जब तक रेल दौडेगी नहीं, तब तक लडाई रुकेगी नहीं! नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे सरळमार्गे व्हावी, हा आपला हक्क आहे. या हक्कासाठी मैदानात उतरून लढणाऱ्या, आजच्या चक्काजाम आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येकाचं मी मनापासून आभार मानतो. काल रात्री स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी माझ्याशी संपर्क साधला, आताही सिन्नर येथे आंदोलनस्थळी असताना मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी फोन केला असता आपण 3 प्रमुख मागण्या लावून धरल्या :- 📌 ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या तज्ज्ञ समितीला कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ न देता 60 दिवसांत अंतिम अहवाल आला पाहिजे. 📌 समितीने फक्त तांत्रिक मुद्दे न तपासता, फक्त नफा तोट्याचे गणित न मांडता जनभावनेचा विचार केला पाहिजे. 📌 समितीने तालुक्या-तालुक्यात आणि गावागावात येऊन, जनसुनवाई / ग्रामसभा घेऊन जनभावना समजून घेतली पाहिजे. या तीनही मागण्या आम्हाला प्रशासनाकडून लेखी हव्यात, अशी ठाम भूमिका आपण यावेळी घेतली आहे. यावर मुख्यमंत्री महोदय आणि मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हे आंदोलन कोणाच्या विरोधात नाही तर जनभावना सरकारपर्यंत पोहोचावी, यासाठी आहे. पण, "जब तक रेल दौडेगी नहीं, तब तक लडाई रुकेगी नहीं!" हा आमचा सरकारला स्पष्ट इशारा आहे
जब तक रेल दौडेगी नहीं, तब तक लडाई रुकेगी नहीं! नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे सरळमार्गे व्हावी, हा आपला हक्क आहे. या हक्कासाठी मैदानात उतरून लढणाऱ्या, आजच्या चक्काजाम आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येकाचं मी मनापासून आभार मानतो. काल रात्री स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी माझ्याशी संपर्क साधला, आताही सिन्नर येथे आंदोलनस्थळी असताना मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी फोन केला असता आपण 3 प्रमुख मागण्या लावून धरल्या :- 📌 ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या तज्ज्ञ समितीला कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ न देता 60 दिवसांत अंतिम अहवाल आला पाहिजे. 📌 समितीने फक्त तांत्रिक मुद्दे न तपासता, फक्त नफा तोट्याचे गणित न मांडता जनभावनेचा विचार केला पाहिजे. 📌 समितीने तालुक्या-तालुक्यात आणि गावागावात येऊन, जनसुनवाई / ग्रामसभा घेऊन जनभावना समजून घेतली पाहिजे. या तीनही मागण्या आम्हाला प्रशासनाकडून लेखी हव्यात, अशी ठाम भूमिका आपण यावेळी घेतली आहे. यावर मुख्यमंत्री महोदय आणि मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हे आंदोलन कोणाच्या विरोधात नाही तर जनभावना सरकारपर्यंत पोहोचावी, यासाठी आहे. पण, "जब तक रेल दौडेगी नहीं, तब तक लडाई रुकेगी नहीं!" हा आमचा सरकारला स्पष्ट इशारा आहे
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त नाशिक शहरात भव्य मिरवणूक आयोजन जागतिक आदिवासी दिनानिमित्त नाशिकच्या पंचवटी परिसरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक वेशभूषा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि उत्साहपूर्ण वातावरणात काढण्यात आलेल्या या मिरवणुकीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि इतिहासाची ओळख या माध्यमातून करून देण्यात आली. मिरवणुकीत भगवान वीर एकलव्य, क्रांतिवीर बिरसा मुंडा तसेच आदिवासी समाजासाठी प्रेरणादायी ठरलेल्या विविध महापुरुषांचे चित्ररथ सहभागी करण्यात आले होते. महापुरुषांच्या जीवनकार्याचा आणि संघर्षाचा संदेश देणाऱ्या या चित्ररथांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीदरम्यान आदिवासी समाजाच्या पारंपरिक कला, संस्कृती आणि वारशाचे दर्शन घडले. भगवान वीर एकलव्य यांची निष्ठा, समर्पण आणि ध्येयाप्रती असलेली बांधिलकी तसेच क्रांतिवीर बिरसा मुंडा यांनी अन्यायाविरोधात उभारलेला संघर्ष आजही समाजाला प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. या भव्य मिरवणुकीत स्थानिक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर, आदिवासी समाजबांधव, युवक, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीमुळे पंचवटी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. आदिवासी संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि महापुरुषांच्या विचारांचा प्रसार करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.1
- रेल्वे हॉस्पिटल परिसरात उदमांजराची पिल्ले आढळली सर्पमित्र व अनुसया कमल फाउंडेशनच्या तत्परतेने पिल्लांना जीवदान; वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली पुनर्वसन मनमाड : प्रतिनिधी मनमाड येथील रेल्वे हॉस्पिटल परिसरात उदमांजराची लहान पिल्ले आढळून आल्याने परिसरात कुतूहल निर्माण झाले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे पिल्लांना वेळेत सुरक्षित ताब्यात घेऊन त्यांची काळजी घेण्यात आली. रेल्वे हॉस्पिटलच्या शेजारी काही पिल्ले आढळून आल्यानंतर नागरिकांनी तत्काळ सर्पमित्र विजू भाऊ उगले यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच उगले यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी पिल्लांजवळ त्यांची आई आढळून आली नाही. पिल्ले उपाशी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर अनुसया कमल फाउंडेशनच्या च्या सहकार्याने पिल्लांना आवश्यक खाद्य देण्यात आले. सध्या त्यांना सुरक्षित ठिकाणी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून, त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, घटनेची माहिती वन विभागाचे वनपाल सय्यद यांना देण्यात आली आहे. पिल्लांची आवश्यक काळजी घेतल्यानंतर वन विभागाशी समन्वय साधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. उदमांजर हा सिवेट कुळातील वन्यजीव असून, त्याला अनेकदा मांजर समजण्याचा गैरसमज होतो. अशा प्रकारची वन्यजीवांची पिल्ले आढळल्यास नागरिकांनी त्यांना स्वतःहून घरी नेऊ नये अथवा त्यांना हाताळण्याचा प्रयत्न करू नये. तातडीने वन विभाग किंवा अधिकृत प्राणी बचाव पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या बचावकार्यात सर्पमित्र विजू भाऊ उगले, अनुसया कमल फाउंडेशनची आणि वन विभाग यांच्या समन्वयामुळे पिल्लांना सुरक्षितता मिळाली.1
- लाडकी बहीण'संदर्भात महत्त्वाची बातमी 'ई-केवायसीसाठी सहा महिन्याची मुदत दिलेली'1
- धुळ्यात महिला बचत गटाची फसवणूक; दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा...... धुळे: महिला बचत गटाची फसवणूक करणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचारी ची चौकशी करून कार्यवाही करा. आज पासून आंदोलने सुरू केले आहे.1
- क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय मोर्चा: पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांच्याकडून ५ मार्गदर्शक सूचना जाहीर1
- भारत उद्योग समूहाच्या वतीने गोकुळ प्रकाश गवारे यांचा सन्मान मुंडवाडी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा. कन्नड : सामाजिक,माऊली साउंड सेवा मंडप च्या माध्यमातून धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे गोकुळ प्रकाश गवारे यांचा भारत उद्योग समूहाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. . यावेळी भारत उद्योग समूहाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी यांच्या हस्ते गोकुळ प्रकाश गवारे सन्मानित माऊली साउंड व सेवेच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. समाजहितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केल्याने इतरांनाही प्रेरणा मिळते, असे यावेळी सांगण्यात आले. सन्मान स्वीकारताना गोकुळ प्रकाश गवारे यांनी भारत उद्योग समूहाचे आभार मानले. भविष्यातही सामाजिक व विकासात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातुन प्रथम असल्याचा बहूमान मिळाला असल्यामुळे गावाचा गौरव झाला आहे अशा भावना गोकुळ गवारे यांनी व्यक्त केल्या. यावेळी भारत उद्योग समूहाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते. मुंडवाडी ग्रामस्थांनी अभिनंदन करून कौतुकाचा वर्षाव करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.1
- जब तक रेल दौडेगी नहीं, तब तक लडाई रुकेगी नहीं! नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे सरळमार्गे व्हावी, हा आपला हक्क आहे. या हक्कासाठी मैदानात उतरून लढणाऱ्या, आजच्या चक्काजाम आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येकाचं मी मनापासून आभार मानतो. काल रात्री स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी माझ्याशी संपर्क साधला, आताही सिन्नर येथे आंदोलनस्थळी असताना मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी फोन केला असता आपण 3 प्रमुख मागण्या लावून धरल्या :- 📌 ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या तज्ज्ञ समितीला कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ न देता 60 दिवसांत अंतिम अहवाल आला पाहिजे. 📌 समितीने फक्त तांत्रिक मुद्दे न तपासता, फक्त नफा तोट्याचे गणित न मांडता जनभावनेचा विचार केला पाहिजे. 📌 समितीने तालुक्या-तालुक्यात आणि गावागावात येऊन, जनसुनवाई / ग्रामसभा घेऊन जनभावना समजून घेतली पाहिजे. या तीनही मागण्या आम्हाला प्रशासनाकडून लेखी हव्यात, अशी ठाम भूमिका आपण यावेळी घेतली आहे. यावर मुख्यमंत्री महोदय आणि मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हे आंदोलन कोणाच्या विरोधात नाही तर जनभावना सरकारपर्यंत पोहोचावी, यासाठी आहे. पण, "जब तक रेल दौडेगी नहीं, तब तक लडाई रुकेगी नहीं!" हा आमचा सरकारला स्पष्ट इशारा आहे1
- रोहिलागड दुमदुमले बैलगाडा शर्यतीच्या थराराने; अक्षय पाटील आणि अखिल पठाण यांच्या गाड्यांची बाजी!1
- छत्रपती संभाजीनगर विमानतळ नोकरी परीक्षा रद्द? फी भरूनही परीक्षा नाही; विद्यार्थ्यांचा संताप1