बुलढाणा जिल्हात पावसाचा प्रचंड कहर..! ९२ पैकी ९१ महसूल मंडळांत अतिवृष्टी; जिल्हा प्रशासन हायअलर्टवर "एकाही पूरग्रस्ताला वाऱ्यावर सोडणार नाही" – पालकमंत्री मकरंद जाधव पाटील बुलढाणावर पावसाचा प्रचंड कहर! ९२ पैकी ९१ महसूल मंडळांत अतिवृष्टी; जिल्हा प्रशासन हायअलर्टवर "एकाही पूरग्रस्ताला वाऱ्यावर सोडणार नाही" – पालकमंत्री मकरंद जाधव पाटील बुलढाणा | दि. ३१ बुलढाणा जिल्ह्यावर मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. सलग कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेती, घरे आणि पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हा प्रशासन हायअलर्टवर असून बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. "शासन प्रत्येक बाधित नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. कोणत्याही पूरग्रस्ताला वाऱ्यावर सोडले जाणार नाही," अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली. स्थिती गंभीर - ९२ पैकी तब्बल ९१ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद - उभी पिके, घरे आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान - पंचनामे व सर्वेक्षणाचे काम युद्धपातळीवर सुरू - मदत व पुनर्वसनासाठी सर्व यंत्रणा सज्ज नागरिकांना प्रशासनाचे आवाहन पूरग्रस्त किंवा धोकादायक भागात जाणे टाळावे. नदी, नाले, पूल आणि पाण्याचा वेग असलेल्या ठिकाणांपासून दूर राहावे. प्रशासनाकडून वेळोवेळी जारी होणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून स्वतःची व कुटुंबाची सुरक्षितता जपावी, असे आवाहन पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी केले आहे. जिल्ह्यावर संकट... प्रशासन सज्ज! सतत सुरू असलेल्या पावसामुळे पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. जिल्हा प्रशासन २४ तास परिस्थितीवर लक्ष ठेवून असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

- सेवापूर्ती सोहळा उत्साहात नगरपरिषद शेगाव चे "वरिष्ठ लिपिक" श्री अशोकराव नंदाने यांचा सत्कार *सेवापूर्ती सोहळा उत्साहात* *नगरपरिषद शेगाव चे "वरिष्ठ* *लिपिक" श्री अशोकराव नंदाने यांचा सत्कार* नगरपरिषद शेगाव येथे वरिष्ठलिपिक म्हणून सलग ३५ वर्षे प्रामाणिक व निष्ठापूर्वक सेवा बजावल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या मा. श्री अशोकराव मोतीरामजी नंदाने यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा नगरपरिषद क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ अर्पण करून श्री अशोकराव नंदाने यांना निरोगी, आनंदी व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळात केलेल्या प्रामाणिक कार्याचा गौरव उपस्थित मान्यवरांनी केला. याच प्रसंगी भोई समाज शेगाव शहर यांच्या वतीने श्री अशोकराव नंदाने यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. समाजाप्रती त्यांचे योगदान व सेवाभावाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुढील आयुष्य सुख, समृद्धी व उत्तम आरोग्याने भरलेले जावो, अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषद शेगाव येथील नगराध्यक्ष मा.श्री प्रकाशभाऊ शेगोकार हे होते कार्यक्रमास, भोई समाज कर्मचारी संघटनेचे शहराध्यक्ष श्री गजाननजी ढोके, श्री हरिदासजी नंदाने भोई समाज चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक, समाजसेवक श्री भास्करराव नंदाने, समाजसेविका सौ. नर्मदाताई बावणे, समाजसेवक श्री देविदासजी कुसुंबे, समाजसेवक श्री रामरावजी बावणे, श्री रवींद्र पाटील,श्रीकांत लोंळे, श्री धनराज आटोळे, तसेच भाजपा शेगाव शहर मच्छीमार सेलचे संयोजक, भाजपा शेगाव शहर सोशल मीडिया प्रमुख व भोई समाज चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री उमेश सुरेशराव राजगुरे , श्री अविनाश नंदाने, नगरपरिषद कार्यालय येथील कर्मचारी नानारावजी इंगळे , राहुल सुरवाडे, सुरेश घुले, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी श्री अशोकराव मोतीरामजी नंदाने यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.4
- मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे: खामगाव नगराध्यक्षा अपर्णा फुंडकर यांचे आवाहन खामगाव : शहर व परिसर क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील १२ ते २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर खामगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. अपर्णा सागर फुंडकर यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून आपण सतत अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. पूर किंवा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपरिषद व स्थानिक प्रशासन तयार आहे. कोणत्याही नागरिकाने सोशल मीडियावरील किंवा इतर असत्य अफवांवर विश्वास ठेवू नये. अतिमहत्त्वाचे काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. नदी, नाले, तलाव तसेच पाणी साचलेल्या भागांपासून सुरक्षित अंतर ठेवावे.कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ नगरपरिषद प्रशासनाशी किंवा हेल्पलाइनवर संपर्क साधावा."आपली व आपल्या कुटुंबाची सुरक्षितता हीच आपली प्रथम प्राधान्यता आहे. सर्वांनी सतर्क राहून एकमेकांना सहकार्य करावे व सुरक्षित राहावे," असे आवाहन सौ. अपर्णा फुंडकर यांनी केले आहे.1
- 👉थायराईड वर आलेला रियांश अमृत जूस चा जबरदस्त रिजल्ट ✅🥰1
- बार्शीटाकली में वर्षों से बंद सार्वजनिक शौचालय, नागरिकों ने नगर पंचायत से की तत्काल शुरू करने की मांग बार्शीटाकली शहर में सार्वजनिक सुविधा के नाम पर साप्ताहिक बाज़ार परिसर में बना शौचालय वर्षों से बंद पड़े होने के कारण नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। इस गंभीर समस्या को लेकर नगर पंचायत के मुख्याधिकारी को एक लिखित आवेदन सौंपकर तत्काल शौचालय शुरू करने की मांग की गई है। आवेदन में कहा गया है कि शहर के प्रमुख स्थान पर स्थित सार्वजनिक शौचालय करीब 3 वर्षों से बंद है। इसके कारण महिलाओं, बुजुर्गों, यात्रियों और बाजार आने वाले लोगों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। नागरिकों ने मांग की है कि बंद पड़े शौचालय की तत्काल मरम्मत कर उसे आम जनता के लिए शुरू किया जाए। अब नागरिकों की नजर इस बात पर है कि टिकी है कि नगर पंचायत इस मांग पर कितनी जल्दी कार्रवाई करती है। यदि समय रहते समस्या का समाधान नहीं हुआ तो नागरिकों ने आंदोलन का रास्ता अपनाने की चेतावनी भी दी है।1
- मुसळधार पावसाचा फटका! शेगांव-कालखेड–वरवट बकाल मार्गावरील वाहतूक ठप्प; नाल्याला पूर आल्याने नागरिक अडकले.. मुसळधार पावसाचा फटका! शेगांव-कालखेड–वरवट बकाल मार्गावरील वाहतूक ठप्प; नाल्याला पूर आल्याने नागरिक अडकले.. शेगांव, दि. 31 जुलै : शेगाव तालुक्यात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे शेगांव-कालखेड–वरवट बकाल मार्गावरील पालघर नाल्याला पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. नाल्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांची ये-जा बंद झाली असून नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गाचा वापर शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी तसेच रोज अप-डाऊन करणारे नागरिक मोठ्या प्रमाणावर करतात. मात्र नाल्यावरील पाण्याची पातळी वाढल्याने अनेकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत असून प्रवासात विलंब होत आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. प्रशासनाने नागरिकांना पूराच्या पाण्यातून वाहन किंवा पायी जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले आहे. पाण्याचा प्रवाह कमी होईपर्यंत या मार्गावरून प्रवास टाळण्याचेही आवाहन करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात नाल्याला पूर आल्याने वाहतूक विस्कळीत होते आणि विद्यार्थी, नोकरदार व ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी उंच पुलाचे किंवा अन्य कायमस्वरूपी पर्यायाचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. नागरिकांना आवाहन: पूराचे पाणी ओसरत नाही तोपर्यंत या मार्गावरून प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून स्वतःची सुरक्षितता जपावी.1