अलंगून आश्रमशाळेच्या मुलींची कबड्डीत दमदार भरारी; जिल्ह्यात प्रथम क्रमांक, विभागस्तरावर झेप! अलंगून आश्रमशाळेच्या मुलींची कबड्डीत दमदार भरारी; जिल्ह्यात प्रथम क्रमांक, विभागस्तरावर झेप! निफाड संघाचा २५ विरुद्ध २ गुणांनी धुव्वा; सर्व सामने एकतर्फी जिंकत खेळाडूंनी मिळवली कौतुकाची थाप नाशिक येथे १५ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, अलंगून (ता. सुरगाणा) येथील १४ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने दमदार कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून विभागस्तरीय स्पर्धेसाठी दिमाखात प्रवेश केला आहे. नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. अलंगून आश्रमशाळेच्या मुलींनी स्पर्धेतील सामने आक्रमक खेळाच्या जोरावर जिंकत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात निफाड संघाचा २५ विरुद्ध २ गुणांनी पराभव करत अलंगून संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले. संघातील दर्शना घागळे, रोहिनी गावीत, वेदिका जाधव, नेहा गांगोडे, दर्शना चव्हाण, तृप्ती पवार, भूमिका चौधरी, वंदना वाघमारे, सरस्वती गावीत, वसंती टोपले, प्रियांका निकुळे आणि वैष्णवी वाघमारे यांनी उत्कृष्ट व आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत क्रीडारसिकांची मने जिंकली. या उल्लेखनीय विजयाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार कॉ. जे. पी. गावीत, संस्थेचे संचालक मंडळ, समन्वयक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी विजयी संघाचे आणि क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन केले. दरम्यान, विजयी खेळाडूंच्या यशाचे कौतुक करत संस्थापक अध्यक्षांनी खेळाडूंना स्वादिष्ट मेजवानी देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला. विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या या संघाकडून पुढील फेरीतही दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.

- पेठ जि.प. शाळा क्रमांक १ मध्ये तोडफोड; वायरिंगसह मुख्याध्यापक कार्यालयाचे नुकसान अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांकडे तक्रार; शाळेतील विद्यार्थी व साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न पेठ जि.प. शाळा क्रमांक १ मध्ये तोडफोड; वायरिंगसह मुख्याध्यापक कार्यालयाचे नुकसान अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांकडे तक्रार; शाळेतील विद्यार्थी व साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न पेठ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ च्या आवारात अज्ञात व्यक्तींनी शाळेच्या वीज वायरिंगची तोडफोड करून नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच मुख्याध्यापक कार्यालयाच्या कुलूपाची व भिंतीचीही तोडफोड करण्यात आल्याने शाळेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकांनी पेठ पोलिस ठाण्यात दि. १५ सप्टेंबर रोजी लेखी तक्रार दिली आहे. शाळेच्या मालमत्तेचे नुकसान करण्यासोबतच शासकीय दस्तऐवज व साहित्याच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच शालेय परिसरात पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. शाळेच्या आवारात वारंवार अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनानेही आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे असल्याची चर्चा आहे.1
- नाशिकमध्ये दुभाजकातील ५५ झाडांची कत्तल; २.७५ लाखांचे नुकसान......चौघांविरुद्ध गुन्हा; गंगापूर रोडवरील प्रकार नाशिक गंगापूर रोडवरील जेहान सर्कल ते बेंडकुळे नगर रस्त्यावरील दुभाजकात महानगरपालिकेने सावली व सुशोभीकरणासाठी लावलेल्या विदेशी प्रजातीच्या ५५ झाडांची विनापरवाना कत्तल करून चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अभिमन्यू खैरनार व त्याच्या तीन साथीदारांसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी पहाटे २ ते २.४५ वाजेच्या दरम्यान जेहान सर्कल ते बेंडकुळे नगर रस्त्यावरील दुभाजकात लावलेली टर्मिलिया मादागास्कर (इंडियन क्रिसमस ट्री) प्रजातीची झाडे तोडण्यात आली. संशयितांनी कटकारस्थान करून विनापरवाना ही झाडे कापून नेल्याचा आरोप आहे. या झाडांची अंदाजे किंमत २ लाख ७५ हजार रुपये असून, महापालिकेच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी श्रीकांत किसन इरणक (३२, रा. करंजकर नगर, जेलरोड) यांनी तक्रार दिली. त्यानुसार १६ सप्टेंबर रोजी रात्री ७.५२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेसह महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियमाच्या विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.1
- ब्रेकिंग न्यूज आप लोगों bhai tu Aashirwad ek Naya Andaaz mein aap logon ka favourite show देखिये रोज भाई तू जा आशीर्वाद 10:00 बजे स्टार प्रवाह खूब मस्ती1
- *गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन* कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात *गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन* कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी परिसरात विशेष खबरदारी घेतली. या पथसंचलनावेळी अंबड डिव्हिजन एसिपी बारीसर, अंबड पीआय शिरसाट, सातपूर पीआय अहिरे, इंद्रा नगर पीआय करंडे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या उपस्थितीमुळे परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आल्याचे दिसून आले. दरम्यान, मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी परिसरात दाखल झाल्याने घरकुलवासीयांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. पथसंचलन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. प्रतिनिधी निलेश शेकोकार नाशिक3
- प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मनपाच्या वतीने अभिवादन उपमहापौर विलास शिंदे, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी केले पुजन नाशिक :-महानगरपालिकेच्या वतीने केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्ष येथे केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस उपमहापौर विलास शिंदे व उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी कार्यक्रमास सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.जितेंद्र धनेश्वर,विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. चारुदत्त जगताप, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे, मनीषा पाटेकर,कनिष्ठ अभियंता तेजल मोरे,साहेबराव भोसले,श्रीकांत भोई,रमेश पागे, संजय मोरे, मनोज गायधनी, रवी पवार आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.1
- सोशल मीडिया के माध्यम से खबर उजागर करने का प्रयास किया जा रहा है ताकि लोगों की समस्या का निराकरण जल्दी से जल्द हो सके सोशल मीडिया के माध्यम से खबर उजागर करने का प्रयास किया जा रहा है ताकि लोगों की समस्या का निराकरण जल्दी से जल्द हो सके1
- NASHIK : नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार : नाशिक शहरात ठेकेदारांच्या चुकीमुळे काही अपघात झाले आहेत. वारंवार सूचना देऊनही नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला आहे. तसेच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचा विमा काढण्याचा विचार सुरू असल्याचे महापौर हिमगौरी आडके यांनी सांगितले. चुकीचे काम करणाऱ्या ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.. NASHIK : नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार : नाशिक शहरात ठेकेदारांच्या चुकीमुळे काही अपघात झाले आहेत. वारंवार सूचना देऊनही नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला आहे. तसेच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचा विमा काढण्याचा विचार सुरू असल्याचे महापौर हिमगौरी आडके यांनी सांगितले. चुकीचे काम करणाऱ्या ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला..1
- नकाशा बदलाचा फटका; बोरगावातील शेतकऱ्यांचे पीक-पाहणी रखडले भूमी अभिलेख कार्यालयाने तात्काळ दुरुस्ती करून शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याची मागणी नकाशा बदलाचा फटका; बोरगावातील शेतकऱ्यांचे पीक-पाहणी रखडले भूमी अभिलेख कार्यालयाने तात्काळ दुरुस्ती करून शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याची मागणी प्रतिनिधी | बोरगाव लक्ष्मण बागुल बोरगाव कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना नकाशामध्ये झालेल्या बदलामुळे पीक-पाहणी नोंदणी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नकाशातील बदलामुळे शेतजमिनीची प्रत्यक्ष स्थिती आणि अभिलेखातील माहिती यामध्ये तफावत निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पीक-पाहणी नोंदणी ही शेतकऱ्यांच्या विविध शासकीय योजना, पीक कर्ज, विमा तसेच इतर कृषीविषयक बाबींसाठी महत्त्वाची असल्याने नकाशातील त्रुटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. संबंधित समस्या दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरगाणा येथील भूमी अभिलेख कार्यालयाकडे तात्काळ दखल घेऊन नकाशाची आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. भूमी अभिलेख विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून नकाशातील त्रुटी तपासाव्यात आणि शेतकऱ्यांना पीक-पाणी नोंदणी करताना कोणतीही अडचण येणार नाही, यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी बोरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.1