सेंट्रल किचनच्या निकृष्ट जेवणाने विद्यार्थी संतापले! थंड, बेचव आणि उशिरा मिळणाऱ्या जेवणाच्या तक्रारी; कळवण-सुरगाणा तालुक्यात पालकांमध्येही नाराजी सेंट्रल किचनच्या निकृष्ट जेवणाने विद्यार्थी संतापले! थंड, बेचव आणि उशिरा मिळणाऱ्या जेवणाच्या तक्रारी; कळवण-सुरगाणा तालुक्यात पालकांमध्येही नाराजी आदिवासी विकास विभागाच्या सेंट्रल किचनमधून आश्रमशाळांना पुरविण्यात येणाऱ्या जेवणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक शाळांमध्ये थंड, बेचव व उशिरा जेवण मिळत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी व पालकांकडून होत आहेत. लांब अंतरावरून अन्नाची वाहतूक होत असल्याने त्याचा ताजेपणा आणि गुणवत्ता टिकते का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. कळवण व सुरगाणा तालुक्यातील विविध आश्रमशाळांमध्ये या प्रकारामुळे नाराजी वाढली असून, सेंट्रल किचन पद्धतीचा फेरआढावा घेऊन पूर्वीप्रमाणे शाळांमध्येच स्वयंपाकाची व्यवस्था सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास पालक व सामाजिक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सेंट्रल किचनच्या निकृष्ट जेवणाने विद्यार्थी संतापले! थंड, बेचव आणि उशिरा मिळणाऱ्या जेवणाच्या तक्रारी; कळवण-सुरगाणा तालुक्यात पालकांमध्येही नाराजी सेंट्रल किचनच्या निकृष्ट जेवणाने विद्यार्थी संतापले! थंड, बेचव आणि उशिरा मिळणाऱ्या जेवणाच्या तक्रारी; कळवण-सुरगाणा तालुक्यात पालकांमध्येही नाराजी आदिवासी विकास विभागाच्या सेंट्रल किचनमधून आश्रमशाळांना पुरविण्यात येणाऱ्या जेवणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक शाळांमध्ये थंड, बेचव व उशिरा जेवण मिळत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी व पालकांकडून होत आहेत. लांब अंतरावरून अन्नाची वाहतूक होत असल्याने त्याचा ताजेपणा आणि गुणवत्ता टिकते का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. कळवण व सुरगाणा तालुक्यातील विविध आश्रमशाळांमध्ये या प्रकारामुळे नाराजी वाढली असून, सेंट्रल किचन पद्धतीचा फेरआढावा घेऊन पूर्वीप्रमाणे शाळांमध्येच स्वयंपाकाची व्यवस्था सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास पालक व सामाजिक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
- दरसवाडी डोंगरगाव कालव्यात पाणी दाखल; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण, दरसवाडी डोंगरगाव कालव्याला अखेर पाणी सोडण्यात आले असून, यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये कमालीचा आनंद पाहायला मिळत आहे. या पाण्यामुळे पिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याने शेतकरी सुखावले आहेत. येवला तालुक्याचे भाग्यविधाते आणि माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या हस्ते दरसवाडी डोंगरगाव कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. भुजबळ साहेबांच्या प्रयत्नांमुळे कालव्यात पाणी दाखल होताच परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण तयार झाले आहे.1
- जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनानिमित्त भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या पालघर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनानिमित्त भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या पालघर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनाचे औचित्य साधून भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या पालघर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन आज दहाणू तालुक्यातील कासा-वरोती येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष प्रमोद पवार यांच्या हस्ते, कार्याध्यक्ष सुनील लोणे व सरचिटणीस नावनाथ भोये यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. राज्य सरचिटणीस स्वप्नील वाघ यांच्या पुढाकारातून हे मध्यवर्ती कार्यालय उभारण्यात आले असून, पालघर जिल्ह्यातील संघटनात्मक कार्याला यामुळे नवी दिशा मिळणार आहे. या प्रसंगी आयोजित कार्यकर्ता मेळावा, जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिन कार्यक्रमास शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. “जय बिरसा”, “जय आदिवासी”, “जय महाराष्ट्र” आणि “भूमिपुत्र एल्गार संघटना विजय असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी बोलताना अध्यक्ष प्रमोद पवार म्हणाले की, “भूमिपुत्र एल्गार संघटना ही गरिबांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी उभी राहिली आहे. ज्या दिवशी समाजातील शेवटच्या माणसाच्या डोळ्यात अश्रू उरणार नाहीत, समस्या उरणार नाहीत, अन्याय आणि अत्याचार संपतील, त्या दिवशी संघटना बंद करावी लागली तरी आम्हाला आनंदच होईल. मात्र जोपर्यंत अन्याय, शोषण आणि समस्या अस्तित्वात आहेत, तोपर्यंत भूमिपुत्र एल्गार संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता अन्यायाविरुद्ध लढत राहील.” कार्याध्यक्ष सुनील लोणे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “संघटनेच्या कार्यालयात आलेला कोणताही नागरिक समाधान घेऊनच परत गेला पाहिजे. तो कोणत्या जातीचा, धर्माचा, पक्षाचा किंवा संघटनेचा आहे हे पाहू नका. त्याच्यावर अन्याय झाला असेल तर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे राहा.” या कार्यक्रमास सरचिटणीस नावनाथ भोये, राज्य सरचिटणीस स्वप्नील वाघ, जिल्हा कार्याध्यक्ष मिलिंद थुळे, जिल्हा उपाध्यक्ष विकास धोडी , जिल्हा सरचिटणीस रेखा धांगडे, तलासरी तालुका अध्यक्ष अनिल करबट, सुनिता वळवी, पालघर युवा प्रमुख नयन धांगडे, विक्रमगड तालुका अध्यक्ष भाऊराम बोडके, सुधीर ब्राह्मणे , नारायण भाऊ , मनोज पारधी, प्रसाद भालेराव, मनोज धर्ममेहर*, अतुल यादव, सुभाष कांबडी , गोपाळ भाऊ, महदू गिंभल, भाई वांगड यांच्यासह जिल्हाभरातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यालयाच्या उद्घाटनामुळे पालघर जिल्ह्यातील आदिवासी, वंचित, शोषित आणि भूमिपुत्र समाजाच्या न्यायहक्कांच्या लढ्याला अधिक बळ मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.3
- शहापूर तालुक्यातील कसारा येथे उत्साहात आदिवासी दिन साजरा शहापूर तालुक्यातील कसारा परिसरात जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मोठ्या संख्येने नागरिक, महिला, युवक-युवती आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. या निमित्ताने पारंपरिक वेशभूषा, आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम, मिरवणूक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सजवलेल्या रथासह काढण्यात आलेल्या मिरवणुकीत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक वाद्ये, भगवे व लाल ध्वज तसेच विविध सांस्कृतिक सादरीकरणांमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. आदिवासी समाजाची परंपरा, संस्कृती, कला, भाषा आणि ऐतिहासिक वारसा जपण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. आदिवासी समाजाच्या हक्कांबरोबरच शिक्षण, विकास आणि सांस्कृतिक ओळख जपण्याच्या गरजेवरही यावेळी भर देण्यात आला.1
- धुळ्यात महिला बचत गटाची फसवणूक; दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा...... धुळे: महिला बचत गटाची फसवणूक करणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचारी ची चौकशी करून कार्यवाही करा. आज पासून आंदोलने सुरू केले आहे.1
- विश्व आदिवासी दिवसानिमित्त ,विश्व आदिवासी सेवा संघटनांच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप विश्व आदिवासी दिवसानिमित्त ,विश्व आदिवासी सेवा संघटनांच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप विश्व आदिवासी दिवसाचे औचित्य साधून नंदुरबार तालुक्यातील टाकलीपाडा व पिंपरीपाडा झराळी येथील जि.प. शाळेत विश्व आदिवासी सेवा संघटनांच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. व आदिवासी क्रांतीकारांचे फोटो भेट देण्यात आले . शिक्षण हे प्रगतीचे साधन असून आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक पात्रता वाढावी, या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत आश्रम शाळा व जिल्हा परिषद येथील प्राथमिक, माध्यमिक विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, कंपास बॉक्स, स्कूल बॅग, गणवेश आदी साहित्य मोफत वितरित करण्यात आले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ नरेश एम पाडवी अतिजिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय नंदुरबार विश्व आदिवासी सेवा संघटने चे. इंजि किशोर बी पावरा , संस्थेचे केंद्रीय संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बागुल, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष विवेक वळवी, नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष किशोर गवळे तसेच आरोग्य व शिक्षण विभागाचे अधिकारी ,सामाजिक कार्यकर्ते व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवासात अडथळा येऊ नये, यासाठी या प्रकारचे उपक्रम गरजेचे असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला . शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. या उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, हा उपक्रम भविष्यातही सुरू ठेवण्यात यावा, अशी मागणी उपस्थितांनी केली.1
- लाडकी बहीण'संदर्भात महत्त्वाची बातमी 'ई-केवायसीसाठी सहा महिन्याची मुदत दिलेली'1
- जब तक रेल दौडेगी नहीं, तब तक लडाई रुकेगी नहीं! नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे सरळमार्गे व्हावी, हा आपला हक्क आहे. या हक्कासाठी मैदानात उतरून लढणाऱ्या, आजच्या चक्काजाम आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येकाचं मी मनापासून आभार मानतो. काल रात्री स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी माझ्याशी संपर्क साधला, आताही सिन्नर येथे आंदोलनस्थळी असताना मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी फोन केला असता आपण 3 प्रमुख मागण्या लावून धरल्या :- 📌 ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या तज्ज्ञ समितीला कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ न देता 60 दिवसांत अंतिम अहवाल आला पाहिजे. 📌 समितीने फक्त तांत्रिक मुद्दे न तपासता, फक्त नफा तोट्याचे गणित न मांडता जनभावनेचा विचार केला पाहिजे. 📌 समितीने तालुक्या-तालुक्यात आणि गावागावात येऊन, जनसुनवाई / ग्रामसभा घेऊन जनभावना समजून घेतली पाहिजे. या तीनही मागण्या आम्हाला प्रशासनाकडून लेखी हव्यात, अशी ठाम भूमिका आपण यावेळी घेतली आहे. यावर मुख्यमंत्री महोदय आणि मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हे आंदोलन कोणाच्या विरोधात नाही तर जनभावना सरकारपर्यंत पोहोचावी, यासाठी आहे. पण, "जब तक रेल दौडेगी नहीं, तब तक लडाई रुकेगी नहीं!" हा आमचा सरकारला स्पष्ट इशारा आहे1
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा....1
- डोळखांब येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा लोकनेते दयानंद चोरघे यांची विशेष उपस्थिती शहापूर : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून डोळखांब येथे आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी लोकनेते तथा डी. वाय. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी विशेष उपस्थिती दर्शवत समस्त आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. डोळखांब येथे दरवर्षी जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षी आदिवासी समाजातील कार्यकर्ते तानाजी भगत, बुधाजी मधे, हिरामण खोडका, लक्ष्मण गांगड, किसन शिवारी, आंबो खांडवी, बुधा दुपारी, सखुबाई वाघ, सोमा केव्हारी, तुकाराम खडके आणि श्रावण बरतड यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून आपल्या संस्कृतीचे आणि परंपरांचे जतन करण्याचा संदेश देत संपूर्ण डोळखांब शहरातून भव्य मिरवणूक काढली. चिंचवाडी येथील वाद्य पथकाने आपल्या सादरीकरणातून कार्यक्रमात अधिक रंगत आणली. लोकनेते तथा डी. वाय. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी कार्यक्रमाला विशेष उपस्थिती दर्शवत मिरवणुकीत तसेच जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांना शुभेच्छा देत उत्कृष्ट नियोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. तसेच दरवर्षी हा कार्यक्रम अधिक दर्जेदार पद्धतीने आयोजित करण्यासाठी सढळ हस्ते मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी आदिवासी समाजाचे नेते दि. ना. उघडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदू डोहळे, समाजसेवक शिवाजी देशमुख, विकास चौधरी, सागर देशमुख, भास्कर भोईर, दिनेश कांबळे, हरिभाऊ शिंदे, गंगाराम झुगरे, सुनील वारघडे, बणेश लोखंडे, सिकंदर शेख, पंढरीनाथ ठाकरे, दत्तू झुगरे, सखाराम गांगड, विश्वनाथ गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.1