उमरेड- भिवापूर मार्गावरील खड्डे ठरत आहेत जीवघेणे ; दोन दिवसांत खड्डे बुजविण्याची माजी आमदार सुधीर पारवे यांची मागणी उमरेड-भिवापूर मार्गावरील खड्डे ठरताहेत जीवघेणे! काल झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार सुधीर पारवे आक्रमक; दोन दिवसांत खड्डे बुजविण्याची मागणी! उमरेड : उमरेड-भिवापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ डीवरील मोठमोठे खड्डे आणि त्यातून निर्माण होणारी धोकादायक वाहतूक व्यवस्था वाहनचालकांच्या जीवावर उठली आहे. काल उमरेडकडे दुचाकीने येणाऱ्या बहीण-भावाला ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात भावाचा जागीच मृत्यू झाला, तर बहीण गंभीर जखमी झाली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उमरेड-भिवापूर मार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. उमरेड ते भिवापूर दरम्यान सुमारे २२ किलोमीटरच्या महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावर यापूर्वीही अनेक अपघात घडले असून, अपघातांची मालिका नेहमीचीच झाल्याचा आरोप वाहनचालकांकडून होत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी रस्त्यावरील खड्डे आणि वाढलेली जड वाहतूक मोठा धोका ठरत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी आमदार सुधीर पारवे यांनी राष्ट्रीय महामार्ग ३५३ डीच्या उमरेड-भिवापूर-नागभीड सेक्शनचे प्रकल्प संचालक अभिजीत जिचकार यांची भेट घेऊन निवेदन दिले. महामार्गावरील खड्ड्यांची दोन दिवसांत दर्जेदार दुरुस्ती करून सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करावी, तसेच उमरेड-भिवापूर मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली. खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास संबंधित विभागाविरोधात आंदोलन करण्याचा इशाराही पारवे यांनी दिला आहे.

- बॅगेत काय होतं? ‘राजा’ कोण? आणि वरिष्ठ अधिकारी मौन का बाळगत आहेत? कचऱ्यातील बॅगेचं रहस्य, ‘राजा’ची चर्चा आणि प्रशासनावर मोठे सवाल! कामठी शहरात सध्या दोन चर्चित प्रकरणांनी नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. कळमना मार्गावर कचरा वेचणाऱ्या मुलांना कथितरित्या रोख रक्कम आणि आक्षेपार्ह वस्तू असलेली बॅग सापडल्याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, ‘कलेक्शन एजंट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका व्यक्तीबाबत विविध चर्चा आणि आरोप समोर येत आहेत. यासोबतच दारू, रेती, मुरूम, गिट्टी, गोवंश तस्करी आणि कोळशाच्या कथित अवैध कारोबारांबाबत नागरिकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ⚠️ महत्त्वाची सूचना: या व्हिडिओमधील माहिती वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित बातम्या, स्थानिक चर्चा आणि नागरिकांकडून व्यक्त करण्यात आलेल्या प्रश्नांवर आधारित आहे. Public To PM News 24 कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवत नाही. संबंधित बाबींवर निष्पक्ष चौकशी होऊन सत्य जनतेसमोर यावे, हीच अपेक्षा आहे. #Kamthi #KamthiNews #BreakingNews #KamthiPolice #NagpurNews #MaharashtraNews #Investigation #LocalNews #CrimeNews #KamthiUpdate #PublicVoice #TrendingNews #ViralNews #QuestionToAdministration #GroundReport #NewsAlert #LatestNews #KamthiCity #Jb Sharma1
- जि प भोजापूर येथे मुलांच्या सहकार्याने फुलली परसबाग पवणी जि प भोजापूर येथे मुलांच्या सहकार्याने फुलली परसबाग पवनी: जि प प्रा शा भोजापूर येथे तब्बल १६० रोपांची परसबाग तयार करण्यात आली मु अ पडवाल सर व राहुल पाटील सर यांच्या परिश्रमाने व वर्ग ४ थी च्या सहकार्याने परसबाग फुलली आहे.1
- दहिसर ठाकुरपाड़ा की स्थिति बदहाल! जनप्रतिनिधि क्यों नहीं दे रहे ध्यान? नागरिकों ने बताई अपनी आपबीती Rok Tok Hindustan news imran shaikh [14/09, 15:47] Imran Shaikh: दहिसर ठाकुरपाड़ा इलाके में नागरिकों ने खराब व्यवस्था और स्थानीय समस्याओं को लेकर अपनी आपबीती साझा की। लोगों का सवाल है कि आखिर जनप्रतिनिधि इन समस्याओं पर ध्यान क्यों नहीं दे रहे हैं? नागरिकों ने प्रशासन और जनप्रतिनिधियों से जल्द से जल्द समस्याओं का संज्ञान लेकर उचित कार्रवाई की मांग की है। अब देखना होगा कि जिम्मेदार प्रशासन और जनप्रतिनिधि इस मामले में कब तक कदम उठाते हैं। [14/09, 15:47] Imran Shaikh: #RokTokHindustanNews #Dahisar #ThakurPada #MumbaiNews #CitizenVoice #जनताकीआवाज #LocalNews #CivicIssues #मुंबई1
- Wardha News | Rohit Pawar in Wardha Today to meet family of Late Bhagwan Dhurve. रोहित पावर आज वर्धा दौरे पर Wardha News | Rohit Pawar in Wardha Today to meet family of Late Bhagwan Dhurve. रोहित पावर आज वर्धा दौरे पर1
- सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत...लोनखैरी नवेगाव टोला दहशतीखाली सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत...लोनखैरी नवेगाव टोला दहशतीखाली1
- धान उत्पादक शेतकऱ्यांच्या २० हजार रुपयांच्या बोनसचा प्रश्न अधांतरी; शासन निर्णयानंतरही मदत खात्यात जमा नाहीच गोंदिया/भंडारा: महाराष्ट्रातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेला प्रति हेक्टरी २० हजार रुपयांचा बोनस नऊ महिने उलटूनही बँक खात्यात जमा न झाल्याने विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाकडून धान उत्पादकांना हेक्टरी २०,००० रुपये बोनस देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार शासनाने १८०० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूदही केली होती, मात्र प्रत्यक्षात ही रक्कम अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. प्रहार संघटनेचे आंदोलन व शेतकऱ्यांची मागणी बोनसची हक्काची रक्कम तात्काळ खात्यात वर्ग करण्यात यावी, यासाठी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत 'प्रहार जनशक्ती संघटने'च्या वतीने निदर्शने व आंदोलने करण्यात आली आहेत. शासनाने शासन निर्णय (GR) काढून निधी निश्चित केल्यानंतरही वितरण प्रक्रिया थांबल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सध्या या बोनसबाबत राजकीय क्षेत्रात दोन वेगळे प्रवाह पाहायला मिळत आहेत: * निधीच्या कमतरतेची भीती: राज्य सरकारकडून राबवली जाणारी कर्जमाफी, 'लाडकी बहीण योजना', 'पीएम किसान' आणि 'नमो शेतकरी महासन्मान निधी' या योजनांमुळे तिजोरीवर भार असून यंदा धान बोनस मिळणार नाही, असा दावा काही नेत्यांकडून केला जात आहे. * महायुतीचा दावा: महायुतीतील लोकप्रतिनिधी आणि घटक पक्षांचे नेते मात्र हा बोनस शेतकऱ्यांना निश्चितपणे मिळेल, अशी भूमिका मांडत आहेत. इतर प्रलंबित समस्या आणि ई-पीक पाहणी धान बोनसच्या मुद्द्यासोबतच ग्रामीण भागातील खराब रस्ते आणि पायाभूत सुविधांचा प्रश्न गंभीर बनला आहे. याशिवाय, शासनाच्या नवीन अपडेटनुसार शेतकऱ्यांना स्वतःच्या 'फार्मर आयडी' (Farmer ID) द्वारे 'ई-पीक पाहणी'ची नोंदणी करावी लागणार आहे. शासनाने दिलेला शब्द पाळून धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात बोनसची रक्कम तात्काळ जमा करावी, अशी आग्रही मागणी आता झाडीबोली पट्ट्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.1
- Wardha District Prime News Today | वर्धा जिले की आज की महत्पूर्ण ख़बरें.............................. Wardha District Prime News Today | वर्धा जिले की आज की महत्पूर्ण ख़बरें..............................1
- जुना धामणगांव दलित वस्ती कडे जाणाऱ्या मार्गावरील नालीची समस्या; नागरिकांचे आरोग्य धोक्यात पावसाचे पाणी व गाळ थेट मुख्य रस्त्यावर; विद्यार्थी, वृद्धांसह नागरिकांचे हाल जुना धामणगांव दलित वस्ती कडे जाणाऱ्या मार्गावरील नालीची समस्या; नागरिकांचे आरोग्य धोक्यात पावसाचे पाणी व गाळ थेट मुख्य रस्त्यावर; विद्यार्थी, वृद्धांसह नागरिकांचे हाल प्रतिनिधी : संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे : जुना धामणगांव येथील दलित वस्तीच्या मुख्य मार्गावरील नालीची दुरवस्था झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नालीमध्ये पावसाचे पाणी अथवा मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानंतर नालीतील घाण पाणी, गाळ व कचरा थेट मुख्य रस्त्यावर येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते. तसेच शाळकरी विद्यार्थी, महिला, वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांनाही याच मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र, नालीचे घाण पाणी व गाळ रस्त्यावर साचत असल्याने नागरिकांना त्यातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला असून, दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. नालीतील साचलेले घाण पाणी आणि गाळ यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय नाली व परिसरात पाणी व कचरा साचत असल्याने साप तसेच इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होत असून, नालीची योग्य साफसफाई, दुरुस्ती व पाण्याचा सुरळीत निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. संबंधित विभागाने केवळ तात्पुरती साफसफाई न करता नालीची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी तसेच पावसाचे पाणी रस्त्यावर येणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन नालीची स्वच्छता, गाळ काढणे, दुरुस्ती आणि पाण्याच्या योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1
- कृषी उत्पन्न बाजार समिती आर्वी परिसरातील विहिरीत आढळल्या मृतदेह1