Shuru
Apke Nagar Ki App…
Sharad Dayedar
- Ramdhanei Yadavमुंबई, मुंबई, महाराष्ट्रgaribo ko kabhi nyaay milta Hai garibon ka Sahara upar wala prashasan Khali paise per chalta haion 5 February
- Ramdhanei Yadavमुंबई, मुंबई, महाराष्ट्रgaribo ko kabhi nyaay milta Hai garibo ka ek Hi Sahara upar walaon 5 February
More news from महाराष्ट्र and nearby areas
- दारव्हा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ आणि मुंगसाजी महाराज महाविद्यालय, दारव्हा यांच्या संयुक्त विद्यमाने २४ मार्च रोजी विशेष भर्ती अभियान यशस्वीरीत्या पार पडले. या उपक्रमात कैरोस ट्रेनिंग अकॅडमी, हैदराबाद व उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा सहभाग होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुनील चकवे होते, तर उद्घाटन डॉ. सौ. संगीताताई घुईखेडकर यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून विराज घुईखेडकर, प्रशांत ढेपे व योगेश काकडे उपस्थित होते. या अभियानासाठी १६० युवक-युवतींनी नोंदणी करून मुलाखती दिल्या. त्यापैकी पात्र ठरलेल्या १९ उमेदवारांना ऑफर लेटर देण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. सुनील डंभारे यांनी केले.1
- इसापूर येथील श्याम गायकवाड याने सोमवारी दिग्रसच्या बीएसएनएल टॉवरवर चढून विविध मागण्यांसाठी वीरूगिरी आंदोलन सुरू केले होते. गुरुवारी चौथ्या दिवशी रात्री तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलनाची सांगता झाली. श्याम गायकवाड याने इसापूर ग्रामपंचायतसंदर्भात विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुरू केले होते. सोमवारी सकाळी सुरू झालेले आंदोलन चौथ्या दिवशी सायंकाळीदरम्यान सोडवण्यात आले. वादळी पावसातही आंदोलन सुरूच होते. दरम्यान गायकवाडवर मधमाश्यांनी हल्ला चढविला.1
- Post by Sayad anees1
- Post by Amravati News Update1
- खामगाव: एकमेव आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील पुरातन खंडोबा मंदिराचा यात्रा महोत्सव आज हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडला. गेल्या १५० वर्षांपासून जोपासली जाणारी '१२ गाड्या ओढण्याची' परंपरा यंदाही हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात पार पडली. बुलढाणा जिल्ह्यात विशेष महत्त्व आहे. नवसाला पावणारा खंडोबा अशी या मंदिराची ख्याती असून, सायंकाळी कमल सिंह गौतम चौकातून १२ बैलगाड्या ओढण्याचा थरारक सोहळा पार पडला. गडकरी भक्तगणांनी श्रद्धेपोटी आणि आपला नवस फेडण्यासाठी या बैलगाड्या ओढल्या. ही परंपरा अबाधित ठेवण्यासाठी गडकरी बांधवांचा यावेळी विशेष सन्मान व विधीवत पूजन करण्यात आले. या उत्सवासाठी ९ दिवस आधी खंडोबा मंदिरात घटाची स्थापना करण्यात आली होती. या काळात मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हनुमान जयंतीच्या दिवशी या महोत्सवाचा मुख्य सोहळा पार पडला. तत्पूर्वी मंदिरात गडकऱ्यांचा हळद लावण्याचा सोहळा आणि शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. खामगावच्या जगदंबा रोड, महात्मा बसवेश्वर चौक परिसरात हा उत्सव साजरा झाला. विशेष म्हणजे ऐतिहासिक शांती महोत्सवाच्या (मोठी देवी) परिसरातच हा महोत्सव होत असल्याने याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या महोत्सवात सर्व धर्मीयांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून खामगावच्या सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता खंडोबा यात्रा महोत्सव समितीच्या वतीने दर्शनासाठी मंदिर सलग २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खामगाव शहरासह जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो भाविकांनी 'येळकोट येळकोट जय मल्हार'च्या जयघोषात खंडोबाचे दर्शन घेतले.खंडोबा मंडळाने ही दीडशे वर्षांची परंपरा आणखीही कायम ठेवली आहे.1
- राज्य सरकारने प्रशासकीय स्तरावर एक मोठी खांदेपालट केली असून बुलढाणा जिल्ह्याला आता नवीन जिल्हाधिकारी मिळाले आहेत. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले डॉ. किरण पाटील यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी आता डॉ. प्रवीणकुमार देवरे बुलढाण्याचे नवे सारथ्य करणार आहेत. काय आहे हा संपूर्ण बदल, पाहूया या विशेष वृत्तात. राज्य शासनाने आज जारी केलेल्या आदेशानुसार, बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची पुणे येथे 'पशुसंवर्धन आयुक्त' म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पुणे येथूनच डॉ. प्रवीणकुमार देवरे यांची वर्णी लागली आहे. डॉ. देवरे हे यापूर्वी पुण्यात पशुसंवर्धन आयुक्त म्हणून कार्यरत होते. आता ही दोन्ही पदे एकमेकांकडे हस्तांतरित झाली आहेत.विशेष म्हणजे, डॉ. प्रवीणकुमार देवरे यांच्यासाठी बुलढाणा जिल्हा नवीन नाही. २००५ मध्ये त्यांनी बुलढाणा जिल्ह्यात महसूल अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. जिल्ह्याचा भौगोलिक आणि प्रशासकीय आवाका त्यांना आधीपासूनच माहित असल्याने, त्यांच्या अनुभवाचा फायदा जिल्ह्याच्या विकासाला गतीने मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.शासकीय नियमानुसार, दोन्ही अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा कार्यभार तातडीने एकमेकांकडे सोपवावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. डॉ. किरण पाटील यांनी आपल्या कार्यकाळात बुलढाण्यात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते, त्यामुळे त्यांच्या बदलीची चर्चा आता प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे.डॉ. देवरे यांच्या नियुक्तीमुळे बुलढाणा जिल्ह्याच्या प्रशासनाला आता कोणती नवी दिशा मिळणार? प्रलंबित प्रकल्प आणि जनसामान्यांचे प्रश्न ते कसे मार्गी लावणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.1
- उकळी ग्रामपंचायत कारभारावर सवाल; अमोल बोरे यांचे अर्धनग्न आंदोलन.. कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा; प्रशासनासमोर वाढले आव्हान... मेहकर :-पंचायत समिती अंतर्गत उकळी ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराविरोधात अमोल बोरे यांनी पंचायत समिती समोर अर्धनग्न आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.... ग्रामसेवक दारूच्या नशेत कार्यालयात येत असल्याचा आरोप त्यांनी केला असून, गरिबाकडून घकुलासाठी 10 हजार रुपयाची मागणी केल्याची ऑडिओ क्लिप असल्याचा दावा करण्यात आलाय.. या आंदोलनाला स्थानिक नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, संबंधित ग्रामसेवकावर कारवाई न झाल्यास सहपरिवार आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आल्याने प्रशासनावर दबाव वाढला आहे...1
- Post by Amravati News Update1