शहरात रविवारी (दि. १९) दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाल्याचे दिसून आले. सायंकाळी मध्यम स्वरूपाचा वादळी वारा सुटला आणि रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू लागल्या.दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभाग, मुंबई यांनी दोन दिवसांपूर्वीच मराठवाड्यासह राज्यातील विविध भागांत अवकाळी पावसासोबत वादळी वाऱ्याचा आणि उष्मालाटेचा इशारा दिला होता. तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम विभागानेही रविवारी दुपारनंतर परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती.या पार्श्वभूमीवर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हळद, भाजीपाला तसेच फळपिकांना या वादळी वाऱ्याचा आणि अवकाळी पावसाचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पिके, फळबागा, पशुधन आणि काढणी केलेली उत्पादने सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

- वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघात रुग्णांसाठी शहरात चार आरोग्य केंद्र - महापौर सय्यद इकबाल1
- Post by Mohsin ahmed khan1
- Post by Today One Live1
- महात्मा बसेश्वर महाराजांची जयंती मंठा येथील उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यासाठी.1
- Post by माधव गायकवाड4
- लिलाव प्रक्रियेदरम्यान गोदामात तारण मालच नसल्याचे उघड झाले. तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आर्थिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याला श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपीस 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.1
- Post by Anil Rathod1
- Skyline Builders & Developers “क्षितिज पुरम – जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो स्वतःचा पत्ता ” क्षितिज पुरम… जिथे आकाशातील स्वप्नं… जमिनीवर उतरतात!2