logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अकोल्याच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल-9 दिवसांच्या चौकशीनंतर पोलिसांची कारवाई अकोल्याच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल-9 दिवसांच्या चौकशीनंतर पोलिसांची कारवाई... अकोल्याचे अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खाण मालकांकडून गिट्टी-दगड खाणी सुरू ठेवण्यासाठी दरमहा 15 हजार रुपये खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ऑडिओ क्लिप पुरावा म्हणून सादर करण्यात आला असून 9 दिवसांच्या चौकशीनंतर पोलिसांनी कारवाई केली. दरम्यान, गायकवाड यांनी सर्व आरोप फेटाळत हे केवळ रॉयल्टी वसुलीसाठी केलेला दबाव असल्याचा दावा केला आहे.

2 days ago
user_अरबाज शेख
अरबाज शेख
Voice of people कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
2 days ago
1f151666-6f9c-42f4-b8ad-75aa94f5d923

अकोल्याच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल-9 दिवसांच्या चौकशीनंतर पोलिसांची कारवाई अकोल्याच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल-9 दिवसांच्या चौकशीनंतर पोलिसांची कारवाई... अकोल्याचे अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खाण मालकांकडून गिट्टी-दगड खाणी सुरू ठेवण्यासाठी दरमहा 15 हजार रुपये खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ऑडिओ क्लिप पुरावा म्हणून सादर करण्यात आला असून 9 दिवसांच्या चौकशीनंतर पोलिसांनी कारवाई केली. दरम्यान, गायकवाड यांनी सर्व आरोप फेटाळत हे केवळ रॉयल्टी वसुलीसाठी केलेला दबाव असल्याचा दावा केला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सिल्लोड तालुक्यातील भवन येथे शुक्रवारी (दि. १७) सकाळी सुमारे नऊ वाजेच्या सुमारास भीषण आग लागून शेतकरी गणेश तेजराव कळम यांचे मोठे नुकसान झाले. भवन शिवारातील गट क्रमांक ९८ मध्ये दोन एकरातील मका काढणीसाठी पंधरा दिवसांपूर्वी सोंगून गंजी करून ठेवण्यात आला होता. मात्र अचानक लागलेल्या आगीत सुमारे १०० क्विंटल मका जळून खाक झाला. प्राथमिक माहितीनुसार, महावितरणच्या विद्युत तारेत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ठिणगी पडून मक्याच्या गंजीने पेट घेतला. उन्हाचे वाढते तापमान आणि कोरडे वातावरण यामुळे आगीने क्षणार्धात भीषण रूप धारण केले. आग विझवण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न केले; मात्र ती एवढ्या वेगाने पसरली की नियंत्रण मिळवणे कठीण झाले. या दुर्घटनेत सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. कष्टाने उभा केलेला पीक हाताशी आले असतानाच जळून गेल्याने शेतकरी कळम हवालदिल झाले आहेत. संबंधित यंत्रणेकडून पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे. ........................
    1
    सिल्लोड तालुक्यातील भवन येथे शुक्रवारी (दि. १७) सकाळी सुमारे नऊ वाजेच्या सुमारास भीषण आग लागून शेतकरी गणेश तेजराव कळम यांचे मोठे नुकसान झाले. भवन शिवारातील गट क्रमांक ९८ मध्ये दोन एकरातील मका काढणीसाठी पंधरा दिवसांपूर्वी सोंगून गंजी करून ठेवण्यात आला होता. मात्र अचानक लागलेल्या आगीत सुमारे १०० क्विंटल मका जळून खाक झाला.
प्राथमिक माहितीनुसार, महावितरणच्या विद्युत तारेत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ठिणगी पडून मक्याच्या गंजीने पेट घेतला. उन्हाचे वाढते तापमान आणि कोरडे वातावरण यामुळे आगीने क्षणार्धात भीषण रूप धारण केले. आग विझवण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न केले; मात्र ती एवढ्या वेगाने पसरली की नियंत्रण मिळवणे कठीण झाले.
या दुर्घटनेत सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. कष्टाने उभा केलेला पीक हाताशी आले असतानाच जळून गेल्याने शेतकरी कळम हवालदिल झाले आहेत. संबंधित यंत्रणेकडून पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.
........................
    user_Chetan Lokhande
    Chetan Lokhande
    Video Creator सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Post by D.hपत्रकार Honmane
    1
    Post by D.hपत्रकार Honmane
    user_D.hपत्रकार Honmane
    D.hपत्रकार Honmane
    Gangapur, Aurangabad•
    15 min ago
  • अजितदादांच्या विमानाचा अपघात; घटनास्थळी रोहित पवार, राजेंद्र पवार दाखल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघाताची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच रोहित पवार आणि राजेंद्र पवार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. बचाव पथक आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी कार्यरत असून मदतकार्य सुरू आहे. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली आहे का याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाकडून पुढील तपास सुरू असून लवकरच सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
    1
    अजितदादांच्या विमानाचा अपघात; घटनास्थळी रोहित पवार, राजेंद्र पवार दाखल
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघाताची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच रोहित पवार आणि राजेंद्र पवार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. बचाव पथक आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी कार्यरत असून मदतकार्य सुरू आहे.
दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली आहे का याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाकडून पुढील तपास सुरू असून लवकरच सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    1
    Post by शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by Shaha News Marathi
    1
    Post by Shaha News Marathi
    user_Shaha News Marathi
    Shaha News Marathi
    Local News Reporter भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by अब तक न्यूज महाराष्ट्र
    1
    Post by अब तक न्यूज महाराष्ट्र
    user_अब तक न्यूज महाराष्ट्र
    अब तक न्यूज महाराष्ट्र
    Local News Reporter भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • मनमाड रेल्वे स्थानकावर थरार; हायटेंशन वायरवर चढलेल्या तरुणाला जीवदान ​मनमाड: येथील रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर एका मनोरुग्ण तरुणाने हायटेंशन ओव्हरहेड वायरवर चढल्याने मोठी खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे प्रशासनाने तातडीने वीज पुरवठा खंडित केला, ज्यामुळे काही काळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वे पोलीस आणि कर्मचाऱ्यांनी सुमारे एक तासाच्या प्रयत्नांनंतर तरुणाला दोरखंडाच्या साहाय्याने सुखरूप खाली उतरवले. हा तरुण वायरपर्यंत पोहोचलाच कसा, याचा तपास आरपीएफ आणि रेल्वे पोलीस करत आहेत.
    2
    मनमाड रेल्वे स्थानकावर थरार; हायटेंशन वायरवर चढलेल्या तरुणाला जीवदान
​मनमाड: येथील रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर एका मनोरुग्ण तरुणाने हायटेंशन ओव्हरहेड वायरवर चढल्याने मोठी खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे प्रशासनाने तातडीने वीज पुरवठा खंडित केला, ज्यामुळे काही काळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वे पोलीस आणि कर्मचाऱ्यांनी सुमारे एक तासाच्या प्रयत्नांनंतर तरुणाला दोरखंडाच्या साहाय्याने सुखरूप खाली उतरवले. हा तरुण वायरपर्यंत पोहोचलाच कसा, याचा तपास आरपीएफ आणि रेल्वे पोलीस करत आहेत.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • दिनांक १७/०४/२०२५ रोजी मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश-०२. जालना मा. श्रीमती. एन. एस. शेख मॅडम यांनी आरोपी कं. ०१. शंकर दगडुबा पतंगे, वय २६ वर्ष; आरोपी कं. ०२. पांडुरंग नरहरी रोकडे, वय ३६ वर्षे, आरोपी कं.०३. पवन नरहरी रोकडे, वय-२६ वर्ष आणि आरोपी कं. ०४. नरहरी बापुराव रोकडे, वय ६० वर्ष सर्व रा. अंबा ता. परतुर, जि. जालना यांनी मयत नामे कृष्णा गुणाजी थोंगडे याचा निर्वृणपणे खून केल्या प्रकरणी कलम ३०२, १२० वी सह कलम ३४ भा.द.वी. अन्वये जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी दहा हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास १ वर्षे कारावासची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अॅड. सौ. जयश्री नारायण बोराडे यांनी काम पाहिले. घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, मयत कृष्णा गुणाजी भोंगडे हा दिनांक ०८/०८/२०२३ रोजी रात्री त्याचे मेडीकलचे दुकान बंद करून त्याच्या घरी जात असतांना वरील आरोपींनी शेतीच्या तसेच पाण्याच्या पाईप लाईनच्या वादाच्या कारणावरून कट रचुन संगमताने फावडयाच्या दांड्याने, कोयत्याने व काठीने जबर मारहाण करून निर्वृणपणे खुन केला. फिर्यादी सागर गुणाजी धोंगडे यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन परतुर येथे गुन्हा कं. ३३१/२०२३ कलम ३०७, ३२६, ३४ भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल होवुन त्यांनतर जखमी कृष्णा च्या मृत्यू नंतर सदर प्रकरणात कलम ३०२, १२० वी सह कलम ३४ भा.द.वि. प्रमाणे कलम वाढ झाली. त्यांनतर संपुर्ण तपास झाल्यानंतर सदर गुन्हयात तपासीक अधिकारी श्री. एम. टी. सुरवसे, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन परतुर यांच्याकडून मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे सदर प्रकरणात एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेली मयताची आई (फिर्यादी) व पत्नी, वैदयकिय अधिकारी, पंच तसेच इतर महत्वाचे साक्षीदार व तपासणीक अधिकारी श्री. एम. टी. सुरवसे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सरकारपक्षातर्फे दिलेला पुरावा व युक्तीवाद लक्षात घेवून मा. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश-०२, जालना मा. श्रीमती. एन. एस. शेख मॅडम यांनी सर्व आरोपींना मयत कृष्णा गुणाजी धोंगडे यांचा निर्वृणपणे खून केल्या प्रकरणी कलम ३०२, १२० वी सह कलम ३४ भादवी मध्ये जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी दहा हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास १ वर्षे कारावासबी शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. सौ. जयश्री नारायण बोराडे यांनी काम पाहिले. या प्रकरणात सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. सौ. जयश्री नारायण योराडे यांनी काम पाहिले व सदर प्रकरणामध्ये मा. पोलीस अधिक्षक श्री. अजयकुमार बन्सल साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. आयुष नोपाणी साहेव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग परतुर श्री.. आर. टी. रेंगे साहेब व सध्याचे पोलीस निरीक्षक श्री. भागवत सुदाम साहेय व कोर्ट पैरवी व जिल्हा सरकारी वकील कार्यालयातील कर्मचारी यांनी मदत केली.
    1
    दिनांक १७/०४/२०२५ रोजी मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश-०२. जालना मा. श्रीमती. एन. एस. शेख मॅडम यांनी आरोपी कं. ०१. शंकर दगडुबा पतंगे, वय २६ वर्ष; आरोपी कं. ०२. पांडुरंग नरहरी रोकडे, वय ३६ वर्षे, आरोपी कं.०३. पवन नरहरी रोकडे, वय-२६ वर्ष आणि आरोपी कं. ०४. नरहरी बापुराव रोकडे, वय ६० वर्ष सर्व रा. अंबा ता. परतुर, जि. जालना यांनी मयत नामे कृष्णा गुणाजी थोंगडे याचा निर्वृणपणे खून केल्या प्रकरणी कलम ३०२, १२० वी सह कलम ३४ भा.द.वी. अन्वये जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी दहा हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास १ वर्षे कारावासची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात
सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अॅड. सौ. जयश्री नारायण बोराडे यांनी काम पाहिले. घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, मयत कृष्णा गुणाजी भोंगडे हा दिनांक ०८/०८/२०२३ रोजी रात्री त्याचे मेडीकलचे दुकान बंद करून त्याच्या घरी जात असतांना वरील आरोपींनी शेतीच्या तसेच पाण्याच्या पाईप लाईनच्या वादाच्या कारणावरून कट रचुन संगमताने फावडयाच्या दांड्याने, कोयत्याने व काठीने जबर मारहाण करून निर्वृणपणे खुन केला.
फिर्यादी सागर गुणाजी धोंगडे यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन परतुर येथे गुन्हा कं. ३३१/२०२३ कलम ३०७, ३२६, ३४ भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल होवुन त्यांनतर जखमी कृष्णा च्या मृत्यू नंतर सदर प्रकरणात कलम ३०२, १२० वी सह कलम ३४ भा.द.वि. प्रमाणे कलम वाढ झाली. त्यांनतर संपुर्ण तपास झाल्यानंतर सदर गुन्हयात तपासीक अधिकारी श्री. एम. टी. सुरवसे, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन परतुर यांच्याकडून मा. न्यायालयात
दोषारोपपत्र दाखल केले.
सरकार पक्षातर्फे सदर प्रकरणात एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेली मयताची आई (फिर्यादी) व पत्नी, वैदयकिय अधिकारी, पंच तसेच इतर महत्वाचे साक्षीदार व तपासणीक अधिकारी श्री. एम. टी. सुरवसे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.
सरकारपक्षातर्फे दिलेला पुरावा व युक्तीवाद लक्षात घेवून मा. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश-०२, जालना मा. श्रीमती. एन. एस. शेख मॅडम यांनी सर्व आरोपींना मयत कृष्णा गुणाजी धोंगडे यांचा निर्वृणपणे खून केल्या प्रकरणी कलम ३०२, १२० वी सह कलम ३४ भादवी मध्ये जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी दहा हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास १ वर्षे कारावासबी शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. सौ. जयश्री नारायण बोराडे यांनी काम पाहिले.
या प्रकरणात सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. सौ. जयश्री नारायण योराडे यांनी काम पाहिले व सदर प्रकरणामध्ये मा. पोलीस अधिक्षक श्री. अजयकुमार बन्सल साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. आयुष नोपाणी साहेव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग परतुर श्री.. आर. टी. रेंगे साहेब व सध्याचे पोलीस निरीक्षक श्री. भागवत सुदाम साहेय व कोर्ट पैरवी व जिल्हा सरकारी वकील कार्यालयातील कर्मचारी यांनी मदत केली.
    user_Yakin Shaikh
    Yakin Shaikh
    Construction Contractor बदनापूर, जालना, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • धुळे जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल साडेसात कोटी रुपयांचा गांजा आणि अफू साठा नष्ट केला आहे. एकूण 3,624 किलो अंमली पदार्थांची कायदेशीर प्रक्रियेनंतर विल्हेवाट लावण्यात आली.
    1
    धुळे जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल साडेसात कोटी रुपयांचा गांजा आणि अफू साठा नष्ट केला आहे. एकूण 3,624 किलो अंमली पदार्थांची कायदेशीर प्रक्रियेनंतर विल्हेवाट लावण्यात आली.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.