logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महसूल पथकाला हुलकावणी देत माटरगावयेथे ट्रॅक्टरसह चालक फरार शासकीय वाहनालाच अडवून जीवघेणा पाठलाग, चालकावर गुन्हा दाखल छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर मंडळातील माटरगाव शिवारात महसूल पथकाने अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर रंगेहात पकडला. तरीही चालकाने चलाखीने ट्रॅक्टर पळवला. शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या - प्रकरणी सुलतानपूर मंडळ अधिकारी अनुना कावळे यांनी खुलताबाद ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून किरण गायकवाड (रा. सुलतानपूर वर गुन्हा दाखल झाला. मंडळ अधिकारी कावळे यांना ८ मे रोजी फुलमस्ता नदीपात्रातून काही जण अवैधरित्या वाळूचे उत्खनन, वाहतूक करत असल्याचे सांगण्यात आले. ९ मे पहाटे महसूल पथक कारवाईसाठी रवाना झाले.तपासणी सुरू असताना तेथे दुधाची गाडी आली. त्या वाहनाला रस्ता देण्याच्या बहाण्याने चालकाने ट्रॅक्टर बाजूला घेतल्याचे भासवत सुलतानपूरच्या दिशेने धूम ठोकली. पथकाने पाठलाग केला. मात्र ट्रॅक्टरने ओव्हरटेक करू दिले नाही.पथकात अनुना कावळे, शेख मोयुनोदिन, सविता वाहटुळे होते. यावेळी ट्रॅक्टर चालकाने माझ्याकडे परवाना नाही. काय करायचे ते करून घ्या, असे म्हणाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

4 hrs ago
user_AMJ NEWS
AMJ NEWS
औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
4 hrs ago

महसूल पथकाला हुलकावणी देत माटरगावयेथे ट्रॅक्टरसह चालक फरार शासकीय वाहनालाच अडवून जीवघेणा पाठलाग, चालकावर गुन्हा दाखल छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर मंडळातील माटरगाव शिवारात महसूल पथकाने अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर रंगेहात पकडला. तरीही चालकाने चलाखीने ट्रॅक्टर पळवला.

शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या - प्रकरणी सुलतानपूर मंडळ अधिकारी अनुना कावळे यांनी खुलताबाद ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून किरण गायकवाड (रा. सुलतानपूर वर गुन्हा दाखल झाला. मंडळ अधिकारी कावळे यांना ८ मे रोजी फुलमस्ता नदीपात्रातून

275c7a22-b7fe-440c-8688-83ae4a10a5c6

काही जण अवैधरित्या वाळूचे उत्खनन, वाहतूक करत असल्याचे सांगण्यात आले. ९ मे पहाटे महसूल पथक कारवाईसाठी रवाना झाले.तपासणी सुरू असताना तेथे दुधाची गाडी आली. त्या वाहनाला रस्ता देण्याच्या बहाण्याने चालकाने ट्रॅक्टर बाजूला घेतल्याचे भासवत सुलतानपूरच्या दिशेने

847c9d27-e9bd-451c-8099-e6d6ae0c7eff

धूम ठोकली. पथकाने पाठलाग केला. मात्र ट्रॅक्टरने ओव्हरटेक करू दिले नाही.पथकात अनुना कावळे, शेख मोयुनोदिन, सविता वाहटुळे होते. यावेळी ट्रॅक्टर चालकाने माझ्याकडे परवाना नाही. काय करायचे ते करून घ्या, असे म्हणाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथे भीषण आग पहाटे 4 वाजेच्या सुमारास 8 ते 10 दुकाने जळून खाक छत्रपती संभाजीनगर मार्गावरील घटना किराणा दुकान, हॉटेल, टायर दुकानांसह अनेक व्यावसायिक गाळ्यांचे मोठे नुकसान शिऊर पोलिसांची घटनास्थळी धाव वैजापूर नगर परिषद आणि छत्रपती संभाजीनगर अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली आगीत अंदाजे 40 ते 50 लाख रुपयांचे नुकसान छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... आगीचे कारण अद्याप अस्पष्ट, पुढील तपास सुरू ANC : वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथे सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. छत्रपती संभाजीनगर मार्गावरील 8 ते 10 दुकाने या आगीत पूर्णपणे जळून खाक झाली. आगीत किराणा दुकान, हॉटेल, टायर दुकानांसह अनेक व्यावसायिक गाळ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच शिऊर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच वैजापूर नगर परिषदेचे अग्निशामक दल आणि छत्रपती संभाजीनगर अग्निशामक विभागाला पाचारण करण्यात आले. दोन्ही विभागाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. या घटनेत अंदाजे 40 ते 50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून पोलिस पुढील तपास करत आहेत.
    4
    वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथे भीषण आग

पहाटे 4 वाजेच्या सुमारास 8 ते 10 दुकाने जळून खाक

छत्रपती संभाजीनगर मार्गावरील घटना

किराणा दुकान, हॉटेल, टायर दुकानांसह अनेक व्यावसायिक गाळ्यांचे मोठे नुकसान

शिऊर पोलिसांची घटनास्थळी धाव

वैजापूर नगर परिषद आणि छत्रपती संभाजीनगर अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली

आगीत अंदाजे 40 ते 50 लाख रुपयांचे नुकसान
छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग...
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट, पुढील तपास सुरू
ANC : वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथे सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. छत्रपती संभाजीनगर मार्गावरील 8 ते 10 दुकाने या आगीत पूर्णपणे जळून खाक झाली. आगीत किराणा दुकान, हॉटेल, टायर दुकानांसह अनेक व्यावसायिक गाळ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच शिऊर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच वैजापूर नगर परिषदेचे अग्निशामक दल आणि छत्रपती संभाजीनगर अग्निशामक विभागाला पाचारण करण्यात आले. दोन्ही विभागाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. या घटनेत अंदाजे 40 ते 50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून पोलिस पुढील तपास करत आहेत.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यात प्रथमच महाराणा प्रताप यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे. हा तालुक्यात अशा प्रकारचा पहिलाच पुतळा असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
    1
    औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यात प्रथमच महाराणा प्रताप यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे. हा तालुक्यात अशा प्रकारचा पहिलाच पुतळा असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • घाटी रुग्णालयातील गैरव्यवस्थेवर नातेवाईकांचा संताप रिकाम्या रूम असूनही रुग्णांना बेड नाही. घाटी रुग्णालयातील गैरव्यवस्थेवर नातेवाईकांचा संताप रिकाम्या रूम असूनही रुग्णांना बेड नाही; डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा आरोप नागरिकांनी केले आहे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : घाटी रुग्णालयातील वार्ड क्रमांक 2, 8, 19 आणि 37 मध्ये अनेक रूम रिकाम्या असूनही गंभीर रुग्णांना बेड व रूम उपलब्ध करून दिल्या जात नसल्याचा गंभीर आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टर व त्यांच्या नातेवाईकांसाठीच या रूम राखीव ठेवण्यात आल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, रुग्ण गंभीर अवस्थेत असतानाही “बेड उपलब्ध नाही”, “रूम खाली नाही” अशी उत्तरे दिली जात आहेत. मात्र प्रत्यक्षात अनेक रूम रिकाम्या दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत विचारणा केल्यावर काही कर्मचाऱ्यांनी “आम्हाला शिकवू नका”, “कोणाला रूम द्यायची हे आम्हाला माहिती आहे”, असे उद्धट उत्तर दिल्याचाही आरोप करण्यात आला.रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले की, घाटी रुग्णालयात गोरगरीब रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. अनेक ठिकाणी गादी, बेड किंवा योग्य उपचार व्यवस्था नसल्याने रुग्णांना जमिनीवर किंवा जिथे जागा मिळेल तिथे थांबावे लागत आहे. “घाटी हे फक्त नावापुरते गरीबांचे रुग्णालय आहे का?” असा सवाल संतप्त नातेवाईकांनी उपस्थित केला. याशिवाय, डॉक्टर वेळेवर रुग्ण तपासण्यासाठी येत नसल्याचा तसेच काही डॉक्टर सतत मोबाईलवर व्यस्त असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांचे जीव धोक्यात येत असल्याची भावना नातेवाईकांनी व्यक्त केली. तक्रार करण्यासाठी पुढे गेलेल्या काही नातेवाईकांना सुरक्षा रक्षकांकडून दमदाटी व मारहाण करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकाराला कंटाळून काही नातेवाईकांनी आपल्या रुग्णांना घाटीतून हलवून हेगडेवार रुग्णालयात दाखल केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या गंभीर आरोपांमुळे घाटी रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
    1
    घाटी रुग्णालयातील गैरव्यवस्थेवर नातेवाईकांचा संताप रिकाम्या रूम असूनही रुग्णांना बेड नाही.
घाटी रुग्णालयातील गैरव्यवस्थेवर नातेवाईकांचा संताप रिकाम्या रूम असूनही रुग्णांना बेड नाही; डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा आरोप
नागरिकांनी केले आहे 
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : घाटी रुग्णालयातील वार्ड क्रमांक 2, 8, 19 आणि 37 मध्ये अनेक रूम रिकाम्या असूनही गंभीर रुग्णांना बेड व रूम उपलब्ध करून दिल्या जात नसल्याचा गंभीर आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टर व त्यांच्या नातेवाईकांसाठीच या रूम राखीव ठेवण्यात आल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, रुग्ण गंभीर अवस्थेत असतानाही “बेड उपलब्ध नाही”, “रूम खाली नाही” अशी उत्तरे दिली जात आहेत. मात्र प्रत्यक्षात अनेक रूम रिकाम्या दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत विचारणा केल्यावर काही कर्मचाऱ्यांनी “आम्हाला शिकवू नका”, “कोणाला रूम द्यायची हे आम्हाला माहिती आहे”, असे उद्धट उत्तर दिल्याचाही आरोप करण्यात आला.रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले की, घाटी रुग्णालयात गोरगरीब रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. अनेक ठिकाणी गादी, बेड किंवा योग्य उपचार व्यवस्था नसल्याने रुग्णांना जमिनीवर किंवा जिथे जागा मिळेल तिथे थांबावे लागत आहे. “घाटी हे फक्त नावापुरते गरीबांचे रुग्णालय आहे का?” असा सवाल संतप्त नातेवाईकांनी उपस्थित केला.
याशिवाय, डॉक्टर वेळेवर रुग्ण तपासण्यासाठी येत नसल्याचा तसेच काही डॉक्टर सतत मोबाईलवर व्यस्त असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांचे जीव धोक्यात येत असल्याची भावना नातेवाईकांनी व्यक्त केली. तक्रार करण्यासाठी पुढे गेलेल्या काही नातेवाईकांना सुरक्षा रक्षकांकडून दमदाटी व मारहाण करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकाराला कंटाळून काही नातेवाईकांनी आपल्या रुग्णांना घाटीतून हलवून हेगडेवार रुग्णालयात दाखल केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या गंभीर आरोपांमुळे घाटी रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    55 min ago
  • न्यू मुंबई चायनीज (बिडकीन) आणि मुंबई चायनीज (फारोळा) या प्रसिद्ध उपाहारगृहांचे मालक इमरान शहा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यांना मित्र, कुटुंब आणि हितचिंतकांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिळत आहेत.
    1
    न्यू मुंबई चायनीज (बिडकीन) आणि मुंबई चायनीज (फारोळा) या प्रसिद्ध उपाहारगृहांचे मालक इमरान शहा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यांना मित्र, कुटुंब आणि हितचिंतकांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिळत आहेत.
    user_Isak Shaha
    Isak Shaha
    Media Consultant Paithan, Aurangabad•
    16 hrs ago
  • मुंबई.राज्यात धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारले जाणार मुंबई.राज्यात धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारले जाणार आहेत. या अभिनव उपक्रमामुळे बालपणापासूनच वाहतूक शिस्तीचे संस्कार मुलांमध्ये रुजण्यास मदत होईल.
    1
    मुंबई.राज्यात धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारले जाणार
मुंबई.राज्यात धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारले जाणार आहेत. या अभिनव उपक्रमामुळे बालपणापासूनच वाहतूक शिस्तीचे संस्कार मुलांमध्ये रुजण्यास मदत होईल.
    user_शुरु रिपोर्टर
    शुरु रिपोर्टर
    Voice of people सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात विहिरीची मोटर दुरुस्त करताना वडील आणि त्यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. धानोरा येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात विहिरीची मोटर दुरुस्त करताना वडील आणि त्यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. धानोरा येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात एक डिझेल टँकर पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, टँकरमधून डिझेल गळती सुरू होताच परिसरातील नागरिकांनी जीव धोक्यात घालून, कॅन-बाटल्या घेऊन डिझेल जमा करण्यासाठी घटनास्थळी गर्दी केली.
    1
    बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात एक डिझेल टँकर पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मात्र, टँकरमधून डिझेल गळती सुरू होताच परिसरातील नागरिकांनी जीव धोक्यात घालून, कॅन-बाटल्या घेऊन डिझेल जमा करण्यासाठी घटनास्थळी गर्दी केली.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • महसूल पथकाला हुलकावणी देत माटरगावयेथे ट्रॅक्टरसह चालक फरार शासकीय वाहनालाच अडवून जीवघेणा पाठलाग, चालकावर गुन्हा दाखल छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर मंडळातील माटरगाव शिवारात महसूल पथकाने अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर रंगेहात पकडला. तरीही चालकाने चलाखीने ट्रॅक्टर पळवला. शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या - प्रकरणी सुलतानपूर मंडळ अधिकारी अनुना कावळे यांनी खुलताबाद ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून किरण गायकवाड (रा. सुलतानपूर वर गुन्हा दाखल झाला. मंडळ अधिकारी कावळे यांना ८ मे रोजी फुलमस्ता नदीपात्रातून काही जण अवैधरित्या वाळूचे उत्खनन, वाहतूक करत असल्याचे सांगण्यात आले. ९ मे पहाटे महसूल पथक कारवाईसाठी रवाना झाले.तपासणी सुरू असताना तेथे दुधाची गाडी आली. त्या वाहनाला रस्ता देण्याच्या बहाण्याने चालकाने ट्रॅक्टर बाजूला घेतल्याचे भासवत सुलतानपूरच्या दिशेने धूम ठोकली. पथकाने पाठलाग केला. मात्र ट्रॅक्टरने ओव्हरटेक करू दिले नाही.पथकात अनुना कावळे, शेख मोयुनोदिन, सविता वाहटुळे होते. यावेळी ट्रॅक्टर चालकाने माझ्याकडे परवाना नाही. काय करायचे ते करून घ्या, असे म्हणाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
    4
    महसूल पथकाला हुलकावणी देत माटरगावयेथे ट्रॅक्टरसह चालक फरार

शासकीय वाहनालाच अडवून जीवघेणा पाठलाग, चालकावर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग 
खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर मंडळातील माटरगाव शिवारात महसूल पथकाने अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर रंगेहात पकडला. तरीही चालकाने चलाखीने ट्रॅक्टर पळवला. शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या - प्रकरणी सुलतानपूर मंडळ अधिकारी अनुना कावळे यांनी खुलताबाद ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून किरण गायकवाड (रा. सुलतानपूर वर गुन्हा दाखल झाला. मंडळ अधिकारी कावळे यांना ८ मे रोजी फुलमस्ता नदीपात्रातून काही जण अवैधरित्या वाळूचे उत्खनन, वाहतूक करत असल्याचे सांगण्यात आले. ९ मे पहाटे महसूल पथक कारवाईसाठी रवाना झाले.तपासणी सुरू असताना तेथे दुधाची गाडी आली. त्या वाहनाला रस्ता देण्याच्या बहाण्याने चालकाने ट्रॅक्टर बाजूला घेतल्याचे भासवत सुलतानपूरच्या दिशेने धूम ठोकली. पथकाने पाठलाग केला. मात्र ट्रॅक्टरने ओव्हरटेक करू दिले नाही.पथकात अनुना कावळे, शेख मोयुनोदिन, सविता वाहटुळे होते. यावेळी ट्रॅक्टर चालकाने माझ्याकडे परवाना नाही. काय करायचे ते करून घ्या, असे म्हणाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.