युगप्रवर्तक अभिवादन महोत्सवाचे भव्य आयोजन सिने पार्श्वगायक आनंद शिंदे यांची भीमगीत संगीत रजनी रंगणार परभणी,( प्रतिनिधी) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त 30 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता युगप्रवर्तक अभिवादन महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवानिमित्त सुप्रसिद्ध सिने पार्श्वगायक आनंद शिंदे यांच्या भीमगीत संगीत रजनीचा कार्यक्रम रंगणार असल्याची माहिती आयोजक काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मागील 21 वर्षांपासून डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांच्या नेतृत्वाखाली परभणी शहरात युगप्रवर्तक अभिवादन महोत्सवाचे सातत्याने आयोजन केले जात आहे. यंदाही हा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून वसमत रोडवरील विष्णू जिनिंग मैदान येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार आहे. अभिवादन सोहळ्यानंतर आनंद शिंदे यांच्या सुमधुर आवाजात भीमगीत संगीत रजनी सादर होणार आहे. त्यांच्या बहारदार सादरीकरणामुळे उपस्थित प्रेक्षकांना अविस्मरणीय सांस्कृतिक मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. याच कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत उत्कृष्ट देखावे सादर करणाऱ्या विविध जयंती मंडळांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकेही प्रदान करण्यात येणार आहेत. या भव्य अभिवादन महोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांनी केले आहे.

- वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघात रुग्णांसाठी शहरात चार आरोग्य केंद्र - महापौर सय्यद इकबाल1
- Post by Mohsin ahmed khan1
- Post by Today One Live1
- महात्मा बसेश्वर महाराजांची जयंती मंठा येथील उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यासाठी.1
- Post by माधव गायकवाड4
- लिलाव प्रक्रियेदरम्यान गोदामात तारण मालच नसल्याचे उघड झाले. तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आर्थिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याला श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपीस 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.1
- Post by Anil Rathod1
- Skyline Builders & Developers “क्षितिज पुरम – जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो स्वतःचा पत्ता ” क्षितिज पुरम… जिथे आकाशातील स्वप्नं… जमिनीवर उतरतात!2