logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भीमाशंकर पतसंस्थेची ९वी वार्षिक सभा उद्या; आर्थिक प्रगतीचा घेतला जाणार आढावा...! सुरेंद्र सोनवणे, मंचर प्रतिनिधी : आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर नागरी सहकारी पतसंस्था, मंचरची ९वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता सोहम मंगल कार्यालय, सोहमनगरी, मंचर येथे आयोजित करण्यात आली आहे. संस्थेचे चेअरमन श्री. अरुणभाऊ गोविंदराव गिरे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडणार आहे. संस्थेच्या आर्थिक प्रगतीबाबत माहिती देताना उपाध्यक्ष विनोद गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण चिखले यांनी सांगितले की, संस्थेचे वसूल भागभांडवल ४८ लाख ६१ हजार ८०० रुपये, निधी १२ लाख ६१ हजार ९३० रुपये, ठेवी ४ कोटी १६ लाख ७० हजार ३९४ रुपये, तर कर्जवाटप ३ कोटी १७ लाख २१ हजार ६९७ रुपये आहे. तसेच संस्थेचे खेळते भांडवल ५ कोटी २८ हजार २७९ रुपये इतके असल्याची माहिती देण्यात आली. सभेमध्ये संस्थेच्या मागील आर्थिक वर्षातील कामकाजाचा आढावा, आर्थिक स्थिती, सभासदांशी संबंधित विषय तसेच संस्थेच्या आगामी वाटचालीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. संस्थेच्या सभासदांनी वार्षिक सभेस उपस्थित राहून संस्थेच्या पुढील प्रगतीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

1 day ago
user_सुरेंद्र सोनवणे
सुरेंद्र सोनवणे
Local News Reporter आंबेगाव, पुणे, महाराष्ट्र•
1 day ago
e671d143-b5cc-45ce-a171-948dece0c37d

भीमाशंकर पतसंस्थेची ९वी वार्षिक सभा उद्या; आर्थिक प्रगतीचा घेतला जाणार आढावा...! सुरेंद्र सोनवणे, मंचर प्रतिनिधी : आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर नागरी सहकारी पतसंस्था, मंचरची ९वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता सोहम मंगल कार्यालय, सोहमनगरी, मंचर येथे आयोजित करण्यात आली आहे. संस्थेचे चेअरमन श्री. अरुणभाऊ गोविंदराव गिरे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडणार आहे. संस्थेच्या आर्थिक प्रगतीबाबत माहिती देताना उपाध्यक्ष विनोद गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण चिखले यांनी सांगितले की, संस्थेचे वसूल भागभांडवल ४८ लाख ६१ हजार ८०० रुपये, निधी १२ लाख ६१ हजार ९३० रुपये, ठेवी ४ कोटी १६ लाख ७० हजार ३९४ रुपये, तर कर्जवाटप ३ कोटी १७ लाख २१ हजार ६९७ रुपये आहे. तसेच संस्थेचे खेळते भांडवल ५ कोटी २८ हजार २७९ रुपये इतके असल्याची माहिती देण्यात आली. सभेमध्ये संस्थेच्या मागील आर्थिक वर्षातील कामकाजाचा आढावा, आर्थिक स्थिती, सभासदांशी संबंधित विषय तसेच संस्थेच्या आगामी वाटचालीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. संस्थेच्या सभासदांनी वार्षिक सभेस उपस्थित राहून संस्थेच्या पुढील प्रगतीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भटक्या कुत्र्यांचा हैदोस! आईवर हल्ला, चिमुरडा थोडक्यात बचावला... पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस कायम असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. एका चिमुरड्याला घेऊन जात असलेल्या आईवर भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला केला. कुत्र्याच्या हल्ल्यामुळे आईच्या हातातून एक वर्षांचा चिमुरडा निसटून थेट रस्त्यावर पडला. सुदैवाने मुलाला गंभीर इजा झाली नाही. मात्र, आई अमृता बसन्नावार या हल्ल्यात जखमी झाल्या. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. विशेष म्हणजे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्या प्रभागातच ही घटना घडल्याने भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीवरून महापालिका प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आता महापालिका ठोस पावलं उचलणार का, हा सवाल आहे... #भटक्याकुत्रे #कुत्र्यांचाहल्ला #पिंपरीचिंचवड #DogAttack #StrayDogs #PCMC #पिंपरीचिंचवडमहापालिका #नागरिकसुरक्षा #CCTV #भटक्याकुत्र्यांचीदहशत #कुत्र्यांचाउपद्रव #महापालिका #PCMCNews #PimpriChinchwadNews #MaharashtraNews #TheNayakNews
    1
    भटक्या कुत्र्यांचा हैदोस! आईवर हल्ला, चिमुरडा थोडक्यात बचावला...
पिंपरी चिंचवड :
पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस कायम असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. एका चिमुरड्याला घेऊन जात असलेल्या आईवर भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला केला.
कुत्र्याच्या हल्ल्यामुळे आईच्या हातातून एक वर्षांचा चिमुरडा निसटून थेट रस्त्यावर पडला. सुदैवाने मुलाला गंभीर इजा झाली नाही. मात्र, आई अमृता बसन्नावार या हल्ल्यात जखमी झाल्या. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
विशेष म्हणजे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्या प्रभागातच ही घटना घडल्याने भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीवरून महापालिका प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आता महापालिका ठोस पावलं उचलणार का, हा सवाल आहे...
#भटक्याकुत्रे #कुत्र्यांचाहल्ला #पिंपरीचिंचवड #DogAttack #StrayDogs #PCMC #पिंपरीचिंचवडमहापालिका #नागरिकसुरक्षा #CCTV #भटक्याकुत्र्यांचीदहशत #कुत्र्यांचाउपद्रव #महापालिका #PCMCNews #PimpriChinchwadNews #MaharashtraNews #TheNayakNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • शिरूरमध्ये कुख्यात गुंडाच्या टोळीवर MCOCA अंतर्गत कारवाई; ११ आरोपी अटकेत शिरूर : शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत संघटित गुन्हेगारी करून दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात गुंड इशप्पा उर्फ विशाल जगन्नाथ पांढी, वय २४ वर्षे, रा. वाघोली, ता. शिरूरमध्ये कुख्यात गुंडाच्या टोळीवर MCOCA अंतर्गत कारवाई; ११ आरोपी अटकेत शिरूर : शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत संघटित गुन्हेगारी करून दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात गुंड इशप्पा उर्फ विशाल जगन्नाथ पांढी, वय २४ वर्षे, रा. वाघोली, ता. हवेली, जि. पुणे आणि त्याच्या गुन्हेगारी टोळीविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीतील ११ आरोपींवर MCOCA अंतर्गत कारवाईस मंजुरी देण्यात आली आहे. शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ५०९/२०२६ नुसार दिनांक १ जून २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमे, भारतीय हत्यार कायदा १९५९ तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. नेमका प्रकार काय? १ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजता, शिरूर तालुक्यातील सारडवाडी येथील करडे घाट परिसरातील राजस्थान ढाब्याजवळ ही घटना घडली. फिर्यादी व त्याचा मित्र टोयोटा कारमधून शिरूरकडे जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग करून वाहनाला धडक दिल्याचे तसेच त्यानंतर फिर्यादीला धमकावून हल्ला केल्याचे पोलिस तपासात समोर आले. या घटनेत फिर्यादीच्या मित्रावर जीवघेणा हल्ला करण्यात आला, तर फिर्यादीवरही हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचे नमूद आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात टोळीचे गुन्हेगारी कृत्य उघड गुन्ह्याच्या तपासादरम्यान इशप्पा उर्फ विशाल जगन्नाथ पांढी, सनी संजय यादव आणि त्यांच्या गुन्हेगारी टोळीचा सहभाग समोर आला. तपासात टोळीतील एकूण ११ आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला असून त्यापैकी १० आरोपींना शोधून अटक करण्यात आली आहे. एक आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या टोळीविरोधात यापूर्वीही संघटित पद्धतीने गुन्हे केल्याचे पोलिस तपासात आढळून आले. टोळीमार्फत बेकायदेशीर गर्दी जमवणे, शस्त्रांचा वापर करून दहशत निर्माण करणे, खंडणीसाठी धमकावणे, जीवघेणे हल्ले करणे आणि खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याचे कागदपत्रात नमूद आहे. कोल्हापूर परिक्षेत्राकडून MCOCA मंजुरी टोळीच्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालून परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शिरूर पोलिसांनी MCOCA अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला होता. या प्रस्तावाची कागदपत्रे व गुन्ह्यांची पडताळणी केल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर मा. रंजनकुमार शर्मा साओ यांनी MCOCA कायद्यान्वये कलमांची वाढ करण्यास सक्षम प्राधिकारी म्हणून मंजुरी दिली. त्यानंतर पुढील तपासाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या कारवाईत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, उपनिरीक्षक महेश डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व शिरूर विभागातील पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांच्या या कारवाईमुळे शिरूर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या संघटित गुन्हेगारी टोळ्यांना मोठा धक्का बसला असून, गुन्हेगारीवर पोलिसांचा वचक निर्माण करण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
    1
    शिरूरमध्ये कुख्यात गुंडाच्या टोळीवर MCOCA अंतर्गत कारवाई; ११ आरोपी अटकेत
शिरूर : शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत संघटित गुन्हेगारी करून दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात गुंड इशप्पा उर्फ विशाल जगन्नाथ पांढी, वय २४ वर्षे, रा. वाघोली, ता.
शिरूरमध्ये कुख्यात गुंडाच्या टोळीवर MCOCA अंतर्गत कारवाई; ११ आरोपी अटकेत
शिरूर : शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत संघटित गुन्हेगारी करून दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात गुंड इशप्पा उर्फ विशाल जगन्नाथ पांढी, वय २४ वर्षे, रा. वाघोली, ता. हवेली, जि. पुणे आणि त्याच्या गुन्हेगारी टोळीविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीतील ११ आरोपींवर MCOCA अंतर्गत कारवाईस मंजुरी देण्यात आली आहे.
शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ५०९/२०२६ नुसार दिनांक १ जून २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमे, भारतीय हत्यार कायदा १९५९ तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नेमका प्रकार काय?
१ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजता, शिरूर तालुक्यातील सारडवाडी येथील करडे घाट परिसरातील राजस्थान ढाब्याजवळ ही घटना घडली. फिर्यादी व त्याचा मित्र टोयोटा कारमधून शिरूरकडे जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग करून वाहनाला धडक दिल्याचे तसेच त्यानंतर फिर्यादीला धमकावून हल्ला केल्याचे पोलिस तपासात समोर आले.
या घटनेत फिर्यादीच्या मित्रावर जीवघेणा हल्ला करण्यात आला, तर फिर्यादीवरही हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचे नमूद आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासात टोळीचे गुन्हेगारी कृत्य उघड
गुन्ह्याच्या तपासादरम्यान इशप्पा उर्फ विशाल जगन्नाथ पांढी, सनी संजय यादव आणि त्यांच्या गुन्हेगारी टोळीचा सहभाग समोर आला. तपासात टोळीतील एकूण ११ आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला असून त्यापैकी १० आरोपींना शोधून अटक करण्यात आली आहे. एक आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या टोळीविरोधात यापूर्वीही संघटित पद्धतीने गुन्हे केल्याचे पोलिस तपासात आढळून आले. टोळीमार्फत बेकायदेशीर गर्दी जमवणे, शस्त्रांचा वापर करून दहशत निर्माण करणे, खंडणीसाठी धमकावणे, जीवघेणे हल्ले करणे आणि खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याचे कागदपत्रात नमूद आहे.
कोल्हापूर परिक्षेत्राकडून MCOCA मंजुरी
टोळीच्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालून परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शिरूर पोलिसांनी MCOCA अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला होता.
या प्रस्तावाची कागदपत्रे व गुन्ह्यांची पडताळणी केल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर मा. रंजनकुमार शर्मा साओ यांनी MCOCA कायद्यान्वये कलमांची वाढ करण्यास सक्षम प्राधिकारी म्हणून मंजुरी दिली. त्यानंतर पुढील तपासाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
या कारवाईत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, उपनिरीक्षक महेश डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व शिरूर विभागातील पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पोलिसांच्या या कारवाईमुळे शिरूर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या संघटित गुन्हेगारी टोळ्यांना मोठा धक्का बसला असून, गुन्हेगारीवर पोलिसांचा वचक निर्माण करण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
    user_पत्रकार . शाबान शाह
    पत्रकार . शाबान शाह
    Social worker शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • ‘विकृत, विक्षिप्त’ म्हणविलेल्या आरोपांवरून सारिका चंद्रकांत नागरे यांच्या विरोधात जनशक्ती एकवटली शिरूर : स्वतःला समाजसेविका म्हणून पुढे करणाऱ्या सारिका चंद्रकांत नागरे यांच्या कथित कार्यपद्धतीविरोधात नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून, त्यांच्या विरोधात जनशक्ती एकवटत असल्याचे चित्र आहे. नागरे यांच्या संदर्भात विविध आरोप व तक्रारी पुढे येत असून, या सर्व बाबींची प्रशासनाने निष्पक्षपणे चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. समाजसेवेच्या नावाखाली कोणतेही गैरप्रकार होत असतील किंवा सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होत असेल, तर त्याची सत्यता अधिकृत चौकशीतून समोर आणणे आवश्यक असल्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे. संबंधित प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि तक्रारींची सखोल तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, नागरे यांच्या विरोधातील कथित आरोपांमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, नागरिकांमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता पारदर्शक चौकशी करून दोष आढळल्यास कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. ‘समाजसेवेच्या नावाखाली गैरप्रकारांना थारा नको; सत्य काय आहे हे निष्पक्ष चौकशीतून समोर आले पाहिजे,’ अशी भूमिका नागरिकांकडून व्यक्त होत असून, आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    ‘विकृत, विक्षिप्त’ म्हणविलेल्या आरोपांवरून सारिका चंद्रकांत नागरे यांच्या विरोधात जनशक्ती एकवटली

शिरूर : स्वतःला समाजसेविका म्हणून पुढे करणाऱ्या सारिका चंद्रकांत नागरे यांच्या कथित कार्यपद्धतीविरोधात नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून, त्यांच्या विरोधात जनशक्ती एकवटत असल्याचे चित्र आहे. नागरे यांच्या संदर्भात विविध आरोप व तक्रारी पुढे येत असून, या सर्व बाबींची प्रशासनाने निष्पक्षपणे चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
समाजसेवेच्या नावाखाली कोणतेही गैरप्रकार होत असतील किंवा सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होत असेल, तर त्याची सत्यता अधिकृत चौकशीतून समोर आणणे आवश्यक असल्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे. संबंधित प्रकरणातील कागदपत्रे, पुरावे आणि तक्रारींची सखोल तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, नागरे यांच्या विरोधातील कथित आरोपांमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, नागरिकांमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता पारदर्शक चौकशी करून दोष आढळल्यास कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
‘समाजसेवेच्या नावाखाली गैरप्रकारांना थारा नको; सत्य काय आहे हे निष्पक्ष चौकशीतून समोर आले पाहिजे,’ अशी भूमिका नागरिकांकडून व्यक्त होत असून, आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_Rajendra kulthe
    Rajendra kulthe
    Social worker शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • नेपाळ मधील आलेल्या महापुरामुळे झालेली विध्वसक दृश्याचा व्हिडीओ
    1
    नेपाळ मधील आलेल्या महापुरामुळे झालेली विध्वसक दृश्याचा व्हिडीओ
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • बारामती गुन्हेगारी वाढलेली आहे या प्रश्नावर उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा उत्तर
    1
    बारामती गुन्हेगारी वाढलेली आहे या प्रश्नावर उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा उत्तर
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • लिंबेवाडीत विकासकामांच्या नावाखाली भ्रष्टाचार? दलित वस्तीतील नागरिकांचा गंभीर आरोप; कारवाईची मागणी
    1
    लिंबेवाडीत विकासकामांच्या नावाखाली भ्रष्टाचार? दलित वस्तीतील नागरिकांचा गंभीर आरोप; कारवाईची मागणी
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • हिप्परगा रवा येथे वीज बिलांचा भोंगळ कारभार! वेळेवर बिल नाही, थेट वीज खंडित; नागरिकांचा संताप
    1
    हिप्परगा रवा येथे वीज बिलांचा भोंगळ कारभार! वेळेवर बिल नाही, थेट वीज खंडित; नागरिकांचा संताप
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • पालखी महामार्गाचे अपूर्ण काम दाखवून कोट्यवधींची बिले काढली; मंत्र्यांच्या नावाने धमकावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे...
    1
    पालखी महामार्गाचे अपूर्ण काम दाखवून कोट्यवधींची बिले काढली; मंत्र्यांच्या नावाने धमकावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे...
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ! आईवर हल्ला, कुशीतलं एक वर्षाचं बाळ रस्त्यावर कोसळलं; थरारक घटना CCTV मध्ये कैद
    1
    पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ! आईवर हल्ला, कुशीतलं एक वर्षाचं बाळ रस्त्यावर कोसळलं; थरारक घटना CCTV मध्ये कैद
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.