‘दावल मलिक बाबा’च्या नावाने दरबार भरवणारा भोंदू मांत्रिक अशोक आढाव पोलिसांच्या ताब्यात भूतबाधा काढण्याच्या नावाखाली १६ लाखांची फसवणूक; ‘शरीरसुखाची’ मागणी.. ‘दावल मलिक बाबा’च्या नावाने दरबार भरवणारा भोंदू मांत्रिक अशोक आढाव पोलिसांच्या ताब्यात राज्यात नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात आणखी एका भोंदू मांत्रिकाचा पर्दाफाश झाला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे ‘दावल मलिक बाबा’च्या नावाने दरबार भरवून अंधश्रद्धा पसरवणाऱ्या अशोक आढाव या भोंदू मांत्रिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पीडितिने केलेल्या आरोपानुसार, भूतबाधा आणि संकट दूर करण्याच्या नावाखाली अशोक आढाव याने तब्बल १६ लाख रुपयांची फसवणूक केली. तसेच उपचार आणि उपायांच्या बहाण्याने शरीरसुखाची मागणी केल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक आढाव हा विविध आजार, कौटुंबिक वाद आणि वैयक्तिक समस्यांवर उपाय सांगण्याच्या नावाखाली नागरिकांची दिशाभूल करत होता. ‘दावल मलिक बाबा’च्या नावाने दरबार भरवून लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. राज्यात यापूर्वी नाशिकमधील अशोक खरात तसेच राजेंद्र गडगे आणि गणेश शिंदे यांच्या प्रकरणांनी मोठी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर आता श्रीरामपूरमधील ही घटना समोर आल्याने अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीविरोधातील कारवाई अधिक कठोर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, पोलिसांकडून अशोक आढाव याची सखोल चौकशी सुरू असून, त्याच्या माध्यमातून आणखी किती लोकांची फसवणूक झाली याचा तपास केला जात आहे. प्रशासनाने नागरिकांना अशा भोंदूगिरीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात महसूल पथकाने अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला. मात्र, चालकाने शासकीय पथकाला हुलकावणी देत ट्रॅक्टर पळवला आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी किरण गायकवाड नावाच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.4
- औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यात प्रथमच महाराणा प्रताप यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे. हा तालुक्यात अशा प्रकारचा पहिलाच पुतळा असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.1
- *चिखली केमिस्ट संघटनेचा अभिनव उपक्रम : निराधार वृद्धांसोबत वाढदिवस साजरा* चिखली प्रतिनिधी - समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तींचा वाढदिवस हा केवळ शुभेच्छांचा दिवस नसतो, तर तो समाजसेवेचा प्रेरणादायी उत्सव ठरतो… आणि याच भावनेतून केमिस्ट संघटनेचे अभ्यासू, लढवय्ये व सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नेतृत्व मा. श्री अनिलभाऊ नावंदर यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळावेगळा मानवतेचा उपक्रम राबविण्यात आला. *चिखली केमिस्ट संघटनेचा अभिनव उपक्रम : निराधार वृद्धांसोबत वाढदिवस साजरा* चिखली प्रतिनिधी - समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तींचा वाढदिवस हा केवळ शुभेच्छांचा दिवस नसतो, तर तो समाजसेवेचा प्रेरणादायी उत्सव ठरतो… आणि याच भावनेतून केमिस्ट संघटनेचे अभ्यासू, लढवय्ये व सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नेतृत्व मा. श्री अनिलभाऊ नावंदर यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळावेगळा मानवतेचा उपक्रम राबविण्यात आला. मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रम, भोकर येथे एक महिना पुरेल एवढा धान्य व किराणा साठा भेट देत निराधार वृद्धांसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला. समाजातील उपेक्षित, दुर्लक्षित आणि आधाराच्या प्रतीक्षेत असलेल्या वृद्धांच्या चेहऱ्यावर यावेळी समाधानाचे आणि आनंदाचे हास्य फुलले. गेल्या चार वर्षांपासून विनाअनुदानित तत्वावर सुरू असलेल्या तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात निराधार, वयोवृद्ध, भिक्षा मागणारे आजी-आजोबा तसेच डिपेंडंट व्यक्तींसाठी निःस्वार्थपणे मोफत सेवा दिली जात आहे. अनेकांना जिथे स्वतःच्या कुटुंबाकडून आधार मिळत नाही, अशा वृद्धांसाठी हा आश्रम मायेची सावली बनला आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, वाढदिवसावर अनाठायी खर्च करण्यापेक्षा समाजातील गरजू, निराधार आणि दुःखी लोकांच्या सेवेसाठी हातभार लावणे हीच खरी मानवसेवा आहे. संघर्ष, समर्पण, अभ्यास आणि माणुसकीचा अखंड वाहणारा झरा… म्हणजे अनिलभाऊ - प्रशांत ढोरे पाटील केमिस्ट विश्वातील लाखो हृदयांवर अधिराज्य गाजवणारं एक आदरणीय व्यक्तिमत्त्व मा. श्री अनिलभाऊ नावंदर! काही व्यक्ती या केवळ व्यक्ती नसतात… त्या एक विचार असतात… एक प्रेरणा असतात… एक चळवळ असतात… आणि हजारो-लाखो लोकांच्या आयुष्याला दिशा देणारं विद्यापीठ असतात…! केमिस्ट कोहिनूर अनिलभाऊ नावंदर हे असंच एक नाव… ज्यांचा उल्लेख झाला की संघर्षालाही बळ मिळतं, अन्यायाविरोधात उभं राहण्याचं धैर्य निर्माण होतं आणि हजारो केमिस्ट बांधवांच्या डोळ्यात विश्वासाची नवी पहाट उगवते…! गेली अनेक दशके त्यांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य केमिस्ट, फार्मासिस्ट आणि औषध व्यवसायाशी निगडित प्रत्येक घटकाच्या हक्कासाठी समर्पित केलं आहे. शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरोधात निर्भीड भूमिका घेत त्यांनी केमिस्ट चळवळीला नवं बळ दिलं. ई-फार्मसीविरोधातील संघर्ष असो किंवा कार्यकर्त्यांच्या हक्कासाठीचा लढा प्रत्येक वेळी अनिलभाऊ खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या प्रत्येक शब्दात अभ्यासाची ताकद आहे… प्रत्येक भाषणात सत्याची धार आहे… प्रत्येक निर्णयात संघटनप्रेम आहे… आणि प्रत्येक कृतीत कार्यकर्त्यांविषयीची अपार आत्मीयता दडलेली आहे…! यावेळी केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील तायडे, सचिव विनोदजी नागवाणी, जिल्हा प्रतिनिधी सुनीलजी पारसकर, उपाध्यक्ष बद्रीभाऊ पानगोळे, जयंत शर्माजी, सुचित भराड, अभिमन्यू जगताप आदी उपस्थित होते. तसेच तुकाराम आश्रय वृद्धाश्रमातील वृद्धांच्या सेवेसाठी समाजातील दात्यांनी पुढे येऊन भरीव मदत करावी, असे आवाहन केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील तायडे यांनी केले. तर कुठेही निराधार, बेघर वृद्ध, मुलं-मुली किंवा नातेवाईक असूनही सांभाळ केला जात नसलेल्या वृद्धांनी 8855850378 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन वृद्धाश्रमाचे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांनी केले आहे.2
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे कब्जा धारक – लीज पट्टा (मालकी हक्क) वितरित करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे कब्जा धारक – लीज पट्टा (मालकी हक्क) वितरित करण्यात आले. खालील लाभार्थ्यांना जमिनीच्या पट्ट्याचे प्राथमिक स्वरूपात वाटप करण्यात आले : ✅फकीराबाबा मिनानी ✅प्रितम मथरानी ✅झामनदास गोधानी ✅शिलाबाई चावला ✅कमल भोजवानी ✅गोविंद माखीजानी ✅हेमंत बेलानी व कमल बेलानी ✅महेश ग्यानचंदानी ✅अशोक संतवानी ✅रवी आंनदानी ✅मुकेश साधवानी ✅रवी कुकरेजा1
- पुण्यातील हडपसरमध्ये धक्कादायक प्रकार! मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला संतप्त नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला. महिलांच्या सुरक्षेबाबत नागरिक आता अधिक सतर्क झाल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.1
- येवला उपजिल्हा रुग्णालयात बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे आणि बिस्किटे वाटण्यात आली. या उपक्रमाने रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला, ज्यामुळे जयंतीचा उत्साह द्विगुणित झाला.1
- छत्रपती संभाजीनगरमधील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेनंतर प्रशासनाला बदनाम करण्यासाठी एका दिव्यांग महिलेचा खोटा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. मनपा आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत दिशाभूल करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीत समोर आले की व्हिडिओतील महिला माठ विक्रेती नसून भिक्षेकरी होती आणि तिचा गैरवापर करण्यात आला.2
- मुख्यमंत्री श्री नायब सिंह सैनी जिला कुरुक्षेत्र के पिहोवा स्थित अरुणाय शिव मंदिर में पूजा अर्चना करते हुए मुख्यमंत्री श्री नायब सिंह सैनी जिला कुरुक्षेत्र के पिहोवा स्थित अरुणाय शिव मंदिर में पूजा अर्चना करते हुए। साथ में हैं गीता मनीषी स्वामी ज्ञानानंद जी महाराज व अन्य गणमान्य।1
- छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात अनेक खोल्या रिकाम्या असूनही गंभीर रुग्णांना बेड्स मिळत नसल्याचा नातेवाईकांनी गंभीर आरोप केला आहे. यामुळे संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. काही रुग्णांना तर दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागल्याने घाटीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.1