माजी मंत्री जयंत पाटील यांची शेखर निचळ यांनी घेतली भेट महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री व अर्थमंत्री,राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार)पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव राजारामबापू पाटील यांची आज सदिच्छा भेट झाली. संयम काय असतो,परिस्थिती कितीही कठीण असली तरी संयम कसा राखायचा आणि शांतपणे आपली वाटचाल कशी सुरू ठेवायची,हे खरंच त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. राजकारणाच्या प्रवासात अनेक माणसे भेटली,अनेक व्यक्तिमत्त्वे जवळून पाहिली;मात्र एवढा मोठा राजकीय अनुभव,जबाबदाऱ्या आणि प्रदीर्घ सार्वजनिक जीवन असूनही साधी राहणी,उच्च विचारसरणी आणि आपल्या तत्वांशी असलेली निष्ठा आजही तितकीच ठामपणे जपणारे व्यक्तिमत्त्व. राजारामबापूंच्या विचारांचा आणि संस्कारांचा वारसा पुढे नेत,त्याच तत्वांवर आजही त्यांची वाटचाल सुरू आहे, ही गोष्ट निश्चितच प्रेरणादायी आहे. आज आपल्यासोबत प्रवास करण्याचा मिळालेला योग माझ्यासाठी खूप खास आणि अविस्मरणीय अनुभव ठरला.या प्रवासादरम्यान आपल्याकडून मिळालेले मार्गदर्शन,अनुभवाचे बोल आणि प्रत्येक क्षणातून शिकायला मिळालेली गोष्ट माझ्यासाठी कायम स्मरणात राहील.
माजी मंत्री जयंत पाटील यांची शेखर निचळ यांनी घेतली भेट महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री व अर्थमंत्री,राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार)पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव राजारामबापू पाटील यांची आज सदिच्छा भेट झाली. संयम काय असतो,परिस्थिती कितीही कठीण असली तरी संयम कसा राखायचा आणि शांतपणे आपली वाटचाल कशी सुरू ठेवायची,हे खरंच त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. राजकारणाच्या प्रवासात अनेक माणसे भेटली,अनेक व्यक्तिमत्त्वे जवळून पाहिली;मात्र एवढा मोठा राजकीय अनुभव,जबाबदाऱ्या आणि प्रदीर्घ सार्वजनिक जीवन असूनही साधी राहणी,उच्च विचारसरणी आणि आपल्या तत्वांशी असलेली निष्ठा आजही तितकीच ठामपणे जपणारे व्यक्तिमत्त्व. राजारामबापूंच्या विचारांचा आणि संस्कारांचा वारसा पुढे नेत,त्याच तत्वांवर आजही त्यांची वाटचाल सुरू आहे, ही गोष्ट निश्चितच प्रेरणादायी आहे. आज आपल्यासोबत प्रवास करण्याचा मिळालेला योग माझ्यासाठी खूप खास आणि अविस्मरणीय अनुभव ठरला.या प्रवासादरम्यान आपल्याकडून मिळालेले मार्गदर्शन,अनुभवाचे बोल आणि प्रत्येक क्षणातून शिकायला मिळालेली गोष्ट माझ्यासाठी कायम स्मरणात राहील.
- तासगाव रथोत्सवास माजी खासदार संजयकाका पाटील युवकनेते प्रभाकर बाबा यांनी घेतले दर्शन महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले तासगाव गणपती रथोत्सवास माजी खासदार संजयकाका पाटील युवकनेते प्रभाकर बाबा पाटील यांनी भेट दिली यावेळी तासगाव शेरासह तालुक्यातील आणि युवकांनी ह्या नेत्यांना खांद्यावर घेऊन एकच जल्लोष करण्यात आला यावेळी माजी खासदार संजय काका पाटील प्रभाकर बाबा पाटील यांनी गणपतीचे दर्शन घेतले व माझा बळीराजा सुखी राहू दे असे साकडे घातले1
- लाखो भाविक हजर असताना तासगाव गणपती रथाजवळ रूग्णवाहिका आली असता सर्वानी वाट करून दिली,व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल1
- गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.... जल्लोष साजरा करताय पण एकदा हा व्हिडिओ नक्की बघा!1
- १९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात १९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात वळसंग (प्रतिनिधी) : वळसंग येथील गांधीनगर परिसरातील युवा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिमय आणि सामाजिक वातावरणात साजरा करण्यात येत आहे. सन १९९२ पासून गणेशोत्सवाची परंपरा जपत मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक तसेच युवकांना प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या गणरायाची आकर्षक प्रतिष्ठापना करण्यात आली असून, परिसरातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व गणेशभक्त मोठ्या संख्येने एकत्र येऊन उत्सवात सहभागी होत आहेत. त्यामुळे गांधीनगर परिसरात सध्या भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूजच्या वतीने युवा गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन मंडळाच्या गणेशोत्सवाचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून सन १९९२ पासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची वाटचाल, मंडळाची वैशिष्ट्ये, आतापर्यंत राबविण्यात आलेले उपक्रम तसेच यंदाच्या उत्सवाचे नियोजन याबाबत माहिती जाणून घेण्यात आली. युवकांच्या कलागुणांना मिळते व्यासपीठ युवा गणेशोत्सव मंडळाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तरुण युवक-युवतींच्या कलागुणांना आणि क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन. गणेशोत्सवाच्या माध्यमातून युवकांनी एकत्र यावे, त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसित व्हावेत आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने मंडळाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी उपक्रम तसेच सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम यामुळे गणेशोत्सवाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा मोठ्या प्रमाणावर असलेला सहभाग. महिला गणेशभक्त एकत्र येऊन धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असून, विविध उपक्रमांमध्येही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आहेत. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या एकत्रित सहभागामुळे गणेशोत्सवाला सामाजिक एकोप्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ‘एकत्र येण्याचा उत्सव’ म्हणून गणेशोत्सव गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारे व्यासपीठ ठरावे, हा मंडळाचा प्रयत्न असल्याचे यावेळी दिसून आले. गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाने जपलेली परंपरा आणि नव्या पिढीच्या सहभागातून उत्सवाला मिळत असलेले आधुनिक स्वरूप यांचा सुंदर संगम यंदाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळत आहे. सन १९९२ पासून सुरू असलेली ही गणेशोत्सवाची परंपरा आजही तितक्याच उत्साहाने पुढे नेली जात असून, आगामी काळातही सामाजिक, सांस्कृतिक व युवकाभिमुख उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा मंडळाचा मानस आहे. गणरायाच्या भक्तीबरोबरच एकता, सामाजिक बांधिलकी, युवकांना प्रोत्साहन आणि महिला सहभाग या चारही गोष्टींचा सुंदर मिलाफ युवा गणेशोत्सव मंडळ, गांधीनगरच्या उत्सवात पाहायला मिळत आहे.4
- बारामतीचा सकल मराठा समाज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात शेवटपर्यंत सहभागी राहणार1
- खेड भाजप नेते वैभव खेडेकर यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे गणरायाचे आगमन खेड भाजप नेते वैभव खेडेकर यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे गणरायाचे आगमन खेड : खेडचे भाजप नेते वैभव खेडेकर यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणरायाचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले. पारंपरिक पद्धतीने गणरायाची प्रतिष्ठापना करून पूजा-अर्चा करण्यात आली. गणरायाच्या आगमनाने खेडेकर यांच्या निवासस्थानी उत्साहाचे आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले. यावेळी कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने श्री गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धी, आरोग्य आणि भरभराटीसाठी प्रार्थना करण्यात आली.1
- यवतमाळ मध्ये साखरेचा ट्रक पलटी लोकांनी साखरेची पोती केली लंपास.1
- पाटण दौलत नगर येथे नामदार शंभूराजे देसाई यांनी भरवला मतदारसंघात जनता दरबार 📍 दौलतनगर | १६ सप्टेंबर २०२६ पाटण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध शासकीय, वैयक्तिक तसेच स्थानिक समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी आज दौलतनगर येथे महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. शंभूराज देसाई साहेब यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या जनता दरबाराला पाटण विधानसभा मतदारसंघातील नागरिक व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या विविध समस्या व अडचणी मंत्री महोदयांसमोर मांडल्या. जनता दरबारामध्ये वीज, आरोग्य, महसूल, पोलीस प्रशासन, रस्ते, शासकीय कार्यालयांशी संबंधित कामे तसेच विविध वैयक्तिक समस्या नागरिकांनी मांडल्या. प्रत्येक नागरिकाची समस्या समजून घेत मा. शंभूराज देसाई साहेब यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत अनेक समस्या जागेवरच मार्गी लावल्या. काही प्रकरणांमध्ये संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत आणि त्यांच्या अडचणींवर वेळेत कार्यवाही व्हावी, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. जनता दरबाराच्या माध्यमातून आपल्या समस्या थेट मंत्री महोदयांसमोर मांडता आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी काही नागरिक व महिलांनी आपली कामे मार्गी लागल्याबद्दल शंभूराज देसाई साहेब यांचे आभार मानत त्यांचा सत्कार केला. आपल्या समस्या ऐकून घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.जनतेच्या समस्या ऐकणे आणि त्या सोडविण्यासाठी प्रशासनाला गतिमान करणे’ या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. प्रत्यक्ष जनतेमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि त्यांचे प्रश्न संबंधित यंत्रणेकडून मार्गी लावणे, या माध्यमातून प्रशासन व नागरिक यांच्यातील संवाद अधिक मजबूत होत असल्याचे यावेळी दिसून आले.या जनता दरबाराला महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारीही उपस्थित राहून नागरिकांच्या समस्यांवर कार्यवाही करण्यासाठी सहभागी झाले होते. जनता दरबाराच्या माध्यमातून अनेक नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लागल्याने दौलतनगर येथील जनता दरबार नागरिकांसाठी दिलासा देणारा ठरला.1