logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पाणीटंचाईच्या संदर्भामध्ये आढावा बैठक संपन्न सिंचन प्रकल्पातील अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करा - पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले. लातूर (प्रतिनिधी) जिल्ह्यात अपुरा पाऊस आणि संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. या पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी कठोर पावले उचलून तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या. तसेच जिल्ह्यातील पशुधनाला पुरेसा चारा उपलब्ध होण्यासाठी पशुसंवर्धन आणि कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन करावे, असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. लातूर जिल्ह्यातील पाणी टंचाई आणि पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषाताई पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार अभिमन्यू पवार, महापौर जयश्री सोनकांबळे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहूल कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच आमदार संजय बनसोडे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देवून जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पांतील पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी विशेष पथके गठीत करावीत आणि सातत्यपूर्ण कार्यवाही करावी. महानगरपालिका, महावितरण, पोलीस आणि महसूलसह सर्व संबंधित विभागांनी संयुक्त मोहीम हाती घेवून मांजरा धरणातून होणारा अवैध पाणी उपसा आणि लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून होणारी पाणी चोरी रोखण्यासाठी प्रभावी कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री श्री. भोसले यांनी दिल्या. एखाद्या गावात पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाल्यास तिथे त्वरित उपाययोजना हाती घेवून पाणीपुरवठा सुरू करावा, असे पालकमंत्री श्री. भोसले म्हणाले. आगामी काळात सिंचन प्रकल्पातील मृत जलसाठा पिण्यासाठी वापरावा लागणार आहे. त्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने सुरू करून ऐनवेळी गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने पूर्ण सज्जता ठेवावी, असे त्यांनी सांगितले. पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून या संकट काळात बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची शासनाची भूमिका आहे. त्यामुळे पीक कापणी प्रयोगात नुकसानाची काळजीपूर्वक नोंद करावी आणि नुकसानाची वस्तुस्थिती अचूक अहवालातून मांडली जाईल याची पूर्ण काळजी घ्यावी, असे पालकमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांसाठी पशुधन अत्यंत महत्त्वाचे असल्याने पाणी टंचाईच्या काळात जनावरांच्या चाऱ्याचे योग्य नियोजन करून चारा टंचाईची स्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिल्या. तसेच चारा उपलब्धतेसाठी पशुसंवर्धन विभागाने आतापासूनच पशुपालकांना आवश्यक मार्गदर्शन करावे, असे त्यांनी सांगितले. लातूर महापालिकेने जलवाहिनीतून होणारी पाणी चोरी रोखण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करावी. पशुसंवर्धन विभागाने जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध करून देण्यासाठी योग्य नियोजन करावे, असे आमदार विक्रम काळे म्हणाले. उदगीर, जळकोट तालुक्यात पिण्यासाठी डिसेंबरपर्यंत पुरेल इतका जलसाठा आहे. त्यानंतर पाणी टंचाई उपाययोजना हाती घ्याव्या लागणार आहेत. जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन करावे लागणार असल्याचे आमदार संजय बनसोडे म्हणाले. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. जलवाहिन्यांची दुरुस्ती, अनावश्यक पाणी वापर याबाबत तातडीने कार्यवाही करावी. तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत जनजगृती करावी, असे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले. बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी जिल्ह्यातील पर्जन्यमान, सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा आणि खरीप पिकांची सद्यस्थिती याबाबत सविस्तर माहिती सादर केली. तसेच महसूल उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपल्या उपविभागातील संभाव्य पाणी टंचाई आणि उपाययोजना, पीक परिस्थितीची माहिती दिली.

1 hr ago
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
1 hr ago
81786ee7-006c-4afc-a7ef-dd522ec17637

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त तहसील कार्यालयात वृक्षारोपण उपक्रम उत्साहात (मुखेड :- प्रतिनिधी)          मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त आज दि. १७ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय परिसरात वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. तुषार राठोड हे उपस्थित होते. यावेळी तहसीलदार अभयराय नंजुडे, पुरवठा अधिकारी, नायब तहसीलदार यांच्यासह तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करून ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार डॉ. तुषार राठोड म्हणाले की, "मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून आपण पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला पाहिजे. एक झाड लावणे हीच खरी आदरांजली ठरेल." तहसीलदार अभयराय नंजुडे यांनी देखील उपस्थितांना वृक्ष संवर्धन करण्याचे आवाहन केले.  हा उपक्रम अतिशय उत्साहात आणि पर्यावरणपूरक संदेश देत पार पडला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त तहसील कार्यालयात वृक्षारोपण उपक्रम उत्साहात (मुखेड :- प्रतिनिधी)   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त आज दि. १७ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय परिसरात वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. तुषार राठोड हे उपस्थित होते. यावेळी तहसीलदार अभयराय नंजुडे, पुरवठा अधिकारी, नायब तहसीलदार यांच्यासह तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करून ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार डॉ. तुषार राठोड म्हणाले की, "मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून आपण पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला पाहिजे. एक झाड लावणे हीच खरी आदरांजली ठरेल." तहसीलदार अभयराय नंजुडे यांनी देखील उपस्थितांना वृक्ष संवर्धन करण्याचे आवाहन केले.  हा उपक्रम अतिशय उत्साहात आणि पर्यावरणपूरक संदेश देत पार पडला.
    3
    मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त तहसील कार्यालयात वृक्षारोपण उपक्रम उत्साहात

(मुखेड :- प्रतिनिधी)  

       मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त आज दि. १७ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय परिसरात वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. तुषार राठोड हे उपस्थित होते. यावेळी तहसीलदार अभयराय नंजुडे, पुरवठा अधिकारी, नायब तहसीलदार यांच्यासह तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करून ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार डॉ. तुषार राठोड म्हणाले की, "मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून आपण पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला पाहिजे. एक झाड लावणे हीच खरी आदरांजली ठरेल."

तहसीलदार अभयराय नंजुडे यांनी देखील उपस्थितांना वृक्ष संवर्धन करण्याचे आवाहन केले. 

हा उपक्रम अतिशय उत्साहात आणि पर्यावरणपूरक संदेश देत पार पडला.

    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • दिव्यांग व्यक्ती तपासणीची होत आहे गैरसोय.!! तपासणीसाठी उपकरणे,विशेषतज्ञ लातूरला मग तपासणी देखावे येथे कशाला?? निलंगा उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग व्यक्तींची होत आहे गैरसोय..!! तपासणी टीम चे वेळ निश्चित नाही!! महिन्यातून दोन दिवस निलंगा तालुक्यातील दिव्यांगाना तपासाला यायला सुद्धा विशेषतज्ञाना वेळ नाही?
    1
    दिव्यांग व्यक्ती तपासणीची होत आहे गैरसोय.!! तपासणीसाठी उपकरणे,विशेषतज्ञ लातूरला मग तपासणी देखावे येथे कशाला??
निलंगा उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग व्यक्तींची होत आहे गैरसोय..!!
तपासणी टीम चे वेळ निश्चित नाही!!
महिन्यातून दोन दिवस निलंगा तालुक्यातील दिव्यांगाना तपासाला यायला सुद्धा विशेषतज्ञाना वेळ नाही?
    user_सुरज हादवे
    सुरज हादवे
    Business banking service निलंगा, लातूर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • नांदेड रोडवर चालत्या कारवर वडाचे झाड कोसळले; चालक सुखरूप, कारचे मोठे नुकसान. नांदेड रोडवर चालत्या कारवर वडाचे झाड कोसळले; चालक सुखरूप, कारचे मोठे नुकसान. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026. नांदेड रोडवरील कृपासदन शाळा परिसरात बुधवार दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी एक मोठी दुर्घटना टळली. रस्त्यावरून जात असलेल्या एका चालत्या कारवर अचानक रस्त्याच्या कडेला असलेले जुने वडाचे झाड कोसळले. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कारचालक यातून सुखरूप बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड रोडवरील कृपासदन परिसराकडून एक कार (क्रमांक एमएच 02 इझेड 2579) शहराच्या दिशेने जात होती. कार कृपासदन शाळेजवळ आली असता, अचानक रस्त्याच्या बाजूला असलेले एक भलेमोठे वडाचे झाड चालत्या कारच्या पुढील भागावर कोसळले. झाड पडल्याचा जोरदार आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी प्रसंगावधान राखून कारमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढले. झाड थेट कारच्या बोनेटवर व टपाच्या समोरील भागावर पडल्याने कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाहतूक विस्कळीत. मुख्य रस्त्यावरच झाड कोसळल्यामुळे नांदेड रोडवरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच महापालिका प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी पोहोचून रस्ता साफ करण्याचे काम सुरू केले. क्रेन आणि कटरच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. जुनी झाडे हटवण्याची मागणी या परिसरात रस्त्याच्या कडेला असलेली अनेक झाडे अत्यंत जुनी व धोकादायक झाली आहेत. प्रशासनाने अशा धोकादायक झाडांची त्वरित पाहणी करून ती हटवावीत, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुनरावृत्त होणार नाहीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व वाहनधारकांनी केली आहे.
    4
    नांदेड रोडवर चालत्या कारवर वडाचे झाड कोसळले; चालक सुखरूप, कारचे मोठे नुकसान.
नांदेड रोडवर चालत्या कारवर वडाचे झाड कोसळले; चालक सुखरूप, कारचे मोठे नुकसान.
सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. 
गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026.
नांदेड रोडवरील कृपासदन शाळा परिसरात बुधवार दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी एक मोठी दुर्घटना टळली. रस्त्यावरून जात असलेल्या एका चालत्या कारवर अचानक रस्त्याच्या कडेला असलेले जुने वडाचे झाड कोसळले. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कारचालक यातून सुखरूप बचावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड रोडवरील कृपासदन परिसराकडून एक कार (क्रमांक एमएच 02 इझेड 2579) शहराच्या दिशेने जात होती. कार कृपासदन शाळेजवळ आली असता, अचानक रस्त्याच्या बाजूला असलेले एक भलेमोठे वडाचे झाड चालत्या कारच्या पुढील भागावर कोसळले. झाड पडल्याचा जोरदार आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
नागरिकांनी प्रसंगावधान राखून कारमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढले. झाड थेट कारच्या बोनेटवर व टपाच्या समोरील भागावर पडल्याने कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
वाहतूक विस्कळीत.
मुख्य रस्त्यावरच झाड कोसळल्यामुळे नांदेड रोडवरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच महापालिका प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी पोहोचून रस्ता साफ करण्याचे काम सुरू केले. क्रेन आणि कटरच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
जुनी झाडे हटवण्याची मागणी
या परिसरात रस्त्याच्या कडेला असलेली अनेक झाडे अत्यंत जुनी व धोकादायक झाली आहेत. प्रशासनाने अशा धोकादायक झाडांची त्वरित पाहणी करून ती हटवावीत, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुनरावृत्त होणार नाहीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व वाहनधारकांनी केली आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • रस्त्याच्या कडेला झाडे वाढल्याने आपेगाव च्या एसटीला अनेक अडचणी
    1
    रस्त्याच्या कडेला झाडे वाढल्याने आपेगाव च्या एसटीला अनेक अडचणी
    user_Beed News Express
    Beed News Express
    अंबाजोगाई, बीड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न
    1
    सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न
सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न
    user_साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    साप्ताहिक सोनपेठ दर्शन
    Paper Distributor सोनपेठ, परभणी, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा गौरव; आर. डी. देशमुख(अण्णा) यांच्या स्मृती अंकाचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते प्रकाशन स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा गौरव; आर. डी. देशमुख(अण्णा) यांच्या स्मृती अंकाचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते प्रकाशन
    1
    स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा गौरव; आर. डी. देशमुख(अण्णा) यांच्या स्मृती अंकाचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते प्रकाशन
स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा गौरव; आर. डी. देशमुख(अण्णा) यांच्या स्मृती अंकाचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते प्रकाशन
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    58 min ago
  • सरकारच्या नियोजित शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात बाधित शेतकऱ्यांचा रोष वाढत चालल सरकारच्या नियोजित शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात बाधित शेतकऱ्यांचा रोष वाढत चालला आहे, आज राज्याचे कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांचा ध्वजारोहण कार्यक्रमाचा मार्ग रोखून धरत आंदोलन केले,शेतकरी महिला आणि आंदोलक इतके आक्रमक झाले की पोलिसांचे बॅरिकेट फेकून देण्यात आले पोलिसांशी झटापट झाली
    2
    सरकारच्या नियोजित शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात बाधित शेतकऱ्यांचा रोष वाढत चालल
सरकारच्या नियोजित शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात बाधित शेतकऱ्यांचा रोष वाढत चालला आहे, आज राज्याचे कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांचा ध्वजारोहण कार्यक्रमाचा मार्ग रोखून धरत आंदोलन केले,शेतकरी महिला आणि आंदोलक इतके आक्रमक झाले की पोलिसांचे बॅरिकेट फेकून देण्यात आले पोलिसांशी झटापट झाली
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician Aundha (Nagnath), Hingoli•
    1 hr ago
  • लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा भररस्त्यात चाकू भोसकून खून; परळीतील नगरसेवकासह तिघे फरार. लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा भररस्त्यात चाकू भोसकून खून; परळीतील नगरसेवकासह तिघे फरार. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026. हॉटेलमध्ये जेवणादरम्यान झालेल्या वादातून मित्रानेच मित्राच्या छातीत सुरा खुपसून खून केल्याची धक्कादायक घटना लातूर शहरातील उस्मानपुरा/इस्लामपुरा भागातील हॉटेल उमेरासमोर घडली. बाबा अली शेख (वय ३८, रा. परळी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी परळीतील नगरसेवक खालेद शेख याच्यासह तीन मित्रांवर संशय असून, घटनेनंतर सर्व आरोपी पसार झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी येथून बाबा अली शेख, नगरसेवक खालेद शेख, अल्फाज पठाण आणि उमेर हे चौघे जण लातूरला आले होते. बसवेश्वर कॉलेज ते खोरीगल्ली रस्त्यावरील हॉटेल उमेरा येथे दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी बुधवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास जेवत असताना त्यांच्यात तीव्र वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर चौघेही हॉटेलबाहेर रस्त्यावर आले. तेथे तिघांनी मिळून बाबा अली यांच्या छातीत तीक्ष्ण चाकू खुपसला. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नियोजनबद्ध कटाचा संशय. बाबा अली शेख आणि आरोपींमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जुना वाद होता. त्यामुळेच नियोजनबद्ध कट रचून खून करण्याच्या हेतूने त्याला परळीहून लातुरात आणले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पालकमंत्री शहरात असतानाच थरार. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले हे शहरात मुक्कामी होते. हा खुनाचा थरार घडला, नेमक्या त्याच वेळी पालकमंत्री घटनास्थळापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरील एका गणेश मंडळात आरती करत होते. शहरात कडक पोलीस बंदोबस्त असतानाही भररस्त्यात घडलेल्या या हत्याकांडामुळे लातूर व परळी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या फरार आरोपींचा तीव्र शोध घेत आहेत.
    1
    लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा भररस्त्यात चाकू भोसकून खून; परळीतील नगरसेवकासह तिघे फरार.
लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा भररस्त्यात चाकू भोसकून खून; परळीतील नगरसेवकासह तिघे फरार.
सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. 
गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026. 
हॉटेलमध्ये जेवणादरम्यान झालेल्या वादातून मित्रानेच मित्राच्या छातीत सुरा खुपसून खून केल्याची धक्कादायक घटना लातूर शहरातील उस्मानपुरा/इस्लामपुरा भागातील हॉटेल उमेरासमोर घडली. बाबा अली शेख (वय ३८, रा. परळी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी परळीतील नगरसेवक खालेद शेख याच्यासह तीन मित्रांवर संशय असून, घटनेनंतर सर्व आरोपी पसार झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी येथून बाबा अली शेख, नगरसेवक खालेद शेख, अल्फाज पठाण आणि उमेर हे चौघे जण लातूरला आले होते. बसवेश्वर कॉलेज ते खोरीगल्ली रस्त्यावरील हॉटेल उमेरा येथे दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी बुधवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास जेवत असताना त्यांच्यात तीव्र वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर चौघेही हॉटेलबाहेर रस्त्यावर आले. तेथे तिघांनी मिळून बाबा अली यांच्या छातीत तीक्ष्ण चाकू खुपसला. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
नियोजनबद्ध कटाचा संशय.
बाबा अली शेख आणि आरोपींमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जुना वाद होता. त्यामुळेच नियोजनबद्ध कट रचून खून करण्याच्या हेतूने त्याला परळीहून लातुरात आणले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
पालकमंत्री शहरात असतानाच थरार.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले हे शहरात मुक्कामी होते. हा खुनाचा थरार घडला, नेमक्या त्याच वेळी पालकमंत्री घटनास्थळापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरील एका गणेश मंडळात आरती करत होते. शहरात कडक पोलीस बंदोबस्त असतानाही भररस्त्यात घडलेल्या या हत्याकांडामुळे लातूर व परळी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या फरार आरोपींचा तीव्र शोध घेत आहेत.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.