logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

**मोठी बातमी : मनरेगा मजुरांची मजुरी 100 दिवसांनंतरही प्रलंबित केंद्र शासनाकडून PFMS वर निधीच अपलोड नाही – आयुक्तालयाचा धक्कादायक खुलासा** नागपूर | दि. 16 फेब्रुवारी 2026 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत काम केलेल्या हजारो मजुरांची मजुरी 100 दिवसांहून अधिक कालावधी उलटूनही अद्याप मिळालेली नाही, असा धक्कादायक खुलासा आयुक्तालय, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – महाराष्ट्र येथून देण्यात आलेल्या अधिकृत पत्रातून झाला आहे. मनरेगा मजुरी प्रलंबित असल्याबाबत 26 जानेवारी 2026 व 16 फेब्रुवारी 2026 रोजी ई-मेलद्वारे तक्रारी व माहिती सादर करण्यात आली होती. या तक्रारींच्या अनुषंगाने आयुक्तालयाने अधिकृत पत्र जारी करून मजुरीबाबतची सद्यस्थिती स्पष्ट केली आहे. केंद्र शासनाकडून निधीच अपलोड नाही आयुक्तालयाच्या पत्रानुसार, संबंधित मजुरांची आवश्यक कागदपत्रे व माहिती कार्यालयाकडे आधीच पूर्ण स्वरूपात प्राप्त झालेली आहे. मात्र, 100 दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही संबंधित मजुरी केंद्र शासनाकडून Online PFMS Portal वर जमा करण्यात आलेली नाही. यामुळे ही मजुरी थेट मजुरांच्या बँक खात्यात जमा होऊ शकलेली नसल्याचे पत्रात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. म्हणजेच, मजुरी रखडण्यास मजूर किंवा स्थानिक यंत्रणा जबाबदार नसून केंद्र शासन स्तरावरील निधी प्रक्रियेमुळे ही अडचण निर्माण झाली आहे, हे अधिकृतरीत्या स्पष्ट झाले आहे. मजुरी कधी मिळणार? कोणतीही तारीख नाही पत्रात पुढे नमूद करण्यात आले आहे की, मनरेगा अंतर्गत मजुरी अदा करण्याची प्रक्रिया केंद्र व राज्य शासनाच्या कार्यक्षेत्रानुसार ठरविण्यात आलेली आहे. निधी उपलब्धता, Online प्रणाली व निर्धारित कार्यपद्धतीनुसारच मजुरी दिली जाते. सध्या Public Financial Management System प्रणालीवर निधी अपलोड न झाल्यामुळे संपूर्ण प्रक्रिया ठप्प आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, मजुरी अदा करण्याबाबत कोणतीही निश्चित तारीख, कालमर्यादा किंवा पुढील निर्णय अद्याप कळविण्यात आलेला नाही. त्यामुळे मजुरांना मजुरी कधी मिळणार, याबाबत प्रशासनाकडेही ठोस उत्तर नसल्याचे या पत्रातून स्पष्ट झाले आहे. मजुरांनी दाद कुणाकडे मागावी? सदर पत्र प्रशासकीय इमारत क्र. 2, पहिला मजला, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथील आयुक्तालय कार्यालयाकडून पाठविण्यात आले आहे. या पत्रामुळे मनरेगा मजुरी प्रलंबित असल्याची अधिकृत नोंद समोर आली असून, केंद्र शासन स्तरावरून निधी प्रक्रिया पूर्ण न झाल्याने मजुरांची मजुरी अडकलेली असल्याचे उघड झाले आहे. महागाई, कर्जबाजारीपणा आणि दैनंदिन उपजीविकेच्या प्रश्नात अडकलेल्या मनरेगा मजुरांसमोर आता एकच प्रश्न उभा राहिला आहे — “आमच्या घामाचे पैसे मागण्यासाठी आम्ही नेमके दाद कुणाकडे मागायची?”

11 hrs ago
user_राविराज शिंदे
राविराज शिंदे
Farmer Nagar, Ahmednagar•
11 hrs ago
8ffe42eb-baa2-4338-b470-40e2b251b39d

More news from Ahmednagar and nearby areas
  • अहिल्यानगरच्या भिंगारजवळ आलमगीर परिसरातील एका घरात शिरलेला बिबट्या जेरबंद करण्यात आला. सोमवारी सकाळी वन विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
    1
    अहिल्यानगरच्या भिंगारजवळ आलमगीर परिसरातील एका घरात शिरलेला बिबट्या जेरबंद करण्यात आला. सोमवारी सकाळी वन विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
    user_राविराज शिंदे
    राविराज शिंदे
    Farmer Nagar, Ahmednagar•
    12 hrs ago
  • शिरूर-आमदाबाद-मलठण अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तीन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रकरणी Shirur Police Station येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदाबाद (ता. शिरूर) हद्दीत आमदाबाद फाट्यापुढे, माषेरेमळा येथे थोरात तलाठी यांच्या घरासमोर हा अपघात घडला. टोयोटा ग्लांजा (क्र. एमएच १२ एक्सएक्स २४८६) या चारचाकी वाहनाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून समोरील वाहनास जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात धीरज राजू पवळे (वय २४), त्यांची पत्नी वैभव धीरज पवळे (वय २१) व सासू गोपिका राजू पवळे (वय ४५, सर्व रा. कोयाळी, ता. खेड, जि. पुणे) हे गंभीर जखमी झाले. तिघांनाही डोक्याला, हात-पायांना तसेच छाती व मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातात त्यांचा तीन वर्षांचा मुलगा विराज धीरज पवळे याचा दुर्दैवी मृत्यू झाला. जखमींना तातडीने शिरूर येथील श्री गणेशा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या प्रकरणी शिवम सत्यवान साळवे (वय २८, रा. मलठण, ता. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी संदीप प्रभाकर पुंडे (रा. कान्हूरमेसाई, ता. शिरूर, जि. पुणे) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (अ)(ब), ३२४ (४), १०६ (१) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा क्रमांक १३३/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
    1
    शिरूर-आमदाबाद-मलठण अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तीन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रकरणी Shirur Police Station येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदाबाद (ता. शिरूर) हद्दीत आमदाबाद फाट्यापुढे, माषेरेमळा येथे थोरात तलाठी यांच्या घरासमोर हा अपघात घडला. टोयोटा ग्लांजा (क्र. एमएच १२ एक्सएक्स २४८६) या चारचाकी वाहनाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून समोरील वाहनास जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
या अपघातात धीरज राजू पवळे (वय २४), त्यांची पत्नी वैभव धीरज पवळे (वय २१) व सासू गोपिका राजू पवळे (वय ४५, सर्व रा. कोयाळी, ता. खेड, जि. पुणे) हे गंभीर जखमी झाले. तिघांनाही डोक्याला, हात-पायांना तसेच छाती व मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातात त्यांचा तीन वर्षांचा मुलगा विराज धीरज पवळे याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
जखमींना तातडीने शिरूर येथील श्री गणेशा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
या प्रकरणी शिवम सत्यवान साळवे (वय २८, रा. मलठण, ता. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी संदीप प्रभाकर पुंडे (रा. कान्हूरमेसाई, ता. शिरूर, जि. पुणे) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (अ)(ब), ३२४ (४), १०६ (१) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा क्रमांक १३३/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
    user_Sachin Reporter Pune
    Sachin Reporter Pune
    पत्रकार Shirur, Pune•
    3 hrs ago
  • 💪
    1
    💪
    user_Shaikh Irfan
    Shaikh Irfan
    अकोले, अहमदनगर, महाराष्ट्र•
    39 min ago
  • वर्धा–नागपूर रेल्वे महामार्गावर तुळजापूर रेल्वे स्टेशनजवळ जीटी एक्सप्रेसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे. प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
    1
    वर्धा–नागपूर रेल्वे महामार्गावर तुळजापूर रेल्वे स्टेशनजवळ जीटी एक्सप्रेसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे. प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • (प्रतिनिधी):- मराठा सेवा संघ बीड व अंतर्गत सर्व कक्ष यांच्या वतीने दरवर्षी शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या वर्षीही शिवजन्मोत्सव सोहळा दिनांक २०/०२/२०२६ शुक्रवार वार रोजी ठीक-सांय. ०७:००वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रम प्रसंगी विविध क्षेत्रात कार्यरत समाजातील तळागाळातील व्यक्तीसाठी योगदान देणाऱ्या समाज रत्नांचा मराठा भूषण पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात येणार आहे. शिवजन्मोत्सव सोहळ्यात मराठा भूषण पुरस्काराने सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कार्य करणारे शिवश्री डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, वैद्यकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे प्रसिद्ध बाल रोगतज्ञ शिवश्री डॉ.प्रदीप शेळके, सामाजिक व उद्योग क्षेत्रातील शिवश्री अँड.प्रकाश कवठेकर, महिला मधून जिजाऊ रत्न पुरस्काराने शिवमती जयश्रीताई पांडुरंग सावंत तसेच विशेष गौरव पुरस्काराने समाज प्रबोधनकार शिवश्री संतोष डोंगरे व प्रशासकीय क्षेत्रातून शिवश्री मधुकर शेळके यांना मान्यवरांच्या हस्ते मराठा समाज भूषण पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे. या वेळी प्रसिद्ध व्याख्याते शिवश्री हनुमंत पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीडचे तहसीलदार मा.चंद्रकांत शेळके साहेब हे राहणार असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्ह्याच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शिवमती प्रियाराणी पाटील, शिवश्री अजय पाटील (अध्यक्ष छत्रपती शाहू महाराज नागरी सहकारी बँक बीड), बीड जिल्हा हिवताप अधिकारी शिवश्री विजयसिंह शिंदे, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष शिवश्री अशोक ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. या सर्व मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये मान्यवरांना मराठा समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तरी सर्व शिवप्रेमींनी शिवजन्मोत्सव व मराठा भूषण पुरस्कार सोहळयास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मराठा सेवा संघ बीड, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व अंतर्गत सर्व कक्षाच्या वतीने करण्यात येते.
    1
    (प्रतिनिधी):- मराठा सेवा संघ बीड व अंतर्गत सर्व कक्ष यांच्या वतीने दरवर्षी शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या वर्षीही शिवजन्मोत्सव सोहळा दिनांक २०/०२/२०२६ शुक्रवार वार रोजी ठीक-सांय. ०७:००वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रम प्रसंगी विविध क्षेत्रात कार्यरत समाजातील तळागाळातील व्यक्तीसाठी योगदान देणाऱ्या समाज रत्नांचा मराठा भूषण पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात येणार आहे. शिवजन्मोत्सव सोहळ्यात मराठा भूषण पुरस्काराने सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कार्य करणारे शिवश्री डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, वैद्यकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे प्रसिद्ध बाल रोगतज्ञ शिवश्री डॉ.प्रदीप शेळके, सामाजिक व उद्योग क्षेत्रातील शिवश्री अँड.प्रकाश कवठेकर, महिला मधून जिजाऊ रत्न पुरस्काराने शिवमती जयश्रीताई पांडुरंग सावंत तसेच विशेष गौरव पुरस्काराने समाज प्रबोधनकार शिवश्री संतोष डोंगरे व प्रशासकीय क्षेत्रातून शिवश्री मधुकर शेळके यांना मान्यवरांच्या हस्ते मराठा समाज भूषण पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे. या वेळी प्रसिद्ध व्याख्याते शिवश्री हनुमंत पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीडचे तहसीलदार मा.चंद्रकांत शेळके साहेब हे राहणार असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्ह्याच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शिवमती प्रियाराणी पाटील, शिवश्री अजय पाटील (अध्यक्ष छत्रपती शाहू महाराज नागरी सहकारी बँक बीड), बीड जिल्हा हिवताप अधिकारी शिवश्री विजयसिंह शिंदे, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष शिवश्री अशोक ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. या सर्व मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये मान्यवरांना मराठा समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तरी सर्व शिवप्रेमींनी शिवजन्मोत्सव व मराठा भूषण पुरस्कार सोहळयास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मराठा सेवा संघ बीड, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व अंतर्गत सर्व कक्षाच्या वतीने करण्यात येते.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • सिल्लोड चे आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन, सिल्लोड शहराच्या माजी नगराध्यक्षा नफीसा बेगम अब्दुल सत्तार यांचे निधन छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात शोककळा, दहा वाजता अंत्यविधी, अंत्यविधीत हजारोच्या संख्येने...
    1
    सिल्लोड चे आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन,
सिल्लोड शहराच्या माजी नगराध्यक्षा  नफीसा बेगम अब्दुल सत्तार यांचे निधन छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात शोककळा, दहा वाजता अंत्यविधी, अंत्यविधीत हजारोच्या संख्येने...
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • AJITDADA STATUE : बारामतीच्या तिरंगा सर्कल येथील नटराज कलामंडळासमोर अजितदादांचा १० फुटी पुतळा उभारला जाणार आहे.. संस्थेचे अध्यक्ष किरण गुजर यांनी याबद्दल माहिती देत पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात आल्याचं सांगितलंय.. #AjitPawar #politics #baramatikar #viralpost #viralvideo #maharashtra #development #fypシ #explore #BreakingNews #MaharashtraPolitics
    1
    AJITDADA STATUE : बारामतीच्या तिरंगा सर्कल येथील नटराज कलामंडळासमोर अजितदादांचा १० फुटी पुतळा उभारला जाणार आहे.. संस्थेचे अध्यक्ष किरण गुजर यांनी याबद्दल माहिती देत पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात आल्याचं सांगितलंय.. 
#AjitPawar #politics #baramatikar #viralpost #viralvideo #maharashtra #development #fypシ #explore #BreakingNews #MaharashtraPolitics
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • अहिल्यानगरात ‘हिंद-दी-चादर’ जनजागृतीची सुरुवात ! श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त विशेष चित्ररथाचे लोकार्पण या चित्ररथाद्वारे जिल्हाभर त्यांच्या शौर्य-त्याग, धर्मरक्षण आणि मानवतेच्या संदेशाचा प्रसार होणार. 📍भव्य समागम : २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ – खारघर, नवी मुंबई 👉 सर्व भाविकांनी उपस्थित राहण्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे आवाहन #HindDiChadar #GuruTeghBahadurJi #शौर्यआणित्याग #धर्मरक्षण #SikhHistory #Ahilyanagar #NaviMumbai #Samagam2026 #InspirationalHistory #MaharashtraEvents #ReligiousHarmony #WaheguruJi #MarathiReels #ViralReels #TrendingNow
    1
    अहिल्यानगरात ‘हिंद-दी-चादर’ जनजागृतीची सुरुवात !
श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त विशेष चित्ररथाचे लोकार्पण
या चित्ररथाद्वारे जिल्हाभर त्यांच्या शौर्य-त्याग, धर्मरक्षण आणि मानवतेच्या संदेशाचा प्रसार होणार.
📍भव्य समागम : २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ – खारघर, नवी मुंबई
👉 सर्व भाविकांनी उपस्थित राहण्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे आवाहन
#HindDiChadar #GuruTeghBahadurJi #शौर्यआणित्याग #धर्मरक्षण #SikhHistory #Ahilyanagar #NaviMumbai #Samagam2026 #InspirationalHistory #MaharashtraEvents #ReligiousHarmony #WaheguruJi #MarathiReels #ViralReels #TrendingNow
    user_राविराज शिंदे
    राविराज शिंदे
    Farmer Nagar, Ahmednagar•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.