दैनिक ‘इन शॉर्ट जळगाव’च्या वृत्ताची दखल; पाईपलाईन दुरुस्तीच्या कामाला सुरुवात धरणी नाला परिसरातील पाणीगळतीचा प्रश्न ऐरणीवर; काजी बिल्डिंगजवळ दुरुस्ती सुरू धरणगाव : धरणी नाला परिसरातील काजी बिल्डिंगच्या पायरीला लागून फुटलेल्या पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याबाबत **दैनिक ‘इन शॉर्ट जळगाव’**मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची संबंधित यंत्रणेने दखल घेत पाईपलाईन दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. पाईपलाईन संपूर्णपणे फाटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत होती. याबाबत नागरिकांकडूनही तातडीने दुरुस्तीची मागणी करण्यात येत होती. वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित विभागाने घटनास्थळी पाहणी करून दुरुस्तीचे काम हाती घेतले. पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने परिसरातील पाण्याची नासाडी थांबण्यास मदत होणार आहे. नागरिकांच्या समस्येला वृत्तपत्रातून वाचा फोडल्यानंतर प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर तातडीने दखल घेतल्याबद्दल संबंधित विभागाचे नागरिकांकडून आभार मानण्यात येत आहेत.
दैनिक ‘इन शॉर्ट जळगाव’च्या वृत्ताची दखल; पाईपलाईन दुरुस्तीच्या कामाला सुरुवात धरणी नाला परिसरातील पाणीगळतीचा प्रश्न ऐरणीवर; काजी बिल्डिंगजवळ दुरुस्ती सुरू धरणगाव : धरणी नाला परिसरातील काजी बिल्डिंगच्या पायरीला लागून फुटलेल्या पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याबाबत **दैनिक ‘इन शॉर्ट जळगाव’**मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची संबंधित यंत्रणेने दखल घेत पाईपलाईन दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. पाईपलाईन संपूर्णपणे फाटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत होती. याबाबत नागरिकांकडूनही तातडीने दुरुस्तीची मागणी करण्यात येत होती. वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित विभागाने घटनास्थळी पाहणी करून दुरुस्तीचे काम हाती घेतले. पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने परिसरातील पाण्याची नासाडी थांबण्यास मदत होणार आहे. नागरिकांच्या समस्येला वृत्तपत्रातून वाचा फोडल्यानंतर प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर तातडीने दखल घेतल्याबद्दल संबंधित विभागाचे नागरिकांकडून आभार मानण्यात येत आहेत.
- धुले में तलवारों के साथ 2 आरोपी गिरफ्तार, 10 तलवारें और 5.30 लाख का मुद्देमाल जब्त1
- ✍️ चीन 🇨🇳 ने १९८०,नंतर एवढी प्रगती कशी केली...🤔 तर फक्त शिक्षणामुळे. ..चीन ने सर्वात जास्त महत्व शिक्षणाला दिल. अन् आपल्याकडे पेपर लीक करुन तरुणांच आयुष्य उध्वस्त केल जातय. आज चीन आपल्या देशा 🇮🇳 पेक्षा वीस, बावीस वर्षे पुढे गेलेला आहे. 🫣 ✍️ चीन 🇨🇳 ने १९८०,नंतर एवढी प्रगती कशी केली...🤔 तर फक्त शिक्षणामुळे. ..चीन ने सर्वात जास्त महत्व शिक्षणाला दिल. अन् आपल्याकडे पेपर लीक करुन तरुणांच आयुष्य उध्वस्त केल जातय. आज चीन आपल्या देशा 🇮🇳 पेक्षा वीस, बावीस वर्षे पुढे गेलेला आहे. 🫣1
- आयटीआयबाहेरील कचरा संकलन केंद्र त्वरित हटवा; अभाविपचे उद्या आयटीआयबाहेर ठिय्या आंदोलन* जळगाव शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयच्या प्रवेशद्वाराबाहेरील कचरा संकलन केंद्र हटवण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. आयटीआय परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कचरा साचत असून, दुर्गंधी आणि डास-माशांचा प्रादुर्भाव वाढल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप अभाविपने केला आहे. आयटीआय परिसराच्या जवळपास सहा महाविद्यालये असून दररोज हजारो विद्यार्थी या मार्गाने ये-जा करतात. पावसाळ्यात येथे साथीचे व संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता असल्याचेही अभाविपने म्हटले आहे. याबाबत मनपा प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही ठोस कारवाई न झाल्याने उद्या आयटीआयबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.1
- Dhule Crime News | धुळ्यात सण-उत्सवाच्या तोंडावर मोठा शस्त्रसाठा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई... A large cache of weapons seized in Dhule ahead of festivals; Major action by the local crime branch - सण-उत्सवाच्या तोंडावर धुळे पोलिसांची मोठी कारवाई! दोंडाईचा-शहादा रोडवर १० तलवारींचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. हा साठा गुजरातमधून आणल्याचे समोर आले असून ५ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाहा सविस्तर बातमी. - #DhuleNews #DhuleCrime #DhuleLCBAction #MaharashtraPolice #DhuleBreaking1
- सावळदबारा परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात सावळदबारा परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात सावळदबारा परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विविध ठिकाणी उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा, वर्धिनी केंद्र तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहण करून स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग व बलिदानाला अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक तथा शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उस्मान तडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष व सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, पोलीस जमादार व अंमलदार, माजी सैनिक, पत्रकार मंडळी, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावळदबारा वर्धिनी केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी, पदाधिकारी, नागरिक तसेच गावातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास, स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान आणि या लढ्याचे ऐतिहासिक महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. विविध ठिकाणी देशभक्तीपर वातावरणात कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.1
- धुळे : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोजदादा आखरे यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांसह विविध तालुक्यांमध्ये महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी आज दि. १५ सप्टेंबर रोजी निवेदने देण्यात आली. त्याच अनुषंगाने धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंत भडक यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. हे निवेदन जिल्हा पुनर्वसन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्री. संजय बागडे यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी शिवश्री हेमंत भडक यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. “कोरडा दुष्काळ जाहीर करा”, “शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या”, “शेतकरी कुटुंबातील पाल्यांचे शैक्षणिक शुल्क व स्पर्धा परीक्षा शुल्क पूर्णतः माफ करा” अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दुमदुमून गेला. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने सातत्याने ओढ दिल्याने खरीप हंगाम गंभीर संकटात सापडला आहे. पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पाऊस न झाल्यामुळे अनेक भागांतील खरीप पिके करपू लागली असून शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. अनेक शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी बँका, पतसंस्था तसेच खासगी सावकारांकडून कर्ज घेतले आहे. मात्र पिकांचे उत्पादनच धोक्यात आल्याने कर्जफेडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सर्व शासकीय सवलती लागू करून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. खरीप पिकांच्या नुकसानीपोटी आर्थिक मदत देण्याबरोबरच आगामी रब्बी हंगामासाठी बियाणे उपलब्ध करून द्यावे, पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे तसेच जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क तसेच स्पर्धा परीक्षा शुल्क पूर्णतः माफ करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. पावसाअभावी तलाव, विहिरी आणि अन्य जलस्रोतांमधील पाणीसाठा कमी होत असल्याने आगामी काळात पाणीटंचाईचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा तसेच जनावरांसाठी चारा छावण्यांचे पूर्वनियोजन करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच १७ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त शासकीय कार्यक्रम होत असताना त्याच दिवशी विशेष मंत्रिमंडळ बैठक घेऊन मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा सर्वंकष आढावा घ्यावा आणि शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशी आग्रही मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. धुळे येथे निवेदन देताना जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंत भडक, उपाध्यक्ष नंदू अहिरराव, महानगर अध्यक्ष भूषण बागुल, धुळे तालुकाध्यक्ष नितीन जाधव, कैलास देसले, दिनकर जाधव, अमर फरताडे, नाना शिरसाठ, मुक्त पत्रकार धनंजय गाळणकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.1
- कन्नड तालुक्यातील पिशोर येथे भगवान श्री विश्वकर्मा जयंती सोहळा उत्साहात; पाहा विशेष रिपोर्ट!1
- मज़दूर का हक़ वक्त पर दो, मेहनत की कमाई रोकना इंसाफ नहीं!1