नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस; सुरगाण्यात सर्वाधिक १११ मिमी नोंद पेठ, सुरगाणा, कळवण, बागलाण, नांदगाव, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी तालुक्यांना झोडपले नाशिक : जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी रात्री जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण, बागलाण, नांदगाव, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि दिंडोरी तालुक्यांत मुसळधार पाऊस कोसळला. सुरगाण्यात सर्वाधिक १११ तर पेठमध्ये ८१ मिमी पावसाची नोंद झाली. हवामान विभागाने पेठ, सुरगाणा, कळवण, बागलाण, नांदगाव, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि दिंडोरी या तालुक्यांसाठी रेड अलर्ट जारी केला होता. त्यानुसार या भागात पावसाचा जोर पाहायला मिळाला. जिल्हाभरात एकाच दिवसात सरासरी ३८.७ मिमी दमदार पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरीच्या १०४.५ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात जूनपासून ५१३.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सामान्यतः या कालावधीत ४९१.९ मिमी पाऊस पडतो. इगतपुरीत जूनपासून १८६१.३ मिमी, त्र्यंबकेश्वरमध्ये १८०८.९ मिमी विक्रमी पाऊस झाला. सुरगाणा तालुक्यातही जूनपासून १११८.० मिमी पाऊस पडल्याने तेथील टक्केवारी सरासरीच्या १५३.१ टक्क्यांवर पोहोचली आहे. या पावसामुळे गिरणा, गोदावरी आणि कादवा नदी पात्रातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली. त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे दारणा, गंगापूर आणि भावली धरण समूहातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून, नद्या दुथडी वाहत आहेत. त्यामुळे आगामी काळात पावसाची स्थिती कायम राहिल्यास नद्यांना पूर वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. - आपत्कालीन व्यवस्था सज्ज जिल्ह्यात संततधारेमुळे काही भागात पाणी साचले आहे. ग्रामीण भागातील काही रस्ते आणि लहान पूल पाण्याखाली गेले आहेत. सुरगाणा आणि पेठ तालुक्यांत वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी पुलावरून पाणी वाहत असताना रस्ता ओलांडण्याचे धाडस करू नये, धबधबे किंवा पर्यटन स्थळांवर जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रमुख तालुक्यांमधील पर्जन्यवृष्टी (मिमी) सुरगाणा (१११), पेठ (८१), बागलाण (५९.४), त्र्यंबकेश्वर (५२.४), कळवण (४०.२), इगतपुरी (३५.३), दिंडोरी (३४.३), नांदगाव (२१.७), देवळा (४०.१), मालेगाव (३७.१), निफाड (२८.२), नाशिक (२०.७), चांदवड (३४.३), सिन्नर (११.२), येवला (१०) - ग्रामीण भागांतील शाळांना सुट्टी जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करतानाच मालेगाव, नांदगाव, बागलाण, कळवण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा या आठ तालुक्यांतील शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी शुक्रवारी रात्री दिल्या. त्यानुसार शनिवारी (दि.१) या भागातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. - शेतकऱ्यांना दिलासा यंदाच्या पावसाळ्यात मान्सूनवर अल निनोचा प्रभाव राहण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यात असमतोल पावसाची नोंद झाली आहे. यात अत्यल्प पावसाचा तालुका म्हणून ओळख असलेल्या नांदगावमध्ये शुक्रवारी रात्री २१ मिमी पावसाची नोंद झाली. त्याचप्रमाणे येवला तालुक्यातही समाधानकारक पाऊस झाल्याने या भागातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

- येवला विंचूर चौफुलीवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत ५० वर्षीय महिला जागीच ठार येवला विंचूर चौफुलीवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत ५० वर्षीय महिला जागीच ठार येवला: येवला शहरातील विंचूर चौफुली पोलीस चौकीसमोर रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकच्या धडकेत निर्मला बाळासाहेब भिसे (वय ५०, रा. पैलवान गल्ली, येवला) या महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने धाव घेत मृतदेह येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी येवला शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. विंचूर चौफुली ते फत्तेबुरुज नाका परिसरात रस्त्यावर एकही दिशाफलक (Signboard) लावण्यात आलेला नाही. परिणामी, चालकांना अचानक ब्रेक मारावे लागतात किंवा वाहने मागे-पुढे करावी लागतात, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळेच एका निष्पाप महिलेचा जीव गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून, चौफुलीवर तातडीने दिशाफलक बसवण्याची जोरदार मागणी होत आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- 9 ऑगस्ट 2026 रोजी येणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाची जय्यत तयारी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सुसरवाडी येथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा होण्यासाठी विद्यार्थ्यांची जय्यत तयारी चालु असल्याचे पहायला मिळत आहे.1
- लहुजी शक्ती सेनेच्या वतीने राहुरी फॅक्टरी येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने राहुरी फॅक्टरी येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी राहुरी फॅक्टरी, प्रतिनिधी : लहुजी शक्ती सेना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देवळाली प्रवरा येथील नूतन माध्यमिक विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पोलीस निरीक्षक श्री. देशमुख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या व पेन देण्यात आले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, शिस्त, सामाजिक जबाबदारी आणि उज्ज्वल भविष्यासाठी परिश्रमाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्याचे जिल्हा संघटक नंदूभाऊ उल्हारे, शहराध्यक्ष शरदभाऊ लोखंडे, उपशहराध्यक्ष सुनीलभाऊ रोकडे, सेक्रेटरी सागरभाऊ उल्हारे तसेच सदस्य करण लोंढे, संदीप तोडमल, प्रफुल शिंदे उपस्थित होते. देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगरसेवक बाळासाहेब लोखंडे यांनीही कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. यावेळी सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा संघटक नंदूभाऊ उल्हारे यांच्या वतीने गरजू दोन विद्यार्थ्यांना शाळेचे गणवेश भेट देण्यात आले. या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपत शिक्षण, सामाजिक समता आणि समाजसेवेचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.1
- प्रीति और जैस्मिन बॉक्सिंग चैंपियन, सोमन ने पैरा शॉटपुट जीता; अब तक 30 मेडल प्रीति पवार (बॉक्सिंग): महिलाओं के 54 किग्रा भारवर्ग के फाइनल मुकाबले में कनाडा की स्कारलेट सवाना डेलगाडो को एकतरफा 5-0 से हराकर स्वर्ण पदक अपने नाम किया।जैस्मिन लंबोरिया (बॉक्सिंग): महिलाओं के 57 किग्रा वर्ग के बेहद कड़े फाइनल में उत्तरी आयरलैंड की मौजूदा चैंपियन माइकेला वॉल्श को 5-0 से मात देकर भारत की झोली में दूसरा बॉक्सिंग गोल्ड डाला।सोमन राणा (पैरा शॉटपुट): पुरुषों की F57 गोला फेंक (Shot Put) स्पर्धा में 13.40 मीटर के बेहतरीन थ्रो के साथ स्वर्ण पदक जीता। इसी स्पर्धा में भारत के शुभम जुयाल ने 13.28 मीटर थ्रो कर रजत (Silver) पदक हासिल किया ब्रेकिंग न्यूज़ संवाददाता आशीष मिश्रा1
- श्रमजीवी संघटनेचा पंचायत समिती जव्हार कार्यालयावर ताटली आंदोलन जिल्हा परिषद शाळे मध्ये मिळणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचे धान्य पुरवठा सुरळीत नाही जव्हार तालुक्यात जिल्हा परिषद शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी शिक्षक कमी तर शिक्षकांना अतिरिक्त प्रशासनाने दिलेली कामे याचा फटका विदयार्थ्यांच्या शिक्षणावर होतो. अशातच जि. प. शाळांना मिळणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचा धान्य पुरवठा होत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचा निषेधार्थ श्रमजीवी संघटनाच्या वतीने ताटली आंदोलन करण्यात आले. संघटनेचे तालुका अध्यक्ष अजित गायकवाड,गोविंद गावित ता. संघटक,संतोष धिंढा तालूका सचिव यांच्या नेतृत्वात निघालेल्या ताटली आंदोलनात, आदिवासी कष्टकरी ढोर नाही माणूस आहे,माणुसकीची भीक नको, आम्हाला आमचा हक्क हवा अशा घोषणा देत कार्यकर्ते व हजारो पालक व विध्यार्थी सहभागी झाले. संघटण्याच्या म्हणण्यानुसार धान्य नियमित मिळत नसल्याने त्या ठिकाणी बचत गट किंवा वैयक्तिक महिला यांना पोषण आहार स्वखर्चाने धान्य विकत घेऊन शिजवून दिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा व भविष्याचा विचार करून प्रशासनाने तातडीने माध्यान्ह भोजन योजनेचे धान्य पुरवठा सुरळीत चालू करावा नाहीतर या पुढचे आंदोलन अधिक तीव्र करनार अशा इशारा संघटनेच्या वतीन देण्यात आला.1