कोपरगाव-येवला-मनमाड चौपदरीकरण व बायपासचा डीपीआर तातडीने सादर करा: छगन भुजबळ कोपरगाव-येवला-मनमाड (NH-160H व NH-752G) या महामार्गाचे चौपदरी कॉंक्रिटीकरण आणि येवला शहर बायपास रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तातडीने सादर करण्याचे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. मंत्रालयात आयोजित उच्चस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. शहराचा भविष्यातील विस्तार लक्षात घेऊन बायपाससाठी योग्य पर्यायी मार्गाची निवड करावी, जेणेकरून तांत्रिक मान्यता मिळणे सुलभ होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ आणि नाशिक-छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी ऑनलाइन उपस्थित होते. वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना करा - समीर भुजबळ यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनी येवला शहरातील गंभीर वाहतूक कोंडीचा प्रश्न मांडला. जड वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर उपाय म्हणून, पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांनी समन्वय राखून अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकल्पामुळे येवला आणि मनमाड परिसरातील दळणवळण वेगवान होणार असून, वाहतूक कोंडीतून शहराची कायमस्वरूपी सुटका होणार आहे.
कोपरगाव-येवला-मनमाड चौपदरीकरण व बायपासचा डीपीआर तातडीने सादर करा: छगन भुजबळ कोपरगाव-येवला-मनमाड (NH-160H व NH-752G) या महामार्गाचे चौपदरी कॉंक्रिटीकरण आणि येवला शहर बायपास रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तातडीने सादर करण्याचे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. मंत्रालयात आयोजित उच्चस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. शहराचा भविष्यातील विस्तार लक्षात
घेऊन बायपाससाठी योग्य पर्यायी मार्गाची निवड करावी, जेणेकरून तांत्रिक मान्यता मिळणे सुलभ होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ आणि नाशिक-छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी ऑनलाइन उपस्थित होते. वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना करा - समीर भुजबळ यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनी येवला शहरातील गंभीर वाहतूक कोंडीचा प्रश्न मांडला. जड
वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर उपाय म्हणून, पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांनी समन्वय राखून अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकल्पामुळे येवला आणि मनमाड परिसरातील दळणवळण वेगवान होणार असून, वाहतूक कोंडीतून शहराची कायमस्वरूपी सुटका होणार आहे.
- शहरात सायलेन्सरमध्ये बेकायदेशीर बदल करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, अशा हुल्लडबाजांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने शहर पोलीस निरीक्षक घोरपडे यांना निवेदन देण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून येवला शहरातील मुख्य रस्ते, शाळा-महाविद्यालय परिसर आणि निवासी भागांत सुधारित सायलेन्सर लावलेल्या बुलेटचा सुळसुळाट वाढला आहे. या आवाजाचा लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः 'नो हॉर्न' झोन आणि हॉस्पिटल परिसरातही नियमांची पायमल्ली होत असून, रस्त्यावरून चालणाऱ्या महिला व युवतींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अशा वाहनधारकांचा शोध घेऊन पोलिसांनी तात्काळ मोहीम राबवावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. यावेळी शिवसेना गट नेते गणेश शिंदे, शहर प्रमुख विशाल परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे, प्रशांत शिंदे, सागर शिंदे, नितीन कायस्थ, सुभाष गांगुर्डे यांसह इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️1
- 4 बार अबॉर्शन कराया, 5वीं बार प्रेग्नेंट होने पर मारपीट कर घर से निकाला, शादी का झांसा देकर युवती से यौन शोषण1
- “विकसित महाराष्ट्र 2047” या ध्येयाच्या पार्श्वभूमीवर पुणे–नाशिक सरळमार्गे रेल्वे प्रकल्पाची गरज आमदार सत्यजित तांबे यांनी सभागृहात अधोरेखित केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर व छत्रपती संभाजीनगर ही आर्थिक वाढ केंद्रे म्हणून घोषित केली असली तरी पुणे–नाशिक दरम्यान वाहतूक मोठी समस्या ठरत आहे. सध्या प्रवासासाठी ८ तासांपर्यंत वेळ लागत असून वाहतूक कोंडीत नागरिक अडकतात. त्यामुळे सरळ मार्गे रेल्वे हा केवळ दोन शहरांसाठी नव्हे तर महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाचा प्रकल्प असल्याचे तांबे यांनी नमूद केले.1
- Post by AMJ NEWS1
- शहागंज–सिटी चौक रोड पर हात गाड़ियों को लेकर अतिक्रमण हटाओ; अन्यथा 10 मार्च से ‘शिवसेना स्टाइल’ आंदोलन की चेतावनी, शिवसेना स्टाइल में आप उतरोंगे तो हम भी SDPI स्टाईल में उतरेंगे रास्ते पर ! शहर में कानून का राज चेलेगा ना गुंडा गर्दी का अभी औरंगाबाद में SDPI है1
- Post by Rajubhau Pradhan1
- अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान देवळाली मतदारसंघातून जाणाऱ्या प्रस्तावित ६० मीटर बाह्य वळण मार्ग (रिंग रोड) प्रकल्पामुळे प्रभावित २२ गावांतील शेतकऱ्यांचा प्रश्न आ. सरोज अहिरे यांनी लक्षवेधीद्वारे सभागृहात मांडला. जमीन अधिग्रहणाच्या दरात मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून ती दूर करून शासनाने विशेष मोबदला पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच पूर्णपणे भूमीहीन होणाऱ्या शेतकरी कुटुंबांना प्रकल्पग्रस्तांचे दाखले देण्याचीही मागणी त्यांनी केली.1