रेल्वे हॉस्पिटल परिसरात उदमांजराची पिल्ले आढळली सर्पमित्र व अनुसया कमल फाउंडेशनच्या तत्परतेने पिल्लांना जीवदान; वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली पुनर्वसन मनमाड : प्रतिनिधी मनमाड येथील रेल्वे हॉस्पिटल परिसरात उदमांजराची लहान पिल्ले आढळून आल्याने परिसरात कुतूहल निर्माण झाले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे पिल्लांना वेळेत सुरक्षित ताब्यात घेऊन त्यांची काळजी घेण्यात आली. रेल्वे हॉस्पिटलच्या शेजारी काही पिल्ले आढळून आल्यानंतर नागरिकांनी तत्काळ सर्पमित्र विजू भाऊ उगले यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच उगले यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी पिल्लांजवळ त्यांची आई आढळून आली नाही. पिल्ले उपाशी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर अनुसया कमल फाउंडेशनच्या च्या सहकार्याने पिल्लांना आवश्यक खाद्य देण्यात आले. सध्या त्यांना सुरक्षित ठिकाणी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून, त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, घटनेची माहिती वन विभागाचे वनपाल सय्यद यांना देण्यात आली आहे. पिल्लांची आवश्यक काळजी घेतल्यानंतर वन विभागाशी समन्वय साधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. उदमांजर हा सिवेट कुळातील वन्यजीव असून, त्याला अनेकदा मांजर समजण्याचा गैरसमज होतो. अशा प्रकारची वन्यजीवांची पिल्ले आढळल्यास नागरिकांनी त्यांना स्वतःहून घरी नेऊ नये अथवा त्यांना हाताळण्याचा प्रयत्न करू नये. तातडीने वन विभाग किंवा अधिकृत प्राणी बचाव पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या बचावकार्यात सर्पमित्र विजू भाऊ उगले, अनुसया कमल फाउंडेशनची आणि वन विभाग यांच्या समन्वयामुळे पिल्लांना सुरक्षितता मिळाली.
रेल्वे हॉस्पिटल परिसरात उदमांजराची पिल्ले आढळली सर्पमित्र व अनुसया कमल फाउंडेशनच्या तत्परतेने पिल्लांना जीवदान; वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली पुनर्वसन मनमाड : प्रतिनिधी मनमाड येथील रेल्वे हॉस्पिटल परिसरात उदमांजराची लहान पिल्ले आढळून आल्याने परिसरात कुतूहल निर्माण झाले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे पिल्लांना वेळेत सुरक्षित ताब्यात घेऊन त्यांची काळजी घेण्यात आली. रेल्वे हॉस्पिटलच्या शेजारी काही पिल्ले आढळून आल्यानंतर नागरिकांनी तत्काळ सर्पमित्र विजू भाऊ उगले यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच उगले यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी पिल्लांजवळ त्यांची आई आढळून आली नाही. पिल्ले उपाशी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर अनुसया कमल फाउंडेशनच्या च्या सहकार्याने पिल्लांना आवश्यक खाद्य देण्यात आले. सध्या त्यांना सुरक्षित ठिकाणी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून, त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, घटनेची माहिती वन विभागाचे वनपाल सय्यद यांना देण्यात आली आहे. पिल्लांची आवश्यक काळजी घेतल्यानंतर वन विभागाशी समन्वय साधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. उदमांजर हा सिवेट कुळातील वन्यजीव असून, त्याला अनेकदा मांजर समजण्याचा गैरसमज होतो. अशा प्रकारची वन्यजीवांची पिल्ले आढळल्यास नागरिकांनी त्यांना स्वतःहून घरी नेऊ नये अथवा त्यांना हाताळण्याचा प्रयत्न करू नये. तातडीने वन विभाग किंवा अधिकृत प्राणी बचाव पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या बचावकार्यात सर्पमित्र विजू भाऊ उगले, अनुसया कमल फाउंडेशनची आणि वन विभाग यांच्या समन्वयामुळे पिल्लांना सुरक्षितता मिळाली.
- Marathi serial bhai tujhe Aashirwad 100 episode complete bhai tujhe Aashirwad ka 100 episode complete happy journey nice show1
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त नाशिक शहरात भव्य मिरवणूक आयोजन जागतिक आदिवासी दिनानिमित्त नाशिकच्या पंचवटी परिसरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक वेशभूषा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि उत्साहपूर्ण वातावरणात काढण्यात आलेल्या या मिरवणुकीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि इतिहासाची ओळख या माध्यमातून करून देण्यात आली. मिरवणुकीत भगवान वीर एकलव्य, क्रांतिवीर बिरसा मुंडा तसेच आदिवासी समाजासाठी प्रेरणादायी ठरलेल्या विविध महापुरुषांचे चित्ररथ सहभागी करण्यात आले होते. महापुरुषांच्या जीवनकार्याचा आणि संघर्षाचा संदेश देणाऱ्या या चित्ररथांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीदरम्यान आदिवासी समाजाच्या पारंपरिक कला, संस्कृती आणि वारशाचे दर्शन घडले. भगवान वीर एकलव्य यांची निष्ठा, समर्पण आणि ध्येयाप्रती असलेली बांधिलकी तसेच क्रांतिवीर बिरसा मुंडा यांनी अन्यायाविरोधात उभारलेला संघर्ष आजही समाजाला प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. या भव्य मिरवणुकीत स्थानिक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर, आदिवासी समाजबांधव, युवक, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीमुळे पंचवटी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. आदिवासी संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि महापुरुषांच्या विचारांचा प्रसार करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.1
- रेल्वे हॉस्पिटल परिसरात उदमांजराची पिल्ले आढळली सर्पमित्र व अनुसया कमल फाउंडेशनच्या तत्परतेने पिल्लांना जीवदान; वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली पुनर्वसन मनमाड : प्रतिनिधी मनमाड येथील रेल्वे हॉस्पिटल परिसरात उदमांजराची लहान पिल्ले आढळून आल्याने परिसरात कुतूहल निर्माण झाले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे पिल्लांना वेळेत सुरक्षित ताब्यात घेऊन त्यांची काळजी घेण्यात आली. रेल्वे हॉस्पिटलच्या शेजारी काही पिल्ले आढळून आल्यानंतर नागरिकांनी तत्काळ सर्पमित्र विजू भाऊ उगले यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच उगले यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी पिल्लांजवळ त्यांची आई आढळून आली नाही. पिल्ले उपाशी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर अनुसया कमल फाउंडेशनच्या च्या सहकार्याने पिल्लांना आवश्यक खाद्य देण्यात आले. सध्या त्यांना सुरक्षित ठिकाणी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून, त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, घटनेची माहिती वन विभागाचे वनपाल सय्यद यांना देण्यात आली आहे. पिल्लांची आवश्यक काळजी घेतल्यानंतर वन विभागाशी समन्वय साधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. उदमांजर हा सिवेट कुळातील वन्यजीव असून, त्याला अनेकदा मांजर समजण्याचा गैरसमज होतो. अशा प्रकारची वन्यजीवांची पिल्ले आढळल्यास नागरिकांनी त्यांना स्वतःहून घरी नेऊ नये अथवा त्यांना हाताळण्याचा प्रयत्न करू नये. तातडीने वन विभाग किंवा अधिकृत प्राणी बचाव पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या बचावकार्यात सर्पमित्र विजू भाऊ उगले, अनुसया कमल फाउंडेशनची आणि वन विभाग यांच्या समन्वयामुळे पिल्लांना सुरक्षितता मिळाली.1
- Post by Amol jadhav1
- सराड आश्रम शाळेच्या भिंतींना यापूर्वी ३.९ रिस्टर स्केलच्या धक्क्याने भेगा पडल्या सुरगाणा तालुक्यातील सराड आश्रम शाळेच्या भिंतींना यापूर्वी ३.९ रिस्टर स्केलच्या धक्क्याने भेगा पडल्या होत्या. आज ४.३ तिव्रतेचा झालेल्या भूकंपाचे हादरे बसल्यावर आश्रम शाळेतील विद्यार्थी भयभीत होऊन बाहेर मोकळ्या जागेत आले. सुरगाणा शहरासह तालुक्याच्या विविध भागात १०:०१ मिनिटांनी भूकंपाचा जोरदार धक्का बसला. हा धक्का १८ ते २० सेकंदाचा होता.आज पर्यंत बसलेल्या हादरे पेक्षा सर्वात मोठा भूकंपाचा धक्का जाणवला. घरातून लोकं बाहेर भयभीत होऊन बाहेर निघाले. घरात मांडणीवर असलेली भांडी खाली पडली.तर पावसाळ्यात घरावरील पत्र्यावर ठेवलेले दगड खाली अंगणात पडले. जोराचा आवाज आल्याने नागरिक घराबाहेर पळत सुटले.पिंपळसोंड, वांगण, दुधवळ, सुभाषनगर, जामूनपाडा, चापापाडा, मोठीघोडी, पालविहीर, अंबाडदहाड, कुकूडमुंडा, पळसन, प्रतापगड, खोबळा, माणी, गणेशनगर, खोकरी, मांजरपाडा, घागबारी, बोरगाव, रोटी, चिखली, राहुडे आदीसह तालुक्यातील सर्वच गावात हा धक्का बसला.नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे.अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे. एरव्ही ग्रामीण भागात दहा वाजेपर्यंत सामसूम असते मात्र भूकंपाचे धक्के बसल्याने चर्चेला उधाण आले होते.1
- आदिवासी दिनाचे औचित्य साधुन खामखेडा ता देवळा येथे एकलव्य मुर्ती स्थापना जागतीक आदिवासीदिनाच्या औचित्य साधून खामखेडा तालुका देवळा येथे भगवान एकलव्य यांची मूर्ती एक स्मारक म्हणून खामखेडा येथे स्थापन करण्यात आले त्यामुळे आदिवासी समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे1
- रविवार , दिनांक - ०९ ऑगस्ट २०२६ *जागतिक आदिवासी गौरव दिवस...* शासकीय आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतिगृह चांदवड येथे ' विश्व आदिवासी गौरव दिवस ' पारंपरिक पद्धतीने साजरा... चांदवड येथील शासकीय आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतिगृहात सालाबाद प्रमाणे ' विश्व आदिवासी गौरव दिवस ' पारंपरिक पद्धतीने व आदिवासी नृत्य सादर करत साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. याप्रसंगी गृहपाल श्री अमोल निकम व सौ. सुप्रिया परभणीकर यांनी प्रास्ताविक केले. विशेष कार्यकारी अधिकारी श्री सुनील डुंगरवाल हे अध्यक्षीय स्थानी होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री शांताराम हांडगे सर व श्री रमेश आहिरे सर , संजय पाडवी , संतोष सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. योगेश घोडे, कंचन इंगळे , पवन गांगुर्डे, ज्ञानेश्वरी चौरे, प्रेरणा चौरे, प्रगती जाधव, लिना घोडे, वैशाली पवार आदी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदविला. वसतिगृहाचे अधिक्षक श्री. अमोल निकम व सौ. सुप्रिया परभणीकर, श्री. जे. आर. उबाळे , स्मिता जाधव यांनी शिस्तबद्ध व कौतुकास्पद नियोजन केले. विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या भूषणावह वर्तनाने तसेच वसतिगृहातील स्वच्छता व सुंदरतेने मान्यवर प्रभावित झाले.7
- *नाशिक-पुणे सरळ रेल्वेसाठी समृद्धी महामार्गावर ठिय्या; आमदार सत्यजीत तांबे यांची ठाम भूमिका* *‘हक्काची रेल्वे मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार’* , दि. ९ ऑगस्ट २०२६ : नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी क्रांती दिनाचे औचित्य साधत रविवारी सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. आमदार सत्यजीत तांबे आणि खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. यावेळी आंदोलकांनी समृद्धी महामार्ग अडवत चक्काजाम जनआंदोलन केले. नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी सरळ मार्गाला प्राधान्य देऊन प्रकल्पाबाबत तातडीने ठोस निर्णय घ्यावा, या मागणीसाठी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. नाशिक-पुणे रेल्वे हा केवळ वाहतुकीचा प्रश्न नसून नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील नागरिकांच्या विकासाशी जोडलेला प्रश्न आहे, अशी भूमिका आमदार सत्यजीत तांबे यांनी मांडली. आंदोलकांनी समृद्धी महामार्ग रोखल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी आंदोलकांना महामार्गावरून बाजूला होण्याचे आवाहन केले. मात्र, रेल्वेच्या मागणीवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये काही काळ झटापटही झाली. आमदार सत्यजीत तांबे यांनी आंदोलनातून नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्गाचा मुद्दा थेट शासनाच्या केंद्रस्थानी आणला. “हा पक्षाचा विषय नाही, तर जनतेच्या हक्काचा विषय आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाबाबत आता केवळ चर्चा नको, तर ठोस निर्णय हवा,” अशी भूमिका त्यांनी घेतली. नाशिक, सिन्नर, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण, आळंदी आणि पुणे या भागांना जोडणाऱ्या सरळ रेल्वेमार्गामुळे उद्योग, व्यापार, शेती, शिक्षण आणि रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. *समृद्धी महामार्गावर झालेल्या या चक्काजाम आंदोलनामुळे नाशिक-पुणे सरळ रेल्वेचा प्रश्न पुन्हा एकदा आक्रमकपणे ऐरणीवर आला आहे.*5