प्रेस नोट... *शेडगाव, गट ग्रा. दहेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते नामदेव महाजन यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर पक्ष प्रवेश...* हिंगणघाट :- हिंगणघाट येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय येथे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, समुद्रपूर तालूका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील व विनोद बाबुळकर यांच्या नेतृत्वात शेडगाव ग्रा. दहेगाव येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी अधिकृतपणे पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. "जिल्ह्यातील जनता बदलाच्या मूडमध्ये आहे. ज्यांनी निष्ठेने काम करण्याची तयारी दर्शवली आहे, त्या सर्वांना पक्षात योग्य सन्मान दिला जाईल. शरद पवार साहेबाचे प्रगल्भ नेतृत्व आणि संघर्षाची जिद्द पाहून अनेक नेते आकर्षित होत आहेत. जनमताचा कौल. आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपली ताकद वाढवण्यासाठी हा पक्ष प्रवेश झाला आहे. यावेळी शेडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य नामदेव महाजन,अशोक उईके,पांडुरंग महाजन, संतोष डुकरे, संजय थुल, नितीन तामगाडगे, शंकर खंडारे, जितेंद्र वाघमारे, शिवशंकर पाल, गौतम लांडगे, विनोद भुजाडे, गजानन वांदिले, श्रावण महाजन, आकाश नरड आदिनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वाना पक्षाचा दुपट्टा व पुष्पगुछ देवून पक्षात स्वागत केले व पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, शाहिद शेख उपस्थिती होते.

- Bhiwandi latest breaking news2
- आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा थेट परिणाम यवतमाळ जिल्ह्यावरही जाणवू लागला आहे. इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याने शहरात ऑटो रिक्षा चालकांना गॅस मिळण्यात अडचणी येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सीएनजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक ऑटो रिक्षा रस्त्यावर उतरू शकत नाहीत. गॅसअभावी रोजच्या उत्पन्नावर परिणाम होत असून चालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी लांबच लांब रांगा लागूनही गॅस उपलब्ध होत नसल्याची तक्रार चालकांकडून केली जात आहे. या परिस्थितीमुळे प्रवाशांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी हा दिनांक सात एप्रिल रोजी चार वाजता जिल्ह्यातील ऑटो चालकांनी केली आहे1
- वडकी :-वडकी येथून खैरी मार्गे जाणाऱ्या माढेळी वरोरा रस्त्या वर खैरी येथील गोटाडी ते खैरी गावात शिरणाऱ्या रस्त्यावर गावात शिरताच गावातील रस्त्याच्या कडेला असलेली नाली संपूर्ण बुझल्याने त्याचे घाण पाणी रोड वर पसरत असून उन्हाळ्यामध्ये पण पावसाळ्या सारखं दृश्य पाहव्यास मिळत आहे. हा संपूर्ण प्रकार खैरी येथील मी माणूस एक संघटन चे चालक किशोर सोनवणे यांनी आपल्या सोशल मीडिया द्वारे सतत अशा प्रकारचे दुर्लक्षित कार्य प्रशासनाच्या निर्दशानात आणून देण्याचे काम करीत असतात हा पण प्रकार गेल्या अनेक दिवसा पासून पाठपुरावा करीत आहे पण आजच्या या प्रकाराणे खरंच आपले हात टेकले परंतु शासन दुर्लक्ष करीतच असल्याचे दिसत आहे. हा खड्डा आपल्या घरासमोरच असल्यामुळे या खड्ड्या मुळे अनेकांना दुखापत होत त्यांना मदत करण्या पलीकडे दुसरे मी काहीच करू शकत नाही असे मी माणूस एक संघटना चे किशोर सोनवणे यांनी म्हटले आहे. त्याच्या या घटनेच्या कार्यामुळे अनेकांना मदत झाली असून पण हि समस्या सोडविण्यात आपण हरलो अशी त्यांनी सोशल मीडिया वर व्यक्त केली आहे.1
- वाकी दर्गा परिसरातील जमीन घोटाळ्याचा आरोप; शेतकऱ्यांची न्यायासाठी धाव नागपूर :- शहरापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेले बाबा ताजुद्दीन औलिया दर्गा वाकी हे देशभरात प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून, दरवर्षी मार्च महिन्यात येथे होणाऱ्या उर्समध्ये लाखो भाविक उपस्थित राहतात. श्रद्धेनुसार, येथे दर्शन घेतल्याने अनेकांना आजारांपासूनही आराम मिळतो, अशी भावना आहे. मात्र, या पवित्र स्थळाशी संबंधित एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. वाकी दर्गा परिसरातील काही शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात ताज आश्रम सेवा समितीचे अध्यक्ष सुजित बुटले यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील किमान १० ते १५ शेतकऱ्यांच्या जमिनी दर्गा ट्रस्टचे ट्रस्टी प्रभाकर डहाके पाटील व त्यांच्या कुटुंबीयांकडून हळूहळू हडप केल्या जात आहेत. संबंधित संस्था १९८९ पासून धर्मादाय आयुक्तालयात नोंदणीकृत असून, त्यांनी १९८२ साली ०.२० आर जमीन अधिकृत नोंदणीद्वारे खरेदी केली होती. त्यानंतर ताज आश्रम सेवा समितीच्या नावाने बक्षीसपत्र देण्यात आले असून सातबारा उताऱ्यावरही समितीचे नाव नोंद आहे. भू-मापन क्र. २५१ अंतर्गत जमीन एकत्रीकरण प्रक्रियेत मूळ क्षेत्रफळ १.२३ आर असताना १९९६ च्या मोजणीत ते १.६४ आर दाखवण्यात आले. ही उपभू-अभिलेख कार्यालयाची चूक असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, ०.२० आर पोटहिस्स्याची मोजणी करताना कंपाऊंड व इतर जागेचा चुकीच्या पद्धतीने समावेश करण्यात आल्याचा आरोप आहे. तक्रारदारांच्या माहितीनुसार, २०१३ च्या मोजणीदरम्यान प्रभाकर डहाके पाटील यांनी कंपाऊंड पाडण्याची धमकी दिली होती. तसेच, २०२० मध्ये कोविड काळात एसडीओ यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता आदेश पारित केला आणि ताज आश्रम सेवा समितीला पक्षकारही करण्यात आले नाही, असा आरोप करण्यात आला आहे. याच कालावधीत भू-मापन क्र. २५१ मधील सुमारे ६ ते ८ आर जमीन अतिक्रमण म्हणून दर्शवून "क प्रत" तयार करण्यात आली. या प्रक्रियेत प्रभाकर डहाके पाटील, त्यांचे कुटुंबीयांकडून आणि भगवान पाटील यांचा सहभाग असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. तसेच, काही राजकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आश्रय मिळाल्यामुळे संबंधितांकडून जमिनी हडपण्याचे प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तक्रारदारांनी उपभू- अधीक्षक, अप्पर आयुक्त तसेच महसूल मंत्र्यांकडे न्याय मागितला असला तरी अद्याप समाधानकारक निर्णय मिळालेला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. ताज आश्रम सेवा समिती ही संस्था धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत असल्याचेही तक्रारदारांनी स्पष्ट केले आहे.1
- वरोरा-वणी रेल्वे गेटवर निकृष्ट कोळसा प्रकरण उघड1
- शालेय विद्यार्थ्याला सुगंधी दुधाचे सांगण्यात आले महत्व प्रतिनिधी (उमरेड ) जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, तास येथे हाडको कंपनीचे मार्केटिंग अधिकारी इंद्रेश मेहरा, भंडारा जिल्हा दुध किसान महासंघ सदस्य विश्वास कापसे यांनी आज दि. ७ एप्रिलला सकाळी ९ वाजता भेट देवून विद्यार्थ्यांशी संवाद साधत सुगंधी दुध असलेल्या पॉकेटचे वितरण केले. यावेळी मुख्याध्यापक ओंकारनाथ दाणी, ग्राम पंचायत तास सरपंच रुपेश श्रीरामे उपस्थित होते. यावेळी उपस्थित हाडको कंपनीचे मार्केटींग अधिकारी यांचे प्रथम पुष्पगुच्छ देवून शालेय विद्यार्थी व मुख्याध्यापक यांनी स्वागत केले. यावेळी मान्यवरांनी दुधाचे महत्व व फायदे सांगण्यात आले. शाळेतील १४५ विद्यार्थ्यानां सुगंधी दुध वितरत करण्यात आले.1
- Post by Bhivandi Maharashtra1
- तुरी घेऊन जाणारे पिकप वाहन पलटी एक जागीच ठार, किनी जवादे फाट्यासमोरील घटना, राळेगाव आदिलाबाद येथून हिंगणघाटकडे तुरी घेऊन जाणारे पिकप वाहन महामार्गावर पलटी झाले या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक सहा एप्रिल रोजी सकाळी अंदाजे नऊ वाजता च्या दरम्यान वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कीनी जवादे फाट्या समोर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टी एस झिरो आठ युपी 65 23 या क्रमांकाचे टाटा पिकप वाहन आदीलाबाद येथून तुरी घेऊन हिंगणघाटच्या दिशेने जात होते दरम्यान किनी जवादे फाट्यासमोर चालकाचे स्टेरिंग वरून नियंत्रण सुटल्याने वाहन महामार्गावर पलटी झाले या अपघातात वाहनातील एकाचा घटनास्थळी मृत्यू झाला. महामार्गाची चमू वडकी पोलीस दाखल झाले व अपघातातील वृत्तकाला पुढील उपचारात वडनेर येथे दाखल केले असून या घटनेचा अधिक तपास वडकी पोलीस करीत असल्याची माहिती दिनांक 7 एप्रिल रोजी पोलिसांमार्फत देण्यात आली आहे1
- गिट्टीखदान पोलीस स्टेशन अंतर्गत अपहरण झालेल्या मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर तीन आरोपींना तात्काळ अटक1