logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जिल्ह्यातील गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारींसाठी संपर्क व्यवस्था जाहीर! श्री गणेशोत्सव-२०२६ च्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्हा पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपविभाग आणि पोलीस ठाणेनिहाय नियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सण-उत्सवांच्या काळात ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी ही विशेष यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विशेष यंत्रणा तैनात जनहित याचिका क्र. १७३/२०१० (महेश बेडेकर वि. महाराष्ट्र शासन व इतर) प्रकरणी उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रत्येक सणापूर्वी ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी व नियंत्रण अधिकाऱ्यांची माहिती प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. त्याअनुषंगाने जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविण खंडारे यांनी ही सूची जाहीर केली आहे. जिल्ह्यातील ध्वनी प्रदूषण नियंत्रण अधिकारी सूची १. उपविभाग वाशिम: • उपविभाग वाशिम: रामकृष्ण पवार (उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम) – मो. ७०५७००७९८३ / ०७२५२-२३२५४५ • वाशिम शहर: संजय चौधरी (पोलीस निरीक्षक, वाशीम शहर) – मो. ८८८८७६८२१८ / ०७२५२-२३२१०० • वाशिम ग्रामीण: श्रीदेवी पाटील (सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाशीम ग्रामीण) – मो. ९०११३८९९८३ / ०७२५२-२३४१०० • रिसोड: रामेश्वर चव्हाण (पोलीस निरीक्षक, रिसोड) – मो. ९८२३०९५५२१ / ०७२५१-२२२३५६ • मालेगाव: राजेश खेरडे (पोलीस निरीक्षक, मालेगाव) – मो. ७८८७४८९२०५ / ०७२५४-२७१२५३ • शिरपूर: योगिता भारव्दाज (सहाय्यक पोलीस निरीक्षक, शिरपूर) – मो. ८९७५४४४८०० / ०७२५४-२७४००३ २. उपविभाग मंगरुळपीर: • उपविभाग मंगरुळपीर: विशाल क्षीरसागर (उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगरुळपीर) – मो. ८३०८०२८५९९ / ०७२५३-२६०६६२ • मंगरुळपीर: किशोर शेळके (पोलीस निरीक्षक, मंगरुळपीर) – मो. ९४२२९५८६१५ / ०७२५३-२६०३३३ • अनसिंग: . संतोष शेळके (पोलीस निरीक्षक, अनसिंग) – मो. ८१०८१२४२४४ / ०७२५२-२२६०३४ • आसेगाव: रामकृष्ण भाकडे (सहाय्यक पोलीस निरीक्षक, आसेगाव) – मो. ७३८५५४४८६६ / ०७२५३-२३५५५८ • जऊळका: श्री. हिवरकर (सहाय्यक पोलीस निरीक्षक, जऊळका) – मो. ७७७४०५४१३३ / ०७२५४-२७२०१६ ३. उपविभाग कारंजा: • उपविभाग कारंजा: मनिष ठाकरे (उपविभागीय पोलीस अधिकारी, कारंजा) – मो. ९८५०१०६०५७ / ०७२५६-२२२००८ • कारंजा शहर: अमर चौरे (पोलीस निरीक्षक, कारंजा) – मो. ९८२३३१०६७१ / ०७२५६-२२२१०० • कारंजा ग्रामीण: प्रविण शिंदे (पोलीस निरीक्षक, कारंजा ग्रामीण) – मो. ९८२३२२००४६ / ०७२५६-२२२४०० • मानोरा: नैना पोहेकर (पोलीस निरीक्षक, मानोरा) – मो. ९९२३०३२४४७ / ०७२५३-२३३२२९ • धनज: जगदीश बांगर (सहाय्यक पोलीस निरीक्षक, धनज) – मो. ९६५७६६२३३० / ०७२५६-२३२०३० तक्रार नोंदवण्यासाठी थेट संपर्क माध्यमे ध्वनी प्रदूषणाची तक्रार नोंदवण्यासाठी नागरिक खालील क्रमांकांवर संपर्क साधू शकतात:जिल्हास्तरीय ध्वनी प्रदूषण नियंत्रण समिती तक्रारींचे निवारण व देखरेखीसाठी जिल्हास्तरावर नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे: • अध्यक्ष: लता फड (अपर पोलीस अधीक्षक, वाशिम) – • सदस्य: किरण दांडगे (पोलीस उपअधीक्षक • सचिव: प्रादेशिक अधिकारी (महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, अमरावती) – द नागरिकांनी गणेशोत्सवाच्या काळात ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

1 day ago
user_के.के. रिपोर्टर
के.के. रिपोर्टर
Spa रिसोड, वाशिम, महाराष्ट्र•
1 day ago
189e76e6-bfbc-4d9f-b1e1-e99c70c17bb7

जिल्ह्यातील गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारींसाठी संपर्क व्यवस्था जाहीर! श्री गणेशोत्सव-२०२६ च्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्हा पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपविभाग आणि पोलीस ठाणेनिहाय नियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सण-उत्सवांच्या काळात ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी ही विशेष यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विशेष यंत्रणा तैनात जनहित याचिका क्र. १७३/२०१० (महेश बेडेकर वि. महाराष्ट्र शासन व इतर) प्रकरणी उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रत्येक सणापूर्वी ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी व नियंत्रण अधिकाऱ्यांची माहिती प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. त्याअनुषंगाने जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविण खंडारे यांनी ही सूची जाहीर केली आहे. जिल्ह्यातील ध्वनी प्रदूषण नियंत्रण अधिकारी सूची १. उपविभाग वाशिम: • उपविभाग वाशिम: रामकृष्ण पवार (उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम) – मो. ७०५७००७९८३ / ०७२५२-२३२५४५ • वाशिम शहर: संजय चौधरी (पोलीस निरीक्षक, वाशीम शहर) – मो. ८८८८७६८२१८ / ०७२५२-२३२१०० • वाशिम ग्रामीण: श्रीदेवी पाटील (सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाशीम ग्रामीण) – मो. ९०११३८९९८३ / ०७२५२-२३४१०० • रिसोड: रामेश्वर चव्हाण (पोलीस निरीक्षक, रिसोड) – मो. ९८२३०९५५२१ / ०७२५१-२२२३५६ • मालेगाव: राजेश खेरडे (पोलीस निरीक्षक, मालेगाव) – मो. ७८८७४८९२०५ / ०७२५४-२७१२५३ • शिरपूर: योगिता भारव्दाज (सहाय्यक पोलीस निरीक्षक, शिरपूर) – मो. ८९७५४४४८०० / ०७२५४-२७४००३ २. उपविभाग मंगरुळपीर: • उपविभाग मंगरुळपीर: विशाल क्षीरसागर (उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगरुळपीर) – मो. ८३०८०२८५९९ / ०७२५३-२६०६६२ • मंगरुळपीर: किशोर शेळके (पोलीस निरीक्षक, मंगरुळपीर) – मो. ९४२२९५८६१५ / ०७२५३-२६०३३३ • अनसिंग: . संतोष शेळके (पोलीस निरीक्षक, अनसिंग) – मो. ८१०८१२४२४४ / ०७२५२-२२६०३४ • आसेगाव: रामकृष्ण भाकडे (सहाय्यक पोलीस निरीक्षक, आसेगाव) – मो. ७३८५५४४८६६ / ०७२५३-२३५५५८ • जऊळका: श्री. हिवरकर (सहाय्यक पोलीस निरीक्षक, जऊळका) – मो. ७७७४०५४१३३ / ०७२५४-२७२०१६ ३. उपविभाग कारंजा: • उपविभाग कारंजा: मनिष ठाकरे (उपविभागीय पोलीस अधिकारी, कारंजा) – मो. ९८५०१०६०५७ / ०७२५६-२२२००८ • कारंजा शहर: अमर चौरे (पोलीस निरीक्षक, कारंजा) – मो. ९८२३३१०६७१ / ०७२५६-२२२१०० • कारंजा ग्रामीण: प्रविण शिंदे (पोलीस निरीक्षक, कारंजा ग्रामीण) – मो. ९८२३२२००४६ / ०७२५६-२२२४०० • मानोरा: नैना पोहेकर (पोलीस निरीक्षक, मानोरा) – मो. ९९२३०३२४४७ / ०७२५३-२३३२२९ • धनज: जगदीश बांगर (सहाय्यक पोलीस निरीक्षक, धनज) – मो. ९६५७६६२३३० / ०७२५६-२३२०३० तक्रार नोंदवण्यासाठी थेट संपर्क माध्यमे ध्वनी प्रदूषणाची तक्रार नोंदवण्यासाठी नागरिक खालील क्रमांकांवर संपर्क साधू शकतात:जिल्हास्तरीय ध्वनी प्रदूषण नियंत्रण समिती तक्रारींचे निवारण व देखरेखीसाठी जिल्हास्तरावर नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे: • अध्यक्ष: लता फड (अपर पोलीस अधीक्षक, वाशिम) – • सदस्य: किरण दांडगे (पोलीस उपअधीक्षक • सचिव: प्रादेशिक अधिकारी (महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, अमरावती) – द नागरिकांनी गणेशोत्सवाच्या काळात ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • महिना उलटला पाऊस नाही, विहिर बोरवेलला पुरेसे पाणी असूनही शेतातील वीज गुल,खरीप पिके धोक्यात,शेतकऱ्याचा टाहो हिंगोली जिल्ह्यात विशेषता कळमनुरी तालुक्यात एका महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके हातची गेली आहेत,तूर ,कापूस, सोयाबीन,हळद ही पिके पाऊस नसल्याने धोक्यात आली आहे.एकंदरीत तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे.महिनाभरापासून पाऊस नाही विहिरी बोरला पुरेशी पाणी असताना देखील शेतातील वीज वारंवार गुण होत आहे त्यामुळे मुबलक पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही,अशी परिस्थिती शेतकऱ्यावर येऊन ठेपली आहे कळमनुरी तालुक्यातील सांडस परीसरात शेतकऱ्यांनी या समस्या बद्दल एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे .या भागात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने येथील पिकाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे .
    1
    महिना उलटला पाऊस नाही, विहिर बोरवेलला पुरेसे पाणी असूनही शेतातील वीज गुल,खरीप पिके धोक्यात,शेतकऱ्याचा टाहो

हिंगोली जिल्ह्यात विशेषता कळमनुरी तालुक्यात एका महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके हातची गेली आहेत,तूर ,कापूस, सोयाबीन,हळद ही पिके पाऊस नसल्याने धोक्यात आली आहे.एकंदरीत तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे.महिनाभरापासून पाऊस नाही विहिरी बोरला पुरेशी पाणी असताना देखील शेतातील वीज वारंवार गुण होत आहे त्यामुळे मुबलक पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही,अशी परिस्थिती शेतकऱ्यावर येऊन ठेपली आहे कळमनुरी तालुक्यातील सांडस परीसरात शेतकऱ्यांनी या समस्या बद्दल एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे .या भागात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने येथील पिकाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे .
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • “ST आरक्षणाची अंमलबजावणीसाठी - मल्हार योद्धा दीपक बोऱ्हाडे आक्रमक" “ST आरक्षणाची अंमलबजावणीसाठी - मल्हार योद्धा दीपक बोऱ्हाडे आक्रमक"
    1
    “ST आरक्षणाची अंमलबजावणीसाठी - 
मल्हार योद्धा दीपक बोऱ्हाडे आक्रमक"
“ST आरक्षणाची अंमलबजावणीसाठी - 
मल्हार योद्धा दीपक बोऱ्हाडे आक्रमक"
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    13 hrs ago
  • बुलढाणा जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन खामगाव: बुलढाणा जिल्हा तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या मुख्य मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल टिकार पाटील यांनी खामगाव तालुक्यातील अटाळी येथे टावरवर चढून ‘शोले’ स्टाईल आंदोलन करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यात ७ आमदार, १ खासदार आणि ३ मंत्री (केंद्रीय मंत्री, पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री) असूनही जिल्ह्याला दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आले, ही दुर्दैवाची बाब आहे. सरकारला आमच्या थडग्यावर राज्य करायचे आहे का?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. जिल्ह्यात पावसाअभावी पिके करपली असून शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. स्थानिक तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांनी आंदोलकांची भेट घेऊन सकारात्मक मध्यस्थीचे व प्रशासकीय स्तरावर १००% प्रयत्न करण्याचे लिखित आश्वासन दिले. प्रशासनाच्या विनंतीवरून हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र येत्या १५ तारखेपर्यंत बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाला नाही, तर आमदार आकाश फुंडकर यांच्या घरावर थेट घुसून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
    3
    बुलढाणा जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन

खामगाव: बुलढाणा जिल्हा तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या मुख्य मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल टिकार पाटील यांनी खामगाव तालुक्यातील अटाळी येथे टावरवर चढून ‘शोले’ स्टाईल आंदोलन करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यात ७ आमदार, १ खासदार आणि ३ मंत्री (केंद्रीय मंत्री, पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री) असूनही जिल्ह्याला दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आले, ही दुर्दैवाची बाब आहे. सरकारला आमच्या थडग्यावर राज्य करायचे आहे का?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. जिल्ह्यात पावसाअभावी पिके करपली असून शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. स्थानिक तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांनी आंदोलकांची भेट घेऊन सकारात्मक मध्यस्थीचे व प्रशासकीय स्तरावर १००% प्रयत्न करण्याचे लिखित आश्वासन दिले. प्रशासनाच्या विनंतीवरून हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र येत्या १५ तारखेपर्यंत बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाला नाही, तर आमदार आकाश फुंडकर यांच्या घरावर थेट घुसून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • आमच्या गावाची स्वच्छता आमच्या dalambi गावामध्ये खूप प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. ओला कचरा सुखा कचरा आणि घरातील wastage कचरा यामुळे गावात बिमारी च प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.
    3
    आमच्या गावाची स्वच्छता 
आमच्या dalambi गावामध्ये खूप प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. ओला कचरा सुखा कचरा आणि घरातील wastage कचरा यामुळे गावात बिमारी च प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.
    user_विकास इंगळे
    विकास इंगळे
    अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • बुलढाण्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक; लोणारमध्ये वाजवले 'डफडे', ३० सप्टेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास सिंदखेडराजा येथे बैलजोड्यांसह चक्काजामचा इशारा!
    1
    बुलढाण्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक; लोणारमध्ये वाजवले 'डफडे', ३० सप्टेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास सिंदखेडराजा येथे बैलजोड्यांसह चक्काजामचा इशारा!
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • मंजूर झालेले सोलर संबंधित सोलर कंपनीने बसवल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान सोलर तात्काळ बसून देण्याची सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांची महावितरण कडे मागणी मंजुर सोलर परंतु न बसवल्यामुळे शेतकऱ्यांचे पाण्या अभावी नुकसान! (शेतकऱ्यांनी वर्ग संबंधित ऑफिसमध्ये मारतात चक्ररा) तात्काळ सोलर बसवावे जाधव यांनी केली मागणी, मालेगाव प्रतिनिधी,दि,१५:- ‌पावसाने तर मारली दांडी परंतु सोलर व महावितरण अधिकारी पण देत आहेत उडवा उडी चे उत्तर, पाण्याअभावी शेतकऱ्यांचे शेतातील हळद सोयाबीन इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात होत आहे नुकसान शासन दरबारी शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सोलर सह इतर योजना असल्या तरी मात्र पात्र लाभार्थ्यांनी दोन दोन तीन तीन महिने पूर्वी लागणारी कागदपत्रे व सोलर साठी लागणारी रक्कम ची भरणा केली परंतु अद्यापही त्यांना सोलर कंपनी मार्फत सोलर तसेच महावितरण कंपनीकडून पाहिजे तसे सहकार्य मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत असून खंत शेतकरी वर्ग व्यक्त करत आहेत, मालेगाव तालुक्यातील जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी विविध सोलर कंपन्याकडे ऑनलाइन अर्ज केले आहेत, अमानी येथील शेतकरी राजू भिमराव गवळी,व अनिल गंगाराम जाधव यांनी मागील दोन - महीन्यापृर्वी सोलर साठी,ओस्वाल कंपनी साठी ऑनलाइन अर्ज केला तसेच लागणारी रक्कम सुद्धा भरली परंतु अद्याप यांच्या शेतात बोरवर सोलर बसवण्यात आले नसल्याने यांचे हळद ,सोयाबीन इतर पिक वाळून चालले यांनी मालेगाव महावितरण कंपनीकडे तसेच वाशिम कंपनीकडे चकरा मारून परेशान झाले असता आज दिनांक 15 सप्टेंबर रोजी महावितरणचे अधीक्षक अभियंता मंडळ कार्यालय वाशिम संदीप दत्तात्रेय दरवडे यांची प्रत्यक्ष भेट सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव तसेच शेतकरी राजु गवळी यांनी घेतली असता, त्यांनी संबंधित महावितरणचे उपकार्यकारी अभियंता व्हि बी चव्हाण, तसेच ओसवाल कंपनीचे विनोद ब्रह्मेकर यांच्याशी संपर्क साधून या शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासंदर्भात सांगितले, याबाबत ओबीसी सेलचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख विवेक गवळी यांनी सुद्धा दूरध्वनीवरून साहेबांशी संपर्क साधून विचारणा केली, सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांनी थेट महावितरण चे वरिष्ठ अधीक्षक दरवडे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची व्यथा मांडली व त्यांनी तात्काळ दाखल घेऊन दोनच दिवसात सोलर बसवल्या जातील असे यावेळी जाधव यांना सांगितले, जाधव यांनी महावितरण व सोलर कंपनी वाले शेतकऱ्याकडून पैशाची मागणी देखील करतात असे सांगितले असता, दरवडे म्हणाले ज्यांनी पैशाची मागणी केली असेल त्यांना डायरेक्ट लाच लुचपत विभागाकडे तक्रार करून पकडून द्या , काही शेतकरी तर आमचे अधिकाऱ्यांचे पाय धरायचे राहिले हो साहेब असे म्हणाले तेव्हा या बाबीची तात्काळ दखल घेऊन पात्र परंतु सोलर पासून वंचित असलेले सर्व शेतकऱ्यांचे सोलर तात्काळ बसून द्यावे अशी मागणीही अनिल जाधव यांनी यावेळी केली
    2
    मंजूर झालेले सोलर संबंधित सोलर कंपनीने बसवल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान सोलर तात्काळ बसून देण्याची सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांची महावितरण कडे मागणी
मंजुर सोलर परंतु न बसवल्यामुळे  शेतकऱ्यांचे पाण्या अभावी नुकसान! (शेतकऱ्यांनी वर्ग संबंधित ऑफिसमध्ये मारतात चक्ररा) तात्काळ सोलर बसवावे जाधव यांनी केली मागणी, मालेगाव प्रतिनिधी,दि,१५:- ‌पावसाने तर मारली दांडी परंतु सोलर व महावितरण अधिकारी पण देत आहेत उडवा उडी चे उत्तर, पाण्याअभावी शेतकऱ्यांचे शेतातील हळद सोयाबीन इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात होत आहे नुकसान शासन दरबारी शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सोलर सह इतर योजना असल्या तरी मात्र पात्र लाभार्थ्यांनी दोन दोन तीन तीन महिने पूर्वी लागणारी कागदपत्रे व सोलर साठी लागणारी रक्कम ची भरणा केली परंतु अद्यापही त्यांना सोलर कंपनी मार्फत सोलर तसेच महावितरण कंपनीकडून पाहिजे तसे सहकार्य मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत असून खंत शेतकरी वर्ग व्यक्त करत आहेत, मालेगाव तालुक्यातील जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी विविध सोलर कंपन्याकडे ऑनलाइन  अर्ज केले आहेत, अमानी येथील शेतकरी राजू भिमराव गवळी,व अनिल गंगाराम जाधव यांनी मागील दोन - महीन्यापृर्वी सोलर साठी,ओस्वाल कंपनी साठी ऑनलाइन अर्ज केला तसेच लागणारी रक्कम सुद्धा भरली परंतु अद्याप यांच्या शेतात बोरवर सोलर बसवण्यात आले नसल्याने यांचे हळद ,सोयाबीन इतर पिक वाळून चालले यांनी मालेगाव महावितरण कंपनीकडे तसेच वाशिम कंपनीकडे चकरा मारून परेशान झाले असता आज दिनांक 15 सप्टेंबर रोजी महावितरणचे अधीक्षक अभियंता मंडळ कार्यालय वाशिम संदीप दत्तात्रेय दरवडे यांची प्रत्यक्ष भेट सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव तसेच शेतकरी राजु गवळी यांनी घेतली असता, त्यांनी संबंधित महावितरणचे उपकार्यकारी अभियंता व्हि बी  चव्हाण, तसेच ओसवाल कंपनीचे विनोद ब्रह्मेकर यांच्याशी संपर्क साधून या शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासंदर्भात सांगितले, याबाबत ओबीसी सेलचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख विवेक गवळी यांनी सुद्धा दूरध्वनीवरून साहेबांशी संपर्क साधून विचारणा केली, सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांनी थेट महावितरण चे वरिष्ठ अधीक्षक दरवडे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची व्यथा मांडली व त्यांनी तात्काळ दाखल घेऊन दोनच दिवसात सोलर बसवल्या जातील असे यावेळी जाधव यांना सांगितले, जाधव यांनी महावितरण व सोलर कंपनी वाले शेतकऱ्याकडून पैशाची मागणी देखील करतात असे सांगितले असता, दरवडे म्हणाले ज्यांनी पैशाची मागणी केली असेल त्यांना डायरेक्ट लाच लुचपत विभागाकडे तक्रार करून पकडून द्या , काही शेतकरी तर आमचे अधिकाऱ्यांचे पाय धरायचे राहिले हो साहेब असे म्हणाले तेव्हा या बाबीची तात्काळ दखल घेऊन पात्र परंतु सोलर पासून वंचित असलेले सर्व शेतकऱ्यांचे सोलर तात्काळ बसून द्यावे अशी मागणीही अनिल जाधव यांनी यावेळी केली
    user_सारनाथ अवचार
    सारनाथ अवचार
    पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • हिंगोली जिल्ह्यातील पिकांच्या स्थितीचा तातडीने सर्वेक्षण अहवाल करण्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे कृषी विभागाला निर्देश जिल्ह्यातील पावसाचा खंड आणि त्याचा खरीप पिकांवर झालेला परिणाम लक्षात घेता कृषी विभागाने पिकांचे प्रत्यक्ष क्षेत्रीय सर्वेक्षण करून त्याचा सविस्तर व वस्तुनिष्ठ असा तालुका, पीकनिहाय अहवाल तत्काळ सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीचे अध्यक्ष राहुल गुप्ता यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीची बैठक झाली. बैठकीत जिल्ह्यातील पर्जन्यमान, पावसातील खंड, खरीप पिकांची सद्य:स्थिती तसेच दुष्काळाच्या अनुषंगाने आवश्यक बाबींचा जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतला. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. बी. एन. संगनवार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.शिवाजी बुचाले, जिल्ह्याचे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांची उपस्थिती होती.   जिल्ह्याचे जून ते सप्टेंबर कालावधीतील सरासरी पर्जन्यमान ७९५.३ मि.मी. आहे. १३ सप्टेंबरअखेर ५०१.५ मि.मी. पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या ६३.१ टक्के आहे. ऑगस्टमध्ये सरासरीच्या केवळ ३०.२ टक्के पाऊस झाला आहे. या कालावधीत १४ ते १८ दिवसांचा पावसाचा खंड नोंदविण्यात आला आहे. सप्टेंबरमध्येही आतापर्यंत केवळ १७.५ मि.मी. पाऊस झाला आहे. या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निकषानुसार आवश्यक त्या उपाययोजनेसाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवावा. कृषी विभागासह वरिष्ठ भूवैज्ञानिक, पशुसंवर्धन विभागाने समन्वय ठेवत आवश्यक ती कार्यवाही तत्काळ पार पाडावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी गुप्ता यांनी अधिकाऱ्यांना दिले.
    1
    हिंगोली जिल्ह्यातील पिकांच्या स्थितीचा
तातडीने सर्वेक्षण अहवाल करण्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे कृषी विभागाला निर्देश

जिल्ह्यातील पावसाचा खंड आणि त्याचा खरीप पिकांवर झालेला परिणाम लक्षात घेता कृषी विभागाने पिकांचे प्रत्यक्ष क्षेत्रीय सर्वेक्षण करून त्याचा सविस्तर व वस्तुनिष्ठ असा तालुका, पीकनिहाय अहवाल तत्काळ सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीचे अध्यक्ष राहुल गुप्ता यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीची बैठक झाली. बैठकीत जिल्ह्यातील पर्जन्यमान, पावसातील खंड, खरीप पिकांची सद्य:स्थिती तसेच दुष्काळाच्या अनुषंगाने आवश्यक बाबींचा जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतला. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. बी. एन. संगनवार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.शिवाजी बुचाले, जिल्ह्याचे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांची उपस्थिती होती.  
जिल्ह्याचे जून ते सप्टेंबर कालावधीतील सरासरी पर्जन्यमान ७९५.३ मि.मी. आहे. १३ सप्टेंबरअखेर ५०१.५ मि.मी. पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या ६३.१ टक्के आहे. ऑगस्टमध्ये सरासरीच्या केवळ ३०.२ टक्के पाऊस झाला आहे. या कालावधीत १४ ते १८ दिवसांचा पावसाचा खंड नोंदविण्यात आला आहे. सप्टेंबरमध्येही आतापर्यंत केवळ १७.५ मि.मी. पाऊस झाला आहे. या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निकषानुसार आवश्यक त्या उपाययोजनेसाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवावा. कृषी विभागासह वरिष्ठ भूवैज्ञानिक, पशुसंवर्धन विभागाने समन्वय ठेवत आवश्यक ती कार्यवाही तत्काळ पार पाडावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी गुप्ता यांनी अधिकाऱ्यांना दिले.
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचा एल्गार; 17 सप्टेंबरला परभणीत महामोर्चा - भारत आव्हाड ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचा एल्गार; 17 सप्टेंबरला परभणीत महामोर्चा - भारत आव्हाड
    1
    ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचा एल्गार; 17 सप्टेंबरला परभणीत महामोर्चा - भारत आव्हाड
ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचा एल्गार; 17 सप्टेंबरला परभणीत महामोर्चा - भारत आव्हाड
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    15 hrs ago
  • महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या :- संभाजी ब्रिगेड सद्ध्याच्या परिस्थितीत पावसाने पाठ फिरवल्याने मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खरीप हंगाम गंभीर संकटात सापडला असून, तातडीच्या उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे. सध्या मराठवाड्यासह विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील शेतीची परिस्थिती अत्यंत भयावह असून कोरडा दुष्काळसदृश बनली आहे. तरी मुख्यमंत्री यांनी वरील विभागातील परिस्थितीचा आढावा घेऊन कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करून त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी बँका, विविध पतपुरवठा संस्था तसेच खासगी सावकारांकडून कर्ज घेतले आहे. मात्र, पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावरच पाऊस न झाल्याने या शेतकऱ्यांसमोर कर्ज फेडण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, कोरडा दुष्काळ जाहीर करून सवलती लागू कराव्यात : विशेषतः बुलढाणा जिल्हा जो कोरडा दुष्काळ यादीतून वगळला आहे तो तातडीने कोरडा दुष्काळ म्हणून घोषित करावा.सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सर्व शासकीय सवलती द्या, तातडीची आर्थिक खरीप पिकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आर्थिक मदत, आगामी रब्बी हंगामाचे नियोजन, बियाणे उपलब्धता, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था यावर तातडीने निर्णय घ्या,शेतीच्या नुकसानीकडे लक्ष देताना कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क व स्पर्धा परीक्षा शुल्क पूर्णतः माफ करून दिलासा द्या, पावसाअभावी तलाव, विहिरी आणि इतर जलस्रोतांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे पुढील काळात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. यासाठी टँकरने पाणीपुरवठा आणि चारा छावण्या यांचे पूर्वनियोजन करणे आवश्यक आहे. मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेऊन, मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन मदतीचे विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी आमची आग्रही मागणी आहे. तरी आपण वरील विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय द्यावा व शेतकरी सुरक्षित ठेवावा या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचे निवेदन आज नांदूर तहसील मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.हे निवेदन संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष ॲड.मनोज आखरे यांच्या आदेशानुसार व प्रदेश संघटक शिवश्री योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनात व बुलढाणा जिल्हाध्यक्ष अमर रमेश पाटील यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी जिल्हा मार्गदर्शक विनोद वनारे,शेतकरी नेते अरविंद बाठे,जिल्हा कार्याध्यक्ष सचिन बाठे,तालुका उपाध्यक्ष सचिन गणगे,वाहतूक आघाडी तालुकाध्यक्ष अमोल भगत,विशाल इंगळे,विनायक वडोदे,रोहन मनस्कार,सुनील अंभोरे,प्रतीक धांडे,संतोष पारस्कार,ज्ञानेश्वर मनस्कार,अंबादास मनस्कार,बाळू डाबेराव,सुनील बाठे,श्रीकृष्ण गायेल,पत्रकार अमोल करुटले व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    2
    महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या :- संभाजी ब्रिगेड


सद्ध्याच्या परिस्थितीत पावसाने पाठ फिरवल्याने मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खरीप हंगाम गंभीर संकटात सापडला असून, तातडीच्या उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे.
सध्या मराठवाड्यासह विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील शेतीची परिस्थिती अत्यंत भयावह असून कोरडा दुष्काळसदृश बनली आहे. तरी मुख्यमंत्री यांनी वरील विभागातील परिस्थितीचा आढावा घेऊन कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करून त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी बँका, विविध पतपुरवठा संस्था तसेच खासगी सावकारांकडून कर्ज घेतले आहे. मात्र, पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावरच पाऊस न झाल्याने या शेतकऱ्यांसमोर कर्ज फेडण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, कोरडा दुष्काळ जाहीर करून सवलती लागू कराव्यात : विशेषतः बुलढाणा जिल्हा जो कोरडा दुष्काळ यादीतून वगळला आहे तो तातडीने कोरडा दुष्काळ म्हणून घोषित करावा.सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सर्व शासकीय सवलती द्या, तातडीची आर्थिक खरीप पिकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आर्थिक मदत, आगामी रब्बी हंगामाचे नियोजन, बियाणे उपलब्धता, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था यावर तातडीने निर्णय घ्या,शेतीच्या नुकसानीकडे लक्ष देताना कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क व स्पर्धा परीक्षा शुल्क पूर्णतः माफ करून दिलासा द्या, पावसाअभावी तलाव, विहिरी आणि इतर जलस्रोतांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे पुढील काळात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. यासाठी टँकरने पाणीपुरवठा आणि चारा छावण्या यांचे पूर्वनियोजन करणे आवश्यक आहे. मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेऊन, मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन मदतीचे विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी आमची आग्रही मागणी आहे. तरी आपण वरील विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय द्यावा व शेतकरी सुरक्षित ठेवावा या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचे निवेदन आज नांदूर तहसील मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.हे निवेदन संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष ॲड.मनोज आखरे यांच्या आदेशानुसार व प्रदेश संघटक शिवश्री योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनात व बुलढाणा जिल्हाध्यक्ष अमर रमेश पाटील यांच्या नेतृत्वात देण्यात आले.
यावेळी जिल्हा मार्गदर्शक विनोद वनारे,शेतकरी नेते अरविंद बाठे,जिल्हा कार्याध्यक्ष सचिन बाठे,तालुका उपाध्यक्ष सचिन गणगे,वाहतूक आघाडी तालुकाध्यक्ष अमोल भगत,विशाल इंगळे,विनायक वडोदे,रोहन मनस्कार,सुनील अंभोरे,प्रतीक धांडे,संतोष पारस्कार,ज्ञानेश्वर मनस्कार,अंबादास मनस्कार,बाळू डाबेराव,सुनील बाठे,श्रीकृष्ण गायेल,पत्रकार अमोल करुटले व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.