logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सभापती, उपसभापतींकडून देवगड तालुक्यातील अवकाळीग्रस्त भागांची पाहणी देवगड तालुक्यात ९ तारीखला झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंचायत समिती देवगडचे सभापती गणेश राणे, उपसभापती अमोल लोके तसेच तहसीलदार रमेश पवार , यांनी बाधित भागांची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी गोवळ व फणसगाव भागात पं. स. सदस्य श्री. विष्णू गाडी हे देखील उपस्थित होते तसेच कृषी विस्तार अधिकारी विलास कोलते, स्वीय सहाय्यक दिपक मयेकर , ग्रामपंचायत अधिकारी , सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते . देवगड तालुक्यातील बापर्डे, पाटगाव, गोवळ, फणसगाव, कुणकवण, मळेगाव आणि सौंदाळे या गावांमध्ये अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी घरांचे, शेतीपिकांचे तसेच फळबागांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. यावेळी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. यामध्ये बापर्डे येथील रविंद्र मोरेश्वर राणे, पाटगाव येथील संतोष रघुनाथ बाणे तसेच गोवळ येथील अश्विन बाबाजी सावंत, विष्णु बाबाजी घाडी , मधुकर शंकर माळकर , संदीप विनायक माळकर , निर्मला सिताराम तांबे ,रघुनाथ गोपाळ मोरे फणसगांव मधील मोहन वासुदेव पालकर , दिलीप पांडुरंग नर, रुक्मिनी अंबाजी गुरव , यशवंत राजाराम महाडीक , महेंद्र नारायण नरसाळे , सत्यवान भास्कर जगताप , प्रकाश रामचंद्र नरसाळे , कुणकवण येथील यशवंत सिताराम विचारे , अनंत राजाराम जनक , महादेव शिवराम राणे , अनंत सोनु देवळेकर , शशिकांत आबा तोरसकर सौंदाळे येथील दशरथ महादेव मुणगेकर या कुटुंबीयांची भेट घेऊन नुकसानीची माहिती घेण्यात आली. प्रशासनामार्फत पंचनामे तातडीने पूर्ण करून शासनाकडून योग्य मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. ग्रामस्थांनीही नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी केली.

2 hrs ago
user_मालवणी Express
मालवणी Express
Iam writer and editor सावंतवाडी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
2 hrs ago
4cbc3100-8d14-477a-8217-540ef958dc4e

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मराठी संगीत विश्वातील लोकप्रिय गायिका श्रेया घोषाला तिच्या गाण्यांमधून आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. 'मेंदीच्या पानावर' सारख्या गाण्यांमधून तिचा मधुर आवाज आजही अनेकांना भुरळ घालतो.
    1
    मराठी संगीत विश्वातील लोकप्रिय गायिका श्रेया घोषाला तिच्या गाण्यांमधून आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. 'मेंदीच्या पानावर' सारख्या गाण्यांमधून तिचा मधुर आवाज आजही अनेकांना भुरळ घालतो.
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • पुण्यातील बालगंधर्व चौकात नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पीडित मुलीचे आई-वडील आणि हजारो नागरिक सहभागी झाले होते, त्यांनी आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली.
    1
    पुण्यातील बालगंधर्व चौकात नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पीडित मुलीचे आई-वडील आणि हजारो नागरिक सहभागी झाले होते, त्यांनी आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • प्रधानमंत्री मोदी की अपील पर देवेंद्र फडणवीस की प्रतिक्रिया। 'जरूरत पड़ने पर ही ईंधन का इस्तेमाल करें', #pmmodi #devendrafadnavis #maharashtra #primenews83 #breakingnews #hindinews प्रधानमंत्री मोदी की अपील पर देवेंद्र फडणवीस की प्रतिक्रिया। 'जरूरत पड़ने पर ही ईंधन का इस्तेमाल करें',
    1
    प्रधानमंत्री मोदी की अपील पर देवेंद्र फडणवीस की प्रतिक्रिया।
'जरूरत पड़ने पर ही ईंधन का इस्तेमाल करें', 
#pmmodi 
#devendrafadnavis 
#maharashtra 
#primenews83 
#breakingnews 
#hindinews 
प्रधानमंत्री मोदी की अपील पर देवेंद्र फडणवीस की प्रतिक्रिया।
'जरूरत पड़ने पर ही ईंधन का इस्तेमाल करें',
    user_Feroj Hungund
    Feroj Hungund
    सोलापूर दक्षिण, सोलापूर, महाराष्ट्र•
    46 min ago
  • वडगाव निंबाळकर पोलिसांनी एका नामांकित डॉक्टरला बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणी अटक केली आहे. या घटनेमुळे आरोग्य क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, बेकायदेशीर वैद्यकीय व्यवहारांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
    1
    वडगाव निंबाळकर पोलिसांनी एका नामांकित डॉक्टरला बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणी अटक केली आहे. या घटनेमुळे आरोग्य क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, बेकायदेशीर वैद्यकीय व्यवहारांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • पुणे जिल्ह्यातील थेऊर गावच्या स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे, ज्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. पाणी, लाईट आणि स्वच्छ शौचालयांच्या अभावामुळे मृताच्या नातेवाईकांना 'नरकयातना' भोगाव्या लागत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. या गंभीर परिस्थितीवर प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
    1
    पुणे जिल्ह्यातील थेऊर गावच्या स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे, ज्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. पाणी, लाईट आणि स्वच्छ शौचालयांच्या अभावामुळे मृताच्या नातेवाईकांना 'नरकयातना' भोगाव्या लागत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. या गंभीर परिस्थितीवर प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • पुणे जिल्ह्यातील कुदळवाडीत मध्यरात्री पोकलेन, जेसीबी आणि शेकडो पोलिसांचा फौजफाटा दिसल्याने खळबळ उडाली आहे. 'रात्रीस खेळ चाले' या नावाने ही मोठी कारवाई नेमकी कोणासाठी आणि कोणत्या कारणासाठी सुरू आहे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
    1
    पुणे जिल्ह्यातील कुदळवाडीत मध्यरात्री पोकलेन, जेसीबी आणि शेकडो पोलिसांचा फौजफाटा दिसल्याने खळबळ उडाली आहे. 'रात्रीस खेळ चाले' या नावाने ही मोठी कारवाई नेमकी कोणासाठी आणि कोणत्या कारणासाठी सुरू आहे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
    user_MAHARASHTRA MANTHAN
    MAHARASHTRA MANTHAN
    Advertising agency पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • नवी मुंबईतील खारघर येथे ५६ लाख रुपयांचे दागिने लुटणाऱ्या टोळीतील दोघांना तासगाव पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही आरोपींकडून ५६ लाखांचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ते तासगाव तालुक्यातील विसापूर येथील आहेत. खारघर आणि तासगाव पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे ही मोठी यशस्वी कारवाई झाली.
    1
    नवी मुंबईतील खारघर येथे ५६ लाख रुपयांचे दागिने लुटणाऱ्या टोळीतील दोघांना तासगाव पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही आरोपींकडून ५६ लाखांचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ते तासगाव तालुक्यातील विसापूर येथील आहेत. खारघर आणि तासगाव पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे ही मोठी यशस्वी कारवाई झाली.
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • सी. जोसेफ विजय यांनी चेन्नईमध्ये तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आता राज्याच्या प्रशासनात एक नवे पर्व सुरू होईल, असे मानले जात आहे.
    1
    सी. जोसेफ विजय यांनी चेन्नईमध्ये तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आता राज्याच्या प्रशासनात एक नवे पर्व सुरू होईल, असे मानले जात आहे.
    user_Feroj Hungund
    Feroj Hungund
    सोलापूर दक्षिण, सोलापूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • पुण्यातील सातारा रोड परिसरात धोकादायक लोंबकळणाऱ्या तारांचे जाळे मृत्यूचा सापळा बनले आहे. यामुळे अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला असून स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. प्रशासनाचे या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
    1
    पुण्यातील सातारा रोड परिसरात धोकादायक लोंबकळणाऱ्या तारांचे जाळे मृत्यूचा सापळा बनले आहे. यामुळे अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला असून स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. प्रशासनाचे या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.