जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीसाठी गुरुवारी विशेष सभा. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):- जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवड करण्यासाठी गुरुवार दि.2 एप्रिल रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात दुपारी 2 वा. होणार आहे. निवड प्रक्रिया सकाळि 10 वा. पासून सुरु होणार आहे,असे या सभेचे पिठासीन अधिकारी संतोष गोरड यांनी कळविले आहे. पिठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कन्नड संतोष गोरड यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार दि.2 एप्रिल रोज ही विशेष सभा जिल्हाधिकारी कार्यलयातील नियोजन सभागृहात होणार आहे. या विशेष सभेचा कार्यक्रम याप्रमाणे- गुरुवार दि.2 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 12 या वेळात नामनिर्देशन स्विकारणे, दुपारी 2 वा. विशेष सभेस सुरुवात. प्रथम प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी, त्यानंतर नामनिर्देशन माघारीसाठी वेळ दिला जाईल. त्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी मराठी वर्णक्रमानुसार करण्यात येईल. त्यानंतर समिती सभापती निवडणूकीसाठी एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास हात वर करुन मतदान घेण्यात येईल. या विशेष सभेसाठी उपस्थित राहण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती सभापती यांना कळविण्यात आले आहे. तथापि, सभापतींना अध्यक्ष/ उपाध्यक्ष निवडीसाठी मतदान करता येणार नाही. हात वर करुन मतदान करणाऱ्या सदस्याची स्वाक्षरी घेऊन नोंद घेण्यात येईल. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येईल. या सभेसाठी नवनिर्वाचित एकूण 63 जिल्हा परिषद सदस्य व 9 पंचायत समिती सभापती यांना बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे, असेही पिठासीन अधिकारी संतोष गोरड यांनी कळविले आहे.

- वैजापूर पंचायत समिती गट विकास अधिकारी शासकीय नियमा विरुद्ध. पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या दालनात A/C त बसून जनतेची सेवा करताना.1
- सिल्लोड तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहेत असेच एक दृश्य डोंगरगाव गावामध्ये पाहायला मिळाले पावसा सहित गारपीट ही होत आहे1
- Arun Borde Visit The Soul Of Fashion Opening Ceremony in Kalda Corner1
- आखाती देशाच्या युद्धामुळे छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅस टंचाईमुळे रिक्षामध्ये गॅस मिळत नसल्याने आखिरकार रिक्षा चालकांनी रिक्षा बंद पुकारत प्रशासना विरोधात रोष व्यक्त केला3
- आज ३० मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली यात विजांचा मोठा कडकडाट सुरू झाला होता आमठाणा येथे एका झाडावर वीज पडल्याची घटना घडली असून सदरील प्रकार बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आले आहे.1
- येवला-कोपरगाव रस्त्यावरील म्हसोबावाडी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही 'श्री म्हसोबा महाराज यात्रा उत्सव' अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. पाच गावांच्या शिवेवर वसलेले हे देवस्थान पंचक्रोशीत अत्यंत जागृत मानले जाते. यात्रेनिमित्त सकाळी कोपरगाव येथून कावडमध्ये गंगेचे पवित्र पाणी आणण्यात आले. गावाच्या मुख्य भागापासून वाजत-गाजत आणि डीजेच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत लहान मुलांसह तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत 'म्हसोबा महाराज की जय'च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या कावडच्या पाण्याने महाराजांना विधिवत अभिषेक घालण्यात आला. उत्सवाचे खास आकर्षण म्हणजे ह.भ.प. गोरख महाराज काळे (अंगणगावकर) यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. कीर्तनानंतर उपस्थित हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. १९८९ पासून सुरू असलेली ही यात्रा परंपरा म्हसोबावाडी, बदापूर, नांदेसर, आडगाव चोथवा आणि पारेगाव या पाच गावांच्या भाविकांकडून मोठ्या श्रद्धेने जपली जात आहे. सध्या मंदिराच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून 'म्हसोबावाडी मित्र मंडळ' व ग्रामस्थ यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत. बदापूर येथील तरुण भजनी मंडळाचा आदर्श या यात्रेचे भूषण ठरला. या सोहळ्यासाठी आबालवृद्ध आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला4
- जालन्यातील चंदनझीरा येथे SIR मॅपिंगला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; एका दिवसात 500 हून अधिक नोंदी महात्मा फुले चौकात विशेष कॅम्प; जवळपास 60% मॅपिंग पूर्ण, उर्वरित लवकरच – पर्यवेक्षक राहुल मुंडे1
- आज सोमवार 30 मार्च रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की छत्रपती संभाजीनगर शहरात सिडको परिसरात एलपीजी गॅस नसल्याने रिक्षा चालकांनी संप पुकारला असून मात्र काही रिक्षा चालकांनी सिटी बस मध्ये जाणाऱ्या प्रवासी यांना दादागिरी करत होते सदरील माहिती सिडको पोलिसांना माहिती दादागिरी करणाऱ्या रिक्षाचालकांना ताब्यात घेतली आहे.1