*नाशिक-पुणे सरळ रेल्वेसाठी समृद्धी महामार्गावर ठिय्या; आमदार सत्यजीत तांबे यांची ठाम भूमिका* *‘हक्काची रेल्वे मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार’* , दि. ९ ऑगस्ट २०२६ : नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी क्रांती दिनाचे औचित्य साधत रविवारी सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. आमदार सत्यजीत तांबे आणि खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. यावेळी आंदोलकांनी समृद्धी महामार्ग अडवत चक्काजाम जनआंदोलन केले. नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी सरळ मार्गाला प्राधान्य देऊन प्रकल्पाबाबत तातडीने ठोस निर्णय घ्यावा, या मागणीसाठी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. नाशिक-पुणे रेल्वे हा केवळ वाहतुकीचा प्रश्न नसून नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील नागरिकांच्या विकासाशी जोडलेला प्रश्न आहे, अशी भूमिका आमदार सत्यजीत तांबे यांनी मांडली. आंदोलकांनी समृद्धी महामार्ग रोखल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी आंदोलकांना महामार्गावरून बाजूला होण्याचे आवाहन केले. मात्र, रेल्वेच्या मागणीवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये काही काळ झटापटही झाली. आमदार सत्यजीत तांबे यांनी आंदोलनातून नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्गाचा मुद्दा थेट शासनाच्या केंद्रस्थानी आणला. “हा पक्षाचा विषय नाही, तर जनतेच्या हक्काचा विषय आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाबाबत आता केवळ चर्चा नको, तर ठोस निर्णय हवा,” अशी भूमिका त्यांनी घेतली. नाशिक, सिन्नर, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण, आळंदी आणि पुणे या भागांना जोडणाऱ्या सरळ रेल्वेमार्गामुळे उद्योग, व्यापार, शेती, शिक्षण आणि रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. *समृद्धी महामार्गावर झालेल्या या चक्काजाम आंदोलनामुळे नाशिक-पुणे सरळ रेल्वेचा प्रश्न पुन्हा एकदा आक्रमकपणे ऐरणीवर आला आहे.*
*नाशिक-पुणे सरळ रेल्वेसाठी समृद्धी महामार्गावर ठिय्या; आमदार सत्यजीत तांबे यांची ठाम भूमिका* *‘हक्काची रेल्वे मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार’* , दि. ९ ऑगस्ट २०२६ : नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी क्रांती दिनाचे औचित्य साधत रविवारी सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. आमदार सत्यजीत तांबे आणि खासदार
राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. यावेळी आंदोलकांनी समृद्धी महामार्ग अडवत चक्काजाम जनआंदोलन केले. नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी सरळ मार्गाला प्राधान्य देऊन प्रकल्पाबाबत तातडीने ठोस निर्णय घ्यावा, या मागणीसाठी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. नाशिक-पुणे रेल्वे हा केवळ वाहतुकीचा प्रश्न नसून
नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील नागरिकांच्या विकासाशी जोडलेला प्रश्न आहे, अशी भूमिका आमदार सत्यजीत तांबे यांनी मांडली. आंदोलकांनी समृद्धी महामार्ग रोखल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी आंदोलकांना महामार्गावरून बाजूला होण्याचे आवाहन केले. मात्र, रेल्वेच्या मागणीवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली. यावेळी
पोलिस आणि आंदोलकांमध्ये काही काळ झटापटही झाली. आमदार सत्यजीत तांबे यांनी आंदोलनातून नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्गाचा मुद्दा थेट शासनाच्या केंद्रस्थानी आणला. “हा पक्षाचा विषय नाही, तर जनतेच्या हक्काचा विषय आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाबाबत आता केवळ चर्चा नको, तर ठोस निर्णय हवा,” अशी भूमिका त्यांनी
घेतली. नाशिक, सिन्नर, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण, आळंदी आणि पुणे या भागांना जोडणाऱ्या सरळ रेल्वेमार्गामुळे उद्योग, व्यापार, शेती, शिक्षण आणि रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. *समृद्धी महामार्गावर झालेल्या या चक्काजाम आंदोलनामुळे नाशिक-पुणे सरळ रेल्वेचा प्रश्न पुन्हा एकदा आक्रमकपणे ऐरणीवर आला आहे.*
- रविवार , दिनांक - ०९ ऑगस्ट २०२६ *जागतिक आदिवासी गौरव दिवस...* शासकीय आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतिगृह चांदवड येथे ' विश्व आदिवासी गौरव दिवस ' पारंपरिक पद्धतीने साजरा... चांदवड येथील शासकीय आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतिगृहात सालाबाद प्रमाणे ' विश्व आदिवासी गौरव दिवस ' पारंपरिक पद्धतीने व आदिवासी नृत्य सादर करत साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. याप्रसंगी गृहपाल श्री अमोल निकम व सौ. सुप्रिया परभणीकर यांनी प्रास्ताविक केले. विशेष कार्यकारी अधिकारी श्री सुनील डुंगरवाल हे अध्यक्षीय स्थानी होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री शांताराम हांडगे सर व श्री रमेश आहिरे सर , संजय पाडवी , संतोष सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. योगेश घोडे, कंचन इंगळे , पवन गांगुर्डे, ज्ञानेश्वरी चौरे, प्रेरणा चौरे, प्रगती जाधव, लिना घोडे, वैशाली पवार आदी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदविला. वसतिगृहाचे अधिक्षक श्री. अमोल निकम व सौ. सुप्रिया परभणीकर, श्री. जे. आर. उबाळे , स्मिता जाधव यांनी शिस्तबद्ध व कौतुकास्पद नियोजन केले. विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या भूषणावह वर्तनाने तसेच वसतिगृहातील स्वच्छता व सुंदरतेने मान्यवर प्रभावित झाले.7
- आदिवासी दिनाचे औचित्य साधुन खामखेडा ता देवळा येथे एकलव्य मुर्ती स्थापना जागतीक आदिवासीदिनाच्या औचित्य साधून खामखेडा तालुका देवळा येथे भगवान एकलव्य यांची मूर्ती एक स्मारक म्हणून खामखेडा येथे स्थापन करण्यात आले त्यामुळे आदिवासी समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे1
- Post by Amol jadhav1
- हक्काच्या पैशांसाठी येवल्यात ठेवीदार रस्त्यावर; पारख पतसंस्थेच्या कारभाराविरोधात तीव्र संताप हक्काच्या पैशांसाठी येवल्यात ठेवीदार रस्त्यावर; पारख पतसंस्थेच्या कारभाराविरोधात तीव्र संताप येवला: येवल्यातील कै. सुभाषचंद्रजी पारख नागरी सहकारी पतसंस्थेच्या मनमानी आणि भोंगळ कारभाराविरोधात संतप्त ठेवीदारांनी अखेर रस्त्यावर उतरून एल्गार पुकारला आहे. शहर व तालुक्यातील शेकडो नागरिकांनी आपल्या कष्टाची पुंजी या पतसंस्थेत विविध मुदतींच्या ठेवींच्या रूपात गुंतवली होती. मात्र, मुदत संपूनही ठेवीदारांना त्यांची हक्काची रक्कम परत मिळत नसल्याने अनेक कुटुंबे गंभीर आर्थिक संकटात सापडली आहेत. एकीकडे हक्काच्या पैशांसाठी सर्वसामान्य ठेवीदार वणवण भटकत असताना, दुसरीकडे पतसंस्थेचे संचालक पिंटू पारख यांच्या वाढदिवसानिमित्त लाखो रुपयांची उधळण करत जंगी सोहळा साजरा करण्यात आला. या प्रकारामुळे ठेवीदारांच्या जखमेवर मीठ चोळले गेले असून, "सर्वसामान्यांचे कष्टाचे पैसे लाटून कसले कसले सत्कार सोहळे साजरे करता?" असा सवाल ठेवीदारांनी उपस्थित केला आहे. या फसवणुकीविरोधात निलेश वखारे, बाळू सुराशे, बबन पाबळे, संतोष कोतवाल आणि सोना कोतवाल यांच्यासह शेकडो ठेवीदारांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली. पतसंस्थेच्या या मनमानी कारभाराची चौकशी करून ठेवीदारांचे पैसे त्वरित परत मिळवून द्यावेत, अशी मागणी जोर धरत आहे. आता या गंभीर प्रकरणी सहकार विभाग आणि पोलीस प्रशासन काय कडक पावले उचलणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- दरसवाडी डोंगरगाव कालव्यात पाणी दाखल; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण, दरसवाडी डोंगरगाव कालव्याला अखेर पाणी सोडण्यात आले असून, यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये कमालीचा आनंद पाहायला मिळत आहे. या पाण्यामुळे पिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याने शेतकरी सुखावले आहेत. येवला तालुक्याचे भाग्यविधाते आणि माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या हस्ते दरसवाडी डोंगरगाव कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. भुजबळ साहेबांच्या प्रयत्नांमुळे कालव्यात पाणी दाखल होताच परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण तयार झाले आहे.1
- सराड आश्रम शाळेच्या भिंतींना यापूर्वी ३.९ रिस्टर स्केलच्या धक्क्याने भेगा पडल्या सुरगाणा तालुक्यातील सराड आश्रम शाळेच्या भिंतींना यापूर्वी ३.९ रिस्टर स्केलच्या धक्क्याने भेगा पडल्या होत्या. आज ४.३ तिव्रतेचा झालेल्या भूकंपाचे हादरे बसल्यावर आश्रम शाळेतील विद्यार्थी भयभीत होऊन बाहेर मोकळ्या जागेत आले. सुरगाणा शहरासह तालुक्याच्या विविध भागात १०:०१ मिनिटांनी भूकंपाचा जोरदार धक्का बसला. हा धक्का १८ ते २० सेकंदाचा होता.आज पर्यंत बसलेल्या हादरे पेक्षा सर्वात मोठा भूकंपाचा धक्का जाणवला. घरातून लोकं बाहेर भयभीत होऊन बाहेर निघाले. घरात मांडणीवर असलेली भांडी खाली पडली.तर पावसाळ्यात घरावरील पत्र्यावर ठेवलेले दगड खाली अंगणात पडले. जोराचा आवाज आल्याने नागरिक घराबाहेर पळत सुटले.पिंपळसोंड, वांगण, दुधवळ, सुभाषनगर, जामूनपाडा, चापापाडा, मोठीघोडी, पालविहीर, अंबाडदहाड, कुकूडमुंडा, पळसन, प्रतापगड, खोबळा, माणी, गणेशनगर, खोकरी, मांजरपाडा, घागबारी, बोरगाव, रोटी, चिखली, राहुडे आदीसह तालुक्यातील सर्वच गावात हा धक्का बसला.नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे.अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे. एरव्ही ग्रामीण भागात दहा वाजेपर्यंत सामसूम असते मात्र भूकंपाचे धक्के बसल्याने चर्चेला उधाण आले होते.1
- Marathi serial bhai tujhe Aashirwad 100 episode complete bhai tujhe Aashirwad ka 100 episode complete happy journey nice show1
- *नाशिक-पुणे सरळ रेल्वेसाठी समृद्धी महामार्गावर ठिय्या; आमदार सत्यजीत तांबे यांची ठाम भूमिका* *‘हक्काची रेल्वे मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार’* , दि. ९ ऑगस्ट २०२६ : नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी क्रांती दिनाचे औचित्य साधत रविवारी सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. आमदार सत्यजीत तांबे आणि खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. यावेळी आंदोलकांनी समृद्धी महामार्ग अडवत चक्काजाम जनआंदोलन केले. नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी सरळ मार्गाला प्राधान्य देऊन प्रकल्पाबाबत तातडीने ठोस निर्णय घ्यावा, या मागणीसाठी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. नाशिक-पुणे रेल्वे हा केवळ वाहतुकीचा प्रश्न नसून नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील नागरिकांच्या विकासाशी जोडलेला प्रश्न आहे, अशी भूमिका आमदार सत्यजीत तांबे यांनी मांडली. आंदोलकांनी समृद्धी महामार्ग रोखल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी आंदोलकांना महामार्गावरून बाजूला होण्याचे आवाहन केले. मात्र, रेल्वेच्या मागणीवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये काही काळ झटापटही झाली. आमदार सत्यजीत तांबे यांनी आंदोलनातून नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्गाचा मुद्दा थेट शासनाच्या केंद्रस्थानी आणला. “हा पक्षाचा विषय नाही, तर जनतेच्या हक्काचा विषय आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाबाबत आता केवळ चर्चा नको, तर ठोस निर्णय हवा,” अशी भूमिका त्यांनी घेतली. नाशिक, सिन्नर, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण, आळंदी आणि पुणे या भागांना जोडणाऱ्या सरळ रेल्वेमार्गामुळे उद्योग, व्यापार, शेती, शिक्षण आणि रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. *समृद्धी महामार्गावर झालेल्या या चक्काजाम आंदोलनामुळे नाशिक-पुणे सरळ रेल्वेचा प्रश्न पुन्हा एकदा आक्रमकपणे ऐरणीवर आला आहे.*5