मॅट्रिमोनियल साईटवर बनावट प्रोफाइलद्वारे लाखोंची फसवणूक; सराईत आरोपी अटकेत पुणे : येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत मॅट्रिमोनियल वेबसाईटवर बनावट प्रोफाइल तयार करून महिलांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आरोपीने सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्याचे भासवत विश्वास संपादन करून तब्बल २९ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदर्श प्रशांत म्हेत्रे (वय ३८ वर्षे) (उर्फ स्वप्नील वाल्के, उर्फ हेमंत गावकर, उर्फ जयेश पाटील), रा. अलीबाग, जि. रायगड (सध्या दुबई) याने मॅट्रिमोनियल साईटवर खोटी ओळख तयार करून फिर्यादी महिलेशी संपर्क साधला. त्यानंतर मैत्री व विश्वास निर्माण करून विविध कारणे सांगत वेळोवेळी पैशांची मागणी केली आणि ऑनलाइन व्यवहारांद्वारे मोठी रक्कम उकळली. फिर्यादीच्या तक्रारीवरून येरवडा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ४१९, ४२० तसेच आयटी अॅक्ट कलम ६६ (सी), ६६ (डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आणि आरोपीचा मागोवा घेतला. तपासादरम्यान आरोपीला दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी नवी मुंबई येथून अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला पुण्यात आणून पुढील चौकशी करण्यात आली. या चौकशीत आरोपीने विविध बँक खात्यांद्वारे व्यवहार करून पैसे वळविल्याचे उघड झाले. यापैकी २१ लाख रुपये पोलिसांनी परत मिळवण्यात यश मिळवले असून उर्वरित रकमेचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विजय ठाकर करत आहेत. ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपायुक्त (परिमंडळ ४) श्रीमती नीला जनकिराम, तसेच संबंधित सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अनुज बागवान, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विजय ठाकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जाधव, पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड, तसेच पोलीस कर्मचारी पिलाने, कोंके, स्वप्नील पिंगळे, भगावत व ओंडूर घडकर यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. 🔎 पोलीसांचे आवाहन मॅट्रिमोनियल किंवा सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना सतर्क राहावे. कोणतीही खातरजमा न करता आर्थिक व्यवहार करू नयेत, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
मॅट्रिमोनियल साईटवर बनावट प्रोफाइलद्वारे लाखोंची फसवणूक; सराईत आरोपी अटकेत पुणे : येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत मॅट्रिमोनियल वेबसाईटवर बनावट प्रोफाइल तयार करून महिलांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आरोपीने सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्याचे भासवत विश्वास संपादन करून तब्बल २९ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदर्श प्रशांत म्हेत्रे (वय ३८ वर्षे) (उर्फ स्वप्नील वाल्के, उर्फ हेमंत गावकर, उर्फ जयेश पाटील), रा. अलीबाग, जि. रायगड (सध्या दुबई) याने मॅट्रिमोनियल साईटवर खोटी ओळख तयार करून फिर्यादी महिलेशी संपर्क साधला. त्यानंतर मैत्री व विश्वास निर्माण करून विविध कारणे सांगत वेळोवेळी पैशांची मागणी केली आणि ऑनलाइन व्यवहारांद्वारे मोठी रक्कम उकळली. फिर्यादीच्या तक्रारीवरून येरवडा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ४१९, ४२० तसेच आयटी अॅक्ट कलम ६६ (सी), ६६ (डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आणि आरोपीचा मागोवा घेतला. तपासादरम्यान आरोपीला दि. २८ फेब्रुवारी २०२६
रोजी नवी मुंबई येथून अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला पुण्यात आणून पुढील चौकशी करण्यात आली. या चौकशीत आरोपीने विविध बँक खात्यांद्वारे व्यवहार करून पैसे वळविल्याचे उघड झाले. यापैकी २१ लाख रुपये पोलिसांनी परत मिळवण्यात यश मिळवले असून उर्वरित रकमेचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विजय ठाकर करत आहेत. ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपायुक्त (परिमंडळ ४) श्रीमती नीला जनकिराम, तसेच संबंधित सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अनुज बागवान, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विजय ठाकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जाधव, पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड, तसेच पोलीस कर्मचारी पिलाने, कोंके, स्वप्नील पिंगळे, भगावत व ओंडूर घडकर यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. 🔎 पोलीसांचे आवाहन मॅट्रिमोनियल किंवा सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना सतर्क राहावे. कोणतीही खातरजमा न करता आर्थिक व्यवहार करू नयेत, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
- पिंपरी चिंचवड :- महापालिका शिक्षण विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे आरटीई RTE प्रवेश प्रक्रिया गेल्या आठ दिवसांपासून संथगतीने सुरू आहे. शहराचे तापमान ४२ अंशांवर गेलेले असताना, भर उन्हात ताटकळत उभे राहूनही पालकांच्या पदरी निराशा पडत आहे. आतापर्यंत केवळ ३० टक्के अर्जांचा निपटारा झाला असून, या विलंबाबाबत राज्य शासनाने महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे... आकुर्डीतील कै. फकीर भाई पानसरे उर्दू शाळा आणि पिंपरीतील कर्मवीर भाऊराव पाटील केंद्र या दोन्ही ठिकाणी कागदपत्र पडताळणीमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला. दोन केंद्रांवर मिळून केवळ १,१९४ अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. समितीने मोठ्या संख्येने अर्ज प्रलंबित ठेवल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. दरम्यान राज्य शिक्षण विभागाने याची दखल घेतली असून, महापालिकेला उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आता प्रशासकीय स्तरावर हालचाली होऊन पालकांना दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे....2
- शासनाचे टँकर जनतेसाठी नहीं तर पत्रकारांच्या घरात झोपडीत आलेले टँकर प्रायव्हेट सोसायटी मधे विकले जातात विकले जातात भर उन्हाळा मधे जनतेला पाणी नहीं गरिबांच्या हक्काचे टँकर विकले जातात1
- Solitaire PANAMER TOWER GANGA DHAM pune आत पार्किंग असताना बाहेर लावायला सांगितले मनोज पाटील सर या सोसायटी वाल्यामुळे अशा गाड्या बाहेर लागत असेल तर पुढे ट्रॅफिक चं खूप अवघड आहे. आणि आमच्या गाडी बाहेर लावून आम्ही पार्सल द्याला गेलो चलन टाकला किंवा गाडी उचलून नेली किंवा ऑर्डर कोणी उचलून नेला जबाबदार कोण घेणार आहे. सोसायटी वाले किंवा वोचमन नुकसान भरपाई देणार आहे का? सोसायटी वाले जबाबदारी घेणार आहे का? सोसायटी वाले चलन चे पैसे भरणार आहे का? सोसायटी वाले ओर्डर चे नुकसान भरपाई देणार आहे का? याचा उत्तर मनोज पाटील सरांनी द्यावा लागेल गाड्या बाहेर लावण्याऱ्या सोसायटीचे नाव 1)TREASURE PARK अर्नेश्वर 2)Solitaire PANAMER TOWER GANGA DHAM 3)Kohinoor Jeeva, बिबवेवाडी 4)GAGAN GALAXY opp GANGA DHAM PHASE-2, 5)GANGA DHAM PHASE-1, 6)shimmer shine सिंहगड रोड 7)RajGruhi Residency कोंढवा 8)Sunshree Gold, NIBM Road, Kondhwa 9) Sangam Park mahrshi Nagar 10) Gagan Vihar Ganga Dham Phase 2 11) Meghsparsh Society Ambegaon BK, Pune 12) Familia Telco Colony Datta Nagar 13)Basil Amora, Jambhulwadi 14)Raghunandan Hingane Hkurd 15) Raheja vistas Premiere Phase 4 Mohammed Wadi 16) TCG Panorama Ambegaon 17) Bharati Vidyapeeth hospital katraj भारती विद्यापीठ हॉस्पिटल च्या आत मध्ये फक्त कर्मचारी ची गाड्या असेल किंवा रुग्णवाहिका असेल तरच आत पार्किंग दिली जाते. नाही तर पेशंट नातेवाईक ची गाड्या किंवा पार्सल वाले म्हणा त्यांना पार्किंग दिली जात नाही. पार्सल वाल्यांना दोन मिनिटे सुद्धा गाडी सोडता येत नाही. अशी परिस्थिती आहे. भारती विद्यापीठ हॉस्पिटल सोडून इतर हॉस्पिटलच्या आत मध्ये पार्किंग देतात1
- Post by Raju Bawdiwale1
- Post by Kishor subhash jadhav1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- Post by Maharashtra 18 news1
- पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवड शहरात लोकांच्या आणि स्वतःच्या जीवाशी खेळणारा एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक सहा-सात वर्षाचा अल्पवयीन चिमुकला वाकड परिसरातील फोनिक्स मॉल समोरील मुख्य रस्त्यावर ऑटो रिक्षा चालवत असतानाचा विडियो सध्या पिंपरी चिंचवड शहरात वायरल होत आहे. या विडियो माझे चिमुकला मुलगा ऑटो रिक्षा चालवत असताना आपण पाहू शकतो तसेच त्याचे वडील ऑटो रिक्षा मागील सीटवर बसून प्रवास करत आहेत असा आपल्याला या विडियो च्या माध्यमातून दिसून येत आहे. चिमुकला मुलगा ऑटो रिक्षा चालवत असताना जर एखादा अपघात झाला तर याला जबाबदार कोण असणार ? असा प्रश्न आता सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकर विचारत आहेत. तर चिमुकला मुलगा शहरातील मुख्य मार्गावर अशाप्रकारे ऑटो रिक्षा चालवत असताना शहरातील वाहतूक पोलीस काय करत होते ? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे.... #पिंपरीचिंचवड #वाकड #धक्कादायक #व्हायरलव्हिडिओ #अल्पवयीन #रिक्षा #वाहतूकनियम #बेजबाबदारपणा #अपघाताचा_धोका #पोलिसप्रश्नचिन्ह #PimpriChinchwad #Wakad #Shocking #ViralVideo #MinorDriving #AutoRickshaw #TrafficViolation #Irresponsible #AccidentRisk #PoliceNegligence1