पारध येथे १९ एप्रिल रोजी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा; इच्छुकांनी ३१ मार्चपर्यंत नोंदणी करावी पारध येथे १९ एप्रिल रोजी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा; इच्छुकांनी ३१ मार्चपर्यंत नोंदणी करावी पारध (महेंद्र बेराड भोकरदन तालुका प्रतिनिधी) – स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पारध येथे भव्य सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा रविवार, दि. १९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता पारध येथील स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव महाविद्यालय, ता. भोकरदन, जि. जालना येथे संपन्न होणार आहे. स्व. हरिवंशराय बच्चन सेवाभावी संस्था पारध, लाल बहादूर शास्त्री सांस्कृतिक युवा क्रीडा मंडळ पारध व अनुजा बहुउद्देशीय संस्था बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने हा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येत आहे. या सोहळ्यामुळे गरजू व सर्व समाजातील वधू-वरांना साधेपणाने व सामाजिक वातावरणात शुभविवाहाची संधी मिळणार आहे. सदर सोहळ्यासाठी विवाह नोंदणी अर्ज ३१ मार्च २०२६ पर्यंत स्वीकारले जाणार असून इच्छुक वधू-वरांनी वेळेत नोंदणी करावी, असे आयोजकांनी आवाहन केले आहे. विवाह नोंदणी व अधिक माहितीसाठी इच्छुकांनी अनुजा मनोहर गायकवाड – 8484861034, भगवान वामनराव जाधव – 9822653234, विक्रांत श्रीवास्तव (भाईजी) – 9767471309, सचिन लक्कस सर – 9890105589, योगेश मोरे सर – 8080445260 यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे. या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून परिसरातील सर्वधर्मीय नागरिकांनीही या सोहळ्यास उपस्थित राहून नवदांपत्यांना शुभाशीर्वाद द्यावेत, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

- Post by Kishor k Patil Patil2
- सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथे मका गंजीला आग; शेतकऱ्याचे मोठे नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथे शेतातील मक्काच्या गंजीला अचानक आग लागून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमसरी येथील शेतकरी पुंडलिक शामराव बावस्कर यांच्या गट नं. ३१४, क्षेत्र १.३१, शिवना शिवारातील शेतात झाकून ठेवलेल्या मक्काच्या गंजीला दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत गंजीतील मोठ्या प्रमाणात मका जळून खाक झाला असून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत गंजीतील मोठ्या प्रमाणात मका जळून खाक झाला होता. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेमुळे शेतकरी पुंडलिक बावस्कर यांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.1
- संरक्षण जाळी तोडून खोलीत घुसला बिबट्या; वनविभागाने घटनास्थळी भेट देत केला पंचनामा सोयगाव प्रतिनिधी दिलीप मोरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील डाभा परिसरात बिबट्याने हल्ला करून शेतकरी महिलेच्या शेळ्या ठार केल्याची घटना घडली आहे. डाभा येथील शेतकरी कमलबाई रमेश रगड यांची शेती देऊळगाव – सावळदबारा रस्त्यालगत, गट क्रमांक ८२ मध्ये आहे. येथे शेळीपालनासाठी टीन पत्र्यांची खोली बांधून परिसराला संरक्षणासाठी जाळी लावण्यात आली होती. मात्र, सोमवारी (दि. ९ मार्च २०२६) रात्री वन्य प्राणी बिबट्याने संरक्षण जाळी तोडून आत प्रवेश केला आणि ४ बकऱ्या व २ बोकड असे एकूण ६ शेळ्यांना ठार केले. या खोलीमध्ये पार्टिशन जाळी असल्यामुळे इतर काही शेळ्या वाचल्या असल्या तरी या घटनेमुळे शेतकरी महिलेचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना वर्दळीच्या ठिकाणी घडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही महिन्यांपासून या भागात बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, या घटनेची माहिती शेतकऱ्यांनी तत्काळ अजिंठा वन विभागाला दिल्यानंतर सावळदबारा बीटचे अधिकारी प्रवीण गवळी, वनसेवक युसुफ पठाण तसेच पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी पाहणी करून पंचनामा केला असून पुढील कार्यालयीन कार्यवाहीसाठी अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शेळीपालन करून उदरनिर्वाह करणाऱ्या कमलबाई रमेश रगड यांना या घटनेमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा तसेच झालेल्या नुकसानीची त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.1
- रिपोर्टर मुजीब शेख1
- #jalna#marathinews#1
- भोकरदन बस स्थानकामध्ये आलेल्या बसमध्ये एका वृद्ध महिलेची मंगळसूत्र चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहेत1
- मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील हाडाखेड सीमेवर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांविरोधात शिरपूरमध्ये नागरिकांनी अनोखे आंदोलन केले. शिरपूर फर्स्टच्या वतीने महामार्गावरील खड्ड्यात बसून ‘26 लाखांच्या खड्ड्याची सत्यनारायण पूजा’ करून प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला.1
- #marathi#news#jalna#1