logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महिलांना राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय हा महात्मा फुले यांच्या विचारांना दिलेली खरी आदरांजली - मंत्री छगन भुजबळ* *खानवडीत ‘ज्योती-सावित्री जिल्हा परिषद शाळेचे’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन* *बहुजन समाजाला शिक्षित करणे हेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे मुख्य कार्य - मंत्री छगन भुजबळ* *पुणे,नाशिक,दि.११ एप्रिल :-* बहुजन समाजाला शिक्षित करणे हेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे मुख्य कार्य होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महिलांना राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय हा महात्मा फुले यांच्या विचारांना दिलेली खरी आदरांजली आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जयंती जयंती वर्षानिमित्त पुणे जिल्हा परिषद अंतर्गत खानवडी ता. पुरंदर जि. पुणे येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ज्योती सावित्री जिल्हा परिषद सीबीएससी शाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील,मंत्री दादाजी भुसे, मंत्री अतुल सावे, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री योगेश कदम, खासदार सुप्रिया सुळे, आमदार योगेश टिळेकर, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार शंकर मांडेकर, आमदार राहुल कुल, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, कौशल्य विकास आयुक्त अमित सैनी, शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रसाद सिंग, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, खानवडी ग्रामपंचायत प्रशासक स्वप्नाली होले यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, महात्मा फुले यांच्या जन्मतिथीबाबत संशोधनातून ११ एप्रिल १८२७ ही तारीख निश्चित झाली आहे. सावित्रीबाई फुले यांनी १८९१ मध्ये प्रकाशित केलेल्या ‘महात्मा फुले यांचे अमर जीवन’ या ग्रंथात या तारखेचा उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे मुख्य कार्य बहुजन समाजाला शिक्षित करणे हेच होते. त्याच विचारातून खानवडी येथे उभारलेली ही आधुनिक सीबीएसई शाळा ही त्यांच्या कार्याची पुढची पायरी आहे. महात्मा फुले हे ‘नेशन बिल्डर’ होते तसेच अंधश्रद्धा आणि ब्राह्मण्यवादी प्रवृत्तींच्या विरोधात लढणारे विचारवंत होते. त्यांच्या कार्यात विविध समाजघटकांनी सहभाग घेतला होता. महात्मा फुले ब्राम्हण विरोधी होते असं विपर्यस्त चित्रण केलं गेलेलं आहे. जोतीरावांच्या ब्राह्मण समाजाविषयीच्या लेखनाचा सोयिस्करपणे वापर करण्यात आलेला आहे. वास्तवात फुलेंचा विरोध ब्राम्हण व्यक्तीला-जातीला नव्हता तर ब्राम्हण्यवादाला होता हे लक्ष्यात घ्यावे.जोतीरावांचे कितीतरी आप्तमित्र आणि सहकारी ब्राह्मण होते.त्यात भांडारकर, सदाशिव गोवंडे, भिडे, वाळवेकर, केशवराव भवाळकर, सखाराम परांजपे,मोरो विठ्ठल वाळवेकर,तुकाराम पडवळ,दादोबा तरखडकर कृष्णशास्त्री चिपळूणकर, हरीरावजी चिपळूणकर,न्या.रानडे, लोकहितवादी अशा अनेकांचा समावेश होता.त्यांनी एका ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन समतेचा आदर्श निर्माण केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महिलांना राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय हा त्यांच्या विचारांना दिलेली खरी आदरांजली असल्याचे मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

on 11 April
user_Kapil Katyare
Kapil Katyare
Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
on 11 April
392cc334-f455-4f95-961b-eb42c2082d49

*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महिलांना राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय हा महात्मा फुले यांच्या विचारांना दिलेली खरी आदरांजली - मंत्री छगन भुजबळ* *खानवडीत ‘ज्योती-सावित्री जिल्हा परिषद शाळेचे’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन* *बहुजन समाजाला शिक्षित करणे हेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे मुख्य कार्य - मंत्री छगन भुजबळ* *पुणे,नाशिक,दि.११ एप्रिल :-* बहुजन समाजाला शिक्षित करणे हेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे मुख्य कार्य होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महिलांना राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय हा महात्मा फुले यांच्या विचारांना दिलेली खरी आदरांजली आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जयंती

2ccccc9a-0e5a-4df5-82eb-a48df1eeb9e9

जयंती वर्षानिमित्त पुणे जिल्हा परिषद अंतर्गत खानवडी ता. पुरंदर जि. पुणे येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ज्योती सावित्री जिल्हा परिषद सीबीएससी शाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील,मंत्री दादाजी भुसे, मंत्री अतुल सावे, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री योगेश कदम, खासदार सुप्रिया सुळे, आमदार योगेश टिळेकर, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार शंकर मांडेकर, आमदार राहुल कुल, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, कौशल्य विकास आयुक्त अमित सैनी, शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रसाद सिंग, जिल्हाधिकारी

3cd23a0e-710e-4453-85e4-7fa6a49f4dde

जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, खानवडी ग्रामपंचायत प्रशासक स्वप्नाली होले यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, महात्मा फुले यांच्या जन्मतिथीबाबत संशोधनातून ११ एप्रिल १८२७ ही तारीख निश्चित झाली आहे. सावित्रीबाई फुले यांनी १८९१ मध्ये प्रकाशित केलेल्या ‘महात्मा फुले यांचे अमर जीवन’ या ग्रंथात या तारखेचा उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे मुख्य कार्य बहुजन समाजाला शिक्षित करणे हेच होते. त्याच विचारातून खानवडी येथे उभारलेली ही आधुनिक सीबीएसई शाळा ही त्यांच्या कार्याची पुढची पायरी आहे. महात्मा फुले हे ‘नेशन बिल्डर’ होते तसेच अंधश्रद्धा आणि ब्राह्मण्यवादी प्रवृत्तींच्या विरोधात

94bb3fdb-fc53-465b-9c5b-c03266620b1b

लढणारे विचारवंत होते. त्यांच्या कार्यात विविध समाजघटकांनी सहभाग घेतला होता. महात्मा फुले ब्राम्हण विरोधी होते असं विपर्यस्त चित्रण केलं गेलेलं आहे. जोतीरावांच्या ब्राह्मण समाजाविषयीच्या लेखनाचा सोयिस्करपणे वापर करण्यात आलेला आहे. वास्तवात फुलेंचा विरोध ब्राम्हण व्यक्तीला-जातीला नव्हता तर ब्राम्हण्यवादाला होता हे लक्ष्यात घ्यावे.जोतीरावांचे कितीतरी आप्तमित्र आणि सहकारी ब्राह्मण होते.त्यात भांडारकर, सदाशिव गोवंडे, भिडे, वाळवेकर, केशवराव भवाळकर, सखाराम परांजपे,मोरो विठ्ठल वाळवेकर,तुकाराम पडवळ,दादोबा तरखडकर कृष्णशास्त्री चिपळूणकर, हरीरावजी चिपळूणकर,न्या.रानडे, लोकहितवादी अशा अनेकांचा समावेश होता.त्यांनी एका ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन समतेचा आदर्श निर्माण केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महिलांना राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय हा त्यांच्या विचारांना दिलेली खरी आदरांजली असल्याचे मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • अनुमंडलीय अस्पताल की सीढ़ियों पर महिला ने बच्चे को दिया जन्म, जच्चा-बच्चा सुरक्षित अनुमंडलीय अस्पताल बाढ़ में एक महिला ने अस्पताल के बाहर सीढ़ी पर बच्चें को जन्म दिया, यह नजारा उस समय आश्चर्यचकित कर देने वाला था। घर पर लेबर पेन उठने के बाद वह ऑटो से इलाज के लिए बाढ़ अनुमंडल अस्पताल पहुंची। जहां अचानक लेबर पेन उठने के बाद उसने वहीं नवजात को जन्म दिया। महिला धनमंती देवी का मायके बाढ़ के उमानाथ मोहल्ला में है और उसका ससुराल सकसोहरा है। ई-रिक्शा से अस्पताल आई थी लेकिन ई-रिक्शा चालक ने उसे अस्पताल के पुराने भवन के पास ही छोड़ दिया। जहां से लगभग 100 मीटर की दूरी तक वह पैदल आई और इस दौरान एक महिला परिजन भी उसके साथ थी। तभी अचानक महिला अनुमंडलीय अस्पताल के नए भवन की प्रवेश द्वार की सीढी तक पहुंचते ही रुक गई और जब तक अस्पताल के कर्मी यह समझ पाते तब तक प्रसूति महिला वही लेट गई और उसकी सहयोगी महिला ने उनका ढाढस बांधते रही। आधे घंटे बाद अस्पताल प्रशासन हरकत में आया इसके बाद अस्पताल के सीढ़ी पर ही महिला ने बच्चें को जन्म दिया वहां मौजूद लोग यह नजारा देखकर स्तब्ध रह गए, बच्चा को जन्म देने के बाद महिला अस्पताल के भीतर गई जहां उनकी जांच की जा रही है। फिलहाल बताया जा रहा है कि जच्चा और बच्चा दोनों सुरक्षित है।
    1
    अनुमंडलीय अस्पताल की सीढ़ियों पर महिला ने बच्चे को दिया जन्म, जच्चा-बच्चा सुरक्षित
अनुमंडलीय अस्पताल बाढ़ में एक महिला ने अस्पताल के बाहर सीढ़ी पर बच्चें को जन्म दिया, यह नजारा उस समय आश्चर्यचकित कर देने वाला था। घर पर लेबर पेन उठने के बाद वह ऑटो से इलाज के लिए  बाढ़ अनुमंडल अस्पताल पहुंची। जहां अचानक लेबर पेन उठने के बाद उसने वहीं नवजात को जन्म दिया। महिला धनमंती देवी का मायके बाढ़ के उमानाथ मोहल्ला में है और उसका ससुराल सकसोहरा है। ई-रिक्शा से अस्पताल आई थी लेकिन ई-रिक्शा चालक ने उसे अस्पताल के पुराने भवन के पास ही छोड़ दिया। जहां से लगभग 100 मीटर की दूरी तक वह पैदल आई और इस दौरान एक महिला परिजन भी उसके साथ थी। तभी अचानक महिला अनुमंडलीय अस्पताल के नए भवन की प्रवेश द्वार की सीढी तक पहुंचते ही रुक गई और जब तक अस्पताल के कर्मी यह समझ पाते तब तक प्रसूति महिला वही लेट गई और उसकी सहयोगी महिला ने उनका ढाढस बांधते रही। आधे घंटे बाद अस्पताल प्रशासन हरकत में आया इसके बाद अस्पताल के सीढ़ी पर ही महिला ने बच्चें को जन्म दिया वहां मौजूद लोग यह नजारा देखकर स्तब्ध रह गए, बच्चा को जन्म देने के बाद महिला अस्पताल के भीतर गई जहां उनकी जांच की जा रही है। फिलहाल बताया जा रहा है कि जच्चा और बच्चा दोनों सुरक्षित है।
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by Anand Gangurde
    3
    Post by Anand Gangurde
    user_Anand Gangurde
    Anand Gangurde
    Nashik, Nashik•
    23 hrs ago
  • श्री नरसिंह जयंती उत्सव: नगरसुल ​येवला तालुक्यातील नगरसुल येथील जागृत देवस्थान, श्री नरसिंह मंदिर येथे नरसिंह जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. भक्तांचे रक्षण आणि अधर्माचा नाश करणाऱ्या भगवान नरसिंहाच्या जन्मोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भाविकांना नरसिंह जयंतीच्या मंगलमयी शुभेच्छा!
    1
    श्री नरसिंह जयंती उत्सव: नगरसुल 
​येवला तालुक्यातील नगरसुल येथील जागृत देवस्थान, श्री नरसिंह मंदिर येथे नरसिंह जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. भक्तांचे रक्षण आणि अधर्माचा नाश करणाऱ्या भगवान नरसिंहाच्या जन्मोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भाविकांना नरसिंह जयंतीच्या मंगलमयी शुभेच्छा!
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांनी मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योजक कक्ष आयोजित 'ग्लोबल मराठा बिझनेस एक्पोला" उद्योजकांनी लाखोंच्या संख्येने येण्याचे आवाहन केले आहे. सदर एक्पो दिनांक 15,16,17 मे 2026 रोजी मोर्शी, पुणे येथे आयोजित केला आहे.
    1
    मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांनी मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योजक कक्ष आयोजित 'ग्लोबल मराठा बिझनेस एक्पोला" उद्योजकांनी लाखोंच्या संख्येने येण्याचे आवाहन केले आहे.
सदर एक्पो दिनांक 15,16,17 मे 2026 रोजी मोर्शी, पुणे येथे आयोजित केला आहे.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • #viral #collage #trend
    1
    #viral #collage #trend
    user_Its_Mangal_14_Official
    Its_Mangal_14_Official
    Actor Ulhasnagar, Thane•
    15 hrs ago
  • तूफान में भैंस को बचाने दौड़ी महिला, तेज हवाओं से पेड़ गिरने का खौफनाक वीडियो वायरल न्यूज़: सोशल मीडिया पर एक भावुक और हैरान कर देने वाला वीडियो तेजी से वायरल हो रहा है, जिसमें एक महिला तेज तूफान और खराब मौसम के बीच अपनी भैंस को बचाने के लिए बाहर दौड़ती नजर आ रही है। बताया जा रहा है कि महिला अपने पशु को सुरक्षित करने की कोशिश कर रही थी, तभी तेज हवाओं के कारण एक बड़ा पेड़ उखड़ गया और मौके पर अफरा-तफरी मच गई। वीडियो ने लोगों को भावुक कर दिया है। कई यूजर्स महिला की हिम्मत और अपने पशु के प्रति उसके प्रेम की तारीफ कर रहे हैं। वहीं कुछ लोग खराब मौसम में सावधानी बरतने की सलाह भी दे रहे हैं। यह घटना इंसान और जानवरों के बीच गहरे रिश्ते और जिम्मेदारी को दर्शाती है। Hashtags: #Storm #Buffalo #ViralVideo #WomanCourage #AnimalLove #Humanity #HeavyStorm #Nature #WeatherAlert #TrendingNews #Viral #Respect #IndiaNews #AnimalCare #CourageousWoman
    1
    तूफान में भैंस को बचाने दौड़ी महिला, तेज हवाओं से पेड़ गिरने का खौफनाक वीडियो वायरल
न्यूज़:
सोशल मीडिया पर एक भावुक और हैरान कर देने वाला वीडियो तेजी से वायरल हो रहा है, जिसमें एक महिला तेज तूफान और खराब मौसम के बीच अपनी भैंस को बचाने के लिए बाहर दौड़ती नजर आ रही है। बताया जा रहा है कि महिला अपने पशु को सुरक्षित करने की कोशिश कर रही थी, तभी तेज हवाओं के कारण एक बड़ा पेड़ उखड़ गया और मौके पर अफरा-तफरी मच गई।
वीडियो ने लोगों को भावुक कर दिया है। कई यूजर्स महिला की हिम्मत और अपने पशु के प्रति उसके प्रेम की तारीफ कर रहे हैं। वहीं कुछ लोग खराब मौसम में सावधानी बरतने की सलाह भी दे रहे हैं। यह घटना इंसान और जानवरों के बीच गहरे रिश्ते और जिम्मेदारी को दर्शाती है।
Hashtags:
#Storm #Buffalo #ViralVideo #WomanCourage #AnimalLove #Humanity #HeavyStorm #Nature #WeatherAlert #TrendingNews #Viral #Respect #IndiaNews #AnimalCare #CourageousWoman
    user_V Bharat Live Official
    V Bharat Live Official
    Newspaper publisher वसई, पालघर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • पत्रकार अजीत अंजुम के घर लगी भयंकर आग फायर ब्रिगेड आग बुझाने में नाकाम। #AjitAnjum #viralvideoシ #mumbranews #viralshorts #viralshort #everyonefollowers #mumbrakausa #NewsUpdate #thane #JusticeForAll #newstoday #newspaper BBC News Aaj Tak CMOMaharashtra CMO Delhi #cmouttarpradesh
    1
    पत्रकार अजीत अंजुम के घर लगी भयंकर आग 
फायर ब्रिगेड आग बुझाने में नाकाम। #AjitAnjum #viralvideoシ #mumbranews #viralshorts #viralshort #everyonefollowers #mumbrakausa #NewsUpdate #thane #JusticeForAll #newstoday #newspaper 
BBC News Aaj Tak CMOMaharashtra CMO Delhi #cmouttarpradesh
    user_Parvez Shaikh
    Parvez Shaikh
    ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • शहरातील मुख्य रहदारीच्या विंचूर चौफुलीवरील सिग्नल गेल्या तीन वर्षांपासून बंद असल्याने वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटोतकर यांनी 'गांधीगिरी' मार्गाचा अवलंब करत बंद सिग्नलचे पूजन केले. ​विंचूर चौफुली हा शहरातील अतिशय गजबजलेला परिसर आहे. मात्र, सिग्नल यंत्रणा बंद असल्याने येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात आणि वारंवार वाहतूक कोंडी होते. या प्रलंबित प्रश्नाबाबत अनेकदा तक्रारी करूनही दखल न घेतल्याने पाटोतकर यांनी अभिनव पद्धतीने आंदोलन केले. "प्रशासन झोपले असेल, तर त्यांना जागे करण्यासाठी हे पूजन केले आहे," असे त्यांनी यावेळी सांगितले. ​यावेळी स्थानिक नागरिक व वाहनधारकांनी उपस्थित राहून आपला संताप व्यक्त केला. आता तरी प्रशासन जागे होऊन हे सिग्नल पूर्ववत करणार का? असा प्रश्न शहरवासीय विचारत आहेत.
    1
    शहरातील मुख्य रहदारीच्या विंचूर चौफुलीवरील सिग्नल गेल्या तीन वर्षांपासून बंद असल्याने वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटोतकर यांनी 'गांधीगिरी' मार्गाचा अवलंब करत बंद सिग्नलचे पूजन केले.
​विंचूर चौफुली हा शहरातील अतिशय गजबजलेला परिसर आहे. मात्र, सिग्नल यंत्रणा बंद असल्याने येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात आणि वारंवार वाहतूक कोंडी होते. या प्रलंबित प्रश्नाबाबत अनेकदा तक्रारी करूनही दखल न घेतल्याने पाटोतकर  यांनी अभिनव पद्धतीने आंदोलन केले. "प्रशासन झोपले असेल, तर त्यांना जागे करण्यासाठी हे पूजन केले आहे," असे त्यांनी यावेळी सांगितले.
​यावेळी स्थानिक नागरिक व वाहनधारकांनी उपस्थित राहून आपला संताप व्यक्त केला. आता तरी प्रशासन जागे होऊन हे सिग्नल पूर्ववत करणार का? असा प्रश्न शहरवासीय विचारत आहेत.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.