logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वाशीम–दिग्रस बस सेवा बंद : प्रवाशांचा संताप उसळला! मानोरा : (प्रतिनिधी) वाशीम ते दिग्रस दरम्यानची बस सेवा गेल्या काही वर्षांपासून बंद असल्यामुळे पाळोदी, फुलउमरी, उमरी व पोहरादेवी परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या मार्गावर पूर्वी वाशीमहून धानोरा, शेंदुरजना, फुलउमरी मार्गे दिग्रस येथे सायंकाळी मुक्कामी येणारी बस दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता फुलउमरी येथून वाशीमकडे रवाना होत असे. मात्र ही सेवा अचानक बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल सुरू झाले आहेत. सध्या वाशीम जिल्हा ठिकाणी शासकीय, शैक्षणिक व वैद्यकीय कामांसाठी जाणाऱ्या नागरिकांना थेट बस उपलब्ध नसल्याने खाजगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. प्रवाशांना शेंदुरजना किंवा धानोरा येथे जाऊन बस पकडावी लागते, ज्यामुळे वेळ व खर्च दोन्ही वाढत आहेत. उशीर झाल्यास नागरिकांना मंगरुळपीर, मानोरा, पोहरादेवी असा वळसा घेत रात्री उशिरा घरी परतावे लागत असल्याने महिलांमध्ये व ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पाळोदी, फुलउमरी, उमरी व पोहरादेवी येथील ग्रामस्थांनी वाशीम ते दिग्रस बस सेवा तात्काळ सुरू करण्याची जोरदार मागणी केली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात येत आहे. # बस सेवा सुरू करा, अन्यथा रस्त्यावर उतरू! असा सवाल कपिल पवार माजी सरपंच उमरी खुर्द # वाशीम–दिग्रस बस सेवा बंद झाल्यामुळे पाळोदी, फुलउमरी, उमरी व पोहरादेवी परिसरातील नागरिकांना होत असलेली गैरसोय गंभीर आहे. विद्यार्थ्यांपासून ते शेतकरी व रुग्णांपर्यंत सर्वच घटकांना याचा फटका बसत आहे. ही बाब अत्यंत महत्त्वाची असून संबंधित परिवहन विभागाशी तात्काळ चर्चा करून बस सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. नागरिकांची अडचण दूर करणे ही आमची प्राथमिकता आहे. आमदार बाबुसिंग महाराज श्रीक्षेत्र पोहरादेवी

6 hrs ago
user_कु.मोनाली अनिल राठोड
कु.मोनाली अनिल राठोड
पत्रकार मानोरा, वाशिम, महाराष्ट्र•
6 hrs ago

वाशीम–दिग्रस बस सेवा बंद : प्रवाशांचा संताप उसळला! मानोरा : (प्रतिनिधी) वाशीम ते दिग्रस दरम्यानची बस सेवा गेल्या काही वर्षांपासून बंद असल्यामुळे पाळोदी, फुलउमरी, उमरी व पोहरादेवी परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या मार्गावर पूर्वी वाशीमहून धानोरा, शेंदुरजना, फुलउमरी मार्गे दिग्रस येथे सायंकाळी मुक्कामी येणारी बस दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता फुलउमरी येथून वाशीमकडे रवाना होत असे. मात्र ही सेवा अचानक बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल सुरू झाले आहेत. सध्या वाशीम जिल्हा ठिकाणी शासकीय, शैक्षणिक व वैद्यकीय कामांसाठी जाणाऱ्या नागरिकांना थेट बस उपलब्ध नसल्याने खाजगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. प्रवाशांना शेंदुरजना किंवा धानोरा येथे जाऊन बस पकडावी लागते, ज्यामुळे वेळ व खर्च दोन्ही वाढत आहेत. उशीर झाल्यास नागरिकांना मंगरुळपीर, मानोरा, पोहरादेवी असा वळसा घेत रात्री उशिरा घरी परतावे लागत असल्याने महिलांमध्ये व ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पाळोदी, फुलउमरी, उमरी व पोहरादेवी येथील ग्रामस्थांनी वाशीम ते दिग्रस बस सेवा तात्काळ सुरू करण्याची जोरदार मागणी केली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात येत आहे. # बस सेवा सुरू करा, अन्यथा रस्त्यावर उतरू! असा सवाल कपिल पवार माजी सरपंच उमरी खुर्द # वाशीम–दिग्रस बस सेवा बंद झाल्यामुळे पाळोदी, फुलउमरी, उमरी व पोहरादेवी परिसरातील नागरिकांना होत असलेली गैरसोय गंभीर आहे. विद्यार्थ्यांपासून ते शेतकरी व रुग्णांपर्यंत सर्वच घटकांना याचा फटका बसत आहे. ही बाब अत्यंत महत्त्वाची असून संबंधित परिवहन विभागाशी तात्काळ चर्चा करून बस सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. नागरिकांची अडचण दूर करणे ही आमची प्राथमिकता आहे. आमदार बाबुसिंग महाराज श्रीक्षेत्र पोहरादेवी

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • दारव्हा तालुक्यातील नायगाव येथे दिनांक ३० मार्च  रोजी सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे काढणीच्या अवस्थेत असलेला गहू, ज्वारी आणि तीळ या प्रमुख पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके अक्षरशः आडवी पडून जमिनीदोस्त झाली असून उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके कापणीसाठी तयार होती. मात्र, वादळी वाऱ्यामुळे पिके पडल्याने कापणी करणे कठीण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातात येणारा उत्पन्नाचा मुख्य आधारच डळमळीत झाला आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्यात भिजल्याने त्यांची गुणवत्ता खालावण्याची शक्यता असून बाजारभावावरही त्याचा परिणाम होणार आहे.  दरम्यान, नायगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाकडे मदतीची मागणी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच पीकविमा योजनेंतर्गतही मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
    1
    दारव्हा तालुक्यातील नायगाव येथे दिनांक ३० मार्च  रोजी सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे काढणीच्या अवस्थेत असलेला गहू, ज्वारी आणि तीळ या प्रमुख पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके अक्षरशः आडवी पडून जमिनीदोस्त झाली असून उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या रब्बी हंगामातील पिके कापणीसाठी तयार होती. मात्र, वादळी वाऱ्यामुळे पिके पडल्याने कापणी करणे कठीण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातात येणारा उत्पन्नाचा मुख्य आधारच डळमळीत झाला आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्यात भिजल्याने त्यांची गुणवत्ता खालावण्याची शक्यता असून बाजारभावावरही त्याचा परिणाम होणार आहे. 
दरम्यान, नायगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाकडे मदतीची मागणी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच पीकविमा योजनेंतर्गतही मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
    user_GAJAANNAN THHAKKARE
    GAJAANNAN THHAKKARE
    दारव्हा, यवतमाळ, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • इसापूर येथील श्याम गायकवाड याने सकाळपासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक टॉवरवर चढून विविध मागण्यांसंदर्भात आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली होती. इसापूर ग्रामपंचायत अंतर्गत नमुना ८ चोरी गेल्याची तक्रार सचिव, सरपंच, उपसरपंच यांनी पोलिस स्टेशनला दिली. त्या तक्रारीवरून काय कार्यवाही झाली, याचा खुलासा द्यावा. इसापूर येथील गावाचा नकाशा नसल्याने कोणते कोणाचे घर आहे. हे सिद्ध होत नाही. काही लोकांना नोटरीनुसार त्यांची नावे नमुना ८ मध्ये नोंद घेण्याचा नियम आहे. आपल्या घराचा नोटरीकृत असलेल्या दस्तानुसार घर नावाने करून द्यावे, एकाच मालमत्तेवर दोन वा तीन व्यक्तीची मालकी कशी याचाही खुलासा देऊन दोषींवर कारवाई करावी, अशा विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. गटविकास अधिकाऱ्यांनी प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी यांना सदर आंदोलकाच्या मागण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात याती व आंदोलकाला आंदोलनापासून परावृत्त करण्याबाबत पत्र दिले.
    1
    इसापूर येथील श्याम गायकवाड याने सकाळपासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक टॉवरवर चढून विविध मागण्यांसंदर्भात आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली होती. इसापूर ग्रामपंचायत अंतर्गत नमुना ८ चोरी गेल्याची तक्रार सचिव, सरपंच, उपसरपंच यांनी पोलिस स्टेशनला दिली. त्या तक्रारीवरून काय कार्यवाही झाली, याचा खुलासा द्यावा. इसापूर येथील गावाचा नकाशा नसल्याने कोणते कोणाचे घर आहे. हे सिद्ध होत नाही. काही लोकांना नोटरीनुसार त्यांची नावे नमुना ८ मध्ये नोंद घेण्याचा नियम आहे. आपल्या घराचा नोटरीकृत असलेल्या दस्तानुसार घर नावाने करून द्यावे, एकाच मालमत्तेवर दोन वा तीन व्यक्तीची मालकी कशी याचाही खुलासा देऊन दोषींवर कारवाई करावी, अशा विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. गटविकास अधिकाऱ्यांनी प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी यांना सदर आंदोलकाच्या मागण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात याती व आंदोलकाला आंदोलनापासून परावृत्त करण्याबाबत पत्र दिले.
    user_Sajid Patlewale
    Sajid Patlewale
    दिग्रस, यवतमाळ, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • हिंगोली | प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक राजू इंगोले, जिल्हा सचिव सिद्धांत गायकवाड, तसेच जिल्हा समन्वयक सरपंच राहुल करवंदे यांनी हिंगोली वंचित जिल्हाध्यक्ष नियुक्तीवर आक्षेप घेत पक्षश्रेष्ठींकडे आपले राजीनामे सादर केले होते. दरम्यान, आज पुन्हा एकदा “राजगृहातच राहण्याचा” निर्णय घेत त्यांनी वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब यशवंतराव आंबेडकर यांचे लहान बंधू तसेच रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेत अधिकृत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू व रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय युवा नेतृत्व अमनसाहेब आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वसमत येथे पार पडला. सदर पक्षप्रवेश कार्यक्रम युवक प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी म्हणून प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशिल कुमार सुर्यवंशी, लिगल सेल महाराष्ट्र नेते ॲड. रावन धाबे, जिल्हाध्यक्ष कैलास जोंधळे, आकाश दातार, विक्की काशिदे, ॲड. धम्मरत्न कांबळे, ॲड. बालाजी खरात, ॲड. रामराव जुमडे, विजय कांबळे, केशव कदम, गोरख खिल्लारे, सूरज वाघमारे, संदीप थोरात, राजू गायकवाड, रवी खंडागळे, सचिन जोंधळे, अरविंद साळवे, भारत गडधने, भीमराव इंगोले, कामाजी खिल्लारे, संजय वाकळे, भारत वाकळे, देवा कांबळे, लखन सरतापे, यशवंत साळवे, महेंद्र घोंगडे , अक्षय खाडे, मारोती राठोड, अनिल राठोड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेची ताकद वाढणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. सूत्रसंचनल ॲड. रावन धाबे यांनी केले. तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष कैलास जोंधळे यांनी केले. आभार भारत गडधणे यांनी मानले.
    1
    हिंगोली | प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक राजू इंगोले, जिल्हा सचिव सिद्धांत गायकवाड, तसेच  जिल्हा समन्वयक सरपंच राहुल करवंदे यांनी हिंगोली वंचित जिल्हाध्यक्ष नियुक्तीवर आक्षेप घेत पक्षश्रेष्ठींकडे आपले राजीनामे सादर केले होते.
दरम्यान, आज पुन्हा एकदा “राजगृहातच राहण्याचा” निर्णय घेत त्यांनी वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब यशवंतराव आंबेडकर यांचे लहान बंधू तसेच रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेत अधिकृत प्रवेश केला.
हा पक्षप्रवेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू व रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय युवा नेतृत्व अमनसाहेब आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वसमत येथे पार पडला.
सदर पक्षप्रवेश कार्यक्रम युवक प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
यावेळी महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी म्हणून प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशिल कुमार सुर्यवंशी, लिगल सेल महाराष्ट्र नेते ॲड. रावन धाबे,  जिल्हाध्यक्ष कैलास जोंधळे, आकाश दातार, विक्की काशिदे, ॲड. धम्मरत्न कांबळे, ॲड. बालाजी खरात, ॲड. रामराव जुमडे, विजय कांबळे, केशव कदम, गोरख खिल्लारे, सूरज वाघमारे, संदीप थोरात, राजू गायकवाड, रवी खंडागळे, सचिन जोंधळे, अरविंद साळवे, भारत गडधने, भीमराव इंगोले, कामाजी खिल्लारे, संजय वाकळे, भारत वाकळे, देवा कांबळे, लखन सरतापे, यशवंत साळवे, महेंद्र घोंगडे , अक्षय खाडे, मारोती राठोड, अनिल राठोड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेची ताकद वाढणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. सूत्रसंचनल ॲड. रावन धाबे यांनी केले. तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष कैलास जोंधळे यांनी केले. आभार भारत गडधणे यांनी मानले.
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by वैजनाथ पावडे
    1
    Post by वैजनाथ पावडे
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • धामणगाव रेल्वे येथे महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी धामणगांव रेल्वे : जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त धामणगांव रेल्वे शहरात महावीर जयंती उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच जैन मंदिर परिसरात पूजा-अर्चा, अभिषेक, धार्मिक विधी तसेच प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते. भगवान महावीर यांच्या प्रतिमेची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. यानंतर शहरातून भव्य शोभायात्रा व मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत जैन समाजातील महिला, पुरुष, युवक-युवती तसेच बालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. धार्मिक घोषणाबाजी, भजन, ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेले होते. मिरवणूक शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात येत महावीर भवनपर्यंत पोहोचली. भगवान महावीर यांनी दिलेल्या अहिंसा, सत्य, करुणा व मानवतेच्या संदेशाचे आचरण जीवनात करण्याचे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसाद वितरण तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महावीर जयंतीनिमित्त संपूर्ण धामणगांव रेल्वे शहरात आनंद, उत्साह आणि धार्मिक एकतेचे वातावरण पाहायला मिळाले. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे
    1
    धामणगाव रेल्वे येथे महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी
धामणगांव रेल्वे : जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त धामणगांव रेल्वे शहरात महावीर जयंती उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच जैन मंदिर परिसरात पूजा-अर्चा, अभिषेक, धार्मिक विधी तसेच प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते.
भगवान महावीर यांच्या प्रतिमेची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. यानंतर शहरातून भव्य शोभायात्रा व मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत जैन समाजातील महिला, पुरुष, युवक-युवती तसेच बालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. धार्मिक घोषणाबाजी, भजन, ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेले होते.
मिरवणूक शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात येत महावीर भवनपर्यंत पोहोचली. भगवान महावीर यांनी दिलेल्या अहिंसा, सत्य, करुणा व मानवतेच्या संदेशाचे आचरण जीवनात करण्याचे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसाद वितरण तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महावीर जयंतीनिमित्त संपूर्ण धामणगांव रेल्वे शहरात आनंद, उत्साह आणि धार्मिक एकतेचे वातावरण पाहायला मिळाले.
सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    6 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Post by वैजनाथ पावडे
    1
    Post by वैजनाथ पावडे
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.