Shuru
Apke Nagar Ki App…
जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने 3 जणांची सेवा संपुष्टात पुणे : Pune News महापालिका प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत तीन लिपिक-टंकलेखक कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली आहे. शासनाच्या अटींनुसार आवश्यक असलेले जात वैधता प्रमाणपत्र निर्धारित कालावधीत सादर करण्यात अपयश आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचे अधिकृत आदेशात नमूद करण्यात आले आहे. महापालिकेच्या आदेशानुसार तुषार शंकर वाघमारे, रविंद्र दत्तात्रय रसाळ आणि संजीव रोहिदास समुद्रे यांची लिपिक-टंकलेखक पदावर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, संबंधितांनी वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने सामान्य प्रशासन विभागाच्या शासन परिपत्रकातील अटी क्रमांक १३ व १५ नुसार त्यांना सेवेत ठेवणे शक्य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
पत्रकार सुधाकर गायकवाड
जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने 3 जणांची सेवा संपुष्टात पुणे : Pune News महापालिका प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत तीन लिपिक-टंकलेखक कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली आहे. शासनाच्या अटींनुसार आवश्यक असलेले जात वैधता प्रमाणपत्र निर्धारित कालावधीत सादर करण्यात अपयश आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचे अधिकृत आदेशात नमूद करण्यात आले आहे. महापालिकेच्या आदेशानुसार तुषार शंकर वाघमारे, रविंद्र दत्तात्रय रसाळ आणि संजीव रोहिदास समुद्रे यांची लिपिक-टंकलेखक पदावर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, संबंधितांनी वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने सामान्य प्रशासन विभागाच्या शासन परिपत्रकातील अटी क्रमांक १३ व १५ नुसार त्यांना सेवेत ठेवणे शक्य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- पिंपरी चिंचवड :- महापालिका शिक्षण विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे आरटीई RTE प्रवेश प्रक्रिया गेल्या आठ दिवसांपासून संथगतीने सुरू आहे. शहराचे तापमान ४२ अंशांवर गेलेले असताना, भर उन्हात ताटकळत उभे राहूनही पालकांच्या पदरी निराशा पडत आहे. आतापर्यंत केवळ ३० टक्के अर्जांचा निपटारा झाला असून, या विलंबाबाबत राज्य शासनाने महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे... आकुर्डीतील कै. फकीर भाई पानसरे उर्दू शाळा आणि पिंपरीतील कर्मवीर भाऊराव पाटील केंद्र या दोन्ही ठिकाणी कागदपत्र पडताळणीमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला. दोन केंद्रांवर मिळून केवळ १,१९४ अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. समितीने मोठ्या संख्येने अर्ज प्रलंबित ठेवल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. दरम्यान राज्य शिक्षण विभागाने याची दखल घेतली असून, महापालिकेला उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आता प्रशासकीय स्तरावर हालचाली होऊन पालकांना दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे....2
- शासनाचे टँकर जनतेसाठी नहीं तर पत्रकारांच्या घरात झोपडीत आलेले टँकर प्रायव्हेट सोसायटी मधे विकले जातात विकले जातात भर उन्हाळा मधे जनतेला पाणी नहीं गरिबांच्या हक्काचे टँकर विकले जातात1
- Solitaire PANAMER TOWER GANGA DHAM pune आत पार्किंग असताना बाहेर लावायला सांगितले मनोज पाटील सर या सोसायटी वाल्यामुळे अशा गाड्या बाहेर लागत असेल तर पुढे ट्रॅफिक चं खूप अवघड आहे. आणि आमच्या गाडी बाहेर लावून आम्ही पार्सल द्याला गेलो चलन टाकला किंवा गाडी उचलून नेली किंवा ऑर्डर कोणी उचलून नेला जबाबदार कोण घेणार आहे. सोसायटी वाले किंवा वोचमन नुकसान भरपाई देणार आहे का? सोसायटी वाले जबाबदारी घेणार आहे का? सोसायटी वाले चलन चे पैसे भरणार आहे का? सोसायटी वाले ओर्डर चे नुकसान भरपाई देणार आहे का? याचा उत्तर मनोज पाटील सरांनी द्यावा लागेल गाड्या बाहेर लावण्याऱ्या सोसायटीचे नाव 1)TREASURE PARK अर्नेश्वर 2)Solitaire PANAMER TOWER GANGA DHAM 3)Kohinoor Jeeva, बिबवेवाडी 4)GAGAN GALAXY opp GANGA DHAM PHASE-2, 5)GANGA DHAM PHASE-1, 6)shimmer shine सिंहगड रोड 7)RajGruhi Residency कोंढवा 8)Sunshree Gold, NIBM Road, Kondhwa 9) Sangam Park mahrshi Nagar 10) Gagan Vihar Ganga Dham Phase 2 11) Meghsparsh Society Ambegaon BK, Pune 12) Familia Telco Colony Datta Nagar 13)Basil Amora, Jambhulwadi 14)Raghunandan Hingane Hkurd 15) Raheja vistas Premiere Phase 4 Mohammed Wadi 16) TCG Panorama Ambegaon 17) Bharati Vidyapeeth hospital katraj भारती विद्यापीठ हॉस्पिटल च्या आत मध्ये फक्त कर्मचारी ची गाड्या असेल किंवा रुग्णवाहिका असेल तरच आत पार्किंग दिली जाते. नाही तर पेशंट नातेवाईक ची गाड्या किंवा पार्सल वाले म्हणा त्यांना पार्किंग दिली जात नाही. पार्सल वाल्यांना दोन मिनिटे सुद्धा गाडी सोडता येत नाही. अशी परिस्थिती आहे. भारती विद्यापीठ हॉस्पिटल सोडून इतर हॉस्पिटलच्या आत मध्ये पार्किंग देतात1
- Post by Raju Bawdiwale1
- Post by Kishor subhash jadhav1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- Post by Maharashtra 18 news1
- पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवड शहरात लोकांच्या आणि स्वतःच्या जीवाशी खेळणारा एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक सहा-सात वर्षाचा अल्पवयीन चिमुकला वाकड परिसरातील फोनिक्स मॉल समोरील मुख्य रस्त्यावर ऑटो रिक्षा चालवत असतानाचा विडियो सध्या पिंपरी चिंचवड शहरात वायरल होत आहे. या विडियो माझे चिमुकला मुलगा ऑटो रिक्षा चालवत असताना आपण पाहू शकतो तसेच त्याचे वडील ऑटो रिक्षा मागील सीटवर बसून प्रवास करत आहेत असा आपल्याला या विडियो च्या माध्यमातून दिसून येत आहे. चिमुकला मुलगा ऑटो रिक्षा चालवत असताना जर एखादा अपघात झाला तर याला जबाबदार कोण असणार ? असा प्रश्न आता सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकर विचारत आहेत. तर चिमुकला मुलगा शहरातील मुख्य मार्गावर अशाप्रकारे ऑटो रिक्षा चालवत असताना शहरातील वाहतूक पोलीस काय करत होते ? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे.... #पिंपरीचिंचवड #वाकड #धक्कादायक #व्हायरलव्हिडिओ #अल्पवयीन #रिक्षा #वाहतूकनियम #बेजबाबदारपणा #अपघाताचा_धोका #पोलिसप्रश्नचिन्ह #PimpriChinchwad #Wakad #Shocking #ViralVideo #MinorDriving #AutoRickshaw #TrafficViolation #Irresponsible #AccidentRisk #PoliceNegligence1