३१ कलाकारांनी भीम-बुद्ध गीतांतून अर्पण केली स्वरांजली; गायक कलाकारांचा सुवर्णपदक देऊन गौरव अंबरनाथमध्ये ‘मधुर संगीत कराओके स्टुडिओ’चा चौथा वर्धापन दिन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात संपन्न ३१ कलाकारांनी भीम-बुद्ध गीतांतून अर्पण केली स्वरांजली; गायक कलाकारांचा सुवर्णपदक देऊन गौरव अंबरनाथ:येथील 'मधुर संगीत कराओके स्टुडिओ'चा चौथा वर्धापन दिन आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विशेष सोहळा नुकताच मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या कार्यक्रमात अंबरनाथसह बदलापूर, उल्हासनगर आणि कल्याणमधील ३१ गायक कलाकारांनी भीम-बुद्ध गीते सादर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्व. शांताराम जाधव सभागृहाचे अध्यक्ष श्री. सुधाकर वणगे उपस्थित होते, तर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. श्रीकांत कर्वे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून करण्यात आली. उपस्थित सर्व कलाकारांनीही पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. कार्यक्रमाचे स्वागत मनोहर लाखोरकर "जगभाई" यांनी पाहुण्यांना शाल आणि गुलाबपुष्प देऊन केले. सकाळी १०:३० वाजल्यापासून सुरू झालेल्या या सांगितिक सोहळ्यात एकापेक्षा एक सरस भीम गीतांचे सादरीकरण झाले. "ये बुद्ध की धरती युद्ध न चाहे" या गीताने दुपारी ३:३० वाजता कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी बोलताना अध्यक्ष सुधाकर वणगे यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला, तर श्रीकांत कर्वे यांनी बाबासाहेबांनी समता, समानता, बंधुभाव आणि स्त्री उद्धारासाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी सर्व गायक कलाकारांना श्री. सुधाकर वणगे, श्री. श्रीकांत कर्वे आणि डॉ. माधुरी लाखोरकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सुवर्णपदक (गोल्ड मेडल) आणि स्टुडिओचे वार्षिक कॅलेंडर देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच 'लकी ड्रॉ'च्या माध्यमातून श्री. देवराम अहिरे यांना 'सरप्राईज गिफ्ट' देऊन गौरविण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुकेश गौतम, राजश्री गुजर, शोभा गोडेगावकर, चंदा जाधव, उदय सुर्वे, विजया कटके, अनिता मराठे, डॉ. माधुरी लाखोरकर आणि परम त्रिपाठी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन स्टुडिओच्या संचालिका डॉ. माधुरी लाखोरकर यांनी केले.

- Post by GBK news1
- देखिए सोशल मीडिया का यह वायरल वीडियो जिसमें युक्ति की कोई पहचान या नाम को नहीं दिखाया गया यह सिर्फ एक सोशल मीडिया का वायरल वीडियो है1
- 19 अप्रैल को गुलामे अहले बैत फाउंडेशन Dwara महिलाओं के लिए मुफ़्त हिजामा कैंप का आयोजन.#mumbranews1
- Post by Nirbhay Nagri1
- वार्ड क 15 हनुमान नगर cng पम्प जवल शिवसेना शाखा वेंकटरामन कंपनी जवल1
- ठाणे :मिरवणुका, डीजेचा आवाज आणि अनावश्यक खर्च टाळून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त 'भूमीपुत्र एल्गार संघटनेने' एक अत्यंत अभिनव आणि डोळस उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातील तब्बल १३५ अनाथ, निराधार आणि मजूर कुटुंबातील मुलांचे 'शैक्षणिक पालकत्व' स्वीकारून संघटनेने महामानवाला खऱ्या अर्थाने कृतिशील आदरांजली वाहिली आहे. आज १४ एप्रिल रोजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. प्रमोद पवार यांनी या उपक्रमाची अधिकृत घोषणा करताना सांगितले की, केवळ जयघोष करून विचार जपले जात नाहीत, तर ते जगले पाहिजेत. बाबासाहेबांनी दिलेला शिक्षणाचा मंत्र प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठीच आम्ही या १३५ कोवळ्या फुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हा 'शैक्षणिक एल्गार' यशस्वी करण्यासाठी गेल्या आठवडाभरापासून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस एक करून दुर्गम पाड्यांचा दौरा केला. यामध्ये अत्यंत पारदर्शक पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून मोखाडा तालुक्यातील ३८, जव्हारमधील १८, डहाणूतील २३, तलासरीमधील १५, पालघरमधील १५, भिवंडीतील १०, वाड्यातील १० आणि विक्रमगड तालुक्यातील ६ विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील लोणे, सरचिटणीस नवनाथ भोये, आदिम शक्ती प्रमुख स्वप्नील वाघ यांनी आपल्या टीमने प्रत्यक्ष गावागावात जाऊन या पाल्यांच्या परिस्थितीची पाहणी केली. निवडलेल्या मुलांमध्ये प्रामुख्याने ज्यांना आई-वडील नाहीत, ज्यांचे पालक गंभीर आजाराने ग्रस्त किंवा दिव्यांग आहेत अशा मुलांचा प्राधान्याने विचार करण्यात आला आहे. आर्थिक अभावामुळे ही मुले शाळा सोडू शकतात किंवा स्थलांतरामुळे शिक्षणापासून वंचित राहू शकतात, हे ओळखून संघटनेने त्यांच्या शैक्षणिक साहित्यापासून ते आवश्यक कागदपत्रे मिळवून देण्यापर्यंतची सर्व जबाबदारी उचलली आहे. या मोहिमेत युवा शक्ती प्रमुख रूपेश जाधव, नाशिक जिल्हा प्रमुख मुरलीधर कनोजे, राज्य उपाध्यक्ष कल्पेश जाधव, असगर पटेल, भूषण घोडविंदे, ॲड. सोनाली मनोरे-पवार, उपकार्याध्यक्ष दूषांत घायवट, विजय राऊत, प्रमिला तरसे आणि सुनीता वळवी यांच्यासह सर्व तालुका अध्यक्ष मनोज पारधी, अनिल करबट, गणेश माळी, रामा होला, विजय नडगे,विकास धोडी, प्रसाद भालेराव, मनोज धर्ममेहर, भावेश पढेर इत्यादी पदाधिकारी हिरिरीने सहभागी झाले आहेत. बडेजाव टाळून समाजाचे देणे लागते या भावनेतून राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत असून, १३५ मुलांची ही फक्त सुरुवात असून येत्या काळात वंचितांच्या शिक्षणासाठी संघटना सदैव कटिबद्ध राहील, अशी ग्वाही प्रमोद पवार यांनी दिली आहे.1
- आगरा में अंबेडकर जयंती पर विवाद: परशुराम चौक पर तोड़फोड़, CCTV कैमरे भी क्षतिग्रस्त 📰 न्यूज़ (कल की घटना): कल आगरा के आवास विकास स्थित परशुराम चौक पर उस समय तनाव की स्थिति बन गई, जब अंबेडकर जयंती के मौके पर कुछ अराजक तत्वों द्वारा कथित रूप से तोड़फोड़ की घटना सामने आई। जानकारी के अनुसार, कुछ लोगों ने जूते पहनकर छत्र पर चढ़कर वहां नीले झंडे लगाए और स्थल को नुकसान पहुंचाने की कोशिश की। इस दौरान मौके पर लगे CCTV कैमरों को भी तोड़ दिया गया। घटना के बाद स्थानीय लोगों में आक्रोश फैल गया और उन्होंने इसे धार्मिक भावनाओं से जुड़ा मामला बताया। स्थानीय नागरिकों और संगठनों ने प्रशासन से दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है। फिलहाल पुलिस मामले की जांच में जुटी हुई है और इलाके में सुरक्षा बढ़ा दी गई है। #AgraNews #AmbedkarJayanti #ParshuramChowk #BreakingNews #UttarPradesh #LawAndOrder #CCTV #ViralNews #PublicReaction #IndiaNews1
- GBK NEWS | ब्रेकिंग न्यूज 🚨 महाराष्ट्रात अपघातांची मालिका; 5 जिल्ह्यांत 5 भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू महाराष्ट्र : राज्यात आज एकामागोमाग एक भीषण रस्ते अपघात घडल्याने खळबळ, उडाली आहे. विविध जिल्ह्यांत झालेल्या अपघातांत एकूण 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आहेत. 📍 परभणी (उमरी फाटा) तीन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या घटनेत सिद्धार्थ पितांबरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी आहेत. 📍 भंडारा (राष्ट्रीय महामार्ग 53) भरधाव ट्रकने चारचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी झाले. 📍 कोल्हापूर-इचलकरंजी मार्ग धार्मिक कार्यासाठी निघालेल्या तरुणाचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मृत युवकाचे नाव सुशांत कांबळे असे आहे. 📍 पुणे निवडणूक कामाच्या तणावात असलेल्या प्राध्यापक ज्ञानेश्वर रोटे (40) यांचा दुचाकी घसरून अपघात झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. 📍 मुंबई-नाशिक महामार्ग कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार ट्रेलरला धडकली. या अपघातात दीपक पाटेकर यांचा मृत्यू, तर चार जण जखमी झाले. 📍 छत्रपती संभाजीनगर (समृद्धी महामार्ग) कारने ट्रकला मागून धडक दिल्याने कार पेटली. या भीषण घटनेत पवन अजमेरा यांचा जळून मृत्यू, तर दोन जण जखमी झाले. ⚠️ या सर्व घटनांमुळे संबंधित परिसरात दुःखाचे वातावरण पसरले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. 📺 GBK NEWS सत्याचा आवाज जनतेसाठी1