logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*ड्रोन, व्हिडिओ कॅमेरे व झूम वेबकास्टद्वारे* *भौतिकशास्त्राच्या पेपरवर जिल्याव तील सर्व परीक्षा केंद्रावर कडेकोट नजर* - जिल्हाधिकारी राहूल कर्डिले नांदेड - इयत्ता 12 वीच्या सकाळ सत्रातील भौतिकशास्त्र विषयाचा पेपर आज जिल्ह्यात सुरळीत पार पडला. या दिवशी जिल्ह्यातील एकूण 109 परीक्षा केंद्रांवर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्टद्वारे पूर्णवेळ परीक्षेचे नियंत्रण ठेवण्यात आले होते. ड्रोन व व्हिडिओ कॅमेऱ्यांच्या सहाय्यानेही केंद्रांवर बारकाईने नजर ठेवण्यात आली, अशी माहिती जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी दिली. पोलीस यंत्रणेने ठेवलेल्या चोख बंदोबस्तामुळे कोणत्याही परीक्षा केंद्राबाहेर अनधिकृत जमाव आढळून आला नाही. जिल्ह्यात शिक्षण विभागाची सहा पथके परीक्षेवर लक्ष ठेवून होती. शिक्षणाधिकारी (योजना) दिलीपकुमार बनसोडे यांच्या पथकाने नरसिंह उच्च माध्यमिक विद्यालय, मुखेड तालुक्यातील उमरदरी येथे भेट दिली असता दोन परीक्षार्थी गैरप्रकार करताना आढळून आले. त्यांच्यावर मंडळ नियमावलीप्रमाणे कॉपी प्रकरण नोंदविण्यात आले. उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) रामचंद्र पाचंगे यांनी कंधार तालुक्यातील श्री बालाजी उच्च माध्यमिक विद्यालय, बोरी खुर्द येथे भेट दिली असता एक परीक्षार्थी गैरप्रकार करताना आढळला. तसेच उपशिक्षणाधिकारी (योजना) माधव शिंगडे यांनी माहूर तालुक्यातील श्री शंकरराव चव्हाण उच्च माध्यमिक विद्यालय, आष्टा येथे भेट दिली असता तीन परीक्षार्थी गैरप्रकार करताना आढळले. तहसीलदार मुखेड राजेश जाधव यांनी महात्मा फुले महाविद्यालय, मुखेड येथील परीक्षा केंद्रावर एका परीक्षार्थ्याविरुद्ध गैरप्रकाराची कारवाई केली. आजच्या भौतिकशास्त्राच्या पेपरसाठी नोंदणीकृत 24 हजार 527 परीक्षार्थ्यांपैकी 24 हजार 206 परीक्षार्थी उपस्थित होते. उपस्थितीची टक्केवारी 98.69 इतकी होती. झूम वेबकास्ट, ड्रोन व व्हिडिओ चित्रीकरणाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे सात परीक्षार्थी गैरप्रकार करताना आढळून आले. संबंधित परीक्षार्थ्यां विरुध्द मंडळाच्या नियमांनुसार कारवाई करण्यात आली असून संबंधित केंद्रसंचालक व बैठे पथकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची नक्कल न करता आत्मविश्वासाने व आनंददायी वातावरणात परीक्षा द्यावी, तसेच नागरिकांनी परीक्षा केंद्र परिसरात गर्दी करू नये. केंद्र परिसरात भारतीय न्याय संहितेचे कलम 163 लागू असल्याने त्याचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी केले आहे.

1 day ago
user_Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwad
Nanded, Maharashtra•
1 day ago
66987aa2-374b-4515-97e3-0354b26d1509

*ड्रोन, व्हिडिओ कॅमेरे व झूम वेबकास्टद्वारे* *भौतिकशास्त्राच्या पेपरवर जिल्याव तील सर्व परीक्षा केंद्रावर कडेकोट नजर* - जिल्हाधिकारी राहूल कर्डिले नांदेड - इयत्ता 12 वीच्या सकाळ सत्रातील भौतिकशास्त्र विषयाचा पेपर आज जिल्ह्यात सुरळीत पार पडला. या दिवशी जिल्ह्यातील एकूण 109 परीक्षा केंद्रांवर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्टद्वारे पूर्णवेळ परीक्षेचे नियंत्रण ठेवण्यात आले होते. ड्रोन व व्हिडिओ कॅमेऱ्यांच्या सहाय्यानेही केंद्रांवर बारकाईने नजर ठेवण्यात आली, अशी माहिती जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी दिली. पोलीस यंत्रणेने ठेवलेल्या चोख बंदोबस्तामुळे कोणत्याही परीक्षा केंद्राबाहेर अनधिकृत जमाव आढळून आला नाही. जिल्ह्यात शिक्षण विभागाची सहा पथके परीक्षेवर लक्ष ठेवून होती. शिक्षणाधिकारी (योजना) दिलीपकुमार बनसोडे यांच्या पथकाने नरसिंह उच्च माध्यमिक विद्यालय, मुखेड तालुक्यातील उमरदरी येथे भेट दिली असता दोन परीक्षार्थी गैरप्रकार करताना आढळून आले. त्यांच्यावर मंडळ नियमावलीप्रमाणे कॉपी प्रकरण नोंदविण्यात आले. उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) रामचंद्र पाचंगे यांनी कंधार तालुक्यातील श्री बालाजी उच्च माध्यमिक विद्यालय, बोरी खुर्द येथे भेट दिली असता एक परीक्षार्थी गैरप्रकार करताना आढळला. तसेच उपशिक्षणाधिकारी (योजना) माधव शिंगडे यांनी माहूर तालुक्यातील श्री शंकरराव चव्हाण उच्च माध्यमिक विद्यालय, आष्टा येथे भेट दिली असता तीन परीक्षार्थी गैरप्रकार करताना आढळले. तहसीलदार मुखेड राजेश जाधव यांनी महात्मा फुले महाविद्यालय, मुखेड येथील परीक्षा केंद्रावर एका परीक्षार्थ्याविरुद्ध गैरप्रकाराची कारवाई केली. आजच्या भौतिकशास्त्राच्या पेपरसाठी नोंदणीकृत 24 हजार 527 परीक्षार्थ्यांपैकी 24 हजार 206 परीक्षार्थी उपस्थित होते. उपस्थितीची टक्केवारी 98.69 इतकी होती. झूम वेबकास्ट, ड्रोन व व्हिडिओ चित्रीकरणाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे सात परीक्षार्थी गैरप्रकार करताना आढळून आले. संबंधित परीक्षार्थ्यां विरुध्द मंडळाच्या नियमांनुसार कारवाई करण्यात आली असून संबंधित केंद्रसंचालक व बैठे पथकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची नक्कल न करता आत्मविश्वासाने व आनंददायी वातावरणात परीक्षा द्यावी, तसेच नागरिकांनी परीक्षा केंद्र परिसरात गर्दी करू नये. केंद्र परिसरात भारतीय न्याय संहितेचे कलम 163 लागू असल्याने त्याचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी केले आहे.

More news from Maharashtra and nearby areas
  • शिवपुतळ्यासाठी आमरण उपोषण सुरू 🚨 हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी तातडीने जागा निश्चित करावी या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाकडून तोंडी आश्वासन देण्यात आले असले तरी लेखी आदेश मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. दि. 10 ऑगस्ट 2023 पासून मागणी प्रलंबित असूनही ठोस निर्णय न झाल्याने शिवप्रेमी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिवरायांच्या जयंतीपूर्वी पेटलेला हा प्रश्न प्रशासन कसा सोडवते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. ✊ शिवरायांच्या सन्मानासाठी लढा सुरूच! #हिमायतनगर #शिवपुतळा #छत्रपतीशिवाजीमहाराज #स्वाभिमानीसंभाजीब्रिगेड #आमरणउपोषण #शिवप्रेमी #महाराष्ट्र #लोकशाही #नगरपंचायत #BreakingNews
    1
    शिवपुतळ्यासाठी आमरण उपोषण सुरू 🚨
हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी तातडीने जागा निश्चित करावी या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
प्रशासनाकडून तोंडी आश्वासन देण्यात आले असले तरी लेखी आदेश मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
दि. 10 ऑगस्ट 2023 पासून मागणी प्रलंबित असूनही ठोस निर्णय न झाल्याने शिवप्रेमी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शिवरायांच्या जयंतीपूर्वी पेटलेला हा प्रश्न प्रशासन कसा सोडवते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
✊ शिवरायांच्या सन्मानासाठी लढा सुरूच!
#हिमायतनगर
#शिवपुतळा
#छत्रपतीशिवाजीमहाराज
#स्वाभिमानीसंभाजीब्रिगेड
#आमरणउपोषण
#शिवप्रेमी
#महाराष्ट्र
#लोकशाही
#नगरपंचायत
#BreakingNews
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Local News Reporter Nanded, Maharashtra•
    16 min ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    8 hrs ago
  • Post by Mohammad Rafikh
    1
    Post by Mohammad Rafikh
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer Nanded, Maharashtra•
    19 hrs ago
  • गोदावरी नदी पात्रामध्ये कचरा तथा नाले व गटारीचे दूषित पाणी साचल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंध पसरत असून गोदावरी नदीपात्रातील जलजीव धोक्यात येत असून सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य सुद्धा थोडक्यात येत असल्याचे निष्पन्न झालेले आहे. गोदावरी नदी शुद्धीकरणा साठी करोडो निधी रुपये येऊन सुद्धा कुठल्याही प्रकारे योग्य ती उपाययोजना स्थानिक प्रशासनाच्या वतीने होत नसताना दिसत असल्याचे सुद्धा नागरिकांच्या भावनातून व्यक्त होत आहे. शिक बांधवांचे हिंदू बांधवांचे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. या ठिकाणी अनेक भाविक भक्त गुरुद्वारा इतर देवस्थानास दर्शनासाठी अनेक राज्यातून या ठिकाणी येतात . त्याच ठिकाणी अशा प्रकारे घाणीचे साम्राज्य बघून. आश्चर्यचकित होत आहेत. एवढा मोठा पवित्र स्थान आणि ऐतिहासिक स्थान असून सुद्धा कुठल्याही प्रकारे योग्य त्या सोयी सुविधा स्थानिक प्रशासनाच्या वतीने दिसत नसल्याचेही निदर्शनास आले आहे. सध्या परिस्थितीत गोदावरी नदी पात्रात अनेक सर्व जसे की अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी आंघोळ करण्याचे महत्त्व असून सुद्धा अंघोळ करणे कठीण झाले आहे. तरीसुद्धा कुठलीही हालचाल स्थानिक प्रशासनाच्या वतीने होत असताना दिसत नाही. याकरिता आज रोजी जिल्हाधिकारी यांना सामाजिक कार्यकर्ते तेजपाल सिंघ खेड व त्यांच्या सहकार्याच्या वतीने. तक्रार देखील करण्यात आली आहे. लवकरात लवकर प्रदूषित होत असलेली गोदावरी नदी त्वरित गांभीर्याने दखल घेऊन स्वच्छ करण्याच्या मार्गे शासनाने लागावे अशी मागणी केली आहे.
    4
    गोदावरी नदी पात्रामध्ये कचरा तथा नाले व गटारीचे दूषित पाणी साचल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंध पसरत असून गोदावरी नदीपात्रातील जलजीव धोक्यात येत असून सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य सुद्धा थोडक्यात येत असल्याचे निष्पन्न झालेले आहे. 
गोदावरी नदी शुद्धीकरणा साठी करोडो निधी रुपये येऊन सुद्धा कुठल्याही प्रकारे योग्य ती उपाययोजना स्थानिक प्रशासनाच्या वतीने होत नसताना दिसत असल्याचे सुद्धा नागरिकांच्या भावनातून व्यक्त होत आहे. शिक बांधवांचे हिंदू बांधवांचे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. या ठिकाणी अनेक भाविक भक्त गुरुद्वारा इतर देवस्थानास दर्शनासाठी अनेक राज्यातून या ठिकाणी येतात . त्याच ठिकाणी अशा प्रकारे घाणीचे साम्राज्य बघून. आश्चर्यचकित होत आहेत. एवढा मोठा पवित्र स्थान आणि ऐतिहासिक स्थान असून सुद्धा कुठल्याही प्रकारे योग्य त्या सोयी सुविधा स्थानिक प्रशासनाच्या वतीने दिसत नसल्याचेही निदर्शनास आले आहे. सध्या परिस्थितीत गोदावरी नदी पात्रात  अनेक सर्व जसे की अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी आंघोळ करण्याचे महत्त्व असून सुद्धा अंघोळ करणे कठीण झाले आहे. 
तरीसुद्धा कुठलीही हालचाल स्थानिक प्रशासनाच्या वतीने होत असताना दिसत नाही. 
याकरिता आज रोजी जिल्हाधिकारी यांना सामाजिक कार्यकर्ते तेजपाल सिंघ खेड व त्यांच्या सहकार्याच्या वतीने. 
तक्रार देखील करण्यात आली आहे. 
लवकरात लवकर प्रदूषित होत असलेली गोदावरी नदी  त्वरित गांभीर्याने दखल घेऊन स्वच्छ करण्याच्या मार्गे शासनाने लागावे अशी मागणी केली आहे.
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    21 hrs ago
  • वसंत स्मृती येथील बैठकीत कडक इशारा..! नायगाव पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी केवळ पद मिळवणे पुरेसे नाही तर गावपातळीवर जाऊन गोरगरीब जनतेची कामे करणे आवश्यक आहे पद घेऊन घरी बसणाऱ्या पदाधिकाऱ्यांची आता गय केली जाणार नाही कामात कसूर करणाऱ्यांना तातडीने पदावरून कमी करून सक्रिय कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल असा स्पष्ट इशारा खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिला नायगाव येथील वसंत स्मृती मेमोरियल मध्ये आयोजित नांदेड दक्षिण काँग्रेस'च्या विस्तारित बैठकीत ते बोलत होते
    1
    वसंत स्मृती येथील बैठकीत कडक इशारा..!
नायगाव पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी केवळ पद मिळवणे पुरेसे नाही तर गावपातळीवर जाऊन गोरगरीब जनतेची कामे करणे आवश्यक आहे
पद घेऊन घरी बसणाऱ्या पदाधिकाऱ्यांची आता गय केली जाणार नाही कामात कसूर करणाऱ्यांना तातडीने पदावरून कमी करून सक्रिय कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल
असा स्पष्ट इशारा खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिला
नायगाव येथील वसंत स्मृती मेमोरियल मध्ये आयोजित नांदेड दक्षिण काँग्रेस'च्या विस्तारित बैठकीत ते बोलत होते
    user_Shuddhodhan Dhawale
    Shuddhodhan Dhawale
    Voice of people नायगाव (खैरगाव), नांदेड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • मुस्लिम महापौर केला तर विरोधकांचं पोट दुखतं, तुम्ही केलं तर ठीक आम्ही केलं तर बाईट - आमदार डॉ राहुल पाटील
    2
    मुस्लिम महापौर केला तर विरोधकांचं पोट दुखतं, तुम्ही केलं तर ठीक आम्ही केलं तर बाईट - आमदार डॉ राहुल पाटील
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    सेलू, परभणी, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • एकादशी निमित्त सांगवी येथील श्री खाटू श्याम बाबा मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघण्यास मिळाली तसेच प्रत्येक एकादशीला विशेष पूजा अर्चना भजन कीर्तन होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्या यासाठी श्री श्याम बाबा यांच्या चरणी साकडे घालतात. पौराणिक कथेमध्ये सांगितले आहे की भगवान श्रीकृष्ण यांनी त्यांच्या सर्व कला शक्ती गुण श्री खाटू श्याम बाबा यांना आशीर्वादरूपी दिले. आणि असे वरदान दिले की कलियुगामध्ये प्रत्येक घरामध्ये पुंजले जाशील तू हरलेल्यांचा सहारा बनशील म्हणजेच हारे का सहारा बाबा श्याम हमार जो भक्त या जगापासून हरला आहे तो तुझ्या चौकटीवर येईल त्याला तू तारणार व त्याच्या मनोकामना पूर्ण करून त्याच्या पाठी उभा राहणारा असा देखील वरदान भगवान श्रीकृष्णाने या खाटू श्याम बाबा यांना दिला आहे. याची महिमा अद्भुत असून श्रीकृष्णाने विशेष असं वरदान देखील या खाटू श्याम बाबाला दिला आहे. की ज्याच्या जीवनात कष्ट ,दुःख , दारिद्र्य, रोग , लिहिलेला आहे. ते कोणी टाळू शकत नाही परंतु ते देखील तू तुझ्या चौकटीवर आलेल्या भक्तांच सर्व संकट दुःख दारिद्र्य कष्ट दूर करण्याच विशेष अधिकार देखील या श्याम बाबांना दिलेला आहे. या कलियुगामध्ये मोठ्या प्रमाणात श्री खाटू श्याम बाबा यांचे भक्त यांना अनेक वेळा विविध अशा मनोकामनामध्ये चमत्कारीरुपी अनुभव आलेला आहे. म्हणून आज लाखो करोडो भक्त या श्याम बाबाच्या दर्शनासाठी राजस्थान येथे मोठ्या संख्येने जाऊन दर्शन घेतात त्याचेच प्रतिरुपी म्हणून नांदेड सांगवी एअरपोर्ट रोड या ठिकाणी मंदिराची स्थापना करण्यात आली असून याचा नांदेड जिल्ह्याच्या प्रत्येक भक्तांना विशेष असा आशीर्वाद प्राप्त होण्याकरिता व त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्याकरिता या मंदिरात सर्वांसाठी प्रवेश असून कुठल्याही प्रकारे या ठिकाणी रोख टोक नसून सर्वांना प्रवेश देण्यात येतो या खाटू श्याम बाबा मंदिर समितीच्या वतीने योग्य त्या सोयी सुविधा येणाऱ्या भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे अनेक भाविक भक्त या ठिकाणी येऊन श्याम बाबा यांचे दर्शन घेतात व आपल्या जीवनात अनुभवाचे बदल घडून घेतात. आज रोजी या ठिकाणी एकादशी निमित्त विशेष पूजा अर्चना आणि संध्याकाळी भजन कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मोठ्या भक्ती भावाने खाटू श्याम बाबांचे गुणगान गायले जाते. आपणही या ठिकाणी येऊन अनुभव घ्याल अशी अपेक्षा. जय श्री श्याम
    1
    एकादशी निमित्त सांगवी येथील श्री खाटू श्याम बाबा मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघण्यास मिळाली तसेच प्रत्येक एकादशीला विशेष पूजा अर्चना भजन कीर्तन होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्या यासाठी श्री श्याम बाबा यांच्या चरणी साकडे घालतात. पौराणिक कथेमध्ये सांगितले आहे की भगवान श्रीकृष्ण यांनी त्यांच्या सर्व कला शक्ती गुण श्री खाटू श्याम बाबा यांना आशीर्वादरूपी दिले. आणि असे वरदान दिले की कलियुगामध्ये प्रत्येक घरामध्ये पुंजले जाशील तू हरलेल्यांचा सहारा बनशील म्हणजेच हारे का सहारा बाबा श्याम हमार जो भक्त या जगापासून हरला आहे तो तुझ्या चौकटीवर येईल त्याला तू तारणार व त्याच्या मनोकामना पूर्ण करून त्याच्या पाठी उभा राहणारा असा देखील वरदान भगवान श्रीकृष्णाने या खाटू श्याम बाबा यांना दिला आहे. याची महिमा अद्भुत असून श्रीकृष्णाने विशेष असं वरदान देखील या खाटू श्याम बाबाला दिला आहे. की ज्याच्या जीवनात कष्ट ,दुःख , दारिद्र्य, रोग , लिहिलेला आहे. ते कोणी टाळू शकत नाही परंतु ते देखील तू  तुझ्या चौकटीवर आलेल्या भक्तांच सर्व संकट दुःख दारिद्र्य कष्ट दूर करण्याच विशेष अधिकार देखील या श्याम बाबांना दिलेला आहे. या कलियुगामध्ये मोठ्या प्रमाणात श्री खाटू श्याम बाबा यांचे भक्त यांना अनेक वेळा विविध अशा मनोकामनामध्ये चमत्कारीरुपी अनुभव आलेला आहे. म्हणून आज  लाखो करोडो भक्त या श्याम बाबाच्या दर्शनासाठी राजस्थान येथे मोठ्या संख्येने जाऊन दर्शन घेतात त्याचेच प्रतिरुपी म्हणून नांदेड सांगवी एअरपोर्ट रोड या ठिकाणी मंदिराची स्थापना करण्यात आली असून याचा नांदेड जिल्ह्याच्या प्रत्येक भक्तांना विशेष असा आशीर्वाद प्राप्त होण्याकरिता व त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्याकरिता या मंदिरात सर्वांसाठी प्रवेश असून कुठल्याही प्रकारे या ठिकाणी रोख टोक नसून सर्वांना प्रवेश देण्यात येतो या खाटू श्याम बाबा मंदिर समितीच्या वतीने योग्य त्या सोयी सुविधा येणाऱ्या भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. 
त्यामुळे अनेक भाविक भक्त या ठिकाणी येऊन श्याम बाबा यांचे दर्शन घेतात व आपल्या जीवनात अनुभवाचे बदल घडून घेतात. आज रोजी या ठिकाणी एकादशी निमित्त विशेष पूजा अर्चना आणि संध्याकाळी भजन कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मोठ्या भक्ती भावाने खाटू श्याम बाबांचे गुणगान गायले जाते.
आपणही या ठिकाणी येऊन अनुभव घ्याल अशी अपेक्षा.
जय श्री श्याम
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.