हिंगोली जिल्ह्यातील उमरा फाटा येथे अवैध सागवान वाहतूक पकडली; टेम्पो जप्त उमरा फाटा येथे आज अवैध सागवान लाकूड वाहतूक करताना वन विभागाने मोठी कारवाई करत एक टेम्पो जप्त केला. सदरील टेम्पो ताब्यात घेऊन विभागीय वन कार्यालयात जमा करण्यात आला आहे. ही कारवाई मा. श्री. राजेंद्र नाळे, विभागीय वनाधिकारी, हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच श्री. सचीन माने, सहाय्यक वनसंरक्षक व कु. मिनाक्षी पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, हिंगोली यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाच्या पथकाने ही धडक कारवाई केली. अवैध सागवान वाहतुकीवर आळा घालण्यासाठी वन विभाग सतत सतर्क असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही विभागाने दिला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अवैध वृक्षतोड व लाकूड वाहतुकीवर वन विभागाचे लक्ष अधिक केंद्रीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Post by M B B1
- Post by Shaikh irfan Shaikh isa1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- Skyline Builders & Developers “क्षितिज पुरम – जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो स्वतःचा पत्ता ” क्षितिज पुरम… जिथे आकाशातील स्वप्नं… जमिनीवर उतरतात!2
- Post by माधव गायकवाड4
- महात्मा बसेश्वर महाराजांची जयंती मंठा येथील उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यासाठी.1
- लिलाव प्रक्रियेदरम्यान गोदामात तारण मालच नसल्याचे उघड झाले. तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आर्थिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याला श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपीस 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.1
- दरेगाव येथील वन विभागाच्या शिवारात असलेल्या जंगल परिसरात एका व्यक्तीचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित व्यक्ती संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली. दरम्यान, या घटनेमुळे तालुका पोलीस ठाण्यात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, खुनामागील कारणांचा तपास तालुका पोलीस करत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.1