logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आयुष्यातील देवाची भेट अनमोल माणसं....! देव कधी कधी आपल्या आयुष्यात काही खास माणसं पाठवतो… अगदी शांतपणे, कोणताही गाजावाजा न करता. त्यांची येण्याची एंट्री जोरात नसते, कोणताही इशारा मिळत नाही; पण अचानकच ती माणसं आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनतात. जणू देवानेच आपल्या प्रवासासाठी योग्य सोबती, योग्य मार्गदर्शक निवडून पाठवलेले असतात. ही माणसं आपल्या आयुष्यात “योगायोग” म्हणून येतात, पण नंतर कळतं.तो योगायोग नसतो… तो देवाचा नियोजन असतो. आपण हरवलो असतो तेव्हा त्यांचा एक शब्द आपल्याला सावरतो. आपण चुकीच्या वाटेवर वळतो तेव्हा त्यांची शांत समज आपल्याला योग्य मार्गावर आणते. त्यांच्या विश्वासामुळे आणि आपल्या क्षमतेवर असलेल्या श्रद्धेमुळे ती माणसं आपल्या आयुष्याची खरी ताकद बनतात. ही माणसं मोठ्या शब्दांत शिकवत नाहीत; पण त्यांच्या साध्या वागण्यातून, कृतीतून, आणि नजरेतील विश्वासातून आपल्याला दिशा मिळते. आपण खचलेलो असतो, ते हात धरून उभे राहतात; आपण चुकलो, तर रागावतात पण सोडत नाहीत. आपले यश साजरे करतात, अपयशात खंबीरपणे साथ देतात. पण आयुष्याची वेदनादायी गोष्ट अशी आहे की, आपण अनेकदा या माणसांची किंमत वेळेवर ओळखत नाही. त्यांच्या सततच्या उपस्थितीची सवय होते, आणि सवय झाली की त्यांची किंमत कमी वाटू लागते. “ते आहेतच” या गृहितकात आपण जगतो; त्यांच्या त्यागांकडे, काळजीकडे, त्यांच्या पाठीशी उभं राहण्याच्या न बोलता केलेल्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष होतो. आणि मग एक दिवस येतो… परिस्थिती बदलते, वेळ निघून जाते, नाती दुरावतात. तेव्हा जाणवतं.आपल्या आयुष्यातील तो आधारस्तंभ आपण किती सहज गमावला. आठवणी राहतात, पण साथ नसते; शब्द राहतात, पण ऐकणारा नसतो; मनात कृतज्ञता उसळते, पण व्यक्त करायला ती माणसं समोर नसतात. आणि हृदय विचार करत राहते.“जर आपण त्यांना थोडं जपलं असतं तर?” म्हणूनच देवाने दिलेली अशी माणसं वेळेवर ओळखणं फार महत्त्वाचं आहे. त्यांच्या अस्तित्वाची कदर करा. त्यांना वेळ द्या. संवाद ठेवा. “तू आहेस म्हणून मी आहे,” हे मनापासून सांगा. नातं टिकवण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते.गरज असते ती प्रामाणिकपणाची, संवादाची आणि जपण्याच्या इच्छेची. जी माणसं आपल्याला योग्य दिशा दाखवतात, ती आपल्या आयुष्याची खरी संपत्ती असतात. पैसा, पद, प्रतिष्ठा हे सगळं नंतरचं; पण योग्य वेळी मिळालेली योग्य साथ आयुष्य घडवते. देव प्रत्येक वेळी स्वतः येत नाही… तो अशा माणसांच्या रूपानेच आपल्या सोबत असतो. त्यांच्या छोट्या-छोट्या त्यागांची, न बोलता केलेल्या काळजीची, पाठीशी उभं राहण्याच्या जिद्दीची किंमत वेळ असताना ओळखा. आजच त्यांना आपल्या मनाची मोकळीक द्या, प्रेम व्यक्त करा, कृतज्ञता व्यक्त करा, आणि त्यांची साथ आयुष्यभर टिकवण्याचा प्रयत्न करा. कारण उद्या कदाचित उशीर झालेला असेल… आणि उशिरा उमजलेली किंमत आयुष्यभर मनाला टोचत राहते. देवाने दिलेली ती अनमोल माणसं ओळखा, जपा, आणि आयुष्यभर मनाच्या जवळ ठेवा. त्यांची साथ हीच खरी देवाची भेट आहे. © दीपक पवार (संपादक) खान्देश माझा

4 hrs ago
user_दीपक  पवार
दीपक पवार
Academy Dharangaon, Jalgaon•
4 hrs ago
34548268-e195-4c3a-8bb3-98fa86620f3e

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Kishor k Patil Patil
    2
    Post by Kishor k Patil Patil
    user_Kishor k Patil Patil
    Kishor k Patil Patil
    पाचोरा, जळगाव, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील हाडाखेड सीमेवर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांविरोधात शिरपूरमध्ये नागरिकांनी अनोखे आंदोलन केले. शिरपूर फर्स्टच्या वतीने महामार्गावरील खड्ड्यात बसून ‘26 लाखांच्या खड्ड्याची सत्यनारायण पूजा’ करून प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला.
    1
    मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील हाडाखेड सीमेवर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांविरोधात शिरपूरमध्ये नागरिकांनी अनोखे आंदोलन केले. शिरपूर फर्स्टच्या वतीने महामार्गावरील खड्ड्यात बसून ‘26 लाखांच्या खड्ड्याची सत्यनारायण पूजा’ करून प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथे मका गंजीला आग; शेतकऱ्याचे मोठे नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथे शेतातील मक्काच्या गंजीला अचानक आग लागून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमसरी येथील शेतकरी पुंडलिक शामराव बावस्कर यांच्या गट नं. ३१४, क्षेत्र १.३१, शिवना शिवारातील शेतात झाकून ठेवलेल्या मक्काच्या गंजीला दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत गंजीतील मोठ्या प्रमाणात मका जळून खाक झाला असून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत गंजीतील मोठ्या प्रमाणात मका जळून खाक झाला होता. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेमुळे शेतकरी पुंडलिक बावस्कर यांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
    1
    सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथे मका गंजीला आग; शेतकऱ्याचे मोठे नुकसान
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथे शेतातील मक्काच्या गंजीला अचानक आग लागून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमसरी येथील शेतकरी पुंडलिक शामराव बावस्कर यांच्या गट नं. ३१४, क्षेत्र १.३१, शिवना शिवारातील शेतात झाकून ठेवलेल्या मक्काच्या गंजीला दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत गंजीतील मोठ्या प्रमाणात मका जळून खाक झाला असून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत गंजीतील मोठ्या प्रमाणात मका जळून खाक झाला होता. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
या घटनेमुळे शेतकरी पुंडलिक बावस्कर यांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • संरक्षण जाळी तोडून खोलीत घुसला बिबट्या; वनविभागाने घटनास्थळी भेट देत केला पंचनामा सोयगाव प्रतिनिधी दिलीप मोरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील डाभा परिसरात बिबट्याने हल्ला करून शेतकरी महिलेच्या शेळ्या ठार केल्याची घटना घडली आहे. डाभा येथील शेतकरी कमलबाई रमेश रगड यांची शेती देऊळगाव – सावळदबारा रस्त्यालगत, गट क्रमांक ८२ मध्ये आहे. येथे शेळीपालनासाठी टीन पत्र्यांची खोली बांधून परिसराला संरक्षणासाठी जाळी लावण्यात आली होती. मात्र, सोमवारी (दि. ९ मार्च २०२६) रात्री वन्य प्राणी बिबट्याने संरक्षण जाळी तोडून आत प्रवेश केला आणि ४ बकऱ्या व २ बोकड असे एकूण ६ शेळ्यांना ठार केले. या खोलीमध्ये पार्टिशन जाळी असल्यामुळे इतर काही शेळ्या वाचल्या असल्या तरी या घटनेमुळे शेतकरी महिलेचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना वर्दळीच्या ठिकाणी घडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही महिन्यांपासून या भागात बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, या घटनेची माहिती शेतकऱ्यांनी तत्काळ अजिंठा वन विभागाला दिल्यानंतर सावळदबारा बीटचे अधिकारी प्रवीण गवळी, वनसेवक युसुफ पठाण तसेच पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी पाहणी करून पंचनामा केला असून पुढील कार्यालयीन कार्यवाहीसाठी अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शेळीपालन करून उदरनिर्वाह करणाऱ्या कमलबाई रमेश रगड यांना या घटनेमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा तसेच झालेल्या नुकसानीची त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
    1
    संरक्षण जाळी तोडून खोलीत घुसला बिबट्या; वनविभागाने घटनास्थळी भेट देत केला पंचनामा
सोयगाव प्रतिनिधी दिलीप मोरे
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील डाभा परिसरात बिबट्याने हल्ला करून शेतकरी महिलेच्या शेळ्या ठार केल्याची घटना घडली आहे.
डाभा येथील शेतकरी कमलबाई रमेश रगड यांची शेती देऊळगाव – सावळदबारा रस्त्यालगत, गट क्रमांक ८२ मध्ये आहे. येथे शेळीपालनासाठी टीन पत्र्यांची खोली बांधून परिसराला संरक्षणासाठी जाळी लावण्यात आली होती. मात्र, सोमवारी (दि. ९ मार्च २०२६) रात्री वन्य प्राणी बिबट्याने संरक्षण जाळी तोडून आत प्रवेश केला आणि ४ बकऱ्या व २ बोकड असे एकूण ६ शेळ्यांना ठार केले.
या खोलीमध्ये पार्टिशन जाळी असल्यामुळे इतर काही शेळ्या वाचल्या असल्या तरी या घटनेमुळे शेतकरी महिलेचे मोठे नुकसान झाले आहे.
ही घटना वर्दळीच्या ठिकाणी घडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही महिन्यांपासून या भागात बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती शेतकऱ्यांनी तत्काळ अजिंठा वन विभागाला दिल्यानंतर सावळदबारा बीटचे अधिकारी प्रवीण गवळी, वनसेवक युसुफ पठाण तसेच पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी पाहणी करून पंचनामा केला असून पुढील कार्यालयीन कार्यवाहीसाठी अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शेळीपालन करून उदरनिर्वाह करणाऱ्या कमलबाई रमेश रगड यांना या घटनेमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा तसेच झालेल्या नुकसानीची त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
    user_DILIP DESHMUKH
    DILIP DESHMUKH
    Farmer सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • #jalna#marathinews#
    1
    #jalna#marathinews#
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    Bhokardan, Jalna•
    1 hr ago
  • भोकरदन बस स्थानकामध्ये आलेल्या बसमध्ये एका वृद्ध महिलेची मंगळसूत्र चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहेत
    1
    भोकरदन बस स्थानकामध्ये आलेल्या बसमध्ये एका वृद्ध महिलेची मंगळसूत्र चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहेत
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    पत्रकार भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    1
    Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    user_🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    Photographer नांदगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    35 min ago
  • #marathi#news#jalna#
    1
    #marathi#news#jalna#
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    Bhokardan, Jalna•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.