आंबेडकर सभागृहाच्या कामाला मुहूर्त कधी? दोन वर्षांनंतरही बांधकाम ठप्प; आरपीआयच्या पाठपुराव्याला यश — ३० टक्के निधी प्राप्त, येत्या आठवड्यात काम सुरू करण्याचे बांधकाम विभागाचे आश्वासन खेड नगरपरिषद हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाच्या बांधकामाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून रखडला आहे. २४ ऑगस्ट २०२४ रोजी या सभागृहाचे भूमिपूजन झाल्यानंतरही प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झालेली नसल्याने नागरिक तसेच आंबेडकरी समाजातून नाराजी व्यक्त होत होती. अखेर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), तालुका खेडच्या पाठपुराव्यानंतर सभागृहाच्या कामासाठी ३० टक्के निधी प्राप्त झाल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली असून, येत्या आठवड्यात प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मा. ना. योगेशदादा कदम यांच्या पुढाकाराने २४ ऑगस्ट २०२४ रोजी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र भूमिपूजनाला दोन वर्षांचा कालावधी होत आला तरी काम सुरू न झाल्याने सभागृह केवळ भूमिपूजनापुरतेच मर्यादित राहणार का, असा सवाल उपस्थित होत होता. या रखडलेल्या कामाबाबत आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे जाब विचारत काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली. सभागृहाच्या कामासाठी निधी उपलब्ध नसल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात येत असल्याने निधीची नेमकी स्थिती काय, याबाबतही आरपीआयने माहिती मागितली. यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सभागृहाच्या कामासाठी ३० टक्के निधी प्राप्त झाल्याचे स्पष्ट केले. तसेच उर्वरित प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून येत्या आठवड्यात प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या कामाला अखेर सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दापोली विधानसभा मतदारसंघात मा. ना. योगेशदादा कदम यांच्या पुढाकारातून विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असून अनेक प्रलंबित कामांना गती मिळत असल्याचे आरपीआयने नमूद केले. मात्र, खेड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे कामही त्याच गतीने मार्गी लागणे आवश्यक असल्याची भूमिका आरपीआयचे युवक कोकण प्रदेश अध्यक्ष सुशांतभाई सकपाळ यांनी मांडली. “योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून मतदारसंघातील अनेक विकासकामांना गती मिळत आहे. त्यांच्या विकासकामांबाबत आमचा सकारात्मक दृष्टिकोन आहे. मात्र खेड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे काम दोन वर्षे प्रलंबित राहणे योग्य नाही. आता बांधकाम विभागाने ३० टक्के निधी प्राप्त झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष काम सुरू झाले पाहिजे,” अशी भूमिका सकपाळ यांनी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह हे खेड शहरातील सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी महत्त्वाचे केंद्र ठरणार असल्याचे आरपीआयने सांगितले. त्यामुळे या सभागृहाचे काम आणखी लांबणीवर पडू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. “भूमिपूजन झाले, आता काम सुरू करण्याची तारीखही प्रशासनाने स्पष्ट करावी. दोन वर्षांपासून काम रखडले आहे. आता ३० टक्के निधी प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले असून येत्या आठवड्यात काम सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. प्रशासनाने दिलेला शब्द पाळून प्रत्यक्ष बांधकाम तातडीने सुरू करावे,” असे सुशांतभाई सकपाळ यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दिलेल्या आश्वासनानुसार येत्या आठवड्यात काम सुरू न झाल्यास आरपीआयच्या वतीने जनतेला सोबत घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. खेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, खेड यांनी सभागृहाच्या कामातील उर्वरित प्रशासकीय आणि तांत्रिक अडथळे तातडीने दूर करून कामाला सुरुवात करावी, अशी मागणी आरपीआयने केली आहे. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मंजूर झालेले सभागृह केवळ भूमिपूजनापुरते मर्यादित राहणे खेडच्या जनतेला मान्य नाही. आता ३० टक्के निधी प्राप्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने दिलेल्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी करून प्रत्यक्ष बांधकाम सुरू करावे,” अशी भूमिका आरपीआय तालुका खेडच्या वतीने घेण्यात आली. निवेदन देताना कोकण प्रदेश सरचिटणीस सी. आर. कांबळे, युवक कोकण प्रदेश अध्यक्ष सुशांतभाई सकपाळ, जिल्हा पर्यावरण अध्यक्ष अॅड. सुरेंद्र तांबे, जिल्हा कोषाध्यक्ष गौतम तांबे, जिल्हा संपर्कप्रमुख गौतम लखू तांबे, तालुका अध्यक्ष बाबाराम पवार, सरचिटणीस जितेंद्र तांबे, कार्याध्यक्ष मिलिंद तांबे, उपाध्यक्ष सखाराम सकपाळ, मोहिराम जाधव, गोपीनाथ जाधव, बाळकृष्ण देवळेकर, सुरेश पवार, कोषाध्यक्ष सुरेश तांबे, संघटक गौतम जाधव, सचिव सुधीर जाधव, प्रवीण जाधव, संघटक सचिव आनंद पवार, युवक अध्यक्ष विकास धुत्रे, जिल्हा युवक संपर्कप्रमुख गणेश शिर्के, अनिल जाधव, राहुल कापसे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आता बांधकाम विभागाने दिलेल्या आश्वासनानुसार येत्या आठवड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होते का, याकडे खेड शहरातील नागरिकांचे आणि आंबेडकरी समाजाचे लक्ष लागले आहे.

- राज्यात 13 हजार नवे शिक्षक, कोणत्या शाळांमध्ये किती पदभरती? Maharashtra Teacher recruitment राज्याला आता 13 हजार नवे शिक्षक मिळालेत... पवित्र प्रणालीद्वारे राबवलेल्या शिक्षक भरतीमध्ये मुलाखतीविना 13 हजार 119 उमेदवारांची निवड करण्यात आलीय... यात सर्वाधिक 8 हजार 481 उमेदवार हे जिल्हा परिषद शाळांसाठी निवडलेत... कागदपत्र पडताळणीनंतर या सर्व पात्र उमेदवारांना लवकरात लवकर सेवेत रुजू करून घेतलं जाणार आहे... Maharashtra is set to get 13,000 new teachers, with the highest number of 8,481 appointments expected in Zilla Parishad schools. The recruitment drive is aimed at strengthening the teaching workforce and addressing vacancies across schools in the state. The development is significant for teacher recruitment aspirants and the education sector in Maharashtra. Maharashtra teacher recruitment, Maharashtra teacher vacancy, 13000 teacher recruitment, 8481 Zilla Parishad teachers, ZP teacher recruitment, Maharashtra teacher jobs, teacher recruitment 2026, Maharashtra education news, government teacher jobs, teacher vacancy Maharashtra, Zilla Parishad teacher recruitment, Maharashtra teacher bharti, teacher bharti latest news, education department Maharashtra, teaching jobs Maharashtra, government jobs Maharashtra, teacher recruitment update, Maharashtra latest news, Shuru news today's.1
- मेफेड्रॉन (एम.डी.) विक्रेत्यावर मार्केटयार्ड पोलिसांची धडक कारवाई; २५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त, एक जण अटक1
- नवी दिल्ली : Zee News चे संस्थापक सुभाष चंद्रा यांच्या कर्जासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्टर मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. या पोस्टरमध्ये सुभाष चंद्रा यांच्यावर २२ हजार कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा दावा करण्यात आला आहे. Zee News संस्थापक सुभाष चंद्रा यांच्या कर्जाबाबत मोठा दावा; चर्चेला उधाण नवी दिल्ली : Zee News चे संस्थापक सुभाष चंद्रा यांच्या कर्जासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्टर मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. या पोस्टरमध्ये सुभाष चंद्रा यांच्यावर २२ हजार कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा दावा करण्यात आला आहे. पोस्टरमध्ये पुढे दावा करण्यात आला आहे की, त्यातील केवळ ६.५ हजार कोटी रुपयेच फेडायचे असून उर्वरित कर्ज माफ करण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच सरकारने केलेल्या कथित कर्जमाफीची भरपाई कोण करणार, असा सवालही पोस्टरमधून उपस्थित करण्यात आला आहे. या दाव्यामुळे सामान्य जनता, शेतकरी आणि कर्जबाधित नागरिकांमध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे. विशेषतः सर्वसामान्य नागरिकांना कर्जफेडीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असताना मोठ्या उद्योगसमूहांच्या कर्जाबाबत असे दावे समोर येत असल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, सोशल मीडियावरील या पोस्टरमधील २२ हजार कोटींचे कर्ज आणि कर्जमाफीचे दावे अधिकृत कागदपत्रे किंवा विश्वसनीय स्रोतांच्या आधारे स्वतंत्रपणे पडताळणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावरील माहिती शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता तपासावी.1
- १५ कोटींचा खर्च, तरी जिल्हा रुग्णालयाची‘नस’ नाजूकच! आग, स्लॅब अन् ५१ टक्के रिक्त पदे; दुर्घटनांचे इशारे मिळूनही ‘सेफ्टी सिस्टम’ अपूर्णच रायगड : रायगड जिल्ह्यातील हजारो रुग्णांसाठी आधारवड असलेल्या अलिबागच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या १३ वर्षांत रुग्णालयावर जवळपास १५ कोटी रुपये खर्च करण्यात आले असतानाही रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था आणि मनुष्यबळाची स्थिती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. एकीकडे रुग्णालयाच्या विद्युत सुरक्षेचे ऑडिट झाले आहे की नाही, याबाबत स्पष्टता नाही, तर दुसरीकडे मंजूर १९४ पदांपैकी तब्बल ९९ पदे रिक्त आहेत. त्यामुळे ‘कोट्यवधींचा खर्च, तरी सिव्हिलची नाडी कमकुवतच’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. आयसीयू, ऑपरेशन थिएटर, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन यंत्रणा तसेच विविध अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे अखंड वीजपुरवठ्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे विद्युत यंत्रणेची सुरक्षितता ही रुग्णालयासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मात्र, या यंत्रणेचे नियमित विद्युत ऑडिट झाले आहे का, शेवटची तपासणी कधी झाली आणि त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्यात आल्या का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. दुर्घटनांचे इशारे; तरी प्रशासन सुस्त? सिव्हिल रुग्णालयात सुरक्षेच्या प्रश्नावर यापूर्वीही धोक्याचे इशारे मिळाले आहेत. ऑगस्ट २०२१ मध्ये रुग्णालयातील अपंग विभागात शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. त्यानंतर जून २०२६ मध्ये रुग्णालयातील स्लॅब कोसळण्याची घटना घडली. तसेच २०२४ मध्ये अलिबाग नगरपालिकेने धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्या होत्या. त्यामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचाही समावेश होता. या घटनांनंतरही रुग्णालयाच्या सुरक्षेचे सर्वंकष परीक्षण झाले आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. विशेषतः २४ ऑगस्ट रोजी अमरावती जिल्हा महिला रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागात आग लागून तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यातील रुग्णालयांच्या विद्युत आणि अग्निसुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर अलिबाग सिव्हिलचे विद्युत ऑडिट तातडीने करण्यात यावे, अशी मागणी शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केली आहे. सिव्हिलमध्ये ५१ टक्के पदे रिक्त रुग्णालयाच्या सुरक्षेबरोबरच मनुष्यबळाची कमतरताही गंभीर समस्या बनली आहे. विविध संवर्गातील १९४ मंजूर पदांपैकी केवळ ९५ पदे भरलेली असून तब्बल ९९ पदे रिक्त आहेत. म्हणजेच रुग्णालयातील सुमारे ५१ टक्के पदांवर कर्मचारीच उपलब्ध नाहीत. तज्ज्ञ डॉक्टरांची ४२ पदे मंजूर असताना केवळ १६ पदे भरलेली असून २६ पदे रिक्त आहेत. अधिपरिचारिकांच्या ९६ मंजूर पदांपैकी ५५ पदे भरलेली असून ४१ पदे रिक्त आहेत. सिस्टर ट्यूटरची १३, क्लिनिकल इन्स्ट्रक्टरची दोन, कनिष्ठ लिपिकाची चार आणि नेत्रचिकित्सा अधिकाऱ्याचे एक पद रिक्त आहे. मनोविकृती परिचारिका, वरिष्ठ लिपिक आणि इतर संवर्गातीलही पदे रिक्त आहेत. रुग्णसेवेवर परिणामाची शक्यता मोठ्या प्रमाणातील रिक्त पदांमुळे उपलब्ध डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. परिणामी रुग्णसेवेची गुणवत्ता, उपचारांची उपलब्धता आणि आपत्कालीन परिस्थितीतील प्रतिसादक्षमता यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे रुग्णालयावर कोट्यवधींचा खर्च होत असतानाही सुरक्षा आणि मनुष्यबळाच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. ‘सेफ्टी सिस्टम’ पूर्ण करण्याची मागणी रुग्णालयातील विद्युत, अग्निसुरक्षा आणि इमारतीची सुरक्षितता यांचे तातडीने सर्वंकष ऑडिट करून धोकादायक बाबी दूर कराव्यात. तसेच ९९ रिक्त पदे भरण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणी होत आहे. दुर्घटना घडल्यानंतर चौकशी आणि पंचनामे करण्यापेक्षा दुर्घटना टाळण्यासाठी आधीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे १५ कोटींच्या खर्चानंतरही सिव्हिलची ‘नाडी’ कमकुवत का राहिली, याचे उत्तर प्रशासनाने देण्याची वेळ आली आहे. यावेळी शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील, नगर सेवक अनिल चोपडा, अश्विनी ठोसर, सामाजिक कार्यकर्ते सागर पेरेकर, भावेश पेरेकर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा रुग्णालय प्रशासन यांना कल्पना देऊन सुद्धा त्यांचे कोणतेही अधिकारी कर्मचारी उपस्थित नव्हते.4
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यातील तब्बल 53 हजार बहिणींना योजनेचा हप्ता मिळाला नसल्याची माहिती आहे. Ladki Bahin Rakshbandhan Gift Miss Update | राज्यातील 53 हजार बहिणींची ओवाळणी हुकली | Zee24Taas मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यातील तब्बल 53 हजार बहिणींना योजनेचा हप्ता मिळाला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या काळात या महिलांची ओवाळणी हुकली आहे. या महिलांना पैसे का मिळाले नाहीत? प्रलंबित हप्ता कधी मिळणार? पाहा संपूर्ण अपडेट फक्त shuru news app1
- हुंडाबळीने पुन्हा पिंपरी-चिंचवड हादरलं; शिल्पाच्या मृत्यूने दोन मुलं पोरकी... पिंपरी चिंचवड : हुंडाबळीच्या घटनांनी पिंपरी-चिंचवड पुन्हा हादरलंय. वैष्णवी हगवणे यांच्यानंतर आता शिल्पा गवारे यांच्या मृत्यूने कलाटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.सतरा वर्षांचा संसार, दोन मुलं आणि शिल्पाच्या मृत्यूने कुटुंबाची वाताहत झालीये. शिल्पाचा पती सचिन, सासरे उत्तम, सासू संजीवनी आणि दीर संदीप यांनी हुंड्यासाठी आणि पैशांसाठी शिल्पाचा छळ केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.दोन एकर जमीन, व्यवसायासाठी मदत आणि लाखो रुपयांची रोकड देऊनही छळ थांबला नाही, असा दावा शिल्पाच्या माहेरच्यांनी केलाय. शिल्पाला माहेरी परतण्याची विनंतीही कुटुंबीयांनी केली होती. मात्र संसार टिकवण्यासाठी ती सासरीच राहिली.अखेर शिल्पाचा मृत्यू झाला. हा आत्महत्येचा प्रकार नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी केलाय. याप्रकरणी वाकड पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करून पतीसह चौघांना अटक केलीये... रतन कलाटे – शिल्पाची आई गुलाब कलाटे – शिल्पाचे वडील संतोष कलाटे – शिल्पाचे मोठे बंधू #BreakingNews #MarathiNews #MaharashtraNews #CrimeNews #TheNayakNews #PuneNews #PCMCNews #Dowry #WomenSafety #Justice1
- वाकडमध्ये हुंडाबळीचा धक्कादायक आरोप; शिल्पा गवारे यांचं टोकाचं पाऊल, भाऊ संतोष कलाटेंचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश!1
- निगडीत चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा मृत्यू; एकाच ठिकाणी पाच बळी..! पिंपरी चिंचवड : निगडी प्राधिकरणात चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमोल शिंदे आणि मनोज शिंदे अशी मृतांची नावे आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास लोकमान्य हॉस्पिटलजवळ ही घटना घडली. चेंबरच्या स्वच्छतेसाठी उतरलेले दोन्ही कामगार त्यात अडकले. माहिती मिळताच अग्निशमन दलाने रेस्क्यू करून त्यांना रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.विशेष म्हणजे, याच मॅनहोलमध्ये वर्षभरापूर्वी स्वच्छतेचे काम करताना बीएसएनएलच्या तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे एकाच ठिकाणी दोन दुर्घटनांमध्ये आतापर्यंत पाच कामगारांचा बळी गेला आहे. वारंवार दुर्घटना होऊनही सुरक्षेच्या उपाययोजना का केल्या जात नाहीत? आणखी किती जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार? असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे... #निगडी #पिंपरीचिंचवड #चेंबरदुर्घटना #कामगारमृत्यू #निगडीप्राधिकरण #मॅनहोल #कामगारसुरक्षा #अग्निशमनदल #रेस्क्यूऑपरेशन #दुर्दैवीघटना #BSNLकामगार #पिंपरीचिंचवडबातम्या #पुणेबातम्या #कामगारांचासुरक्षितता #प्रशासनाचानिषेध #TheNayakNews #BreakingNews #PimpriChinchwad #Nigdi #WorkerDeath1
- पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ! आईवर हल्ला, कुशीतलं एक वर्षाचं बाळ रस्त्यावर कोसळलं; थरारक घटना CCTV मध्ये कैद1