logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात लोकप्रतिनिधींचा गौरव सोहळा आमदार अमरनाथ राजूरकर यांची १० लाखांच्या निधीची घोषणा* शिवकुमार काळे सविस्तर वृत्त दि.२ ऑगस्ट रोजी नांदेड : अभिनव भारत शिक्षण संस्था संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महाराष्ट्र विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल आमदार अमरनाथ राजूरकर, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या महापौर म्हणून निवड झाल्याबद्दल महापौर कविताताई मुळे तसेच उपमहापौर म्हणून निवड झाल्याबद्दल दीपकसिंह रावत यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब पांडे होते. सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन संस्थेच्या वतीने यथोचित स्वागत व सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना आमदार अमरनाथ राजूरकर यांनी समाजहित, शिक्षणाचा विकास आणि जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या आमदार निधीतून १० लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. महापौर कविताताई मुळे यांनी नांदेड शहरातील शैक्षणिक विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे सांगत महाविद्यालयाचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याची ग्वाही दिली. उपमहापौर दीपकसिंह रावत यांनी आपण या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याचा उल्लेख करत महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच शहरातील नागरिकांचे प्रश्न प्रामाणिकपणे व पारदर्शकपणे सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे महानगराध्यक्ष प्रवीणभाऊ साले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत भारतीय संस्कृती, संस्कार आणि परंपरांचे जतन करण्याचे आवाहन केले. आधुनिकतेसोबतच आपल्या सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्रकुमार कुलकर्णी यांनी केले. त्यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक वाटचालीचा आढावा घेत कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. अध्यक्षीय समारोपात संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब पांडे यांनी शहराच्या विकासासाठी आणि शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीसाठी लोकप्रतिनिधी व शैक्षणिक संस्था यांच्यातील समन्वय अधिक दृढ होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष कैलासचंद काला, संतोषभाऊ मुळे, विजय येवनकर, अरविंद भारतीया, नगरसेविका पुनम ठाकूर, सुषमा थोरात यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. डॉ. संदीप काळे यांनी केले, तर अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. मनीष देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

6 hrs ago
user_Shivkumar kale Press reporter
Shivkumar kale Press reporter
Nanded, Maharashtra•
6 hrs ago
0b283a07-d65b-4038-b7ea-5b7929f9b717

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा संपन्न किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या किर्तन पासदगाव येथे संपन्न
    1
    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा संपन्न किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या किर्तन पासदगाव येथे संपन्न
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    Advertising Photographer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • पिएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे, मुखेड येथे साहित्य रत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून विध्यार्थी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.. अतिशय छान असं विषयास धरून खूप मोठ्या संख्येनी लेकरांची भाषणे झाली.. सर्व वर्ग शिक्षकांनी विध्यार्थ्यांची चांगली तयारी करून घेतली.. मुख्याध्यापक राजपूत सरांचे चांगले सहकार्य झाले.. तसेंच नेहमीप्रमाणेच शालेय व्यवस्थापन समितीचे पण चांगले योगदान मिळाले... सर्वांचे मनःपूर्वक आभार... आपलाच...नितीनदादा तलवारे मराठवाडा अध्यक्ष तथा शा. स. सदस्य, मुखेड. पिएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे, मुखेड येथे साहित्य रत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून विध्यार्थी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.. अतिशय छान असं विषयास धरून खूप मोठ्या संख्येनी लेकरांची भाषणे झाली.. सर्व वर्ग शिक्षकांनी विध्यार्थ्यांची चांगली तयारी करून घेतली.. मुख्याध्यापक राजपूत सरांचे चांगले सहकार्य झाले.. तसेंच नेहमीप्रमाणेच शालेय व्यवस्थापन समितीचे पण चांगले योगदान मिळाले... सर्वांचे मनःपूर्वक आभार...नितीनदादा तलवारे मराठवाडा अध्यक्ष तथा शा. स. सदस्य, मुखेड.
    3
    पिएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे, मुखेड येथे साहित्य रत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून विध्यार्थी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते..
अतिशय छान असं विषयास धरून खूप मोठ्या संख्येनी लेकरांची भाषणे झाली..
सर्व वर्ग शिक्षकांनी विध्यार्थ्यांची चांगली तयारी करून घेतली..
मुख्याध्यापक राजपूत सरांचे चांगले सहकार्य झाले..
तसेंच नेहमीप्रमाणेच शालेय व्यवस्थापन समितीचे पण चांगले योगदान मिळाले...
सर्वांचे मनःपूर्वक आभार... 

आपलाच...नितीनदादा तलवारे
मराठवाडा अध्यक्ष तथा शा. स. सदस्य, मुखेड.
पिएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे, मुखेड येथे साहित्य रत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून विध्यार्थी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते..
अतिशय छान असं विषयास धरून खूप मोठ्या संख्येनी लेकरांची भाषणे झाली..
सर्व वर्ग शिक्षकांनी विध्यार्थ्यांची चांगली तयारी करून घेतली..
मुख्याध्यापक राजपूत सरांचे चांगले सहकार्य झाले..
तसेंच नेहमीप्रमाणेच शालेय व्यवस्थापन समितीचे पण चांगले योगदान मिळाले...
सर्वांचे मनःपूर्वक आभार...नितीनदादा तलवारे मराठवाडा अध्यक्ष तथा शा. स. सदस्य, मुखेड.
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • आ.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न नांदेड येथे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त युवा नेते माधवराव पावडे यांच्या वतीने इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न झाला. एवढी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा लाभ देखील हजारो नागरिकांनी घेतला.
    1
    आ.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न 
नांदेड येथे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त युवा नेते माधवराव पावडे यांच्या वतीने इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न झाला. एवढी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा लाभ देखील हजारो नागरिकांनी घेतला.
    user_Arvind D. Patil
    Arvind D. Patil
    Hadgaon, Nanded•
    11 hrs ago
  • वैजनाथ पावडे यांच्या निवासस्थानी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती घोटा देवी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी 👏👏👏👏 (प्रतिनिधी): हिंगोली तालुक्यातील घोटा देवी येथे धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांच्या निवासस्थानी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी अत्यंत आदरपूर्वक व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर वैजनाथ पावडे यांनी उपस्थित शालेय विद्यार्थी व मेंढपाळ समाजातील मुलांना या दोन्ही महान विभूतींच्या जीवनकार्याची सविस्तर माहिती देत मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी सांगितले की, "महान पुरुषांचे विचार, त्याग, शिक्षणप्रेम आणि समाजसेवेची प्रेरणा प्रत्येकाने आपल्या जीवनात उतरवली पाहिजे. चांगले संस्कार, शिक्षण आणि समाजहिताची भावना जोपासून आपणही समाजसुधारक म्हणून कार्य केले, तर आपल्या जीवनालाही खरा अर्थ प्राप्त होईल. जयंती व पुण्यतिथी हे केवळ स्मरणाचे दिवस नसून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची प्रेरणा देणारे दिवस आहेत." यावेळी नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या आश्रमातील विद्यार्थी, मेंढपाळ समाजातील मुले तसेच परिसरातील शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही महान व्यक्तींच्या विचारांचे पालन करून शिक्षण, शिस्त आणि समाजसेवा यांचा संकल्प केला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि महान व्यक्तींच्या विचारांबद्दल जागरूकता निर्माण झाली असून, उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
    1
    वैजनाथ पावडे यांच्या निवासस्थानी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती 
घोटा देवी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी
👏👏👏👏
(प्रतिनिधी): हिंगोली तालुक्यातील घोटा देवी येथे धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांच्या निवासस्थानी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी अत्यंत आदरपूर्वक व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर वैजनाथ पावडे यांनी उपस्थित शालेय विद्यार्थी व मेंढपाळ समाजातील मुलांना या दोन्ही महान विभूतींच्या जीवनकार्याची सविस्तर माहिती देत मार्गदर्शन केले.
आपल्या मार्गदर्शनात त्यांनी सांगितले की, "महान पुरुषांचे विचार, त्याग, शिक्षणप्रेम आणि समाजसेवेची प्रेरणा प्रत्येकाने आपल्या जीवनात उतरवली पाहिजे. चांगले संस्कार, शिक्षण आणि समाजहिताची भावना जोपासून आपणही समाजसुधारक म्हणून कार्य केले, तर आपल्या जीवनालाही खरा अर्थ प्राप्त होईल. जयंती व पुण्यतिथी हे केवळ स्मरणाचे दिवस नसून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची प्रेरणा देणारे दिवस आहेत."
यावेळी नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या आश्रमातील विद्यार्थी, मेंढपाळ समाजातील मुले तसेच परिसरातील शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही महान व्यक्तींच्या विचारांचे पालन करून शिक्षण, शिस्त आणि समाजसेवा यांचा संकल्प केला.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि महान व्यक्तींच्या विचारांबद्दल जागरूकता निर्माण झाली असून, उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • दिगंबर जैन तीर्थक्षेत्र पुसेगाव येथे मंगल कलश स्थापना सोहळा उत्साहात संपन्न सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील दिगंबर जैन तीर्थक्षेत्र या ठिकाणी मंगल कलश स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या धार्मिक कार्यक्रमाला जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता श्रमणि आर्यिका 105 विशाखा श्री माताजी का 24 वा पावन वर्षायोग 2026 मंगल कलश स्थापना सोहळा दिनांक 1 ऑगस्ट रोजी पुसेगाव या ठिकाणी संपन्न झाला. पुसेगाव या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेली भगवान बाहुबलीची 31 फूट मूर्ती स्थापन करण्यात आली असून महाराष्ट्रातील हे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. याच ठिकाणी मंगल कलश स्थापना सोहळा आयोजित करण्यात आला असून ध्वजारोहण देखील करण्यात आले या ध्वजारोहण कार्यक्रमाला सकल दिगंबर जैन समाज,मान्यवर व प्रमुख पाहुणे व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मंगल कलश स्थापना निमित्ताने संगीतमय सुरांचा कार्यक्रम देखील पार पडला हिंगोली जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्रातील सकल समाज बांधव मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होता कार्यक्रम यशस्वीतेसाठी भगवान बाहुबली मूर्ती निर्माण कार्य अध्यक्ष रवी कान्हेड यांच्यासह जैन समाज बांधवांनी परिश्रम घेतले.
    1
    दिगंबर जैन तीर्थक्षेत्र पुसेगाव येथे मंगल कलश स्थापना सोहळा उत्साहात संपन्न
सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील दिगंबर जैन तीर्थक्षेत्र या ठिकाणी मंगल कलश स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या धार्मिक कार्यक्रमाला जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता श्रमणि आर्यिका 105 विशाखा श्री माताजी का 24 वा पावन वर्षायोग 2026 मंगल कलश स्थापना सोहळा दिनांक 1 ऑगस्ट रोजी पुसेगाव या ठिकाणी संपन्न झाला. पुसेगाव या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेली भगवान बाहुबलीची 31 फूट मूर्ती स्थापन करण्यात आली असून महाराष्ट्रातील हे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. याच ठिकाणी मंगल कलश स्थापना सोहळा आयोजित करण्यात आला असून ध्वजारोहण देखील करण्यात आले या ध्वजारोहण कार्यक्रमाला सकल दिगंबर जैन समाज,मान्यवर व प्रमुख पाहुणे व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मंगल कलश स्थापना निमित्ताने संगीतमय सुरांचा कार्यक्रम देखील पार पडला हिंगोली जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्रातील सकल समाज बांधव मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होता कार्यक्रम यशस्वीतेसाठी भगवान बाहुबली मूर्ती निर्माण कार्य अध्यक्ष रवी कान्हेड यांच्यासह जैन समाज बांधवांनी परिश्रम घेतले.
    user_Shankar bhairane
    Shankar bhairane
    Reportar सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन किर्तनकार इंदुरीकर महाराज किर्तन सोहळा संपन्न
    1
    आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन किर्तनकार इंदुरीकर महाराज किर्तन सोहळा संपन्न
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    Advertising Photographer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण इशारा परिषद नांदेड लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण इशारा परिषद नांदेड
    1
    लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र 
 अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण इशारा परिषद नांदेड  
लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र 
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण इशारा परिषद नांदेड
    user_सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    कंधार, नांदेड, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.