पिशोरमध्ये अंगावर वीज कोसळून ३ महिलांचा मृत्यू,पावसापासून बचावासाठी सहा जणी कवठाच्या झाडाखाली थांबल्या अन्.... शेतात काम करताना अचानक जोरदार पाऊस सुरू झाल्याने बचावासाठी कवठाच्या झाडाखाली उभ्या राहिलेल्या सहा महिलांवर वीज कोसळली. यातील तिघींचा मृत्यू झाला, तर तिघी गंभीर जखमी झाल्या आहेत. ही दुर्दैवी घटना कन्नड तालुक्यातील पिशोरजवळील वाघुळखेडा शिवारात आज, १७ सप्टेंबरला दुपारी दीडच्या सुमारास घडली. फरजाना सय्यद हमीद (वय ३८), तस्लीमबानो मुक्तार सय्यद (वय ५०), अलविरा हनीफ सय्यद (वय १६, तिघी रा. पिशोर) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हफिस सय्यद खलील (वय २२), हमीदा हनीफ सय्यद (वय ३२) व अनिसा निसार सय्यद (वय ३५, तिघी रा. पिशोर) अशी जखमी महिलांची नावे आहेत. जोरदार विजेच्या कडकडाटासह वीज कवठाच्या झाडावर कोसळल्याने झाडाखाली उभ्या या महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांना ग्रामस्थांनी पिशोरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. धीरज पाटील यांनी तपासून फरजाना, तस्लीमबानो आणि अलविरा यांना मृत घोषित केले. दरम्यान माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी रुग्णालयात जाऊन नातेवाईकांची भेट घेतली.
पिशोरमध्ये अंगावर वीज कोसळून ३ महिलांचा मृत्यू,पावसापासून बचावासाठी सहा जणी कवठाच्या झाडाखाली थांबल्या अन्.... शेतात काम करताना अचानक जोरदार पाऊस सुरू झाल्याने बचावासाठी कवठाच्या झाडाखाली उभ्या राहिलेल्या सहा महिलांवर वीज कोसळली. यातील तिघींचा मृत्यू झाला, तर तिघी गंभीर जखमी झाल्या आहेत. ही दुर्दैवी घटना कन्नड तालुक्यातील पिशोरजवळील वाघुळखेडा शिवारात आज, १७
सप्टेंबरला दुपारी दीडच्या सुमारास घडली. फरजाना सय्यद हमीद (वय ३८), तस्लीमबानो मुक्तार सय्यद (वय ५०), अलविरा हनीफ सय्यद (वय १६, तिघी रा. पिशोर) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हफिस सय्यद खलील (वय २२), हमीदा हनीफ सय्यद (वय ३२) व अनिसा निसार सय्यद (वय ३५, तिघी रा. पिशोर) अशी जखमी महिलांची नावे
आहेत. जोरदार विजेच्या कडकडाटासह वीज कवठाच्या झाडावर कोसळल्याने झाडाखाली उभ्या या महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांना ग्रामस्थांनी पिशोरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. धीरज पाटील यांनी तपासून फरजाना, तस्लीमबानो आणि अलविरा यांना मृत घोषित केले. दरम्यान माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी रुग्णालयात जाऊन नातेवाईकांची भेट घेतली.
- छत्रपती संभाजीनगर जिल्हा फुलंब्री शहरात सर्वदूर विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे,1
- कन्नड तालुक्यातील पिशोर येथे भगवान श्री विश्वकर्मा जयंती सोहळा उत्साहात; पाहा विशेष रिपोर्ट!1
- मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयातच मोकाट कुत्रे सोडले; निफाडमध्ये युवा सेनेचा निषेध निफाड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याचा आरोप करत युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक आंदोलन केलं. मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात कुत्रे सोडून निषेध करण्यात आला. यावेळी युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम रंधवे यांनी कारवाई न झाल्यास संपूर्ण शहरातील कुत्रे पकडून नगरपंचायतीत सोडण्याचा इशारा दिला.1
- अल्लामा इक्बाल शाळेतील कथित गैरप्रकारांविरोधात जिल्हा परिषदेसमोर इम्रान खान यांचे आमरण उपोषण!.. शिक्षक भरतीतील कथित गैरप्रकारांची चौकशी करा; शिक्षण विभागाच्या दिरंगाईविरोधात संताप; अल्लामा इक्बाल शाळेच्या चौकशीसाठी उपोषण!.. अल्लामा इक्बाल शाळेतील कथित गैरप्रकारांविरोधात जिल्हा परिषदेसमोर इम्रान खान यांचे आमरण उपोषण!.. शिक्षक भरतीतील कथित गैरप्रकारांची चौकशी करा; शिक्षण विभागाच्या दिरंगाईविरोधात संताप; अल्लामा इक्बाल शाळेच्या चौकशीसाठी उपोषण!.. तीन नोटिसा, तरीही चौकशीचा अहवाल नाही! अल्लामा इक्बाल शाळेच्या प्रकरणात जिल्हा परिषदेसमोर उपोषण.. शिक्षण अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर नगरसेवक इमरान अमानुल्ला खान यांचे उपोषण स्थगित.. जालना : जुना जालना येथील अल्लामा इक्बाल उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेतील कथित शिक्षक भरतीतील गैरप्रकार तसेच मुख्याध्यापक व व्यवस्थापनाच्या कथित गैरकारभाराची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी जमियत उल मुस्लिमीन एज्युकेशन सोसायटीचे सदस्य इम्रान खान अमानुल्ला खान यांनी जालना जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणी यापूर्वी 19 ऑगस्ट 2025 रोजी शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), जिल्हा परिषद जालना यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली होती. शाळेतील शिक्षकांची कथित बेकायदेशीर भरती तसेच इतर प्रशासकीय अनियमिततेबाबत पुरावे व माहितीही सादर केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.1
- दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर वारंवार होणाऱ्या आरोपांमुळे चारित्र्याहनन होत आहे, हे थांबलं पाहिजे -उद्धव ठाकरे दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर वारंवार होणाऱ्या आरोपांमुळे चारित्र्याहनन होत आहे, हे थांबलं पाहिजे -उद्धव ठाकरे दिशा सर्व मृत्यू प्रकरणाशी आपल्या कुटुंबाचा किंवा पक्षाचा कोणताही संबंध नसल्याची उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले या प्रकरणाचा राजकीय तुम्ही वापर केला जात असल्याचा आरोप उद्योग ठाकरे यांनी केला वारंवार होणाऱ्या आरोपामुळे चारित्र्य आनंद होत असून हे थांबले पाहिजे अन्यथा कायदेशीर मार्ग ओळखण्याचा इशारा दिला पत्रकारांनाही उद्देशून या प्रकरणात कोणाचीही नाव जोडले जाऊ शकते असे त्यांनी म्हटले1
- मनोज जरांगे पाटील पुढील उपचारासाठी निघाले गॅलेक्सी हॉस्पिटल छत्रपती संभाजी नगर.1
- पिशोर येथे वीज पडून तिघांचा मृत्यू ;तिघे गंभीर; मृतांच्या कुटुंबीयांना २४ तासांत मदत देण्याची हर्षवर्धन जाधवांची मागणी छत्रपती संभाजीनगर : कन्नड तालुक्यातील पिशोर येथे वीज पडून झालेल्या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू, तर तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मृतांच्या कुटुंबीयांना २४ तासांत शासकीय मदत देण्याची मागणी केली. दुर्घटनेतील कुटुंबीयांना तातडीने मदत मिळावी, यासाठी शासनाने तत्काळ कार्यवाही करावी, असे जाधव यांनी म्हटले आहे.1
- पिशोर में बिजली गिरने से 3 महिलाओं की मौत, 3 गंभीर। हर्षवर्धन जाधव ने घटना पर दुख हर्षवर्धन जाधव ने घटना पर दुख जताया #AQSNEWS #KannadNews #PishorNews #ChhatrapatiSambhajinagar #AQSNewsDigital#anisqureshisillod #sillod1
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वीजेचा कहर सिल्लोड-कन्नड तालुक्यात दोन घटनांत पाच जणांचा मृत्यू; चार जण गंभीर जखमी छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात वीज पडण्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सिल्लोड आणि कन्नड तालुक्यातील पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनांमध्ये चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पावसादरम्यान वीज कोसळल्याने या घटना घडल्या असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून घटनेची नोंद घेऊन पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.1