परभणीत नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ भव्य रॅली परभणीत नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ भव्य रॅली परभणी : नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ आज परभणी शहरात भव्य बाईक रॅली व पदयात्रा काढण्यात आली. या रॅलीत महिलांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.या रॅलीला पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागांतून ही रॅली काढण्यात आली, ज्यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.यावेळी बोलताना, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिलांना विधिमंडळ सभागृहात ३३ टक्के आरक्षण मिळवून देण्यासाठी नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. महिलांनी केवळ लाभार्थी न राहता देशाच्या धोरणनिर्मितीत सक्रिय सहभाग घ्यावा, या उद्देशाने हे ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आल्याचे मत व्यक्त करण्यात आले.रॅलीदरम्यान नारीशक्तीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. महिलसक्षमीकरणाचा संदेश देत ही बाईक रॅली व पदयात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली.कार्यक्रम शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
परभणीत नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ भव्य रॅली परभणीत नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ भव्य रॅली परभणी : नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ आज परभणी शहरात भव्य बाईक रॅली व पदयात्रा काढण्यात आली. या रॅलीत महिलांचा
मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.या रॅलीला पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागांतून ही रॅली काढण्यात आली, ज्यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.यावेळी बोलताना, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
यांच्या नेतृत्वाखाली महिलांना विधिमंडळ सभागृहात ३३ टक्के आरक्षण मिळवून देण्यासाठी नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. महिलांनी केवळ लाभार्थी न राहता देशाच्या धोरणनिर्मितीत सक्रिय सहभाग घ्यावा, या उद्देशाने हे ऐतिहासिक
पाऊल उचलण्यात आल्याचे मत व्यक्त करण्यात आले.रॅलीदरम्यान नारीशक्तीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. महिलसक्षमीकरणाचा संदेश देत ही बाईक रॅली व पदयात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली.कार्यक्रम शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
- आकांक्षा गायकवाड यांच्या आई वडिलांचे साखळी उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड1
- Post by अशोक दगडू वाघमारे1
- धक्कादायक प्रकार! नाशिक कार्यालयात लैंगिक छळ व जबरदस्ती धर्मांतराचे आरोप; व्हायरल व्हिडिओ ! #Everyonehighlightfollowers सोशल मीडियावर मैत्री करून तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे. त्यांचे अश्लील फोटो-व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याची माहितीही उघड झाली आहे. या प्रकरणी आरोपी अटक करण्यात आली असून, या घटनेने अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. तसा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.1
- उमदरीयेथील गट क्रमांक ५८/३ मध्ये सुरू असलेल्याबेकायदशीर मुरूम उपशाबाबतची बातमी प्रसिद्ध होऊनही आणि प्रशासनाकडे पुराव्यासह तक्रारकरूनही, भूमाफियांनी आपला धुमाकूळ थांबवलेला नाही. उलट, अधिक जोमाने रात्रीच्या अंधारात जेसीबी आणि हायवा टिपर्सच्या साहाय्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल लुटला जात आहे. प्रशासनाच्या या ‘थंडा‘ भूमिकेमुळे आता महसूल विभागाचेच या अवैध धंद्याला मूक संमती तर नाही ना? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समिती सदस्य भाई असद इब्राहिमसाब बल्खी यांनी १ एप्रिल रोजी तहसीलदारांना लेखी निवेदन दिले होते. या निवेदनात स्पष्टपणे अवैध उत्खनना चा उल्लेख असता नाही, अद्याप घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी कोणतीही यंत्रणा पोहोचलेली नाही. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर यंत्रणा सतर्क होण्याऐवजी भूमाफियांना मोकळे रान मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रार झाल्या पासून हे उत्खनन थांबण्या ऐवजी त्याचे स्वरूप अधिक ‘चोरटे‘ झाले आहे. ५ ते ६ हायवा टिपर्सच्या माध्यमातून रातोरात मुरूम गायब केला जात आहे. पर्यावरणाची मोठी हानी होत असतानाही स्थानिक महसूल कर्मचारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचाआरोप होत आहे. ‘जाया मोका‘ पंचनामा त्वरित होणे अपेक्षित असताना टाळाटाळ का केली जात आहे? आता चेंडू महसूल प्रशासनाच्या कोर्टात आहे. मुखेडचे तहसीलदार याकडे गांभीर्याने बघून गुन्हे दाखल करणार की भूमाफियांना अभय देणार, याकडे संपूर्ण तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.2
- विशेष अधिवेशन घेऊन नारिशक्ती वंदन या अभियाना अंतर्गत घटना दुरुस्ती करणार असल्यामुळे देशाचे पंत प्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार -भारतीय जनता पार्टी प्रदेश उप अध्यक्षा अर्चना पाटील चाकूरकर1
- नारी शक्ती बिल होणार पारित, महाराष्ट्र उपाध्यक्षा डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती1
- अमरावती लैंगिक शोषण प्रकरणात मोठी कारवाई : आरोपीच्या अनधिकृत घरावर बुलडोझर अमरावती : जिल्ह्यातील परतवाडा येथे उघडकीस आलेल्या धक्कादायक लैंगिक शोषण प्रकरणात प्रशासनाने मोठी कारवाई करत मुख्य आरोपीच्या अनधिकृत घरावर बुलडोझर चालवला आहे. ही कारवाई १६ एप्रिल २०२६ रोजी पहाटे करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, आरोपी अयान अहमद तनवीर अहमद (वय १९) याच्यावर १८० हून अधिक मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे तसेच ३५० हून अधिक अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. प्रशासनाची कडक कारवाई अचलपूर नगर परिषद च्या पथकाने पोलिस बंदोबस्तात आरोपीच्या घरावरील अवैध बांधकामावर कारवाई केली. जेसीबीच्या साहाय्याने घराचा अनधिकृत भाग जमीनदोस्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध POCSO कायद्यांतर्गत तसेच लैंगिक शोषणाचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.1
- लातूर शहरात भीमजयंतीचा जल्लोष; मिरवणूक मार्गावर स्वागतासाठी भीम आर्मीच्या स्टेजवर मिरवणूक व मिरवणूक अध्यक्षाचे सन्मान चिन्ह देऊन केले स्वागत. सुरू ॲप इन मराठी न्यूज. बुधवार दिनांक 15 एप्रिल 2026. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मंगळवारी (दि. १४) शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. यासाठी संपूर्ण शहर निळ्या ध्वजांनी, शुभेच्छांच्या फलकांनी आणि आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते. एका बाजूला आंबेडकर अनुयायांनी, भीम सैनिकांनी समतेचा संदेश देत लातूर शहरातून अनेक भागातून मिरवणुका काढण्यात आल्या या मिरवणुकांना शांततेचा संदेश देत भीम आर्मीचे रणधीर सुरवसे यांनी मिरवणुकीतील अध्यक्षांना स्टेजवर बोलावून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भीम आर्मीचे अध्यक्ष रणधीर सुरवसे यांनी बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले शिका संघर्ष करा परंतु आपला समाज संघटित झाला नाही तो झाला पाहिजे, संघटन करा असे समाजाला संदेश देत सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती भीम आर्मीने उत्साहात साजरी केली. याप्रसंगी भीम आर्मीचे सर्व पदाधिकारी व सदस्य भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- 🙏 मी तुम्हाला एका खास उपक्रमासाठी आमंत्रित करत आहे… 🌍 आज जगात ताण, भीती आणि अस्थिरता वाढत आहे… पण एक सुंदर सत्य आहे - 👉 समाजातील फक्त 1% लोक जर नियमित ध्यान करू लागले, तर त्यांचा शांत आणि सकारात्मक प्रभाव हळूहळू संपूर्ण समाजात पसरतो 💫 🧘♂️14 दिवसांची विनामूल्य मेडिटेशन सिरीज 🗓 20 एप्रिलपासून ⏰ Batch Timings: 👉 7:00 AM | 11:00 AM | 7:00 PM ✨ प्राणायाम • ध्यान • सकारात्मक ऊर्जा आताच विनामूल्य नोंदणी करा आणि त्या 1% चा भाग बनन्यासाठी व्हॉटसअप करा 9422366147 🌿 शांत मनातूनच शांत जग निर्माण होतं 🌍1