जागतिक महिला दिन कार्यक्रम यशस्वी मानोरा :-- ८ मार्च रोजी अन्नपूर्णा महिला बचत गट, आणि ब्राह्मकुमारीज यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष रजनी दीदी होत्या. प्रमुख उपस्थितीत पोलीस स्टेशनचे ठाणेदार नैना पोहेकर, रेखा हेमेंद्र ठाकरे, किरण यशवंत पद्मगीरवार, आणि वैशाली दीदी, यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून झाली. सर्व मान्यवरांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, तसेच भेटवस्तू दिल्या गेल्या. तारा दीदी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ठाणेदार नैना पोहेकर यांनी महिलांच्या सुरक्षेसंबंधी कायद्यांची माहिती देत अनुभव शेअर केले. किरण पद्मगीरवार यांनी ८ मार्चचा दिवस कशासाठी साजरा केला जातो याची माहिती दिली. वैशाली दीदी, यांनी वंदे मातरम स्वर्णिम विषयावर मार्गदर्शन केले. विजया दीदी यांनी गीत सादर केले, तर कृष्णाली सवंदले आणि मनस्वी सोनोने यांनी नृत्य सादर केले. कार्यक्रमात कविता सादर करण्यात आल्या, तसेच रेखा ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात रजनी दीदी यांनी महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न तारा दीदी यांनी केले, तर आशा सोनोने आशा सोनकुसरे, आणि समूहाच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन शीतल ठाकरे यांनी केले. कार्यक्रमात महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती आणि सर्व पाहुण्यांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

- दारव्हा तालुक्यातील लाखखिंड परिसरात एका शेतातील विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. या घटनेची माहिती मंगळवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून वन विभागाने बिबट्याच्या सुटकेसाठी रेस्क्यू मोहीम सकाळी ११. ०० वाजता सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाखखिंड येथील शेतकरी रमेश जाधव यांचे तीवरी रोडलगत शेत आहे. सोमवारी रात्री पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या त्यांच्या शेतातील विहिरीमध्ये पडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मंगळवारी सकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास रमेश जाधव शेतात गेले असता विहिरीमध्ये बिबट्या पडलेला दिसून आला. ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ गावातील नागरिकांना माहिती दिली. काही वेळातच ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. दरम्यान, घटनेची माहिती दारव्हा वन विभागाला देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी विशेष रेस्क्यू मोहीम सुर राबविण्यात आली.वन विभागाकडून बिबट्याला पकडून सुरक्षित जंगलात सोडण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव चऱ्हाटे यांनी सांगितले.1
- Post by Sharad Dayedar1
- बोधिसत्व बुद्धविहार, जवळा येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा जवळा (ता. आर्णी) : प्रतिनिधी बोधिसत्व बुद्धविहार, जवळा येथे ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापिका सौ. आशाताई जाधव या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सौ. नम्रताताई विनोद पंचभाई, सौ. रुचिका गणेश एकंडवार, सौ. हर्षला अनिल चौधरी आणि सौ. परमजीत अमोल मुजमुले उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीसमोर मेणबत्ती प्रज्वलित करून व पूजन करून करण्यात आली. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व हारार्पण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन सौ. मायाताई भीमराव मुजमुले यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या सौ. नम्रताताई पंचभाई यांनी महिलांच्या सक्षमीकरणाबाबत प्रेरणादायी विचार मांडले. तसेच सौ. परमजीतताई मुजमुले यांनी भारतीय संविधानात महिलांना दिलेल्या अधिकारांबाबत सविस्तर माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात सौ. आशाताई जाधव यांनी स्त्री-पुरुष समानतेचे महत्त्व अधोरेखित करत समाजात महिलांनी आत्मविश्वासाने पुढे यावे, असे आवाहन केले. तसेच भीमराव मुजमुले यांनीही आपले विचार मांडत उपस्थित पाहुण्यांच्या सहभागाबद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. मीनाबाई मुजमुले यांनी केले. या कार्यक्रमाला परिसरातील मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.1
- एकता नगर वार्ड क्रमांक 2 बाशिटाकळी मधील पिण्याच्या पाणी चिंता जनक परिस्थिती आहे नगरपंचायत बाशिटाकळीमधील कर्मचारी काय करतात अनेक निवेदन दिले असुन याकडे शासनाच दुर्लक्ष बाशिटाकळी नगरपंचायत हातपंपाचे पाणी पिण्या साठी भरता येत नसुन बाशिटाकळीमधील परिस्थिती आहे1
- Post by वैजनाथ पावडे1
- जागतीक महिला दिनाचं औचित्य साधून यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये एकता महिला मंडळ आणि यशस्विनी बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सन्मान नारीशक्तीचा या कार्यक्रमामध्ये नगर परीषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी होम मिनीस्टर,खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.1
- वाघोली शेत शिवारात खळबळ; कॅनलमध्ये आढळले दोन तरुणांचे मृतदेह धामणगांव रेल्वे तालुक्यातील वाघोली शेत शिवार परिसरात आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी कॅनलमध्ये दोन तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोन वेगवेगळ्या गावचे तरुण मिळालेल्या माहितीनुसार, मृत आढळलेले दोन्ही तरुण आजूबाजूच्या परिसरातीलच आहेत. पहिल्या मृताची ओळख दिनेश दिवाकर मारकाम (वय ३४, रा. जळगाव मंगरूळ) अशी पटली आहे, तर दुसरा मृतदेह धीरज मातरे (रा. ढाकुलगाव) या तरुणाचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे दोन्ही मृतदेह वाघोली शिवारातील कॅनलमध्ये काही अंतरावर आढळून आले. पोलीस पथक घटनास्थळी घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गिरीश तातोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये हवालदार सागर कदम, अतुल पाटील, नवनाथ खेडकर, हरिहर वैद्य आणि पोलीस कॉन्स्टेबल मयूर धावक यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलवले आहेत. या दोन्ही तरुणांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हा घातपात आहे की अपघात? याचा अधिक तपास दत्तापूर पोलीस करत आहेत. एकाच दिवशी दोन मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचे व चर्चेचे वातावरण पसरले आहे. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे *💥वाघोली शेत शिवारात खळबळ; कॅनलमध्ये आढळले दोन तरुणांचे मृतदेह* *💥दोन वेगवेगळ्या ठिकाणी कॅनलमध्ये दोन तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली* *💥सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे*1
- अमरण उपोषणाचा दुसरा दिवस भानेगाव येथील विविध प्रश्नांवर न्याय मिळावा यासाठी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सिंगणवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे सुरू केलेल्या अमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. भानेगाव येथील जल जीवन मिशन (JJM) व पाणीपुरवठा कामातील अनियमितता, बनावट कागदपत्रे व सह्या, सन 2021–23 मधील ग्रामपंचायत विकास कामांची चौकशी, जि.प. प्राथमिक शाळेतील कामांची चौकशी, तसेच माजी मुख्याध्यापक चौकशीत दोषी आढळूनही कारवाई न झाल्याने त्यांना निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पूरामुळे बंद होणारा गावाचा जीवनावश्यक रस्ता पुनर्वसन जागेतून तात्काळ खुला करावा व बेलगव्हाण–भानेगाव पांदन रस्ता तात्काळ सुरू करावा, या मागण्यांसाठी उपोषण सुरू असल्याचे सांगण्यात आले.1