नाशिक:येवल्यात रंगली सुप्रसिद्ध गायक रईस अनिस साबरी यांची कव्वाली महफिल ** *रमजान ईद निमित्त भव्य ईद मिलन समारंभ उत्साहात संपन्न* *मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांच्या पुढाकारातून सामाजिक सलोख्याचा संदेश* *येणाऱ्या पिढ्यांपर्यंतही बंधुभाव,सहिष्णुता आणि सांस्कृतिक ऐक्याचा संदेश पोहोचविणे आवश्यक- माजी खासदार समीर भुजबळ* *येवला शहराने नेहमीच सामाजिक सलोखा,सौहार्द आणि सर्वधर्मसमभावाची परंपरा जपली -माजी खासदार समीर भुजबळ* *सण-उत्सव हे समाजाला जोडणारे,आपुलकी वाढवणारे राष्ट्रीय एकात्मता बळकट करणारे सेतू - आमदार पंकज भुजबळ* *येवला, * येवला शहराने नेहमीच सामाजिक सलोखा, सौहार्द आणि सर्वधर्मसमभावाची परंपरा जपली आहे.अशा कार्यक्रमांमुळे ही एकतेची भावना अधिक दृढ होते. येणाऱ्या पिढ्यांपर्यंतही बंधुभाव,सहिष्णुता आणि सांस्कृतिक ऐक्याचा संदेश पोहोचविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले. तर सण-उत्सव हे समाजाला जोडणारे,आपुलकी वाढवणारे राष्ट्रीय एकात्मता बळकट करणारे सेतू असल्याचे प्रतिपादन आमदार पंकज भुजबळ यांनी केले. पवित्र रमजान ईदच्या निमित्ताने येवला शहरात आयोजित करण्यात आलेला भव्य ‘ईद मिलन समारंभ’ व सुप्रसिद्ध गायक रईस अनिस साबरी यांची कव्वाली महफिल अत्यंत उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ,माजी खासदार समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमाला येवलेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. येवला शहरातील पोलीस परेड ग्राउंड, अँग्लो उर्दू हायस्कूलजवळ सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सामाजिक सलोखा, बंधुभाव, प्रेम आणि एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. रमजान ईदच्या पावन पार्श्वभूमीवर विविध समाजघटक, नागरिक, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने कार्यक्रमस्थळी उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते सुप्रसिद्ध गायक रईस अनिस साबरी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच या सोहळ्याच्या आयोजनाबद्दल मुस्लीम बांधवांच्या वतीने सामुहिक रित्या माजी खासदार समीर भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ.शेफाली भुजबळ, लासलगाव बाजार समितीच्या संचालिका सोनिया होळकर, नाशिक शहराध्यक्ष रंजन ठाकरे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, शहराध्यक्ष दत्ता निकम, येवला नगरपालिकेचे गटनेते दिपक लोणारी, नगरसेवक अमजद शेख, नगसेवक जावेद लखपती, नगरसेवक परवीन शेख, नगरसेवक गोटू मांजरे, नगरसेवक महेश काबरा, नगरसेवक पारुल गुजराथी, नगरसेवक बंटी परदेशी, निसार शेख, मलिक मेंबर,शफिक शेख, मुश्ताक शेख, सोहेल मोमीन, मतीन अन्सारी,बब्बू शेख, जुबेर सौदागर, राजेश भांडगे, राजश्री पहिलवान, सुनील पैठणकर, संजय खैरनार, नितीन गायकवाड,गुड्डू जावळे, सचिन सोनवणे, दीपक गायकवाड,प्रविण पहिलवान यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व येवलेकर बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, ईद हा प्रेम, बंधुभाव, आपुलकी आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा उत्सव आहे. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येत परस्परांमध्ये सद्भावना आणि जिव्हाळा वाढविणे ही आजची खरी गरज आहे.“रमजानचा पवित्र महिना आपल्याला संयम, श्रद्धा, सेवाभाव आणि मानवतेचे महत्त्व शिकवतो. ईदच्या निमित्ताने समाजात प्रेम, सलोखा आणि परस्पर सन्मानाची भावना अधिक बळकट व्हावी, या उद्देशाने हा ‘ईद मिलन समारंभ’ आयोजित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार पंकज भुजबळ म्हणाले की, समाजात प्रेम, विश्वास आणि परस्पर आदराची भावना वाढवण्यासाठी अशा सामाजिक, सांस्कृतिक आणि लोकसहभागातून साजऱ्या होणाऱ्या उपक्रमांचे मोठे महत्त्व आहे. विविध धर्म, पंथ आणि समाजघटकांनी एकत्र येऊन आनंद वाटून घेणे, हेच आपल्या संस्कृतीचे खरे वैशिष्ट्य आहे.सण-उत्सव हे केवळ आनंद साजरा करण्याचे माध्यम नसून, ते समाजाला जोडणारे, आपुलकी वाढवणारे आणि राष्ट्रीय एकात्मता बळकट करणारे सेतू आहेत, असेही त्यांनी सांगितले. *कव्वाली महफिलीने जिंकली रसिकांची मने* या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरली ती सुप्रसिद्ध गायक रईस अनिस साबरी यांची बहारदार कव्वाली महफिल. त्यांच्या सुमधुर, भावपूर्ण आणि जोशपूर्ण सादरीकरणाने संपूर्ण परिसर भारावून गेला. सूफी परंपरेची समृद्ध परंपरा जपत त्यांनी सादर केलेल्या कव्वालींनी उपस्थित रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. अध्यात्म, प्रेम, मानवता आणि एकतेचा संदेश देणाऱ्या कव्वालींच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमाला एक विशेष उंची प्राप्त झाली. प्रत्येक सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळत होती. कव्वालीच्या सुरेल लयी, तबल्याचे ठेके, हार्मोनियमचे सूर आणि गायकांच्या जिवंत सादरीकरणामुळे कार्यक्रमात उपस्थित प्रत्येकजण तल्लीन झालेला पाहायला मिळाला.
नाशिक:येवल्यात रंगली सुप्रसिद्ध गायक रईस अनिस साबरी यांची कव्वाली महफिल ** *रमजान ईद निमित्त भव्य ईद मिलन समारंभ उत्साहात संपन्न* *मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांच्या पुढाकारातून सामाजिक सलोख्याचा संदेश* *येणाऱ्या पिढ्यांपर्यंतही बंधुभाव,सहिष्णुता आणि सांस्कृतिक ऐक्याचा संदेश पोहोचविणे आवश्यक- माजी खासदार समीर भुजबळ* *येवला शहराने नेहमीच सामाजिक सलोखा,सौहार्द आणि सर्वधर्मसमभावाची परंपरा जपली -माजी खासदार समीर भुजबळ* *सण-उत्सव हे समाजाला जोडणारे,आपुलकी वाढवणारे राष्ट्रीय एकात्मता बळकट करणारे सेतू - आमदार पंकज भुजबळ* *येवला, * येवला शहराने नेहमीच सामाजिक सलोखा, सौहार्द आणि सर्वधर्मसमभावाची परंपरा जपली आहे.अशा कार्यक्रमांमुळे ही एकतेची भावना अधिक दृढ होते. येणाऱ्या पिढ्यांपर्यंतही बंधुभाव,सहिष्णुता आणि सांस्कृतिक ऐक्याचा संदेश पोहोचविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले. तर सण-उत्सव हे समाजाला जोडणारे,आपुलकी वाढवणारे राष्ट्रीय एकात्मता बळकट करणारे सेतू असल्याचे प्रतिपादन आमदार पंकज भुजबळ यांनी केले. पवित्र रमजान ईदच्या निमित्ताने येवला शहरात आयोजित करण्यात आलेला भव्य ‘ईद मिलन समारंभ’ व सुप्रसिद्ध गायक रईस अनिस साबरी
यांची कव्वाली महफिल अत्यंत उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ,माजी खासदार समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमाला येवलेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. येवला शहरातील पोलीस परेड ग्राउंड, अँग्लो उर्दू हायस्कूलजवळ सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सामाजिक सलोखा, बंधुभाव, प्रेम आणि एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. रमजान ईदच्या पावन पार्श्वभूमीवर विविध समाजघटक, नागरिक, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने कार्यक्रमस्थळी उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते सुप्रसिद्ध गायक रईस अनिस साबरी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच या सोहळ्याच्या आयोजनाबद्दल मुस्लीम बांधवांच्या वतीने सामुहिक रित्या माजी खासदार समीर भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ.शेफाली भुजबळ, लासलगाव बाजार समितीच्या संचालिका सोनिया होळकर, नाशिक शहराध्यक्ष रंजन ठाकरे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, नगराध्यक्ष
राजेंद्र लोणारी, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, शहराध्यक्ष दत्ता निकम, येवला नगरपालिकेचे गटनेते दिपक लोणारी, नगरसेवक अमजद शेख, नगसेवक जावेद लखपती, नगरसेवक परवीन शेख, नगरसेवक गोटू मांजरे, नगरसेवक महेश काबरा, नगरसेवक पारुल गुजराथी, नगरसेवक बंटी परदेशी, निसार शेख, मलिक मेंबर,शफिक शेख, मुश्ताक शेख, सोहेल मोमीन, मतीन अन्सारी,बब्बू शेख, जुबेर सौदागर, राजेश भांडगे, राजश्री पहिलवान, सुनील पैठणकर, संजय खैरनार, नितीन गायकवाड,गुड्डू जावळे, सचिन सोनवणे, दीपक गायकवाड,प्रविण पहिलवान यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व येवलेकर बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, ईद हा प्रेम, बंधुभाव, आपुलकी आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा उत्सव आहे. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येत परस्परांमध्ये सद्भावना आणि जिव्हाळा वाढविणे ही आजची खरी गरज आहे.“रमजानचा पवित्र महिना आपल्याला संयम, श्रद्धा, सेवाभाव आणि मानवतेचे महत्त्व शिकवतो. ईदच्या निमित्ताने समाजात प्रेम, सलोखा आणि परस्पर सन्मानाची भावना अधिक बळकट व्हावी, या उद्देशाने हा ‘ईद मिलन समारंभ’ आयोजित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार पंकज
भुजबळ म्हणाले की, समाजात प्रेम, विश्वास आणि परस्पर आदराची भावना वाढवण्यासाठी अशा सामाजिक, सांस्कृतिक आणि लोकसहभागातून साजऱ्या होणाऱ्या उपक्रमांचे मोठे महत्त्व आहे. विविध धर्म, पंथ आणि समाजघटकांनी एकत्र येऊन आनंद वाटून घेणे, हेच आपल्या संस्कृतीचे खरे वैशिष्ट्य आहे.सण-उत्सव हे केवळ आनंद साजरा करण्याचे माध्यम नसून, ते समाजाला जोडणारे, आपुलकी वाढवणारे आणि राष्ट्रीय एकात्मता बळकट करणारे सेतू आहेत, असेही त्यांनी सांगितले. *कव्वाली महफिलीने जिंकली रसिकांची मने* या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरली ती सुप्रसिद्ध गायक रईस अनिस साबरी यांची बहारदार कव्वाली महफिल. त्यांच्या सुमधुर, भावपूर्ण आणि जोशपूर्ण सादरीकरणाने संपूर्ण परिसर भारावून गेला. सूफी परंपरेची समृद्ध परंपरा जपत त्यांनी सादर केलेल्या कव्वालींनी उपस्थित रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. अध्यात्म, प्रेम, मानवता आणि एकतेचा संदेश देणाऱ्या कव्वालींच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमाला एक विशेष उंची प्राप्त झाली. प्रत्येक सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळत होती. कव्वालीच्या सुरेल लयी, तबल्याचे ठेके, हार्मोनियमचे सूर आणि गायकांच्या जिवंत सादरीकरणामुळे कार्यक्रमात उपस्थित प्रत्येकजण तल्लीन झालेला पाहायला मिळाला.
- नालंदा दुष्कर्म में न्याय दिलाने पहुंचे पासवान नेता और पुलिस में हुई भिड़ंत,पीड़ित से मिलने को रोका.1
- येवला शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी लागू केली आहे. मात्र, वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात येत असून, शनिवारी गोपीनाथ मुंडे चौक हुडको कॉर्नर ते विंचूर चौफुलीपर्यंत अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयात घेतलेल्या बैठकीनंतर हे निर्बंध लादण्यात आले होते. परंतु, भरदिवसा पोलीसच ही वाहने सोडत असल्याचा आरोप करत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या गंभीर परिस्थितीत शिवसेना (एकनाथ शिंदे गट) जिल्हा उपप्रमुख अमोल शिंदे व गटनेते गणेश शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत केली. यावेळीशिवसेना जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे व शिवसेना गटनेते गणेश शिंदे तसेच शिंदे फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अडकलेल्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्याचे वाटप करून दिलासा दिला. प्रशासकीय नियोजनाचा फज्जा उडाला असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या यंत्रणेवर जिल्हाधिकारी आता काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- ठाणे:मुरबाड तालुक्यातील टोकावडे मोरोशी, शिरोशी ,धसई विभागात गुरुवारी (तारीख २ एप्रिल) सायंकाळी सहाच्या सुमारास जोरदार वारा वादळ व पाऊस पडला यामुळे या विभागातील विट उत्पादक, भाजीपाला व आंबा, चिकू उत्पादकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे आंब्याच्या झाडाला लागलेल्या कैऱ्या मोठ्या प्रमाणात पडून मोरेश्वर मोरे (खेड ) प्रकाश पवार (टोकावडे ) सुभाष भोईर (सोनावळे ) ह्या व इतर आंबा, चिकू उत्पादकांचे फार मोठे नुकसान झाले आहे तसेच वीट उत्पादकांचे मातीच्या विटा भिजल्याने व भाजीपाला उत्पादकांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी सांगितले आहे - वरील सर्व नुकसानीची माहिती तात्काळ व्हाट्सअपद्वारे ठाणे जिल्हा कृषी अधिकारी रामेश्वर पाचे, मुरबाड कृषी अधिकारी संदीप केणे, तहसीलदार अभिजीत देशमुख ,नायब तहसीलदार अमोल शिंदे यांना प्रकाश पवार यांनी व्हाट्सअप व फोनद्वारे कळवून झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे मागणी केली आहे.4
- चोंढे बु.ता.शहापुर येथे हनुमान जयंती उत्साहात संपन्न ,सर्व ग्रामस्थ ऐकञ येवून हनुमान जयंतीचा कार्यक्रम अगदी यशस्वीपणे सर्व तरुन वर्गाने पार पाडला या कार्यक्रमात सकाळी हनुमंताचे अभिषेक,रामनाम जप, सायंकाळी पालखी सोहळा संपन्न झाला.या पालखी सोहळ्यात राम,लक्षमण ,सिता,व हनुमान यांचे देखावे हे कार्यक्रमाचे केंद्र बिंदु ठरले.व संपुर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमासाठी आलेले सर्व नागरीकांना सुंदर भोजन व्यवस्था केली होती तसेच खातळेकर महाराज आळंदी यांची किर्तन सेवा ,व ग्रामस्थांचे जागर भजन होवून कार्यक्रमाची सांगता झाली.3
- bolate hai Hindu khatre mein aur Hindu Hui atank faila raha hai2
- Post by Devidas Gaikwad1
- नशे में ‘हंगामा क्वीन’ बनी युवती: टोल प्लाजा पर तोड़ी बैरिकेडिंग, वायरल वीडियो ने खोली पोल" झाँसी :- झाँसी के लुहारी टोल प्लाजा पर उस वक्त तमाशा बन गया जब नशे में धुत एक युवती ने सरेआम हंगामा काटते हुए मर्यादा की सारी सीमाएं लांघ दीं। अपने आपको, लड़की हूँ, लड़ सकती हूँ की ब्रैंड एम्बेसडर समझ कर सड़क पर उतरी इस “पापा की परी” ने, न सिर्फ राहगीरों को परेशान किया, बल्कि टोल की बैरिकेडिंग तक तोड़ डाली। बताया जा रहा है कि युवती अपनी महिला डांसर साथियों के साथ कार्यक्रम से लौट रही थी और मोबाइल गुम होने के शक में बेकाबू हो गई। लेकिन सवाल ये है कि क्या नशा अब बदतमीजी का लाइसेंस बन चुका है? वीडियो वायरल होते ही यह मामला चर्चा में आ गया है। हैरानी की बात ये कि घटना के बाद भी कोई शिकायत दर्ज नहीं हुई, लेकिन अब पुलिस हरकत में आई है। #viralvideo #breakingnews #viral #FYPIndia #istagram1
- ठाणे:शहापूर तालुक्यातील मौजे नांदगाव येथे हनुमान जन्मोत्सव यावर्षी मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रथमच संपूर्ण गावकऱ्यांनी एकत्र येऊन हनुमान जन्मोत्सव साठी मोठी तयारी केली होती ,प्रत्येक घराच्या समोर रांगोळ्या काढून ,रस्ते सुंदर पद्धतीने स्वच्छ केले होते. सकाळी अभिषेक व रात्री पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते, यावेळी गावातील बाळ गोपाळ यांनी राम सीता लक्ष्मण ,हनुमंत व वानर सेनेचे मुखवटे धारण करून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. गावातील सर्व देवस्थानाची भेट घेऊन पालखी सोहळ्याची हनुमान मंदिर येथे सांगता करण्यात आली. या सोहळ्यास गावातील अबाल वृद्ध तरुण व बाहेरगावी असलेले असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सोहळा अभूतपूर्वक करण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या सर्व तरुण वर्गाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.1