मंदिरे आणि मशिदींमधील लाऊडस्पीकर इतके मोठे झाले आहेत की उपासमार, बेरोजगारी, गुन्हेगारी, गरिबी, बलात्कार आणि महागाई यासारखे मुद्दे गायब झाले आहेत. सध्याच्या काळात धार्मिक मुद्द्यांवरील चर्चा आणि लाऊडस्पीकरचा वाद इतका मोठा केला जातो की, सामान्य माणसाच्या जगण्याशी संबंधित मूलभूत प्रश्न मागे पडतात. बेरोजगारी आणि महागाई: तरुण नोकरीसाठी संघर्ष करत आहेत आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. सुरक्षा आणि गुन्हेगारी: महिलांवरील अत्याचार (बलात्कार) आणि वाढती गुन्हेगारी हे गंभीर विषय केवळ बातम्यांपुरते मर्यादित राहतात. गरिबी आणि उपासमार: आजही देशातील एक मोठा वर्ग मूलभूत गरजांपासून वंचित आहे. जेव्हा समाजात भावनिक आणि धार्मिक मुद्दे केंद्रस्थानी येतात, तेव्हा प्रशासकीय उत्तरदायित्व (Accountability) कमी होते. गोंधळ पेक्षा विकासाचा आवाज मोठा होणे ही काळाची गरज आहे. या परिस्थितीत शासक - विरोधक धार्मिक वादाऐवजी शिक्षण, आरोग्य आणि रोजगारावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे वाटते.

- मुंबई सेंट्रल पार्कच्या 295 एकर विकासाबाबत संभ्रम; सतेज पाटील यांचा अधिवेशनात प्रश्न कोल्हापूर / प्रतिनिधी मुंबई शहराचे “फुप्फुस” मानल्या जाणाऱ्या मुंबई सेंट्रल पार्कच्या 295 एकर जागेच्या विकासाबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने विधानसभेत हा मुद्दा उपस्थित झाला.आमदार सतेज पाटील यांनी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करत या मोठ्या प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असल्याचे सांगितले. मुंबई सेंट्रल पार्कच्या 295 एकर जमिनीवर विकासकामे सुरू असून या ठिकाणी नेमक्या कोणत्या सुविधा नागरिकांना उपलब्ध होणार आहेत, याची सविस्तर माहिती अद्याप सार्वजनिक झालेली नाही. त्यामुळे शहरातील पर्यावरणप्रेमी तसेच स्थानिक नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू असल्याचे पाटील यांनी अधिवेशनात नमूद केले.या संदर्भात त्यांनी राज्य सरकारने नागरिकांसाठी खुली सुनावणी आयोजित करावी किंवा प्रकल्पाचा संपूर्ण आराखडा प्रेझेंटेशनच्या माध्यमातून जनतेसमोर मांडावा, अशी मागणी केली. इतक्या मोठ्या प्रमाणावर विकसित होणाऱ्या या हरित क्षेत्राचा आराखडा पारदर्शकपणे लोकांसमोर यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. मुंबई सेंट्रल पार्क विकसित करताना नागरिकांच्या सूचना विचारात घेतल्या जातील आणि या संदर्भात उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकल्पामध्ये कोणत्याही प्रकारचे व्यापारीकरण होणार नसल्याचा स्पष्ट खुलासा सामंत यांनी केला. पार्कचा विकास हा पर्यावरणपूरक आणि नागरिकांना खुला असा करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात मोठे हरित क्षेत्र उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे या 295 एकर जागेचा विकास कशा स्वरूपात होणार याकडे आता नागरिकांसह पर्यावरणप्रेमींचेही लक्ष लागले आहे.1
- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रफुल्लित केंद्रामार्फत कै. मीनाताई ठाकरे विद्यालय, क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथे प्रेरणादायी उपक्रम पार पडला. यावेळी प्रफुल्लित केंद्राचे संस्थापक डॉ. प्रफुल्ल पाटील यांनी विद्यार्थ्यांना उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी शाळेला दोन सीलिंग फॅन भेट दिले. तसेच प्रफुल्लित केंद्राच्या अध्यक्षा डॉ. अल्फिया बागवान यांचा ‘पद्मश्री ग्लोबल एक्सलन्स नॅशनल अवॉर्ड’ मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.2
- Post by सारथी महाराष्ट्राचा न्यूज1
- सांगोल तालुका अजनाळे येथे पत्रकार सचिन धांडोरे मित्रपरिवार व डॉक्टर खंडागळे हॉस्पिटल यांच्या वतीने सर्व रोग आरोग्य शिबिर संपन्न या शिबिरामध्ये 200 रुग्णांची तपासणी करण्यात आली.1
- सोलापूर : ज्योती वाघमारे यांना राज्यसभा उमेदवारीबद्दल काहीच माहित नव्हते, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या नावावरून त्यांच्याकडून कागदपत्रे घेतली. मात्र, त्यांना राज्यसभा उमेदवारीबद्दल काहीच माहीत नव्हते. उमेदवारी अर्ज भरण्याचे दिवशी त्यांना राज्यसभा उमेदवारीबद्दल माहीत झाले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.1
- विक्रम शिंदे /भोर दि.19 तालुक्यातील नाझरे गावात शेकडो वर्षांपासून सोंगांच्या माध्यमातून ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाची सेवा करण्याची अनोखी परंपरा आजही जपली जात आहे. पूर्वजांच्या श्रद्धेतून सुरू झालेली ही परंपरा पिढ्यान् पिढ्या ग्रामस्थांकडून जोपासली जात आहे. होळी नंतर सलग सात दिवस यात्रेपर्यंत गावात विविध सोंगं घेऊन उत्सव साजरा केला जातो. गावातील खेळगडी वेगवेगळी वेशभूषा परिधान करून वाद्यांच्या तालावर गावभर फिरतात. त्यानंतर चौकाचौकात ढोल-ताशांच्या गजरात सोंगांचे सादरीकरण करत ग्रामस्थांचे मनोरंजन केले जाते. या परंपरेमागे एक आख्यायिका सांगितली जाते. पूर्वी खेळगड्यांचा वंश वाढत नसल्याने गावच्या पूर्वजांनी ग्रामदैवत भैरवनाथाला नवस केला होता. त्यानुसार धुलवडीच्या दिवशी होळीची शिळी पोळी घरोघरी मागून ती ओढ्याजवळ जाऊन खाणे तसेच गावातून वेगवेगळ्या सोंगांचे सादरीकरण करत छबिना काढण्याची प्रथा सुरू झाली. हा नवस फेडत आजही ग्रामस्थ सोंगांच्या माध्यमातून भैरवनाथ देवाची सेवा करत ही शेकडो वर्षांची परंपरा जिवंत ठेवत आहेत.1
- Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र1
- कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील शिरढोण गावामध्ये दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास धक्कादायक चोरीची घटना घडली. घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम बॅगेमध्ये भरली. मात्र घराशेजारील युवकाच्या सतर्कतेमुळे चोराला दारातच अडवण्यात आले. गल्लीतील नागरिक जमा झाल्यानंतर चोराने चोरीची कबुली देत चोरलेले साहित्य परत केले. घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चोराला ताब्यात घेतले. या घटनेमुळे शिरढोण गावात मोठी खळबळ उडाली आहे.1