जऊळका रेल्वे परिसरात जिओ टावर ची सेवा खंडित वारंवार खंडित नागरिक त्रस्त जऊळका रेल्वे परिसरात जिओ टॉवर सेवा वारंवार खंडित; नागरिक त्रस्त महासागर प्रतिनिधी जऊळका (रेल्वे):-मालेगाव तालुक्यातील जऊलका रेल्वे परिसरात जिओ टॉवरची सेवा वारंवार खंडित होत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून नेटवर्कमध्ये सतत व्यत्यय येत असून कॉल ड्रॉप, इंटरनेटचा वेग मंदावणे तसेच अनेक वेळा नेटवर्क पूर्णपणे बंद पडणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. या नेटवर्क समस्येमुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण विस्कळीत होत आहे. तसेच शेतकरी व व्यावसायिकांचे डिजिटल व्यवहारही प्रभावित होत असून दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण होत आहेत. स्थानिक नागरिकांनी संबंधित कंपनीकडे अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. मात्र अद्याप या समस्येवर कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, अशी नाराजी नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. जऊळका परिसरातील नागरिकांनी लवकरात लवकर जिओ टॉवरची सेवा सुरळीत करावी, अशी मागणी संबंधित प्रशासन व कंपनीकडे केली आहे.

- इसापूर येथील श्याम गायकवाड याने सकाळपासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक टॉवरवर चढून विविध मागण्यांसंदर्भात आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली होती. इसापूर ग्रामपंचायत अंतर्गत नमुना ८ चोरी गेल्याची तक्रार सचिव, सरपंच, उपसरपंच यांनी पोलिस स्टेशनला दिली. त्या तक्रारीवरून काय कार्यवाही झाली, याचा खुलासा द्यावा. इसापूर येथील गावाचा नकाशा नसल्याने कोणते कोणाचे घर आहे. हे सिद्ध होत नाही. काही लोकांना नोटरीनुसार त्यांची नावे नमुना ८ मध्ये नोंद घेण्याचा नियम आहे. आपल्या घराचा नोटरीकृत असलेल्या दस्तानुसार घर नावाने करून द्यावे, एकाच मालमत्तेवर दोन वा तीन व्यक्तीची मालकी कशी याचाही खुलासा देऊन दोषींवर कारवाई करावी, अशा विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. गटविकास अधिकाऱ्यांनी प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी यांना सदर आंदोलकाच्या मागण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात याती व आंदोलकाला आंदोलनापासून परावृत्त करण्याबाबत पत्र दिले.1
- Post by Amravati News Update1
- Post by Labour addaa.1
- Post by वैजनाथ पावडे1
- किरकोळ वादाचे हिंसक रूप! लोखंडी रॉडने तरुणावर जीवघेणा हल्ला — तिघांविरुद्ध गुन्हा दाखल शेगाव : शहरातील जयअंबे नगर परिसरात किरकोळ वादातून संताप अनावर झाल्याने एका तरुणावर लोखंडी रॉडने निर्घृण हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अण्णाभाऊ नारायण म्हस्के (वय ३१) हे २३ मार्च रोजी दुपारी शेतातून घरी परतत असताना आरोपी प्रकाश मेटकर याने विनाकारण शिवीगाळ करत वाद उकरून काढला. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणातच हिंसक बनला. संतापलेल्या आरोपीने जवळ पडलेला लोखंडी रॉड उचलून म्हस्के यांच्या हातावर व डोक्यावर सपासप वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यात म्हस्के गंभीर जखमी झाले. इतक्यावरच न थांबता आरोपीची आई व बहीण सोनाली यांनीही घटनास्थळी धाव घेत फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. “त्याला मारून टाका” अशी आरोळी देत हल्ल्यास उत्तेजन दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी धाडस दाखवत मध्यस्थी केली व जखमीला आरोपींच्या तावडीतून सोडवून तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल केले. अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेप्रकरणी २७ मार्च रोजी शेगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीसांकडून सुरू आहे. किरकोळ वादातून वाढती हिंसा पुन्हा समोर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.1
- तहसीलदाराला उदविण्याचा प्रयत्न अखेर रेती माफियांवर कारवाई रेती माफिया यांचे धाबे दणाणले?1
- खामगाव : तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या थाटामाटात पार पडला. या मंगलमयी सोहळ्यासाठी संपूर्ण गावासह परिसरातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शिव-पार्वती विवाहाच्या चार दिवसानंतर आता मंदिर परिसरात भव्य यात्रेला सुरुवात झाली असून, संपूर्ण गाव भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले आहे.या उत्सवाचे औचित्य साधून स्थानिक शिव मंदिराला अतिशय आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रंगीबेरंगी दिव्यांच्या माळांनी उजळून निघालेले मंदिर भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले होते. विवाहाच्या पूर्वसंध्येपासूनच परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पारंपारिक पद्धतीने पार पडला. शास्त्रोक्त विधी, पुरोहितांचे मंत्रोच्चार आणि मंगलाष्टकांच्या स्वरात शिव-पार्वतीचा विवाह संपन्न झाला. यावेळी उपस्थित भाविकांनी 'हर हर महादेव'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या सोहळ्यानंतर मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर चार दिवसांनी, म्हणजेच आजपासून सुटाळा बुद्रुक महादेव संस्थान परिसरात मोठ्या यात्रेला प्रारंभ झाला आहे. या यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे, गावातील विवाहित लेकी-सुना या यात्रेच्या निमित्ताने खास माहेरी येतात.यात्रेनिमित्त परिसरात विविध दुकाने, पाळणे आणि खेळण्यांची दुकाने थाटली गेली आहेत. सुटाळा बुद्रुक येथील ही परंपरा सामाजिक एकोपा आणि श्रद्धेचे प्रतीक बनली असून, या सोहळ्यामुळे गावात उत्सवी चैतन्य पसरले आहे.परिसरातील नागरिक या यात्रेचा आणि दर्शनाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने सुटाळा बुद्रुक येथे दाखल होत आहेत.2
- Post by Amravati News Update1