जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर महानगरपालिका आणि प्रसारमाध्यम न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने "थुंकीमुक्त आणि तंबाखूमुक्त कोल्हापूर" या जनजागृती अभियानाचा आज भवानी मंडप येथे शुभारंभ करण्यात आला. कोल्हापूर शहराला सामाजिक व आरोग्यदृष्ट्या अधिक स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत असून, तंबाखू सेवन आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या वाढत्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी व्यापक जनजागृती हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. महापौर सौ. रूपाराणी निकम यांनी यावेळी नागरिकांना या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्रासमोर एक आदर्श निर्माण करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. महापौर निकम यांनी पुन्हा एकदा प्रसारमाध्यम न्यूज आणि महानगरपालिकेच्या या सामाजिक उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले, तसेच प्रसारमाध्यम न्यूजच्या आगामी सर्व सामाजिक आणि विधायक उपक्रमांना महानगरपालिकेचे सहकार्य कायम राहील अशी ग्वाही दिली. प्रसारमाध्यम न्यूज चॅनेलचे संचालक प्रताप पाटील यांनी सामाजिक विकासात सक्रिय भूमिका बजावण्याचे आणि समाजहिताच्या उपक्रमांद्वारे सकारात्मक परिवर्तन घडवण्याचे आश्वासन दिले. यावेळी विद्यमान नगरसेवक आदिल फरास, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी, नगरसेविका दीपा ठाणेकर, सृष्टी जाधव, दीपा काटकर, माधुरी व्हटकर, रेखा उगवे, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, किरण नकाते, कसबा बावड्याचे नगरसेवक जाधव, जिल्हा एड्स नियंत्रण कार्यालयाच्या दीपा शिपूरकर व विजय घोडखिंडकर, सामाजिक कार्यकर्ते सुनील पाच्छापुरे, ई-सिटी न्यूज नेटवर्कचे संपादक सागर ठाणेकर यांच्यासह आरोग्य, शिक्षण, प्रशासन आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यादरम्यान, महालक्ष्मी भक्त मंडळाचे राजू मेवेकरी, आदर्श प्रशालेचे मुख्याध्यापक आर. व्ही. पाटील, स्वामी विवेकानंद ट्रस्टचे महेश कामत आणि किशोर घाटगे यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या आणि भविष्यात या 'थुंकीमुक्त आणि तंबाखूमुक्त' अभियानात सक्रिय सहभाग नोंदविणार असल्याचे सांगितले. या अभियानाच्या माध्यमातून कोल्हापूर शहरात स्वच्छता, आरोग्य आणि सामाजिक जबाबदारीची भावना अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर महानगरपालिका आणि प्रसारमाध्यम न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने "थुंकीमुक्त आणि तंबाखूमुक्त कोल्हापूर" या जनजागृती अभियानाचा आज भवानी मंडप येथे शुभारंभ करण्यात आला. कोल्हापूर शहराला सामाजिक व आरोग्यदृष्ट्या अधिक स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत असून, तंबाखू सेवन आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या वाढत्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी व्यापक जनजागृती हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. महापौर सौ. रूपाराणी निकम यांनी यावेळी नागरिकांना या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्रासमोर एक आदर्श निर्माण करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. महापौर निकम यांनी पुन्हा एकदा प्रसारमाध्यम न्यूज आणि महानगरपालिकेच्या या सामाजिक उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले, तसेच प्रसारमाध्यम न्यूजच्या आगामी सर्व सामाजिक आणि विधायक उपक्रमांना महानगरपालिकेचे सहकार्य कायम राहील अशी ग्वाही दिली. प्रसारमाध्यम न्यूज चॅनेलचे संचालक प्रताप पाटील
यांनी सामाजिक विकासात सक्रिय भूमिका बजावण्याचे आणि समाजहिताच्या उपक्रमांद्वारे सकारात्मक परिवर्तन घडवण्याचे आश्वासन दिले. यावेळी विद्यमान नगरसेवक आदिल फरास, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी, नगरसेविका दीपा ठाणेकर, सृष्टी जाधव, दीपा काटकर, माधुरी व्हटकर, रेखा उगवे, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, किरण नकाते, कसबा बावड्याचे नगरसेवक जाधव, जिल्हा एड्स नियंत्रण कार्यालयाच्या दीपा शिपूरकर व विजय घोडखिंडकर, सामाजिक कार्यकर्ते सुनील पाच्छापुरे, ई-सिटी न्यूज नेटवर्कचे संपादक सागर ठाणेकर यांच्यासह आरोग्य, शिक्षण, प्रशासन आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यादरम्यान, महालक्ष्मी भक्त मंडळाचे राजू मेवेकरी, आदर्श प्रशालेचे मुख्याध्यापक आर. व्ही. पाटील, स्वामी विवेकानंद ट्रस्टचे महेश कामत आणि किशोर घाटगे यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या आणि भविष्यात या 'थुंकीमुक्त आणि तंबाखूमुक्त' अभियानात सक्रिय सहभाग नोंदविणार असल्याचे सांगितले. या अभियानाच्या माध्यमातून कोल्हापूर शहरात स्वच्छता, आरोग्य आणि सामाजिक जबाबदारीची भावना अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
- राजस्थानमध्ये सध्या भीषण वाळूच्या वादळाचा कहर सुरू आहे, ज्यामुळे अनेक शहरे पूर्णपणे अंधारात बुडाली आहेत.1
- आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त, उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी त्यांच्या जन्मगाव चोंडी येथे जाऊन विनम्र अभिवादन केले. त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली. यावेळी कृषिमंत्री श्री दत्तात्र्य भरणे, श्री अक्षय शिंदे आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कु. संध्या सोनवणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोककल्याणकारी राज्यकारभार, न्यायनिष्ठा आणि समाजहिताच्या कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा उपस्थितांनी गौरव करत, त्यांचे विचार आणि कार्याचा वारसा समाजाला कायम प्रेरणा देत राहील, अशी भावना व्यक्त केली.1
- कोकोमध्ये क्लासी वाइब्सचा अनुभव येतो. त्यात शांत स्वभाव असून, अथांग प्रेम दिसून येते.2
- पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात 'दिवाखाली अंधार' असल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्या विभागावर अवैध दारू पकडण्याची मोठी जबाबदारी आहे, त्याच पुणे कार्यालयाच्या आवारात एका कुंडीत चक्क व्होडकाची बाटली आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर एका कार्यकर्त्याने थेट अधिकाऱ्यांसमोर ती व्होडकाची बाटली ठेवून जाब विचारला. अधिकाऱ्यांना 'आरसा' दाखवल्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर, विशेषतः इंस्टाग्रामवर, मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.1
- मनोज जरांगे पाटील यांनी काल सकाळी दहा वाजता अंतरवाली सराटी येथे भर उन्हात, पाण्याविना उपोषण सुरू केले होते, ज्यासाठी लाखो मराठा बांधव जमले होते. रात्री अकराच्या सुमारास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आले. त्यांनी सविस्तर चर्चा केली, ज्यामध्ये विखे पाटील यांनी येणाऱ्या कॅबिनेट मंत्रिमंडळात काही मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. यामध्ये सातारा गॅझेट किंवा कोल्हापूर संस्थांचे गॅझेट संबंधित प्रश्नही समाविष्ट होता. त्यानंतर प्रसाद लाड आणि मंत्री विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना सरबत देऊन उपोषण सोडण्याची विनंती केली. त्यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सोडले.1
- दौंड तालुक्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या माजी आमदार उषादेवी कृष्णराव जगदाळे यांच्या निधनानंतर त्यांच्या शोकसंतप्त कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी राज्यसभा खासदार पार्थ पवार यांनी दौंड येथे भेट दिली. पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या निवासस्थानी जाऊन खासदार पवार यांनी दिवंगत उषादेवी जगदाळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि जगदाळे परिवाराचे सांत्वन केले. उषादेवी जगदाळे यांच्या निधनामुळे संपूर्ण दौंड तालुक्यावर शोककळा पसरली असून, त्यांना राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. त्यांच्या निधनाने दौंडच्या राजकीय क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण पर्व संपल्याची भावना व्यक्त होत आहे.1
- पिंपरी चिंचवडमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या अचानक दौऱ्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. दापोडी पोलीस स्टेशन परिसरात रस्त्याच्या दुतर्फा पार्क केलेली वाहने हटवण्यासाठी पोलिसांना अक्षरशः ‘दे धक्का’ करावा लागला. अनेक वाहनचालकांशी संपर्क होऊ न शकल्याने, पोलिसांना लॉक केलेली वाहने उघडण्यासाठीही शर्थीचे प्रयत्न करावे लागले. विशेष म्हणजे, वाहतूक पोलिसांना एका पोलिसांच्याच वाहनाचे लॉक उघडताना मोठी धावपळ करावी लागली. मंत्री महाजन हे विषारी दारू प्रकरणातील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आणि या प्रकरणाच्या तपासाचा आढावा घेण्यासाठी येण्याची शक्यता होती. यामुळेच पिंपरी चिंचवड पोलिसांवर मोठा ताण निर्माण झाल्याचे दिसून आले.1
- सांगलीतील माधवनगर ते कर्नाळ रस्त्यावर, एलसीबी (लोकल क्राईम ब्रँच) पथकाने गावठी बनावटीची हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर जेसीबीच्या साहाय्याने मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहिती मिळाल्यानंतर फॅक्टरीच्या उत्तरेस ओढ्यात छापा टाकून ही धडक मोहीम राबवण्यात आली, ज्यात हातभट्टीचा संपूर्ण अड्डा जमीनदोस्त करण्यात आला. या कारवाईदरम्यान, ७५० लिटर गावठी हातभट्टीचे कच्चे दारूचे रसायन आणि इतर संबंधित साहित्य जागेवरच नष्ट करण्यात आले. तसेच, २०० लिटर क्षमतेचे पाच लोखंडी बॅरल, डबे आणि कोळशाची पोती असा एकूण ३१,६५०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी नितेश कुंभार मारवाडी आणि संजय कुंभार मारवाडी, रा. कंजारभाट वस्ती, कर्नाळ यांच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई मोहिमेत अनिल कोळेकर, अतुल माने, महादेव नागणे, संदीप पाटील, विक्रम खोत, अभिजीत माळकर, संकेत कानडे, ऋषिकेश सदामते, श्रीधर वाघमोडे आदी पोलिसांनी सहभाग घेतला.1