विजेच्या तारेच्या ठिणग्यांनी सावळी शिवारात आग; उभे पीक, संत्री व ठिबक संच खाक मानवत (प्रतिनिधी):- विजेच्या तारांतील बिघाडामुळे लागलेल्या आगीत सावळी शिवारात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. शनिवारी घडलेल्या या घटनेत उभे पीक, कडबा, संत्र्याची झाडे व ठिबक सिंचन संच जळून खाक झाला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सावळी येथील शेतकरी दत्ता वैजनाथ काळे यांच्या शेतात विजेच्या तारांमधील घर्षणामुळे ठिणग्या पडून आग लागली. या आगीत सुमारे दोन एकर क्षेत्रातील ज्वारी पीक, कडबा, तब्बल ५०० संत्र्याची झाडे तसेच ठिबक सिंचन संच जळून पूर्णपणे नष्ट झाला. या घटनेत सुमारे १ लाख ९३ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून पंचनाम्यानंतर नुकसान वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, जीर्ण वीजतारा आणि त्यांच्या दुरुस्तीकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे. महावितरणकडून केवळ वीजबिल वसुलीकडे लक्ष दिले जात असून सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचा संतापही शेतकरी दत्ता काळे यांनी व्यक्त केला.

- वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघात रुग्णांसाठी शहरात चार आरोग्य केंद्र - महापौर सय्यद इकबाल1
- Post by Mohsin ahmed khan1
- Post by Anil Rathod1
- महात्मा बसेश्वर महाराजांची जयंती मंठा येथील उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यासाठी.1
- लिलाव प्रक्रियेदरम्यान गोदामात तारण मालच नसल्याचे उघड झाले. तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आर्थिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याला श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपीस 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.1
- ----- (प्रतिनिधी):- नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे रस्त्यालगतच्या विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेनंतर राज्यभरात अशा धोकादायक विहिरींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर बीड तालुक्यातील विविध गावांमध्येही रस्त्यालगत असलेल्या विहिरींबाबत ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार बीड यांना निवेदन देऊन रस्त्यालगत धोकादायक स्थितीत असलेल्या विहिरींची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाय योजना करण्याची मागणी केली आहे. संबंधित विहिरींच्या मालकांना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संरक्षक भिंत किंवा कठडा उभारण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशीही त्यांनी मागणी केली. दरम्यान, बीड तालुक्यातील पोखरी (घाट) येथील खिल्लारे वस्ती परिसरात रस्त्याच्या कडेला असलेली विहीर अत्यंत धोकादायक अवस्थेत असून तिच्याभोवती कोणतीही संरक्षण व्यवस्था नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या विहिरीमुळे लहान मुले, दुचाकीस्वार, बैलगाड्या तसेच जनावरांच्या जीविताला धोका असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर ध्रुपदी खिल्लारे, गोरख खिल्लारे, मधुकर खिल्लारे, मच्छिंद्र खिल्लारे, बबन खिल्लारे, जालिंदर खिल्लारे, हौसराव खिल्लारे, साहेबराव धुमाळ, दत्तु खिल्लारे यांच्या सह खिल्लारे, मुळीक व झांजुर्णे वस्तीवरील ग्रामस्थांनी संबंधित विहिरीला तातडीने संरक्षक कठडा किंवा भिंत उभारण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांनी “दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने उपाय योजना कराव्यात,” अशी ठाम भूमिका घेतली असून, या कडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.1
- Post by Karan1
- Skyline Builders & Developers “क्षितिज पुरम – जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो स्वतःचा पत्ता ” क्षितिज पुरम… जिथे आकाशातील स्वप्नं… जमिनीवर उतरतात!2