logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जलजीवन मिशन योजनेचा बळसोंड ग्रामपंचायतीत शुभारंभ; ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण जलजीवन मिशन योजनेचा बळसोंड ग्रामपंचायतीत शुभारंभ; ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण हिंगोली | प्रतिनिधी हिंगोलीजवळील बळसोंड ग्रामपंचायत परिसरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गावामध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ आज उत्साहात पार पडला. या योजनेचे उद्घाटन गावाचे सरपंच शैलेश जैस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून गावात शुद्ध व नियमित पाणीपुरवठ्याची मागणी होत होती. यासाठी सरपंच शैलेश जैस्वाल यांनी सातत्याने पाठपुरावा करून शासनस्तरावर प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने गावात जलजीवन मिशन योजनेचे पाणी पोहोचले आहे. जल क्रांती पॅनलने दिलेला शब्द पूर्ण करत गावात पाणी आणून दाखवले, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. बळसोंड गावातून सुरू झालेल्या या योजनेमुळे मुळगावापर्यंत पाणी पोहोचले असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, नवीन रस्त्याच्या कामामुळे काही ठिकाणी पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असली तरी लवकरात लवकर योजनेचे काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या योजनेमुळे महिलांची पाण्यासाठी होणारी धावपळ कमी होणार असून गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी सरपंच शैलेश जैस्वाल व संबंधित सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.

1 hr ago
user_Balu Vitthal Jadhav
Balu Vitthal Jadhav
पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
1 hr ago
82dab216-fa3b-4043-86c4-07531b09a68e

जलजीवन मिशन योजनेचा बळसोंड ग्रामपंचायतीत शुभारंभ; ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण जलजीवन मिशन योजनेचा बळसोंड ग्रामपंचायतीत शुभारंभ; ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण हिंगोली | प्रतिनिधी हिंगोलीजवळील बळसोंड ग्रामपंचायत परिसरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गावामध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ आज उत्साहात पार पडला. या योजनेचे उद्घाटन गावाचे सरपंच शैलेश जैस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून गावात शुद्ध व

becf6ec7-9aa0-4061-af2c-8b9eac6f94e2

नियमित पाणीपुरवठ्याची मागणी होत होती. यासाठी सरपंच शैलेश जैस्वाल यांनी सातत्याने पाठपुरावा करून शासनस्तरावर प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने गावात जलजीवन मिशन योजनेचे पाणी पोहोचले आहे. जल क्रांती पॅनलने दिलेला शब्द पूर्ण करत गावात पाणी आणून दाखवले, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. बळसोंड गावातून सुरू झालेल्या या योजनेमुळे मुळगावापर्यंत पाणी पोहोचले असून नागरिकांना मोठा

7adf1d74-7336-4161-9f81-4c3f98c116b2

दिलासा मिळाला आहे. दरम्यान, नवीन रस्त्याच्या कामामुळे काही ठिकाणी पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असली तरी लवकरात लवकर योजनेचे काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या योजनेमुळे महिलांची पाण्यासाठी होणारी धावपळ कमी होणार असून गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी सरपंच शैलेश जैस्वाल व संबंधित सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.

More news from Buldhana and nearby areas
  • श्री गजानन महाराज संस्थानने शेगाव मंदिर परिसरात मोबाईल वापरास पूर्ण बंदी लागू केली आहे. मंदिर परिसरातील वाढती गर्दी आणि गोंधळामुळे मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्या भाविकांचा मोबाईल तात्काळ जप्त केला जाईल, असा कडक इशारा संस्थानने दिला आहे.
    1
    श्री गजानन महाराज संस्थानने शेगाव मंदिर परिसरात मोबाईल वापरास पूर्ण बंदी लागू केली आहे. मंदिर परिसरातील वाढती गर्दी आणि गोंधळामुळे मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्या भाविकांचा मोबाईल तात्काळ जप्त केला जाईल, असा कडक इशारा संस्थानने दिला आहे.
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    18 hrs ago
  • बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात एक डिझेल टँकर पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, टँकरमधून डिझेल गळती सुरू होताच परिसरातील नागरिकांनी जीव धोक्यात घालून, कॅन-बाटल्या घेऊन डिझेल जमा करण्यासाठी घटनास्थळी गर्दी केली.
    1
    बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात एक डिझेल टँकर पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मात्र, टँकरमधून डिझेल गळती सुरू होताच परिसरातील नागरिकांनी जीव धोक्यात घालून, कॅन-बाटल्या घेऊन डिझेल जमा करण्यासाठी घटनास्थळी गर्दी केली.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • येवला/येवला उपजिल्हा रुग्णालयात बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त फळे व बिस्किट वाटप येवला उपजिल्हा रुग्णालयात बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त फळे व बिस्किट वाटप
    1
    येवला/येवला उपजिल्हा रुग्णालयात बाळासाहेब  आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त फळे व बिस्किट वाटप
येवला उपजिल्हा रुग्णालयात बाळासाहेब  आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त फळे व बिस्किट वाटप
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • महाराष्ट्रातील शेगावातील श्री गजानन महाराज मंदिरात आता मोबाईल वापरण्यावर सक्त बंदी घालण्यात आली आहे. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी आणि भाविकांना शांततेत दर्शन घेता यावे यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्या भाविकांचा मोबाईल जप्त करण्यात येईल, असे संस्थानने स्पष्ट केले आहे.
    1
    महाराष्ट्रातील शेगावातील श्री गजानन महाराज मंदिरात आता मोबाईल वापरण्यावर सक्त बंदी घालण्यात आली आहे. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी आणि भाविकांना शांततेत दर्शन घेता यावे यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्या भाविकांचा मोबाईल जप्त करण्यात येईल, असे संस्थानने स्पष्ट केले आहे.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    13 hrs ago
  • Post by नागनाथ ससाने
    1
    Post by नागनाथ ससाने
    user_नागनाथ ससाने
    नागनाथ ससाने
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • बुलडाणा जिल्ह्यातील धरणगावाजवळ राष्ट्रीय महामार्ग ५३ वर धावत्या ट्रकला अचानक भीषण आग लागली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असली तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली.
    1
    बुलडाणा जिल्ह्यातील धरणगावाजवळ राष्ट्रीय महामार्ग ५३ वर धावत्या ट्रकला अचानक भीषण आग लागली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असली तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली.
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • नंदुऱ्यामध्ये 'रियांश अमृत ज्यूस'ने सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार करत असल्याचा दावा केला आहे. 'हर हर रियांश, हर घर रियांश' या घोषणेसह हे उत्पादन घरोघरी पोहोचवले जात आहे. या ज्यूसच्या परिणामकारकतेबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये कुतूहल आणि चर्चा सुरु आहे.
    1
    नंदुऱ्यामध्ये 'रियांश अमृत ज्यूस'ने सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार करत असल्याचा दावा केला आहे. 'हर हर रियांश, हर घर रियांश' या घोषणेसह हे उत्पादन घरोघरी पोहोचवले जात आहे. या ज्यूसच्या परिणामकारकतेबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये कुतूहल आणि चर्चा सुरु आहे.
    user_Sagar Chimkar
    Sagar Chimkar
    Public Health Specialist नांदुरा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे शेतीच्या वादातून झालेल्या दुहेरी हत्याप्रकरणी न्यायालयाने तीन दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे पीडित कुटुंबाला उशिरा का होईना न्याय मिळाला आहे.
    1
    लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे शेतीच्या वादातून झालेल्या दुहेरी हत्याप्रकरणी न्यायालयाने तीन दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे पीडित कुटुंबाला उशिरा का होईना न्याय मिळाला आहे.
    user_RAFTAR HINDUSTAN KI
    RAFTAR HINDUSTAN KI
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • ज्ञानेश्वर विद्यालयाचा दहावी बोर्ड परीक्षेचा ९७.५७%  दमदार निकाल लातूर, दि. 11 (प्रतिनिधी):- लातूर शहरातील शाहू चौक परिसरातील ज्ञानेश्वर विद्यालयाने यंदाच्या दहावी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेचा एकूण निकाल तब्बल ९७.५७ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी आदर्श युवराज कांबळे आणि स्नेहा चक्रधर कारभारी या दोन विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच वैष्णवी पानहळवे हिने ९९.६० टक्के गुण मिळवत द्वितीय, तर सृष्टी चव्हाण हिने ९९ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे शाळेतील ४२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांची संस्थाअध्यक्ष विक्रम गोजमगुंडे, उपाध्यक्ष प्रल्हाद दूडीले, सचिव डी.एन. शेळके, कोषाध्यक्ष विनायक पिनाटे, सहसचिव विठ्ठल इगे, संचालक प्रा. प्रकाशराव शिंगाडे, नाथराव कोल्हे माधवराव गोलावार अनिरुद्ध शेळके हरिचंद्र निर्मित डॉक्टर सोपानराव जटाळ चंदुलाल बलवा यांच्यासह प्राचार्य संजय मलवाडे उप प्राचार्य माधव क्षीरसागर, पर्यवेक्षक हनुमंत बैनगिरे, पूनम पाटील, संजय कासले, परीक्षा प्रमुख सुधाकर बुरगे, लिपिक अजय अरदवाड आदींनी कौतुक केले आहे. ज्ञानेश्वर विद्यालयाच्या या घवघवीत यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
    1
    ज्ञानेश्वर विद्यालयाचा दहावी बोर्ड परीक्षेचा ९७.५७%  दमदार निकाल
लातूर, दि. 11 (प्रतिनिधी):- लातूर शहरातील शाहू चौक परिसरातील ज्ञानेश्वर विद्यालयाने यंदाच्या दहावी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेचा एकूण निकाल तब्बल ९७.५७ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.
यावर्षी आदर्श युवराज कांबळे आणि स्नेहा चक्रधर कारभारी या दोन विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच वैष्णवी पानहळवे हिने ९९.६० टक्के गुण मिळवत द्वितीय, तर सृष्टी चव्हाण हिने ९९ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.
विशेष म्हणजे शाळेतील ४२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
गुणवंत विद्यार्थ्यांची संस्थाअध्यक्ष विक्रम गोजमगुंडे, उपाध्यक्ष प्रल्हाद दूडीले, सचिव डी.एन. शेळके, कोषाध्यक्ष विनायक पिनाटे, सहसचिव विठ्ठल इगे, संचालक प्रा. प्रकाशराव शिंगाडे, नाथराव कोल्हे माधवराव गोलावार अनिरुद्ध शेळके हरिचंद्र निर्मित डॉक्टर सोपानराव जटाळ चंदुलाल बलवा यांच्यासह प्राचार्य संजय मलवाडे उप प्राचार्य माधव क्षीरसागर, पर्यवेक्षक हनुमंत बैनगिरे, पूनम पाटील, संजय कासले, परीक्षा प्रमुख सुधाकर बुरगे, लिपिक अजय अरदवाड आदींनी कौतुक केले आहे. ज्ञानेश्वर विद्यालयाच्या या घवघवीत यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
    user_Dede Khanderao Nivrutti
    Dede Khanderao Nivrutti
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.