logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भोरमध्ये गंगोत्री पासवर्ड वाचन अभियानास उस्फूर्त प्रतिसाद ; अभिनेता सचिन खेडेकर उपस्थित भोरमध्ये गंगोत्री पासवर्ड वाचन अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद अभिनेते सचिन खेडेकर यांचा विद्यार्थ्यां-पालकांशी प्रेरणादायी संवाद विक्रम शिंदे /भोर दि.8भोर एज्युकेशन सोसायटीच्या राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, भोर येथे गंगोत्री पासवर्ड वाचन अभियान अंतर्गत आयोजित कार्यक्रमात नामवंत अभिनेते सचिन खेडेकर यांनी विद्यार्थ्यां व पालकांशी संवाद साधत वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमात डॉ. सुरेश गोरेगावकर, श्री. आवटे व श्री. जाधव यांनी सचिन खेडेकर यांची प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीद्वारे सचिन खेडेकर यांचे वाचनाविषयीचे विचार आणि अनुभव श्रोत्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचले. सचिन खेडेकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, कोणतीही भूमिका साकारताना वाचन अत्यंत उपयुक्त ठरते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भूमिका साकारताना आपण जवळपास ३८ पुस्तके वाचली, त्यानंतरच त्या भूमिकेला योग्य न्याय देता आला, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळांनी वयोगटानुसार पुस्तकांची यादी विद्यार्थ्यांना द्यावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी गंगोत्री होम्सचे श्री. आवटे यांनी “पासवर्ड” उपक्रमासोबत वाचन अभियान राबविले जात असल्याची माहिती दिली. पासवर्डचे श्री. आनंद अवधानी यांनी पालकांना उद्देशून बोलताना पालकांनी स्वतः वाचनाची सवय लावल्यास मुलांमध्येही वाचनाची गोडी निर्माण होते असे सांगत मोबाईलपासून थोडे दूर राहून वाचन संस्कृती जोपासण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात श्रीमती वृशाली जोगळेकर व श्रीमती बोरवणकर यांनी “मला पासवर्ड हवा गं बाई” हे प्रभावी भरुड सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या प्रसंगी भोर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. श्री. प्रमोद गुजर, उपाध्यक्ष मा. श्री. मुकुंद तांबेकर, सचिव मा. डॉ. सुरेश गोरेगावकर, श्री. पैठणकर, श्री. मळेकर, ज्येष्ठ संचालक सुरेशभाई शाह, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. बिराजदार, श्री. दत्तात्रय मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. एल. एम. भांगे यांनी केले. सूत्रसंचालन श्री. विक्रम शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक संतोष दळवी यांनी केले. यावेळी उपमुख्याध्यापिका श्रीमती निलीमा मोरे, डॉ. भीकू म्हेत्रे व डॉ. सौ. म्हेत्रे तसेच शहरातील मान्यवर नागरिक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढविण्यासाठी नवी प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

on 8 March
user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
दै.राष्ट्र सह्याद्री reporter
Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
on 8 March

भोरमध्ये गंगोत्री पासवर्ड वाचन अभियानास उस्फूर्त प्रतिसाद ; अभिनेता सचिन खेडेकर उपस्थित भोरमध्ये गंगोत्री पासवर्ड वाचन अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद अभिनेते सचिन खेडेकर यांचा विद्यार्थ्यां-पालकांशी प्रेरणादायी संवाद विक्रम शिंदे /भोर दि.8भोर एज्युकेशन सोसायटीच्या राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, भोर येथे गंगोत्री पासवर्ड वाचन अभियान अंतर्गत आयोजित कार्यक्रमात नामवंत अभिनेते सचिन खेडेकर यांनी विद्यार्थ्यां व पालकांशी संवाद साधत वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमात डॉ. सुरेश गोरेगावकर, श्री. आवटे व श्री. जाधव यांनी

सचिन खेडेकर यांची प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीद्वारे सचिन खेडेकर यांचे वाचनाविषयीचे विचार आणि अनुभव श्रोत्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचले. सचिन खेडेकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, कोणतीही भूमिका साकारताना वाचन अत्यंत उपयुक्त ठरते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भूमिका साकारताना आपण जवळपास ३८ पुस्तके वाचली, त्यानंतरच त्या भूमिकेला योग्य न्याय देता आला, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळांनी वयोगटानुसार पुस्तकांची यादी विद्यार्थ्यांना द्यावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी गंगोत्री होम्सचे श्री. आवटे यांनी “पासवर्ड” उपक्रमासोबत वाचन

अभियान राबविले जात असल्याची माहिती दिली. पासवर्डचे श्री. आनंद अवधानी यांनी पालकांना उद्देशून बोलताना पालकांनी स्वतः वाचनाची सवय लावल्यास मुलांमध्येही वाचनाची गोडी निर्माण होते असे सांगत मोबाईलपासून थोडे दूर राहून वाचन संस्कृती जोपासण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात श्रीमती वृशाली जोगळेकर व श्रीमती बोरवणकर यांनी “मला पासवर्ड हवा गं बाई” हे प्रभावी भरुड सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या प्रसंगी भोर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. श्री. प्रमोद गुजर, उपाध्यक्ष मा. श्री. मुकुंद तांबेकर, सचिव मा. डॉ. सुरेश गोरेगावकर, श्री. पैठणकर,

श्री. मळेकर, ज्येष्ठ संचालक सुरेशभाई शाह, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. बिराजदार, श्री. दत्तात्रय मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. एल. एम. भांगे यांनी केले. सूत्रसंचालन श्री. विक्रम शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक संतोष दळवी यांनी केले. यावेळी उपमुख्याध्यापिका श्रीमती निलीमा मोरे, डॉ. भीकू म्हेत्रे व डॉ. सौ. म्हेत्रे तसेच शहरातील मान्यवर नागरिक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढविण्यासाठी नवी प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • विक्रम शिंदे /भोर दि.४ मोसे खोर्‍यातील ऐतिहासिक श्री शिरकाई देवी यात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला असून भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी शिरकोली (ता. राजगड) येथील मंदिराला भेट देत देवीचे दर्शन घेतले.तसेच शिरकोली देवस्थान साठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले.यावेळी , अमोलदादा नलावडे (सभापती कृषी व पशुसंवर्धन, जि.प. पुणे), किरण राऊत(अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस राजगड) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थितीत होते .
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.४
मोसे खोर्‍यातील ऐतिहासिक
श्री शिरकाई देवी यात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला असून भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी शिरकोली (ता. राजगड)  येथील मंदिराला भेट देत देवीचे दर्शन घेतले.तसेच शिरकोली देवस्थान साठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले.यावेळी , 
अमोलदादा नलावडे (सभापती कृषी व पशुसंवर्धन, जि.प. पुणे), किरण राऊत(अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस राजगड) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थितीत होते .
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • स्वामिकाज गुरुभक्ती । पितृवचन सेवा पति ॥१॥ हेचि विष्णूची महापूजा । अनुभव नाही दुजा ॥धृपद॥ सत्य बोले मुखे । दुखवे आणिकाच्या दुःखे ॥२॥ निश्चयाचे बळ । तुका म्हणे तेचि फळ ॥३॥ अर्थ स्वामी चे काम, गुरुभक्ती, थोर व्यक्तींनी सांगितलेली आज्ञा आणि पतीची सेवा ही यथा योग्य केली पाहिजे. हीच खरी विष्णूची महा पूजा आहे यात काहीच संदेह नाही. नेहमी मुखाने सत्य बोलावे आणि दुसऱ्यांच्या दुःखात दुःख मानत जावे. तुकाराम महाराज म्हणतात परमार्थ करण्याविषयी आणि इतर चांगल्या गोष्टी करण्या विषयी दृढनिश्चय असावा मग निश्चयाचे बळ दृढ असेल तर कोणतेही फळ ते देणारे असते.
    1
    स्वामिकाज गुरुभक्ती । पितृवचन सेवा पति ॥१॥
हेचि विष्णूची महापूजा । अनुभव नाही दुजा ॥धृपद॥
सत्य बोले मुखे । दुखवे आणिकाच्या दुःखे ॥२॥
निश्चयाचे बळ । तुका म्हणे तेचि फळ ॥३॥
अर्थ
स्वामी चे काम, गुरुभक्ती, थोर व्यक्तींनी सांगितलेली आज्ञा आणि पतीची सेवा ही यथा योग्य केली पाहिजे. हीच खरी विष्णूची महा पूजा आहे यात काहीच संदेह नाही. नेहमी मुखाने सत्य बोलावे आणि दुसऱ्यांच्या दुःखात दुःख मानत जावे. तुकाराम महाराज म्हणतात परमार्थ करण्याविषयी आणि इतर चांगल्या गोष्टी करण्या विषयी दृढनिश्चय असावा मग निश्चयाचे बळ दृढ असेल तर कोणतेही फळ ते देणारे असते.
    user_महाराष्ट्राची जनता न्युज. साता
    महाराष्ट्राची जनता न्युज. साता
    Salesperson जावळी, सातारा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • पिंपरी चिंचवड : - अशोक खरात प्रकरणावरही उदय सामंत स्पष्ट; गैरवापर थांबवण्याचा इशारा... एमएनजीएल गॅस पुरवठ्यावरून राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी कडक इशारा दिलाय. हॉटेल आणि उद्योजकांना गॅस पुरवठा जाणीवपूर्वक थांबवला जात असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही गॅस पुरवठ्यात दिरंगाई होत असल्याची तक्रार समोर येत आहे. कृत्रिम तुटवडा निर्माण केल्यास सरकार कठोर पावलं उचलेल, असंही त्यांनी सांगितलं.दरम्यान, अशोक खरात प्रकरणावर बोलताना सामंत म्हणाले, काही नेत्यांशी फोनवर बोलणं झालं असलं तरी कुणीही त्यांच्या कृत्याचं समर्थन केलेलं नाही. या प्रकरणात गैरफायदा घेण्याची प्रवृत्ती थांबवण्याची भूमिका शिवसेनेची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.... #पिंपरीचिंचवड #एमएनजीएल #गॅसपुरवठा #उदयसामंत #हॉटेलव्यवसाय #उद्योजक #गॅसतुटवडा #सरकारइशारा #कारवाई #शिवसेना #अशोकखरात #PimpriChinchwad #MNGL #GasSupply #UdaySamant #HotelBusiness #Entrepreneurs #GasShortage #GovernmentWarning #StrictAction #ShivSena #AshokKharat
    1
    पिंपरी चिंचवड : - 
अशोक खरात प्रकरणावरही उदय सामंत स्पष्ट; गैरवापर थांबवण्याचा इशारा...
एमएनजीएल गॅस पुरवठ्यावरून राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी कडक इशारा दिलाय. हॉटेल आणि उद्योजकांना गॅस पुरवठा जाणीवपूर्वक थांबवला जात असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही गॅस पुरवठ्यात दिरंगाई होत असल्याची तक्रार समोर येत आहे. कृत्रिम तुटवडा निर्माण केल्यास सरकार कठोर पावलं उचलेल, असंही त्यांनी सांगितलं.दरम्यान, अशोक खरात प्रकरणावर बोलताना सामंत म्हणाले, काही नेत्यांशी फोनवर बोलणं झालं असलं तरी कुणीही त्यांच्या कृत्याचं समर्थन केलेलं नाही. या प्रकरणात गैरफायदा घेण्याची प्रवृत्ती थांबवण्याची भूमिका शिवसेनेची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं....
#पिंपरीचिंचवड #एमएनजीएल #गॅसपुरवठा #उदयसामंत #हॉटेलव्यवसाय #उद्योजक #गॅसतुटवडा #सरकारइशारा #कारवाई #शिवसेना #अशोकखरात
#PimpriChinchwad #MNGL #GasSupply #UdaySamant #HotelBusiness #Entrepreneurs #GasShortage #GovernmentWarning #StrictAction #ShivSena #AshokKharat
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • आयपीओ गुंतवणुकीच्या नावाखाली २ कोटींची सायबर फसवणूक,बँकॉक-म्यानमार कनेक्शन उघड, नवी मुंबईत कॉल सेंटर सुरू करण्याचा कट उधळला..
    1
    आयपीओ गुंतवणुकीच्या नावाखाली २ कोटींची सायबर फसवणूक,बँकॉक-म्यानमार कनेक्शन उघड, नवी मुंबईत कॉल सेंटर सुरू करण्याचा कट उधळला..
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • अहमदनगर : राहुरी, पाथर्डी आणि नगर या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नगर दक्षिण व उत्तर जिल्ह्यांची संयुक्त बैठक घेऊन अनिल भिकाजी जाधव या आदिवासी तरुण कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी एकमुखाने हा निर्णय घेतला. अनिल जाधव हे गोरगरीब, कष्टकरी आणि शोषित घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणारे, तडफदार व अनुभवी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना विधानसभेत पाठवण्यासाठी उमेदवारी देण्यात आल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. याबाबत माहिती देताना राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी सांगितले की, “आजपर्यंत या मतदारसंघात प्रस्थापितांना उमेदवारी देण्याची परंपरा राहिली आहे. मात्र संविधान जिवंत ठेवण्यासाठी आणि जातीवादी मानसिकतेला पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने एका संघर्षशील कार्यकर्त्याला संधी दिली आहे.” तसेच, मतदारसंघातील जनतेने एकदिलाने काम करून अनिल जाधव यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नवी समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
    1
    अहमदनगर : राहुरी, पाथर्डी आणि नगर या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नगर दक्षिण व उत्तर जिल्ह्यांची संयुक्त बैठक घेऊन अनिल भिकाजी जाधव या आदिवासी तरुण कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
या बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी एकमुखाने हा निर्णय घेतला. अनिल जाधव हे गोरगरीब, कष्टकरी आणि शोषित घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणारे, तडफदार व अनुभवी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना विधानसभेत पाठवण्यासाठी उमेदवारी देण्यात आल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.
याबाबत माहिती देताना राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी सांगितले की, “आजपर्यंत या मतदारसंघात प्रस्थापितांना उमेदवारी देण्याची परंपरा राहिली आहे. मात्र संविधान जिवंत ठेवण्यासाठी आणि जातीवादी मानसिकतेला पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने एका संघर्षशील कार्यकर्त्याला संधी दिली आहे.”
तसेच, मतदारसंघातील जनतेने एकदिलाने काम करून अनिल जाधव यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नवी समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
    user_Shubham Jadhav
    Shubham Jadhav
    Local News Reporter पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • BARAMATI ELECTION : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.. बिचुकले यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या आहेत. बारामतीच्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे..
    1
    BARAMATI ELECTION : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.. बिचुकले यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या आहेत. बारामतीच्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे..
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    50 min ago
  • पिंपरी चिंचवड : - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वाकड परिसरात सापळा रचून २७ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये मुंबईतील एका मुख्य पुरवठादारासह दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. हिंजवडी पोलिसांना बातमी मिळाली होती की, एक इसम चारचाकी गाडीतून एम.डी. (मेफेड्रोन) विकण्यासाठी विनोदे वस्ती, वाकड येथे येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अतुल शंकर बालगुडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४२ ग्रॅम एम.डी. आणि कार असा एकूण ७ लाख ४४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास केला असता, या तस्करीचे धागेदोरे मुंबईपर्यंत पोहोचले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुंबईतील गोवंडी येथून शारुख उर्फ सद्दाम इक्बाल अंसारी याला अटक केली. त्याच्याकडून २० लाख रुपये किमतीचे २०० ग्रॅम एम.डी. जप्त करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी हिंजवडी पोलिसांनी हायड्रोपोनिक पद्धतीने केलेली गांजाची शेती आणि अंमली पदार्थांचे कारखाने उद्ध्वस्त केले होते. आता पुन्हा इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडल्याने आयटी हब म्हणून ओळखले जाणारे हिंजवडी आता ड्रग्ज हब बनत आहे का ? असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे.... : संभाजी कदम, पोलीस उपायुक्त #हिंजवडी #पिंपरीचिंचवडपोलीस #ड्रग्जकारवाई #एमडीड्रग्ज #मादकपदार्थविरोधीमोहीम #वाकड #गुन्हेगारी #मुंबईकनेक्शन #पोलीसकारवाई #ड्रग्जजप्ती #क्राइमन्यूज #Hinjewadi #PimpriChinchwadPolice #DrugBust #Mephedrone #AntiDrugOperation #Wakad #CrimeNews #MumbaiConnection #PoliceAction #DrugSeizure #BreakingNews
    1
    पिंपरी चिंचवड : -
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वाकड परिसरात सापळा रचून २७ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये मुंबईतील एका मुख्य पुरवठादारासह दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
हिंजवडी पोलिसांना बातमी मिळाली होती की, एक इसम चारचाकी गाडीतून एम.डी. (मेफेड्रोन) विकण्यासाठी विनोदे वस्ती, वाकड येथे येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अतुल शंकर बालगुडे  याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४२ ग्रॅम एम.डी. आणि कार असा एकूण ७ लाख ४४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास केला असता, या तस्करीचे धागेदोरे मुंबईपर्यंत पोहोचले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुंबईतील गोवंडी येथून शारुख उर्फ सद्दाम इक्बाल अंसारी याला अटक केली. त्याच्याकडून २० लाख रुपये किमतीचे २०० ग्रॅम एम.डी. जप्त करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी हिंजवडी पोलिसांनी हायड्रोपोनिक पद्धतीने केलेली गांजाची शेती आणि अंमली पदार्थांचे कारखाने उद्ध्वस्त केले होते. आता पुन्हा इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडल्याने आयटी हब म्हणून ओळखले जाणारे हिंजवडी आता ड्रग्ज हब बनत आहे का ? असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे....
: संभाजी कदम, पोलीस उपायुक्त
#हिंजवडी #पिंपरीचिंचवडपोलीस #ड्रग्जकारवाई #एमडीड्रग्ज #मादकपदार्थविरोधीमोहीम #वाकड #गुन्हेगारी #मुंबईकनेक्शन #पोलीसकारवाई #ड्रग्जजप्ती #क्राइमन्यूज
#Hinjewadi #PimpriChinchwadPolice #DrugBust #Mephedrone #AntiDrugOperation #Wakad #CrimeNews #MumbaiConnection #PoliceAction #DrugSeizure #BreakingNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.