Shuru
Apke Nagar Ki App…
भारत–अमेरिका करार शेतकऱ्यांसाठी धोकादायक? | डॉ. अजित नवले यांचे मत | #Hashtag #IndiaUSDeal #भारतअमेरिकाकरार #शेतकरी #DrAjitNavale #AgricultureNews #ShegaonLive अशाच महत्त्वाच्या आणि निर्भीड बातम्यांसाठी Shegaon Live ला Subscribe करा
SHEGAONlive
भारत–अमेरिका करार शेतकऱ्यांसाठी धोकादायक? | डॉ. अजित नवले यांचे मत | #Hashtag #IndiaUSDeal #भारतअमेरिकाकरार #शेतकरी #DrAjitNavale #AgricultureNews #ShegaonLive अशाच महत्त्वाच्या आणि निर्भीड बातम्यांसाठी Shegaon Live ला Subscribe करा
More news from महाराष्ट्र and nearby areas
- खामगाव : तालुक्यातील पोरज येथील शेतकऱ्यांनी सन 2024-25 च्या खरीप हंगामात एका नामांकित कंपनीचे मका बियाणे खरेदी करून शेतात पेरणी केली होती. परंतु मका पीक वाढले पण कणसात दाणेच भरले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.त्यामुळे शेतकऱ्यांनी तालुका कृषि कार्यालय अधिकारी कार्यालयाकडे तक्रार करून प्रति एकरी 60 हजार रूपये भरपाई देण्यात यावी तसेच संबंधित कंपनीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा 2 फेब्रुवारी पासून कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु कृषि अधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल घेतली नसल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी 2 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण सुरू केले होतो.अखेर आज तिसऱ्या दिवशी 4 फेब्रुवारी रोजी कृषि प्रशासनाला जाग आली आणि उपोषणकर्त्या शेतकऱ्यांसोबत तालुका कृषि अधिकारी सुनिल पवार यांनी भेट देऊन चर्चा केली. यावेळी तालुका कृषि अधिकारी यांनी प्रति एकर 25 हजार रूपये नुकसान भरपाई मिळवून देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या हस्ते नारळ पाणी घेऊन उपोषणाची सांगता केली. यावेळी शिवसेनेचे अमोल अंधारे, तालुका प्रमुख राजेंद्र बघे, विजय बोराडे आदी उपस्थित होती.3
- बुलढाणा नगराध्यक्ष कार्यालय समोर उपोषण; बाबासाहेबांच्या प्रतिमेसाठी कार्यकर्ते ठाम.1
- Post by Sharad Dayedar1
- Post by Raghunath Aghao1
- अवलिया महाराज संस्थान काळामाथा येथील यात्रेत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोफत पाणी वाटप या उपक्रमाचे उद्घाटन1
- Post by Israrkhn1
- 👉 “आसलगाव–खांडवी रस्त्यावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.” 👉 “अशाच स्थानिक आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी शेगाव लाईव्हला सबस्क्राईब करा.” 👉 “हा व्हिडिओ शेअर करून माहिती पुढे पोहोचवा.”1
- खामगाव : खामगाव नगर परिषदेने मालमत्ता करात प्रस्तावित केलेली १०० ते १००० टक्क्यांपर्यंतची भरमसाठ वाढ आणि पाणीपट्टीत केलेली ५० टक्के वाढ पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा दावा करत, शहरातील सजग नागरिकांनी आणि वकील संघाने प्रशासनाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. ही करवाढ त्वरित मागे न घेतल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल करण्याचा कडक इशारा मुख्याधिकाऱ्यांना एका कायदेशीर निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. वकिलांनी दिलेल्या निवेदनात एका महत्त्वाच्या कायदेशीर मुद्द्यावर बोट ठेवले आहे. नगर परिषदेने कर मोजणीचे काम 'स्थापत्य कन्सल्टंट' या खाजगी संस्थेला दिले आहे. मात्र, 'संदीप इंदरचंद गांधी विरुद्ध महाराष्ट्र शासन' या खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट निकाल दिला आहे की, मालमत्ता कराचे मूल्यांकन करण्याचे अधिकार केवळ अधिकृत नगर परिषद अधिकारी किंवा तांत्रिकदृष्ट्या सक्षम म्युनिशिपल अधिकाऱ्यांनाच आहेत. कोणत्याही खाजगी संस्थेला हे काम देता येत नाही. त्यामुळे या एजन्सीने तयार केलेली कर आकारणी यादीच कायदेशीररीत्या अवैध ठरते, असा दावा वकिलांनी केला आहे. नगर परिषदेची मुदत २०२१ मध्ये संपल्यानंतर प्रशासकीय राजवट सुरू होती. मात्र, आता सार्वत्रिक निवडणूक होऊन नगराध्यक्ष अपर्णा सागर फुंडकर यांनी पदभार स्वीकारला आहे. तरीही, नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता किंवा सभागृहात कोणताही ठराव संमत न करता मुख्याधिकाऱ्यांनी ही करवाढीची नोटीस काढली आहे. प्रशासकांचे अधिकार संपुष्टात आले असतानाही असा निर्णय घेणे लोकशाही तत्त्वांच्या विरोधात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.अव्वाच्या सव्वा करवाढीच्या नोटिसा मिळाल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. काही ठिकाणी ही वाढ १००० टक्क्यांपर्यंत असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे."प्रशासकीय काळात खाजगी एजन्सीमार्फत केलेली ही करमोजणीच मुळात अवैध आहे. आम्ही या अन्यायाविरुद्ध कायदेशीर लढा देण्यास सज्ज आहोत."या कायदेशीर निवेदनामुळे आता नगर परिषदेच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, मुख्याधिकारी यावर काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.2
- Post by Raghunath Aghao1